“भेटीगाठी”

Submitted by mi manasi on 6 June, 2019 - 00:38

“भेटीगाठी”

अशाच येती भेटीगाठी ...
गतजन्मीची घेऊनी नाती
मित्र म्हणा वा म्हणा सोबती
ओळख ती ती आतापुरती llधृll

कितीक असुनी अवतीभवती
चारांचीच मग होते गणती
अंतरातले प्रेम नांदते
विश्वासाच्या बांधून भिंती ll१llअशाच येती भेटीगाठी ...

झुरणे मरणे नाही वायदे
इथे न कसले नियम कायदे
प्रेमच भाषा प्रेमच मनीषा
प्रेमच केवळ आदी अंती ll२llअशाच येती भेटीगाठी ...

खेळ चालतो असा निरंतर
कुणी हरवती कुणा शोधती
हरवणेच परी उरते नंतर
शोधशोधुनि भेटीअंती ll३llअशाच येती भेटीगाठी ...
....मी मानसी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मित्रांनो धन्यवाद !
सांकेतीक भाषा अजून समजलेली नाही. शोधतेय.
लोभ असावा ...

पुलेशु - पुढील लेखनास शुभेच्छा!
पुभाप्र - पुढील भागाच्या प्रतीक्षेत
इथे पुढील कवितेच्या प्रतीक्षेत असा अर्थ घ्यावा!