लव्ह इन ट्रबल भाग -7

Submitted by स्वरांगी on 22 May, 2019 - 12:16

लव्ह इन ट्रबल भाग-7
“ आरोपी ‘अनघा भावे’, यांनी खोटं स्टेटमेंट देऊन पोलिसांची आणि कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.. आपला गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला…माझे अशील ‘शुभम फडके’ यांच्यावर आरोपीचा प्रचंड राग होता आणि या रागातूनच त्यांनी शुभमची हत्या केली तेही अत्यंत निर्दयपणे!! त्यांच्या विरुद्ध मिळालेला ठोस पुरावा मी कोर्टासमोर सादर केलेला आहे… त्यामुळेच कोर्टाला माझी अशी विनंती आहे की आरोपी ‘अनघा भावे’ यांना 15 वर्षे तुरुंगवासाची ठोठावण्यात यावी!!!” अभिजित एवढं बोलून खाली बसला पण त्याच्या मनात मात्र प्रचंड खळबळ उडाली होती..
त्याला आठवलं त्याचे वडील, ‘ विलास कुलकर्णी’, शहरातले त्या काळातले खूप मोठे आणि प्रामाणिक वकील होते.. गुन्हेगार तर त्यांचे सर्वात मोठे शत्रू होते.. गुन्हेगारांना शिक्षा देऊन अन्याय झालेल्याना न्याय मिळवून देण्याचं व्रत त्यांनी आयुष्यभरासाठी घेतलेलं.. अभिजीतसाठी त्याचे वडील म्हणजे सुपरहिरोच होते.. वाईट लोकांशी फाईट करून चांगल्या लोकांना मदत करणारे सुपरहिरो..
“ मोठं होऊन मला तुमच्यासारखाच मोठा वकील व्हायचंय!!” लहानगा अभिजित नेहमी त्याच्या बाबांना सांगायचा. त्याच्या बाबांनाही त्याचं खूप कौतुक होतं.. अभिजित नेहमी म्हणायचा, “ बाबा!!! मोठं झाल्यावर मी तुमच्यासारखीच सत्याची बाजू घेणार, गुन्हेगारांना पकडून देणार आणि तुमच्या सारखंच मोठं नाव कमावणार!!” त्याच्या वडिलांचा चांगुलपणा अनेकांच्या डोळ्यात खूपत होता आणि म्हणूनच कुणीतरी सगळंच संपवण्यासाठी त्यांच्या घराला आग लावून दिली!! ह्यात त्याचे आई, बाबा आणि मोठी बहीण तिघेही वाचू शकले नाहीत पण अभिजित मात्र सुखरूप राहिला!!!
जेव्हा अभिजित फायनल स्टेटमेंट देत होता तेव्हा त्याच्या मनात सगळ्यात आधी फक्त बाबांचाच विचार आला.. सगळं बोलून गेल्यावर तो खाली बसला आणि अपराधी भावनेने अनुकडे पाहू लागला.. त्याला अनुचं बोलणं आठवलं..
“ सर!! तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना?? मला खात्री आहे की तुमचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे!!!! तुम्ही माझ्याच बाजूने आहात आणि तुम्हीच मला यातून बाहेर काढाल!!!”
आपल्या वडिलांचे आदर्श आणि अनुचा त्याच्यावर असलेला विश्वास त्याला स्वस्थ बसू देईना!!! पण एवढ्यात त्याला अप्पसाहेबांनी दिलेली धमकीही आठवली..
अनुला शिक्षा नाही झाली तर त्याच आयुष्य उध्वस्त होणार होतं!! स्वतः अप्पासाहेबच त्याला सोडणार नव्हते!!
स्वार्थीपणे स्वतःचा विचार करावा!!? की आपण आत्तापर्यंत जस आपल्या बाबांचा आदर्श समोर ठेवत योग्य ते करत आलो तसंच करावं!! विचार करून करून अभिजीतचं डोकं भणभणू लागलं होतं.. पुष्कर अनूची बाजू मांडण्यासाठी उठला त्याच क्षणी काही विचार करून अभिजित झटकन उठला आणि पुष्करला अडवत मोठ्याने म्हणाला, “ Your honour,मला कोर्टासमोर अजून एक पुरावा सादर करायचा आहे!!”
त्याच्या या वाक्याने पुष्कर गडबडला.. अनुही त्याच्याकडे पाहू लागली..सगळेजण आपापसात बोलू लागले..
“ अजून एक पुरावा??” judge साहेबांनी विचारलं..
“ Yes your honour!! खरं हे आहे की,त्यावेळी एक नाही दोन दोन हत्यारं मिळाली होती!! हाच तो दुसरा चाकू!!” अभिजितने तो चाकू सर्वांसमोर उंचावर धरला आणि judge साहेबांकडे सबमिट केला..
