लव्ह इन ट्रबल भाग- 8

Submitted by स्वरांगी on 31 May, 2019 - 13:06

लव्ह इन ट्रबल भाग- 8

खाड !!!! अप्पासाहेबांनी अभिजीतच्या जोरात कानाखाली मारलं…पण तेवढ्यावरच त्यांचं समाधान झालं नाही.. खाड !!! खाड !! खाड !!!! त्यांनी पुन्हा अभिजीतला तीन चार वेळा कानाखाली मारलं…अभिजित निमूटपणे मार खाऊन त्यांच्यासमोर उभा होता.. पण त्याने अप्पासाहेबांकडे डोळ्यात डोळे घालून पाहिलं.. कारण त्याची बाजू सत्याची होती.. आणि त्याने जे केलं ते योग्यच केलं यावर त्याचा पूर्ण विश्वास होता..अप्पासाहेब त्याला सुखाने जगू देणार नाहीत हे तर जगजाहीर होतं…अप्पासाहेबांनी जो राग काढायचा होता तो अभिजीतवर काढून घेतला…
इकडे अनु सगळी procedure complete करून आईला घेऊन आपल्या घरी आली.. या घरात पुन्हा पाऊल ठेवताना तिला खूपच जड गेलं.. आईनेच तिला धीर दिला..
“ अनु!! पण ते अप्पासाहेब तुला पुन्हा आत टाकू शकतात ना???! जरी advocate कुलकर्णींनी तुझ्यावरचा खटला मागे घेतला तरी ते दुसरा वकील करून तुला आत टाकुच शकतात!! काय करायचं गं मग आपण?? प्रमिलाताईंनी काळजीने अनुला विचारलं..
“ एकदा वकिलाने खटला मागे घेतला तर ते माझ्यावर परत लगेच खटला करू शकत नाहीत..” अनु म्हणाली..
“ म्हणजे?? मला कळेल असं सांग..” प्रमिलाताई न कळून म्हणल्या..
“ अगं म्हणजे माझ्याविरुद्ध ठोस असा पुरावा मिळाल्याशिवाय ते पुन्हा माझ्यावर केस करू शकत नाहीत… मला खुनी सिद्ध करण्यासाठी त्यांच्याकडे सबळ पुरावा हवा!! तरच ते मला आत टाकू शकतील..” अनुने समजावून सांगितलं..
“ हो का??” प्रमिलाताईंनी आनंदाने विचारलं..
“ हम्म..” अनुने हसून मान डोलावली.. पण लगेचच परत गंभीर होत ती म्हणाली, “ आई!! कुलकर्णी सरांनी खूप केलंय माझ्यासाठी… त्यांनीच advocate पुष्कर काळेंना माझी केस घ्यायला सांगितलं.. माझ्याशी कितीही कठोर वागले असले तरी त्यांनी शेवटी खऱ्याची बाजू घेतली..माझी बाजू घेतली.. माझ्यामुळे त्यांचं करियर धोक्यात आलंय.. अप्पासाहेब खूप मोठं नाव आहे गं!! आणि त्यांचीच केस लढत असताना त्यांनी माझी बाजू घेतली.. मला नाही वाटत अप्पासाहेब सरांना सुखाने जगू देतील..” अनुला खूप guilty वाटत होतं..तिचा उतरलेला चेहरा पाहून प्रमिलाताईंनी तिच्या चेहऱ्यावर मायेने हात फिरवला..
अनु झोपायला जाण्याआधी आपली डायरी शोधू लागली… ह्या मधल्या दिवसात जे घडलं ते सगळं तिला लिहून काढायचं होत.. काही मनातल्या गोष्टी लिहायच्या होत्या…तिने आपली डायरी घेतली आणि टेबललॅम्प लावून पानं उलटू लागली..पानं उलटताना तीचं मधूनच एका ओळीकडे लक्ष गेलं.. तिने डायरी जवळ ओढली आणि बघितलं..
“ आज नेहमीप्रमाणेच कुलकर्णी सरांनी खूप मनस्ताप दिला..” अनुने लिहिलं होतं त्याखालीच एक शब्द लिहिलेला तिला दिसला..
“ accepted “ अनुने वाचलं…तिने पान मागे पुढे उलटून पाहिलं..बाकी कुठे काहीच वेगळं लिहिलेलं नव्हतं..तिने पुन्हा तो शब्द वाचला आणि तिच्या चेहऱ्यावर हसू पसरलं…. तिने अक्षर ओळखलं… ते अभिजितचं अक्षर होतं…झेंडें जेव्हा त्याच्याकडे डायरी देऊन फोन घ्यायला बाहेर गेले तेव्हाच त्याने खाली
“ accepted” म्हणून लिहून ठेवलं…अनु स्वतःशीच हसत होती..तिने डायरी उचलली आणि छातीशी कवटाळून धरली… तिच्या चेहऱ्यावर खूप आनंद होता…

