लव्ह इन ट्रबल भाग- १०

Submitted by स्वरांगी on 13 June, 2019 - 11:36

लव्ह इन ट्रबल भाग- 10

पायातले बूट आपटत आपटत एक तरुण जिना चढत होता..तो अनुच्या ऑफिस समोर आला…त्याने सराईतपणे ऑफिसचं दार उघडलं आणि तो आत घुसला…हातात ग्लोव्हज आणि तोंडावर मास्क अशा अवतारात तो सगळी खोली निरखून पाहत होता.. तो टेबलपाशी आला..त्याने त्याच्या हातातला गिफ्ट पॅक केलेला बॉक्स टेबलवर ठेवला आणि अनुच्या खुर्चीत जाऊन बसला…इकडचे तिकडचे ड्रॉवर उघडून पाहू लागला…त्यात त्याला एक फाईल सापडली…त्यात शुभमच्या खुनाचा पूर्ण तपशील होता..हत्यारांचे फोटो, त्याखाली लिहिलेली माहिती,अनुने सुरू केलेला तपास सगळं त्याने त्या अंधुक उजेडातही पाहिलं.. तोच बाहेरून पायऱ्या चढण्याचा आवाज आला आणि तो झटकन तिथून उठून दाराआड लपला…
अनु दरवाजा उघडून आत आली आणि खुर्चीत बसून रडू लागली...थोड्या वेळाने ती रडायची थांबली आणि तीच लक्ष टेबलवर ठेवलेल्या बॉक्सकडे गेलं..तिने आश्चर्याने तो बॉक्स उघडला..आतलं पोस्टर बाहेर काढलं..ते उलट सुलट करून पाहिलं..त्याच्या मागे लिहिलं होतं..
“ If you are keep looking for me, I will find you first!!”
अनुने ते वाचलं आणि तिच्या डोळ्यासमोरून झरझर सगळे प्रसंग गेले..सायकलवरची ती व्यक्ती, शुभमची डेड बॉडी, कोर्टात ऐकू आलेलं गाणं अगदी सगळं तिला आठवलं..आणि तिच्या अंगावर काटा आला..
“ याचाच अर्थ तो माझ्यावर लक्ष ठेऊन आहे!!!” अनु मनातच म्हणाली..
अभिजित घरी निघाला होता..मगाशी अनु जे त्याला बोलली, त्याचाच विचार तो करत होता..
“ नक्की काय म्हणायचं होतं तुला अनघा?!!” अभिजित डोकं खाजवत स्वतःशीच म्हणाला..त्याने शेजारच्या सीटवर पाहिलं..अनु तिचं वॉलेट गाडीतच विसरून गेली होती… टॅक्सी करून घरी येणार म्हणून तिने ते हातात काढून ठेवलं..ते हातातच राहिलं आणि गाडीतून उतरताना सीटवर राहिलं…त्याने अनुला कॉल केला…
अनु घाबरूनच इकडे तिकडे पाहात होती..या खोलीत तो खुनी येऊन गेला आणि तो आपल्यावर पाळत ठेऊन आहे या विचाराने ती प्रचंड घाबरली होती..तोच तिथल्या शांततेचा भंग करत मोठ्याने तिच्या मोबाईलची रिंग वाजली…अचानक झालेल्या मोठ्या आवाजाने ती दचकली..तिने थरथरत्या हातानेच कॉल रिसिव्ह करून मोबाइल कानाला लावला…
“ हॅलो.. अनघा,तू तुझं वॉलेट गाडीतच…” अभिजित बोलणार एवढ्यात त्याचं बोलणं थांबवत अनु म्हणाली..
“ सर!! माझ्या ऑफिसमध्ये, कुणीतरी आलं होतं…” अनु दबक्या आवाजात म्हणाली..
“ काय??” अभिजीतने विचारलं..
“ सर..माझ्या ऑफिसमध्ये तो आला होता!!! शुभमचा खुनी!!!” अनु उदगारली..
तिचं हे वाक्य ऐकून दाराआड लपलेला तो तरुण सावध झाला..मगाचपासून तिच्या चेहऱ्यावरचे झरझर बदलणारे भाव तो त्या अंधारातही टिपत होता…
“ काय म्हणालीस तू अनघा?? कोण आलं होतं तुझ्या ऑफिसमध्ये??” अभिजित चक्रावला…
