Submitted by mi manasi on 6 June, 2019 - 00:38
“भेटीगाठी”
अशाच येती भेटीगाठी ...
गतजन्मीची घेऊनी नाती
मित्र म्हणा वा म्हणा सोबती
ओळख ती ती आतापुरती llधृll
कितीक असुनी अवतीभवती
चारांचीच मग होते गणती
अंतरातले प्रेम नांदते
विश्वासाच्या बांधून भिंती ll१llअशाच येती भेटीगाठी ...
झुरणे मरणे नाही वायदे
इथे न कसले नियम कायदे
प्रेमच भाषा प्रेमच मनीषा
प्रेमच केवळ आदी अंती ll२llअशाच येती भेटीगाठी ...
खेळ चालतो असा निरंतर
कुणी हरवती कुणा शोधती
हरवणेच परी उरते नंतर
शोधशोधुनि भेटीअंती ll३llअशाच येती भेटीगाठी ...
....मी मानसी
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुरेख लिहिलंय!..पु.ले.शु!
सुरेख लिहिलंय!..पु.ले.शु!
छान.!
छान.!
आवडली ,दु:खाची किनार प्रत्येक
आवडली ,दु:खाची किनार प्रत्येक कडव्याला आहे
अप्रतिम
अप्रतिम
आवडली पुलेशु
आवडली पुलेशु
कविता आवडली, पुभाप्र!!!
कविता आवडली, पुभाप्र!!!
मित्रांनो धन्यवाद !
मित्रांनो धन्यवाद !
सांकेतीक भाषा अजून समजलेली नाही. शोधतेय.
लोभ असावा ...
छान आहे कविता!
छान आहे कविता!
पुलेशु - पुढील लेखनास
पुलेशु - पुढील लेखनास शुभेच्छा!
पुभाप्र - पुढील भागाच्या प्रतीक्षेत
इथे पुढील कवितेच्या प्रतीक्षेत असा अर्थ घ्यावा!
अज्ञातवासी .. तसदीबद्धल आभारी
अज्ञातवासी .. तसदीबद्धल आभारी आहे.
."तू" वाचलीत का?
आता पुढच्या आठवड्यात येईन.
सुरेख! मस्त जमली आहे.
सुरेख! मस्त जमली आहे.
प्रांजली, शाली धन्यवाद...
प्रांजली, शाली धन्यवाद... अजून प्रतिक्रिया type करणं जमत नाहीय.. शिकेन लवकरच.
किती मस्त, एक लय आहे तुझ्या
किती मस्त, एक लय आहे तुझ्या कवितेला.