भो भो २०१६ - चित्रपट

Submitted by कटप्पा on 2 June, 2019 - 20:30

मुळात असा एखादा चित्रपट आहे हेच मला माहित नव्हते। सहज तूनळी वर दिसला, प्रशांत दामले, सुबोध भावे, शरद पोंक्षे, संजय मोने, केतकी चितळे सारखी स्टारकास्ट पाहिली, बघायला सुरुवात केली, खूप ओरिजिनल थ्रिलर मिस्ट्री आहे.
एक फ्लॅट आहे आणि पोलीस दरवाजा तोडून आत शिरतात तर तिथे दिसते स्मिता चा मृतदेह आणि बाजूला बसलेला एक कुत्रा. स्मिता च्या शरीरावर कुत्र्याने हल्ला केलेल्या खुणा दिसतात, पोलीस कुत्र्याला ताब्यात घेतात आणि केस फाईल करतात.
स्मिता ची एक करोड ची इन्शुरन्स पॉलिसी आहे, आणि तिचा नवरा विनायक ला पैसे नको असतात, ते पैसे सरळ स्मिता च्या आई ला देण्यात यावेत असे त्याचे म्हणणे असते.
इन्शुरन्स रिपोर्ट बनवण्याचे काम एका प्रायवेट डिटेक्टिव्ह व्यंकटेश भोंडे ( प्रशांत दामले) यांच्याकडे असते जो एक श्वान प्रेमी आहे आणि त्याचे पर्सनल आयुष्य मध्ये पण काही त्रास आहेत.
इथून सुरू होते त्यांची शोधमोहीम. कुत्रा वेडा आहे असे प्रमाणपत्र मिळाले असते,पण दामले जेंव्हा कुत्र्याला बघायला जातात तर तो एकदम शांत दिसतो.
दामले यांनी कॉमेडी पेक्षा सिरियस प्रसंग छान रंगवले आहेत. विनायक च्या भूमिकेत सुबोध भावे उत्तम काम केले आहे. विनायक चा भाऊ सौरभ गोखलेंनी चिडक्या, शॉर्ट टेम्पर्ड भूमिका मस्त केली आहे. शरद पोंक्षे, संजय मोने यांचे रोल लहान आहेत पण व्यवस्थित न्याय दिला आहे.संजय मोने चे एक दोन प्रसंग खूप हसवतात.
कथा खूप ओरिजिनल वाटली। काही गोष्टी अशक्य वाटल्या, काही पटल्या नाहीत पण स्पोईलर नको म्हणून इथे लिहीत नाहीय.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जूना पिक्चर आहे ओ...
स्पॉइलर काय कप्पाळ !
-------
पण खुप छान मुव्हि होता.
आवडेश एकदम !

विक्ष - २०१६ लिहिलंय की शीर्षक मध्ये. आणि जुना चित्रपट आहे म्हणून स्पोईलर टाकायचा असे नाही ना, बऱ्याच जणांनी पाहिला नाहीय.

मस्त आहे हा सिनेमा. मी एकदा टाईमपास करताना दिसला म्हणून पाहिला होता. Happy झी5/आयडिया मुव्हीज/जिओ टीव्ही यापैकी एकावर.
स्टोरी वेगळी आहेच. पण सगळ्या कलाकारांनी अभिनय पण सुंदर केलाय खास करुन प्रशांत दामले. त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्प्रेशन्स इतक्या झराझर बदलतात की काय सांगावे. त्यासाठी तरी पहायला हरकत नाही. Happy

भु भु यु ट्यूबवर आहे.

मी थोडा पाहिला व शेवट पाहिला. करोडोचा इन्शुरन्स क्लेम, प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आणि शेवट पाहून ह्याचे मूळ परदेशी कथेत असणार असे वाटले. तिथून साऊथ तिथून मराठी असे झाले असावे.

2014 - Naaigal Jaakirathai ह्या तमिळ चित्रपटाचा रिमेक वाटतोय. कारण मी भो भो बघितलेला नाही. हा Turner & Hooch या 1989 साली आलेल्या चित्रपटाचा रिमेक होता.
सो साधना तुमची क्रोनोलॉजी बरोबर ठरतेय! Happy

कट्टप्पा , काल बघितलाच . आवडला .
सुरुवातीला भारी कंटाळा आला पण नंतर नंतर आवडत गेला .