तोच अनुला ऑफिसमध्ये दाराआड कुणाचीतरी चाहूल लागली…तिचा चेहरा भीतीने ग्रासला होता…आपलं इथलं अस्तित्व तिच्या लक्षात आलय हे त्याला कळलं आणि तो घोगऱ्या आवाजात म्हणाला..
“ If you are keep looking for me, I will find you first!!!”
अनुचं हृदय आता खूप जोरात धडधडत होतं…अभिजित फोनवर होता..
“ तो अजूनही इथेच आहे!!!” अनु सावकाशपणे एक एक शब्द उच्चारात म्हणाली..आणि तिने घाबरत घाबरतच सावकाश मान वळवून दाराच्या दिशेने पाहिलं…तोवर त्याने दार उघडलं होतं आणि तो डोळ्यांच्या कोपऱ्यातून अनुकडे पाहत होता…
“ हे बघ अनु तू अत्ता काहीही अविचार करू नको!!” अभिजित अनुला समाजावत म्हणाला..पण तिचं त्याच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं..आत्तापर्यंत त्याने दाराच्या बाहेर पाऊल ठेवलं होतं..आणि दार बंद करून तो निघाला..
“ मी लगेचंच तिथे पोचतोय!! तू तिथेच…” अभिजितचं बोलणं पूर्ण न ऐकता तिने मोबाइल धाडकन टेबलावर ठेवला आणि त्याला पकडायला त्याच्या मागे धावली…
“ हॅलो!!! हॅलो!!!” अभिजितने जोरजोरात बोलून अनु ऐकतेय की नाही ते पाहिलं..पण समोरून आवाज न आल्याने त्याने जोरात स्टेररिंग फिरवून यु टर्न मारला आणि तो वेगाने अनुकडे निघाला…
अनु धावतच दार उघडून त्याला पकडायला गेली..तो पॅसेजच्या टोकालाच पोहोचला होता तोच अनुने हाक मारून त्याला थांबवलं..
“ एक मिनिट!! तूच ना तो?? शुभमचा खुनी??” अनुने विचारलं..त्याने तिरकी मान करून मागे पाहिलं आणि धडाधड जिने उतरू लागला..त्याला पाहून अनुही त्याच्या मागे धडाधड जिने उतरू लागली.. इकडे अभिजित अस्वस्थ होऊन फुल्ल स्पीडने गाडी चालवत होता..कधी एकदा पोचतोय अस झालेलं त्याला…इकडे अनु त्याच्या मागेच खाली उतरून रस्त्यावर आली..पण तो गायब झाला होता… रस्त्यावर अजूनही रहदारी होती..तिने चारही दिशांना पाहिलं..चारही बाजूला माणसं येत जात होती…तो कुठे गायब झाला अनुला कळलंच नाही..अनु सगळीकडे पुन्हा पुन्हा पाहत होती..ती आता सैरभैर झाली होती…तोच जोरात ब्रेक दाबत अभिजितने गाडी थांबवली… कारमधून उतरून धावतच तो तिच्याकडे निघाला…
“ अनु!!! अनु,तू ठीक आहेस ना?!!!” अभिजीतने अनुचा हात धरून तिला काळजीने विचारलं…अनुने अभिजीतकडे पाहिलं..पण अजूनही तिची नजर खुनीला शोधत होती..
“ अनु!!मी विचारतोय ठीक आहेस ना तू??तुला काही झालं तर नाही ना??” अभिजीतने आता अनुचे खांदे पकडून तिला भानावर आणत विचारलं…
“ माझ्या समोर आला होता तो!! पण मी नाही पकडू शकले त्याला.. माझ्या डोळ्यासमोरून गायब झाला तो!! चिडचीड होतेय माझी खूप!!!” अनु वैतागुन म्हणाली…अभिजितने तिच्याकडे पाहिलं..तिच्या चेहऱ्यावर,त्याला पकडण्यासाठी असलेली तळमळ स्पष्ट दिसत होती.. तिच्या डोळ्यांत पाणी तरळलं होतं..हताशपणे तिने खाली मान घातली…