अभिजित आपलं ऑफिसमधलं टेबल आवरत होता…त्याच्या समानाचं शिफ्टिंग सुरू होतं…अनुची केस close होऊन आता दोन आठवडे होत आलेले..आणि अप्पासाहेबांनी आपला सूड घ्यायला सुरुवात केली.. अभिजितचं ऑफिस जे त्याने रेंटवर घेतलं होतं, अप्पासाहेबांनी ते दुप्पट रक्कम देऊन विकत घेतलं होतं.. हे होणार हे त्याने गृहीतच धरलं होतं.. पण तरीही त्याने स्वतःच्या मेहनतीने इथे स्वतःच ऑफिस सुरू केलं होतं..निघताना त्याने पूर्ण ऑफिसवर नजर फिरवली आणि तो तिथून बाहेर पडला..
अनु ह्या पूर्ण दोन आठवड्यात घराच्या बाहेरच पडली नव्हती.. तिला बाहेर पडायलाच खूप भीती वाटत होती.. या केस मधून ती आता सुटली असली तरी तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलला होता लोकांचा.. आणि त्यामुळेच तिला घरातून बाहेर पडायचं नव्हतं.. पण किती दिवस असं घरात बसून राहणार!! प्रमिलाताईंनी तिला समजावलं..अनु तयार झाली..आणि त्यात तिला अभिजीतलाही भेटायचं होतं..म्हणूनच ती आज अभिजीतला भेटायला बाहेर पडली होती..
अनु आज खूप खुश होती..अभिजीतला भेटणार होती ना!!!
“ लोकं म्हणतात कधीकधी प्रेमात पडायला एक क्षण पुरेसा असतो!! Love at first sight???!!! माझा त्यावर कधीच विश्वास बसला नाही!! पण कधी अभिजित सरांनी माझ्या मनाच्या कोपऱ्यात जागा केली कळलंच नाही!! सरांना माझ्याविषयी काय वाटतं मला माहित नाही पण माझ्या मनात त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे..त्यांचं त्यावर काहीही म्हणणं असुदे, पण मला माझ्या मनातलं त्यांना सांगितलंच पाहिजे!! त्यासाठीच तर मी इथे आलेय..” अनु बिल्डिंगच्या समोर आली.. तिथून ती पुढे पाऊल टाकणार तोच तिला समोरून अभिजित येताना दिसला…त्याला पाहूनच तिचं हृदय जोरात धडधडू लागलं.. काय बोलावं काय करावं तिला काहीच सुचेना तोच अभिजीतचंही लक्ष अनुकडे गेलं. ते दोघही हळूहळू चालत एकमेकांसमोर आले..
“ मी आज तुम्हाला माझ्या मनातलं सांगणार आहे सर!!.” अनु मनातच म्हणाली..घरी आरशासमोर बोलायला खूप सोपं वाटलं होतं पण अभिजित समोर येताच तिची बोलतीच बंद झाली…तो काही बोलतोय का याचीच वाट पाहत राहिली ती..
अभिजीतने तिच्याकडे पाहिलं..अनु खुश दिसत होती..त्याने एक मोठा सुस्कारा सोडला आणि बोलायला तोंड उघडलं..
“ मला असं वाटतं की दैवानेच आपली भेट घडवली आहे..” अभिजित म्हणाला. अनुच्या चेहऱ्यावर आनंद पसरला..
“ मलाही अगदी असंच…”
“ माझ्या दुर्दैवाने!!” अनुचं बोलणं पूर्ण होण्याआधीच अभिजित म्हणाला..
“ म्हणूनच आपण परत न भेटणंच बरं..” एवढं बोलून अभिजित जाऊ लागला.. अनुच्या चेहऱ्यावरचं हसू मावळलं..तिने जाणाऱ्या अभिजीतकडे वळून पाहिलं..तिला आतून त्याला खूप ओरडून सांगावस वाटत होतं की तिला काय वाटत होतं.. तिचे डोळे भरून आले…ती अभिजीतला अडवण्यासाठी त्याच्या मागे धावली आणि त्याच्या समोर पुन्हा उभी राहिली.. तिला असं आपल्यामागे आलेलं पाहून अभिजित वैतागुन म्हणाला, “ हे बघ अनघा तू!!”
“ मला तुम्हाला हे द्यायचं होतं सर!!” तो काही बोलणार एवढ्यात अनु तिच्याजवळची पेपरबॅग त्याच्यासमोर धरत म्हणाली..
“ हे काय आहे??” अभिजितने विचारलं..
“ हे insomnia वर उपयोगी चूर्ण आहे..” अनु म्हणाली.. अभिजित तिच्याकडे पहातच राहिला..
“ तुला कसं कळलं की मला insomnia आहे?!!” अभिजितने आश्चयाने विचारलं..