दामले यांनी कॉमेडी पेक्षा सिरियस प्रसंग छान रंगवले आहेत. >>> अगदी अगदी .
त्यान्ची बायको कोणाशीतरी फोनवर बोलत असते आणि हे कम्पुटरवर काम करत असतात , तिच्याकडे दुर्लक्श करून ते कामावर एकाग्र व्हायचा प्रयत्न करतात , तिच्या बोलण्याचा त्याना त्रास होतो तेन्व्हा ....काळूला शोधताना ... नेहाला त्यान्च्या खाजगी आयुश्याबद्दल सांगत असतात आणि अचानक त्याना हातातली पिशवी बघून आठवतो आपण कशासाठी बाहेर पडलो होतो - त्यांच एकच वाक्य अंगावर काटा आणतं .

काही गोष्टी अशक्य वाटल्या, काही पटल्या नाहीत पण स्पोईलर नको म्हणून इथे लिहीत नाहीय. >>> अगदीच अ आणि अ वाटल्या . त्याच्या तपासातल्या करामती. आणि बर्याच गोष्टी .

बंडल सिनेमा आहे हा .
ओवर अ‍ॅक्टिंगचा कळस केला आहे दामलेंच्या प्रशांतने !

कुत्रा मरतो का शेवट? तसे असेल तर मी बघत नाही. उगीच टब भरून अश्रु गाळा. आधीच पाणी टंचाई आहे.

प्रशांत दामले प्रचंड बोअर आहे.

कुत्रा मरतो का शेवट? तसे असेल तर मी बघत नाही. उगीच टब भरून अश्रु गाळा. आधीच पाणी टंचाई आहे.
<<
प्रयत्न तर भरपूर करतात, मात्र यश येत नाही.

अज्ञातवासी, Turner & Hooch या 1989 साली आलेल्या चित्रपटाचा रिमेक होता. >> टॉम हॅंक्सचा आहे का हा? टॉम हॅंक्सचा असा एक चित्रपट बघितल्याचं आठवत आहे, कुत्र्याच्या मदतीने खुनी शोधण्याचा.
हा मराठी चित्रपट बघायला पाहिजे.

ओवर अ‍ॅक्टिंगचा कळस केला आहे दामलेंच्या प्रशांतने ! >>>> सिरियसली ,??? यापेक्शा जास्त अ‍ॅक्टीन्ग ते आम्ही सारे खवय्ये मध्ये करायचे Happy

Turner & Hooch वेगळा आहे हो अज्ञातवासी. काहीच समानता नाहीय फक्त कुत्रा सोडून। हे म्हणजे प्रत्येक कुत्र्याचा चित्रपट 'तेरी मेहेरबनिया ची कॉपी म्हटल्यासारखे झाले।

Naaigal Jaakirathai पण वेगळा आहे, गूगल वर हे दिसत आहे त्याबद्धल - After his beloved wife is kidnapped by a ruthless gangster, a cop (Sibiraj) teams up with a neighbor's dog to rescue her

भो भो संपूर्ण वेगळा आहे, कथा वेगळी आहे.त्यात कुत्रा खुनी आहे आणि तो जेल मध्ये आहे।

चित्रपट न पाहताच उगीच ह्याचा कॉपी आहे, त्याचा कॉपी आहे म्हणताय।

कटप्पा...
ते वाटतोय बोल्ड मध्ये का लिहिलं असावं बर, आणि त्यावर मी भो भो बघितलेला नाहीये हे स्पष्टीकरण का द्यावं बरं?
वाटतोय आणि आहे यात फरक आहे ना?

कटप्पा...
ते वाटतोय बोल्ड मध्ये का लिहिलं असावं बर, आणि त्यावर मी भो भो बघितलेला नाहीये हे स्पष्टीकरण का द्यावं बरं?
वाटतोय आणि आहे यात फरक आहे ना?

Submitted by अज्ञातवासी on 4 June, 2019 - 15:32

तुमच्या प्रत्येक कथेवर ही चोरलेली वाटतेय असे लिहिले तर चालेल म्हणजे ☺️

Pages