“ आता खूप रात्र झालीय!!” झेंडे म्हणाले..
“ पण तरीही मी फॉरेन्सिक डिपार्टमेंटला कॉल करू का?? झेंडे मिश्किल हसत म्हणाले..अनुसाठी अजूनही अभिजित एवढं करतोय म्हटल्यावर त्यांना गंमत वाटंत होती..
“ हो लगेचच कॉल करा त्यांना..” अभिजीत म्हणाला..तो आणि अनु आत्ता ऑफिसमध्ये येऊन काय करावं याबद्दल विचार करत होते..काही एक ठरवून अभिजितने झेंडेना फोन लावला होता..
“ बाय द वे, तुम्हाला खात्री आहे का की तो खुनीच होता?!!” झेंडे म्हणाले..अभिजित इकडे तिकडे फेऱ्या मारत त्यांच्याशी बोलत होता..ते काय बोलतायत हे ऐकावं म्हणून अनुने अभिजीतच्या हातातल्या मोबाईलला कान लावला आणि तीही त्याच्याबरोबर तशीच अवघडून चालत होती…
“ हो!! नक्की तोच असला पाहिजे” अभिजीत टेबलवर बसत म्हणाला..
“ पण तुम्ही तर ती केस केव्हाच सोडलीय ना!! मग आता कशाला तुम्ही यात पडताय??” झेंडे म्हणाले..
“ तुम्ही मला चिडवणं बंद करा आता आणि ठेवा फोन!!” अभिजित एवढ्या जोरात खेकसला की अनु दचकून बाजूला झाली..अनुने अभिजीतकडे पाहिलं आणि त्याला खांद्याला धरून बाजूला केलं..

“ काय चाललंय तुझं??” अभिजितने वैतागुन विचारलं..
“ ते टेबलावर त्या खुनीचे फिंगरप्रिंट असतील ना!! आणि तुम्ही त्यावरच बसला होता म्हणून तुम्हाला बाजूला केलं..बरं..काय म्हणाले झेंडे सर?? फॉरेन्सिक डिपार्टमेंटमधून कुणी येणारे का??” अनुने विचारलं…
“ नाही माहीत मला..” अभिजित वैतागुन म्हणाला..
“ अभिजित अजूनही या केसमध्ये गुंतलाय तर!!!” झेंडे स्वतःशीच म्हणाले…