“ आधीचा आणि आत्ता सबमिट केलेला चाकू, या दोन्ही चाकूंवर शुभमचं रक्त लागलेलं आहे.. आणि हे दोन्ही चाकू एकाच दिवशी पण दोन वेगवेगळ्या ठिकाणी सापडले..” अभिजितने सांगितलं.
“ जर तुम्ही ह्या मॅपवर पाहिलं, तर तुमच्या लक्षात येईल की घटनास्थळापासून 7 किलोमीटरच्या अंतरावर हा चाकू सापडला..” अभिजीतने प्रोजेक्टरवर मॅप काढून तो डिस्प्ले केला.. त्यात घटनास्थळ आणि चाकू मिळालेली जागा दोन्ही रेड सर्कलने दाखवल्या होत्या..
“ जर आपण शुभमच्या खुनाची वेळ आणि ते हत्यार तिथून दुसरीकडे वाहून न्यायची वेळ consider केली, तर आरोपीला शुभमचा खून करून मग ते हत्यार घटनास्थळापासून लांब नेऊन त्याची विल्हेवाट लावण्यासाठी पुरेसा वेळ नव्हता.”
“ जर आरोपीसोबत आणखी कुणी ह्या गुन्ह्यात सामील असतं तरच हे सर्व एवढ्या कमी वेळात करणं आरोपीला शक्य होतं..किंवा जर साथीदार नसेल तर आरोपीला सुपरमॅनच्या स्पीडने तो चाकू वाहून न्यावा लागला असता जे माणसाला शक्य नाही..”
“ खून जवळपास सव्वाबारच्या सुमारास झाला आणि पोलिसांना कळवण्यात आलं साधारण 12.45 ते 12.55 च्या सुमारास म्हणजे जवळजवळ मध्ये फक्त 30 ते 40 मिनिटांचा वेळ होता.. ह्या एवढ्या वेळात तिथून 7 किलोमीटर लांब जाऊन हत्यार टाकून पुन्हा परत घरी येणं तेही मुंबईसारख्या शहरात अशक्यच आहे..” अभिजितने explain करून सांगितलं..
“ पण तुम्ही हा पुरावा इतक्या उशिरा का सादर केला??” judge साहेबांनी अभिजीतला न कळून विचारलं..
“मी मुद्दाम तो पुरावा सादर नाही केला.. आरोपीला खुनी ठरवणं माझ्यासाठी सत्यापेक्षा जास्त महत्वाचं होतं…” अभिजित गंभीरपणे म्हणाला.. “ह्या केसमध्ये दोन हत्यारं सापडली, त्यातलं एक हत्यार बनावट आहे आणि दुसरं खरं आहे.. आणि मी हा पुरावा सबमिट केला आहे… That’s why according to section 321 Cr. P .C. ( criminal prosecution code) I will cancel my charge!!!” एवढं म्हणून अभिजित खाली बसला.. त्याच्या या स्टेटमेंटने सगळेच गोंधळ घालू लागले.. त्याने अनुवरचा खटला मागे घेतला होता!!!! रिपोर्टर्स, मीडियावाले सगळ्यांनी गलका करायला सुरुवात केली..अभिजित खाली मान घालून डोकं धरून बसला.. त्याच्या डोक्यावरचं खूप मोठं ओझं हलकं झाल्यासारखं वाटत होतं त्याला.. पण पुढे आपलं काय होणार याची चिंताही चेहऱ्यावर दिसत होती.. प्रमिलाताईंना काहीच कळेना..
“ नक्की काय झालं?? काय निकाल दिला कोर्टाने?? माझ्या अनुचं काय होणार??” प्रमिलाताईंनी इकडे तिकडे पाहिलं, मागेच advocte बर्वे बसले होते..
“ कुलकर्णी वकील म्हणाले याचा अर्थ काय?? काय होणार नक्की?” प्रमिलाताईंनी काळजीनं बर्वेना विचारलं..
“ फिर्यादी वकिलांनी आरोपीवरचा खटला मागे घेतलाय!! म्हणजेच आरोपीवर आता कोणत्याही गुन्ह्याचा आळ नाहीये.. तिला फिर्यादी वकिलांनीच निर्दोष सिद्ध केलंय, त्यामुळे आरोपीची यातुन निर्दोष मुक्तता करण्यात येईल..
ती घरी जाऊ शकेल..” बर्वे प्रमिलाताईंना समजावत म्हणाले..
“ खरंच!!??” प्रमिलाताई आनंदाने म्हणाल्या.. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते.. त्यांनी डोळे भरून आपल्या लेकीकडे पाहिलं.. अनुही आईकडेच पहात होती.. तिच्याही चेहऱ्यावर आनंद होता.. तिने परत अभिजीतकडे पाहिलं.. त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण समाधान दिसत होतं…अनु त्याच्याकडे पाहतच राहिली…

