भो भो २०१६ - चित्रपट

Submitted by कटप्पा on 2 June, 2019 - 20:30

मुळात असा एखादा चित्रपट आहे हेच मला माहित नव्हते। सहज तूनळी वर दिसला, प्रशांत दामले, सुबोध भावे, शरद पोंक्षे, संजय मोने, केतकी चितळे सारखी स्टारकास्ट पाहिली, बघायला सुरुवात केली, खूप ओरिजिनल थ्रिलर मिस्ट्री आहे.
एक फ्लॅट आहे आणि पोलीस दरवाजा तोडून आत शिरतात तर तिथे दिसते स्मिता चा मृतदेह आणि बाजूला बसलेला एक कुत्रा. स्मिता च्या शरीरावर कुत्र्याने हल्ला केलेल्या खुणा दिसतात, पोलीस कुत्र्याला ताब्यात घेतात आणि केस फाईल करतात.
स्मिता ची एक करोड ची इन्शुरन्स पॉलिसी आहे, आणि तिचा नवरा विनायक ला पैसे नको असतात, ते पैसे सरळ स्मिता च्या आई ला देण्यात यावेत असे त्याचे म्हणणे असते.
इन्शुरन्स रिपोर्ट बनवण्याचे काम एका प्रायवेट डिटेक्टिव्ह व्यंकटेश भोंडे ( प्रशांत दामले) यांच्याकडे असते जो एक श्वान प्रेमी आहे आणि त्याचे पर्सनल आयुष्य मध्ये पण काही त्रास आहेत.
इथून सुरू होते त्यांची शोधमोहीम. कुत्रा वेडा आहे असे प्रमाणपत्र मिळाले असते,पण दामले जेंव्हा कुत्र्याला बघायला जातात तर तो एकदम शांत दिसतो.
दामले यांनी कॉमेडी पेक्षा सिरियस प्रसंग छान रंगवले आहेत. विनायक च्या भूमिकेत सुबोध भावे उत्तम काम केले आहे. विनायक चा भाऊ सौरभ गोखलेंनी चिडक्या, शॉर्ट टेम्पर्ड भूमिका मस्त केली आहे. शरद पोंक्षे, संजय मोने यांचे रोल लहान आहेत पण व्यवस्थित न्याय दिला आहे.संजय मोने चे एक दोन प्रसंग खूप हसवतात.
कथा खूप ओरिजिनल वाटली। काही गोष्टी अशक्य वाटल्या, काही पटल्या नाहीत पण स्पोईलर नको म्हणून इथे लिहीत नाहीय.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टॉम हँक्सच्या चित्रपटाची कथा वाचली. वेगळी आहे.

मराठीत कुत्राच खुनी आहे, त्याला खुनी कुणी व कसा बनवला ही चित्रपटाची कथा. आपले एलआयसी वगैरे लोक असे गुप्तहेर नेमून रहस्य शोधतात का हे माहीत नाही. सरकारी असल्यामुळे 1 करोड काढून द्यायला त्यांचे फारसे काही जात नसावे. त्यामुळे परदेशी कथानकांमध्येच हे प्रकार दिसतात. बाकी पॉलिसी नेहमीच्या भारतीय एलाईसीची असती तर चित्रपट पहिल्या पाच मिनिटात संपला असता.

कुत्रा मरतो का शेवट? तसे असेल तर मी बघत नाही. उगीच टब भरून अश्रु गाळा. आधीच पाणी टंचाई आहे.
: कुत्र्याला काय सोनं लागलंय?कोंबड्या मारून खाताच ना,डास, माश्या आणि ढेकूण मारता ना. तेंव्हा पण अश्रू गाळता का।

मरत नाही कुत्रा शेवटी।

काय भांडणे चालली आहेत इथे.. हाहा.

साधना, भारतीय सरकारी प्रकरणे पटापट संपत असावीत वाटत नाही. वेगळ्या पद्ध्तीचा झाला असता मग चित्रपट- फाईल कशी सरकत नाही आणि वजन कसे ठेवले, भ्रष्टाचार कसा आहे वगैरे वगैरे वगैरे. लोल.