“मी ऑफिसवरून अशी सावकाश नजर फिरवली…आणि मला वाटलं..वाटलं की..म्हणजे असं शब्दात सांगणं कठीण आहे.. पण मला असं वाटलं की कुणीतरी आपल्या ऑफिसमध्ये आहे.. ह्या विचारानेच माझ्या अंगावर शहारे आले!!! तोच कर्रर्रर्रर्र आवाज करत दरवाजा वाजला…मी सावकाश मान वळवत तिकडे पाहिलं…तर तो माझ्याकडे एकदा बघून दरवाजा लावून बाहेर पडला..मी अक्षरशः तिथेच बेशुद्ध पडणार होते पण मी स्वतःला कसंबसं सावरून धीर एकवटला..आणि धावत त्याला पकडायला गेले!!” अभिजित मक्ख तोंड करून तिच्याकडे पाहत होता..
“ पण तो गर्दीचा फायदा घेऊन माझ्या हातून निसटला..एवढ्या रात्रीही खूप माणसं होती आज खाली..एवढ्या माणसात त्याला कसं शोधायचं या विचाराने मी पूर्ण गोंधळून गेले!!! सगळी माणसं एकसारखीच वाटायला लागली मला!!!मी चारही बाजूंना त्याला शोधत होते पण कुठेच सापडला नाही तो!!!अभिजित अजूनही त्याच चेहऱ्याने तिच्याकडे पाहत होता..
“ मला तर एकदा वाटलं त्याने मागून येऊन माझ्या डोक्यात दगड घातला तर!!! किंवा चाकू घेऊन माझ्या पोटात खुपसला तर!!! मी जोक नाही मारत आहे!!” अनु म्हणाली…
“माहितेय मला तू जोक नाही मारत आहेस..पण तुझ्याकडे पाहून तसंच वाटतंय!! खूप excite झालीयस तू आत्ता!!” आत्ता अभिजीतने तोंड उघडलं…
“ मी ?? Excite झाल्यासारखी वाटतेय का??” अनुने गोंधळून विचारलं…
“ तुला जरा तरी कल्पना आहे का की तू काही वेळापूर्वी कोणत्या situation मध्ये होतीस?? किती dangerous होतं हे सगळं??” एक एक पाऊल टाकत अभिजित तिच्या दिशेने येऊ लागला.. अनु त्याला पुढे येताना बघून मागे सरकू लागली..
“ तुला कळतंय का??जेव्हा तू कसलाही विचार न करता त्याच्या मागे गेलीस तेव्हा तो तुला किती seriously injure करू शकत होता?? आणि हे सगळं तू मला अशा प्रकारे सांगतेयस की जसं काही तू थ्रिलर मूवी बघून आलीयस…” आता अनुला मागे सरकायला जागा नव्हती…
“ तुम्ही हे सगळं बोलताय कारण तुम्हाला माझी काळजी आहे.. बरोबर?” अनुने विचारलं..तिचा चेहरा आता खुलला होता…
“ ऑफ कोर्स!!” अभिजित म्हणाला..अनुने हसून मान खाली घातली..
“ तुझ्याजागी दुसरं कुणीही असतं तरी मला तेवढीच काळजी वाटली असती..” अभिजितने explain केलं..
“ हम्म.. right..” अनु शांतपणे म्हणाली..आणि ती अभिजितकडे पाहू लागली…
“ हम्म..” अभिजितने काहीतरी रिप्लाय द्यायचा म्हणून दिला…
“ अचानक तो खुनी समोर आल्यामुळे मी जे प्रॉमिस स्वतःला केलं होतं ते मी विसरूनच गेले…अभिजितला like न करण्याचं प्रॉमिस!! त्याला पूर्णपणे विसरून जायचं प्रॉमिस!!” अनु अभिजीतकडे एकटक पाहत मनातल्या मनात म्हणाली..अभिजीतही तिच्याकडे पहात होता…
“ काय!!अशी काय बघतेयस माझ्याकडे एकटक??” अभिजितने विचारलं..
“ जागी हो!!!” अनु स्वतःच स्वतःच्या डोक्यावर टपली मारत जोरात म्हणाली…
“ ?????” अभिजितने प्रश्नार्थक चेहऱ्याने तिच्याकडे पाहिलं…
“ काही नाही..मी स्वतःशीच बोलत होते..” असं म्हणून अनु अभिजितची नजर चुकवत तिथून बाजूला झाली…
“ तुम्ही मगाशी म्हणालात ना सर!! की मी खूप excite झाले होते!!! का नाही होणार?? इतके दिवस ज्या माणसाला मी शोधतेय तोच खुनी माणूस आज एवढ्या दिवसांनी माझ्यासमोर आला होता..माझ्यासाठी खूप चांगला चान्स होता हा स्वतःला निर्दोष सिद्ध करायचा…” अनु म्हणाली..
“ पण त्यात तुझा जीव गेला असता!!” अभिजित म्हणाला..
“ ते परवडलं असतं मला त्यापेक्षा..” अनु गंभीरपणे म्हणाली..
“ काय बोलतेयस तू हे??” अभिजीतने न राहवून विचारलं…
“ माझे दिवसच सध्या इतके खराब आहेत की मरणं पसंत केलं असतं मी..” अनु कंटाळून म्हणाली..
“ आपल्या आयुष्यात खूप चढ उतार येत असतात..पण म्हणून कुणी लगेच मरणाची भाषा करत नाही!!” अभिजित म्हणाला…
“ हो!! येतात ना!!! पण मला एक सामान्य माणसाचं आयुष्य जगायचं होतं..तेही नीट जगता येत नाहीये..माझ्या ऑफिसची कंडिशन बघा..बँक बॅलन्स संपत चाललाय..पैसे कमावण्यासाठी मी जॉबसुद्धा शोधत होते पण qualification असूनही मला जॉब नाही मिळाला…का??? कारण लोकांच्या नजरेत मी अजूनही खुनी आहे!!!” अनु सगळं एक दमात बोलून गेली…
“ माझी आई सगळं ठीक असल्याचं भासवत असते मला..तिचं दुःख ती कधीच बोलून नाही दाखवत..माझ्यासोबत असताना खूप आनंदी असल्याचं दाखवते..पण मी तिच्यासोबत नसताना ती खूप वेळा रडलीय!! कारण तिच्या मुलीवर झालेले आरोप तिला सहन होत नाहीत..” आता अनुचा आवाज कापरा झाला होता..डोळ्यांत पाणी आलं होतं..अभिजित गंभीरपणे तिच्याकडे पाहत होता…
“ त्यामुळेच काहीही झालं तरी मला ही केस solve करायलाच हवी…फक्त माझ्यासाठीच नाही तर माझ्या आईसाठी आणि तुमच्यासाठीसुद्धा!!! कारण माझ्याचमुळे तुम्हाला तुमचं ऑफिस गमवावं लागलं…” अनु अभिजीतकडे निर्धाराने पहात म्हणाली…
“ त्यामुळे आत्ता खुनी माझ्यासमोर आला हे एका अर्थी चांगलंच झालं..”अनु सुस्कारा सोडत म्हणाली..अभिजितने यावर होकारार्थी मान हलवली…
“ हम्म..काहीही करून त्याला पकडायलाच हवं.. आपण मिळुन पकडू…” अभिजित अनुची नजर चुकवत म्हणाला..
“हम्म??” अनुने आश्चर्याने विचारलं..
“ मी म्हणालो आपण दोघं मिळून पकडू त्याला!!” अभिजित अनुकडे पाहत ठामपणे म्हणाला…
“ चल, निघुया आता..” अभिजित दाराकडे जात म्हणाला..
“एक..एक..मिनिट!! कुठे जातोय आपण?!!” अनुने गोंधळून विचारलं…
“ घरी!! तुला तुझ्या घरी सोडतो!!” अभिजित म्हणाला..
“ सध्या..हेच माझं घर आहे..” अनु कसंनुसं हसत म्हणाली…अभिजीतचा चेहरा बघण्यासारखा झाला होता..

