Submitted by सिद्धेश्वर विला... on 4 June, 2019 - 07:25
मी पण अमिताभ बनलो असतो भाय
पण आपल्याला रोलच कधी मिळाला न्हाय
" अय साला " करून, डिट्टो करतो हाणामारी
स्टाईल आपली बघून येड्या होतात साऱ्या पोरी
बिग बी ची ऍक्टिंग म्हणजे खाऊ वाटलं काय
उंची सोडली तर बाकी इथं सर्व ठीक हाय
मी पण अमिताभ बनलो असतो भाय
पण साला तसा रोलंच मिळाला न्हाय
शहेनशहा बनुन बाहेर पडलो एका काळ्याभोर रात्री
चमकणारा हात बघून लागली भरपूर मागे कुत्री
लटपट लटपट धावत होतो जणू अग्निपथावरती
जंजीर धरुनी दिवार चढलो मग पडलो तोंडावरती
तोंड फुटुनी पार सुजले , आला गळ्यात माझ्या पाय
मी पण अमिताभ बनलो असतो भाय
पण काय करू , आता पाय गळ्यात आलाय भाय
नायतर नक्की बनलो असतो बिग बी भाय
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
भरीये...
मस्त लिहिता.. आता नेहमीची
मस्त लिहिता.. आता नेहमीची खासियत असलेल्या पण लिहा
एकच नंबर.
-
मस्त लिहिता.. आता नेहमीची
मस्त लिहिता.. आता नेहमीची खासियत असलेल्या पण लिहा >>>>
प्रतिसाद देणार्यांचे अनेक
प्रतिसाद देणार्यांचे अनेक आभार , आणि असेच तुमचे प्रेम लाभू देत या वेड्याला ...
हा हा... मस्त आहे कविता.
हा हा... मस्त आहे कविता.
धन्यवाद च्रप्स भौ
धन्यवाद च्रप्स भौ
भारीये
भारीये