बाहेर आल्यानंतर अभिजितभोवती लोकांनी गराडाच घातला.. प्रश्न विचारुन विचारून त्यांनी त्याला अगदी भंडावून सोडलं होतं.. अभिजीतला बोलायची अजीबात इच्छा नव्हती.. कशीबशी त्यांच्यातून वाट काढत काढत तो बाहेर पडला.. तोच मागून अनुला घेऊन पोलीस आले.. तिला पाहताच सगळेजण तिच्याकडे धावले.. तिला प्रश्न विचारू लागले.. मीडियावाल्यांना ब्रेकिंग न्युज हवीच होती.. अनुवर प्रश्नांची सरबत्ती होत होती.. पोलीस तिला व्हॅनमध्ये बसायला नेऊ लागले..
या सगळ्या गोंगाटातून अनुला बारीक आवाजात एक गाणं ऐकू आलं.. गाण्याचा आवाज खूप बारीक आणि लांबवरून येत होता पण तरीही त्या आवाजाने तिचं लक्ष वेधून घेतलं..ते गाणं ऐकू येताच ती इकडे तिकडे पाहू लागली.. तो आवाज कुठून येतोय हे पाहण्याचा ती प्रयत्न करू लागली… बाकीचे सगळे आवाज तिच्यासाठी बंद झाले होते.. फक्त तेच एक गाणं तिच्या कानात घुमत होतं..आणि ते गाणं होतं… खामोशिया!!!!!

क्रमशः

Group content visibility: 
Use group defaults

हा भाग थोडा लहान झालाय ,पण खरंच लिहायला अजिबातच वेळ मिळत नाही त्यामुळे ह्या 4-5 दिवसात झालं तेवढं टंकून माबोवर टाकलं.. आणखी भाग वाढवला असता तर आणखी दिवस गेले असते त्यामुळे एवढाच टाकला.. माबोकरांनी समजून घ्यावं.. तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!! Happy

जर आपण शुभमच्या खुनाची वेळ आणि ते हत्यार तिथून दुसरीकडे वाहून न्यायची वेळ >>> तो दुसरा चाकू तर खूप वेळाने सापडला ना? तोपर्यंत भरपूर वेळ होता की !