अभिजित आणि अनु आत्ता अभिजीतच्या बंगल्यासमोर उभे होते..अनुच्या हातात मोठी बॅग होती…पूर्ण बंगल्यावर नजर फिरवत अनुने सुस्कारा सोडला…
“ येतेयस ना आत?? “ गेटजवळ जात अभिजित म्हणाला...
“ तुम्ही मला इकडे यायची एवढी विनंती केलीत तर मी येणारच ना!!”
“ काय?? मी कधी तुला विनंती केली माझ्या घरी चल म्हणून?!!” अभिजित आश्चर्याने म्हणाला..
“ मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं ,की मी तुमच्यापासून चार हात लांबच राहीन.. पण तुम्ही म्हणालात, या अशा dangerous ठिकाणी मी तुला एकटीला सोडून जाऊ शकत नाही!!” अनुने त्याच्या आवाजात acting करून दाखवली..
“ व्हॉट नॉनसेन्स?!! मी कधी असं म्हणालो तुला??” अभिजित आश्चर्याने म्हणाला..
“ तुम्हीच तर मला इनसिस्ट केलं इकडे यायला!! आणि घेऊन आलात इकडे..” अनु म्हणाली..
“ तुला असं नाही वाटत?? की तू काहीही बरळतेयस!!!” अभिजित कंटाळून म्हणाला..
“ So..आता इथून पुढे जे काही होईल त्याला मी responsible नसेन..” असं म्हणून अनु गेटमधून आत शिरू लागली..
“ म्हणजे?? नक्की काय म्हणायचंय तुला??” अभिजितने गोंधळून विचारलं..आणि तोही तिच्या मागोमाग आत शिरला..

क्रमशः

Group content visibility: 
Use group defaults

लव्ह इन ट्रबल भाग- ९
https://www.maayboli.com/node/70153
लव्ह इन ट्रबल भाग- 8
https://www.maayboli.com/node/70118
लव्ह इन ट्रबल भाग- ७
https://www.maayboli.com/node/70025
लव्ह इन ट्रबल भाग- ६
https://www.maayboli.com/node/69994
लव्ह इन ट्रबल भाग- ५
https://www.maayboli.com/node/69974
लव्ह इन ट्रबल भाग- ४
https://www.maayboli.com/node/69957
लव्ह इन ट्रबल भाग- ३
https://www.maayboli.com/node/69948
लव्ह इन ट्रबल भाग- २
https://www.maayboli.com/node/69937
लव्ह इन ट्रबल भाग- १
https://www.maayboli.com/node/69925