“ मी तुमच्यासोबत एक महिनाभर काम केलं आहे सर!! त्यामुळे काही गोष्टी मला कळणारच.. तुम्हाला खोटं वाटेल कदाचित, पण सर मी तुम्हाला चांगल्याप्रकारे ओळखू लागलेय!!” अनु म्हणाली..
“ झोप न येणं आरोग्यासाठी चांगलं नाहीच,पण तुम्हाला माहितेय त्यामुळे तुमच्या डोळ्याखाली डार्क सर्कल येऊ शकतात??” अभिजित निर्विकार चेहऱ्याने तिच्याकडे पाहत होता..
“ मी खूप पकवतेय का??” अनुने विचारलं..
“ तू आत्ता कितीही पकव!! तसंही ही आपली शेवटची भेट आहे..” अभिजित गंभीरपणे म्हणाला..
“ शेवटची भेट..” अनु शून्यात पाहत म्हणाली.. शेवटची भेट या विचारानेच तिला गलबलून आलं…पण तसं चेहऱ्यावर न दाखवता ती म्हणाली,
“ मला तुम्हाला सॉरी म्हणायचंय सर.. तुम्हाला मेट्रोत चुकीचं ठरवण्यासाठी…त्यावेळी माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला..त्याबद्दल खरंच सॉरी! माझ्याचमुळे तुम्हाला तुमचं ऑफिसही गमवावं ,लागलं!!” अभिजितने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिलं..
“ मला झेंडेंनी सांगितलं..” अनु त्याचा प्रश्न ओळखून म्हणाली.. “ माझ्यामुळे तुम्हाला हे सगळं सहन करावं लागलं त्याबद्दल मी खरंच तुमची मनापासून माफी मागते..”
“ आणि मला तुम्हाला thank you सुद्धा म्हणायचंय!! तुमच्यासोबत काम करताना मी खूप गोष्टी शिकले तुमच्याकडून..आणि प्रत्येक वेळी मी प्रॉब्लेममध्ये असताना तुम्ही मला खूप हेल्प केलीय..मला तुम्ही या केसमधून बाहेर काढलं!! या सगळ्यांबद्दल खूप खूप thank you सर!! तुम्ही ना माझ्यासाठी सुपरमॅन आहात!! सुपरहिरो!! “ अनु आनंदाने म्हणाली..तिला असं बोलताना पाहून अभिजीतला हसू आलं..
“ खरंच??” त्याने हसूनच विचारलं..
“ हो खरंच!! तुम्ही माझे आयडॉल आहात..मला तुमचा खूप अभिमान वाटतो आणि..!!” अनु बोलता बोलता थांबली..अभिजित तिच्याकडेच पाहत होता..
“ मला तुम्ही आवडता सर..” अनु अभिजीतकडे पाहत मनातल्या मनात म्हणाली..
“ आणि काय??” अभिजितने विचारलं..
“ आणि?? आणि काही नाही!!!” अनु भानावर येत म्हणाली.. “ आणि हो !! मला असं वाटतंय की मी शुभमच्या गुन्हेगाराला पाहिलंय, ज्याने खून केला शुभमचा..” अनु चटकन म्हणाली..
“ खरा गुन्हेगार??? मग तू मला हे आधी का नाही सांगितलं?!!!” अभिजित आश्चर्याने म्हणाला..
“ कारण मला नक्की माहीत नव्हतं..मीच confirm नव्हते त्या बाबतीत..पण मी आता लवकरच त्याचा शोध घेईन आणि त्याला पकडेन !! तुम्ही काळजी करू नका सर, मी बघते काय करायचं ते..एकतर माझ्यामुळे तुमचं ऑफिस..”
“ माझं ऑफिस गेलं खड्डयात!! जर तू खऱ्या गुन्हेगाराबद्दल माहिती होतं तर तू मला आधीच का नाही सांगितलं??!” अभिजित त्वेषाने म्हणाला..
“मी प्रत्यक्ष त्याला भेटले नाहीये पण मी त्याला एका गाण्यामुळे ओळखते..” अनु म्हणाली..
“ गाणं?? कोणतं गाणं??” अभिजीतने विचारलं..
“ खामोशियाँ !! खामोशियाँ मूवीचं title song..” अनु म्हणाली..थोडा वेळ विचार करून अभिजित म्हणाला.. “ ते गाणं जाऊदे!! तो दिसायला कसा होता?? कसे कपडे घातले होते त्याने?? आठवतंय??” अभिजितने उत्सुकतेने विचारलं..
“ नाही सर..मला पुन्हा तुमची मदत नकोय..तुम्ही माझ्यामुळे खूप त्रास सहन केलाय. मला तुम्हाला पुन्हा अडचणीत नाही टाकायचंय!!” अनु शांतपणे म्हणाली..
“ तुम्ही माझी काळजी करू नका सर !!” अनु कसंबसं हसत म्हणाली..