ह्या एवढ्या वेळात तिथून 7 किलोमीटर लांब जाऊन हत्यार टाकून पुन्हा परत घरी येणं >>> कोण व्यक्ती आणि ती कुणाच्या आणि कुठल्या घरी गेली याचा काहीच खुलासा नाहीये.

त्यातलं एक हत्यार बनावट आहे आणि दुसरं खरं आहे >>> म्हणून खटला का काढून घ्यावा हे नाही समजले. आणि तसंही तो अधिकार वकिलाला नसतोच. शुभमच्या वडीलांनी खटला दाखल केलाय. अभिजीतने फक्त वकिलपत्र घेतलंय.

हा भाग थोडा गोंधळलेला वाटला.

Mr. Madhav - 1. the knife was found on next day and meanwhile murderer could hide it but Anagha was in police custody how would she do that?
2. Here writer is talking about Anagha again because everyone is thinking she is culprit.
3. Abhijit is a lawyer so if he says he don't want to proceed further with the case then Annasaheb have to find new lawyer for that matter and have to start the process in court from where Abhijit left the case .

Swarangi you have written so very practical and interesting...
keep going we are waiting for the next part...

साडे तीन भाग वाचले आणि या भागाची फक्त पहिली ओळ वाचली, तेवढ्यात अनघाचं नाव तीन वेळा बदललं आहे. कुलकर्णी / मेहेंदळे //भावे ??????

बाकी कथा (जेवढी वाचली तेवढी) रटाळ आणि 25 कादंबऱ्या वाचल्या तर त्यातून थोडी थोडी घेऊन एक लिहिल्यासारखी आहे. मला नावीन्य किंवा गुन्हेगार कथा म्हणून उत्सुकतेने वाचवीशी वाटली नाही.

तरीही पुढील लेखनासाठी शुभेच्छा

तो दुसरा चाकू तर खूप वेळाने सापडला ना? तोपर्यंत भरपूर वेळ होता की ! >>> ते दोन्ही चाकू एकाच दिवशी मात्र वेगवेगळ्या वेळी सापडले.. आणि ते मिळाले तेव्हा अनु पोलीस स्टेशनमध्ये होती..घरात सापडलेला चाकू बनावट होता ( अप्पासाहेबांनी तयार केलेला) आणि 7 km लांब मिळालेला चाकू खरा होता पण तो खऱ्या खुनीने टाकला होता( कारण जर अनु खुनी असती तर तिला तो चाकू लांब नेऊन टाकून परत घरी येणं एवढया कमी वेळात impossible होतं.. तुम्ही कथेतील टायमिंग वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल माधव.. आणि बाकीचे मुद्दे तुम्हाला अंजली वाघमारेंनी नीट explain केलेत त्याबद्दल त्यांचे आभार . Happy

मीरा तुम्ही म्हणालात तशी मी गुन्हेगारीवर आधारित कथा न लिहिता प्रेमकथा लिहिण्याचा प्रयत्न करतेय.. फक्त त्या कथेत थोडा वेगळेपणा यावा म्हणून मी हा भाग त्यात add केला आहे.. पण तुम्ही म्हणालात तसं कथेत नावीन्य आणण्याचा प्रयत्न मी करेन.. तुम्ही कथेचे जे काही भाग वाचले आणि त्यावर प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद. Happy
नावांचा गोंधळ मी चुकून घातला आहे . Lol तिचं नाव अनघा भावेच आहे.. बाकीच्यांची नावं अभिजित कुलकर्णी आणि पुष्कर काळे अशी आहेत..
सर्वाना प्रतिसादाबद्दल धन्यवाद! पुढील भाग लवकरच टाकेन..

Submitted by स्वरांगी on 24 May, 2019 - 10:30 >>> All the Best Happy
पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत