आभाळ पक्षी

Submitted by पाषाणभेद on 25 May, 2019 - 02:37

आभाळानं द्यावे पाणी
धरतीनं गावी गाणी

धरतीनं जागा द्यावी
झाडांची आई व्हावी

झाडांनी सावली द्यावी
पक्षांची घरटी ल्यावी

पक्षांनी पंख पसरावे
आभाळात विहरावे

आभाळाने द्यावे पाणी
धरतीनं गावी गाणी

पाषाणभेद ( त्रंबकेश्वर मुक्काम)
२५/०५/२०१९

Group content visibility: 
Use group defaults

सहज. सुंदर! आता सुटसुटीत आणि सुंदर दिसतंय. Happy पु.ले.शु!

येस मन्या.

जरा घाईतच होतो तेव्हा. त्रंबकला एका शाळेत काम होते. जरा वेळ भेटला अन मी एका टेकडीच्या उतारावर बसलो. आजूबाजूला त्रंबक, अंजिनेरीचे डोंगर, थोड्या अंतरावरचा तलाव, त्यातील पाणी, दाट झाडी. तेथेच खाली गवतात बसलो. असा अनुभव फारा दिवसांनी भेटत होता. निसर्गाच्या सानिध्यात आपण एकरूप व्हायला पाहीजे. त्याच्यासारखेच व्हायला पाहीजे.

दुपारचे १२ वाजताचे मे महिन्यातले ऊन अन चक्क थंडगार भरारा येत होता टेकडीवर. मग तेथेच वाळलेल्या गवतात फतकल मारली. जवळच उंबरांचा सडा पडलेला होता. मुंग्या, किडे खाद्याची बेगमी करत होते. एक कावळा डोक्यावरच्या फांदीवर ओरडत होता. दुरवर काही पक्षी आवाज काढत होते.
शिवशक्ती ज्ञानपीठ आश्रमाचे शिवमंदीर जवळच होते. असे एकदम चित्रमय वातावरण होते.

अशा वातावरणात आतील संवेदना जागृत होतात. संत निवृत्तीनाथांनी समाधीसाठी असे भारावलेले वातावरण का निवडले असावे याची प्रचीती येते.

मग मोबाईलमध्येच कविता तयार झाली अन लगेचच पोस्ट केली. नंतर पुन्हा एकदा पुनरावलोकन केले तेव्हा दोन ओळींत जागा असावी असे वाटले अन मग संपादन केले.

धन्यवाद मन्या, रत्ना आणि इतर वाचकांचे !!

तुमची कविता आवडली आणि तुम्हाला ती कुठल्या वातावरणात सुचली., असावी असा विचार पण मनात येऊन गेला.मी अजुन नाशिकला नाही गेले पण तुम्ही केलेलं वर्णन मनाला नाशिकची ओढ लावतंय.जर कधी नाशिकला येणं झालंच तर नक्की त्र्यंबकेश्वराला भेट देईल. Happy

तुमची कविता आवडली आणि तुम्हाला ती कुठल्या वातावरणात सुचली., असावी असा विचार पण मनात येऊन गेला.मी अजुन नाशिकला नाही गेले पण तुम्ही केलेलं वर्णन मनाला नाशिकची ओढ लावतंय.जर कधी नाशिकला येणं झालंच तर नक्की त्र्यंबकेश्वराला भेट देईल. Happy

सुंदर