“ मी तुझी काळजी करत नाहीये कळलं?!! मला फक्त curiosity आहे म्हणून विचारलं..” रात्री झोपण्याआधी सोफ्यावर बसलेला असताना अभिजीतला आज सकाळची अनुची भेट आठवली.. ते आठवून तो कपाळावर आठ्या आणत स्वतःशीच म्हणाला..
त्याच्या हातात दुधाने भरलेला कप होता..अनुने insomnia वर जे चूर्ण दिलेलं तेच तो दुधातून घेत होता.. त्याने एक घोट पिऊन बघितलं
“ शीsss कडू आहे हे खूप!!! च् च् !!” अभिजित तोंड वाकडं करत म्हणाला..कसंबसं त्याने दूध संपवलं आणि कप खाली ठेवला.. त्याने डोकं मागे टेकलं आणि डोळे मिटले..तो गाणं ऐकत होता..खामोशियाँsss

अनु जिवाच्या आकांताने धावत होती… तिचा चेहरा भीतीने पांढरा पडला होता. मागून कुणीतरी तिचा पाठलाग करत होतं..अनु पूर्ण ताकद लावून त्याच्यापासून वाचण्याचा प्रयत्न करत होती..अंधाऱ्या गल्ल्यांमध्ये धावत होती..मागून ती व्यक्ती सायकलवरून येत होती…अनुला तर भुलभुलैयात सापडल्यासारखं वाटलं..घराचा रस्ताच सापडत नव्हता तिला…कशीबशी धापा टाकत ती एका गल्लीच्या तोंडाशी आली..तिथून तिला पुढची वाट सापडली आणि ती तिच्या बिल्डिंगपाशी आली..धडाधड जिने चढत ती तिच्या ब्लॉक समोर आली… थरथरत्या हातांनी तिने latch उघडायचा प्रयत्न केला..आपल्या मागावर असलेली ती व्यक्ती जवळ तर आली नाही ना हे ती वारंवार बघत होती.. कसंतरी धडपडत तिने latch उघडलं आणि दरवाजा उघडणार….एवढ्यात तिच्या खांद्यावर मागून कुणीतरी हात ठेवला…आणि अनु खाडकन झोपेतून जागी झाली..तिला दरदरून घाम फुटला होता.. तोच बेल वाजली.. ती त्या आवाजाने भानावर आली आणि तिने घड्याळात पाहिलं..9 वाजत आलेले.. आई घरात नाहीये हे ती विसरूनच गेली होती...कालच तिची आई पुन्हा गावी निघून गेलेली.. ती उठून दरवाज्यापाशी आली आणि तिने दरवाजा उघडला...समोर अप्पासाहेब उभे होते...

क्रमशः

Group content visibility: 
Use group defaults

“ शीsss कडू आहे हे खूप!!! च् च् !!” अभिजित तोंड वाकडं करत म्हणाला..कसंबसं त्याने दूध संपवलं आणि कप खाली ठेवला.. त्याने डोकं मागे टेकलं आणि डोळे मिटले..तो गाणं ऐकत होता..खामोशियाँsss >>> अय्यो.. म्हणजे??? twist भारीये !!!

सर्वांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद!! Shitalkrishna आणि स्नेहनील तुम्ही सुचवलेला ट्विस्ट पण खूप छान आहे ..पण मला हिरोला व्हिलन नाही करायचं. Happy अभिजित ते गाणं ऐकत होता कारण अनुने सांगितलेलं असतं की तो खुनी हे गाणं ऐकतो..