कुत्रा मरतो का शेवट? तसे असेल तर मी बघत नाही. उगीच टब भरून अश्रु गाळा. आधीच पाणी टंचाई आहे.
: कुत्र्याला काय सोनं लागलंय?कोंबड्या मारून खाताच ना,डास, माश्या आणि ढेकूण मारता ना. तेंव्हा पण अश्रू गाळता का।

मरत नाही कुत्रा शेवटी।
Submitted by कटप्पा on 4 June, 2019 - 22:06

प्रतिसाद वाचून ऋन्मेषची आठवण आली.

मला वाटते ती बहुदा परमवीर मालिका असावी. ज्यात (बहुदा) रेखा राव च्या नवर्‍याचे तीन पार्टनर्स त्याचा विश्वासघाताने खून करतात. या खूनाचा बदला घेण्याकरिता ती या सर्व पार्टनर्सना एकेक करुन घरी बोलावून पिंजर्‍यातून त्यांच्यावर शिकारी कुत्रा सोडून त्यांचा बळी घेते. प्रत्येक पार्टनरच्या बळीनंतर कबरीपाशी जाऊन मेणबत्ती लावते.

परमवीर आणि हॅल्लॉ इन्स्पेक्टर दोन्ही अधिकारी बंधूंच्याच मालिका होत्या. परमवीर मध्ये कुलदीप पवार आणि हॅल्लो इन्स्पेक्टर मध्ये रमेश भाटकर होते. या कुत्र्याच्या कथेत कुलदीप पवार यांना पाहिल्याचे आठवते त्यामुळे ही कथा परमवीर सिरीज मधली असावी.

गंमतीची गोष्ट म्हणजे मला व्यक्तिशः आवडायचा रमेश भाटकर पण हॅल्लो इन्स्पेक्टर पेक्षा सगळ्या भारी कथा मिळाल्यात त्या परमवीरला. त्यामुळे दोन्ही सिरीज आवडीने पाह्यल्यात.

परमवीर अजून युट्युब वर आली नसेल.
त्याकाळी रेकॉर्डर नव्हते,महाग होते
दूरदर्शन ने जुन्या प्रिंट शोधून परत रिलीज केली तर येईल.
प्राईम वर शेमारु ने जबान संभालके आणली आहे.

ती कुत्र्याला खाणं घालताना घालते तो मुखवटा भयंकर होता. अनू कुठल्या सीन बद्दल बोलते आहेस? भो भो मधल्या की सिरीयल मधल्या?

रेखा रावला मुखवटा चढवायची गरजच काय? तिच्या डोळ्यांमुळे ती तशीही हाँटिंग दिसायची. आताही काही सासू सूनांच्या केकता कपूर मालिकांमध्ये निगेटीव्ह रोल्स करते ना?

सिनेमा पहिला. ठीक आहे.
काही प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत. जसं की
तो सौरभ गोखले त्या दिवशी स्विमिन्ग कॅम्प ला गेला नाही असं प्र. दा. सांगतो मग तो कुठे जातो त्याचा उलगडा होतं नाही. तसंच सु. भा. त्याचा confendial माहिती असलेला टॅब एका प्रायव्हेट डिटेक्टिव्ह ला देतो ते का ते कळले नाही . सु. भा चे शेजारी प्र. दा. ला सांगतात की त्या दोघात सतत वाद व्हायचे आणि सु. भा. ची बायको म्हणायची की मी बाबाकडे निघून जाईन पण कोणत्या बाबाकडे ते कळत नाही. त्याचा पुढे उलगडा झाला नाही.

कुत्र्याला मालकीण ओळखू आली तर तो वासाची आठवण मालकिणीशी ठेवून तिच्यावर हल्ला करेल असं होऊ नये असं लॉजिक असेल सिरीयल मध्ये

हाच तो धागा जिथे माझा आणि अज्ञात यांचा वाद झाला होता |
महाश्वेता नावाच्या आयडीने माझ्या दुसऱ्या धाग्यात मला भांडायला सुरुवात केली होती मला तेंव्हा कळले नव्हते | आता कळले का ते ||

Pages