लव्ह इन ट्रबल भाग-6
आज या केसचा पहिला दिवस होता.. आजपासून शुभमच्या खुनाच्या खटल्याची सुनावणी होणार होती.. खटला पहायला बऱ्याच जणांनी गर्दी केलेली.. अभिजित, पुष्कर म्हणजेच डोभी बाजूंचे वकील हजर होते.. अनघा आरोपीच्या पिंजऱ्यात उभी होती.. तिच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता.. प्रमिलाताईही बावरलेल्या चेहऱ्याने मागे बेंचवर बसल्या होत्या.. अप्पासाहेब मुद्दाम कोर्टात हजर नव्हते..अभिजित आणि पुष्कर एकमेकांविरुद्ध असल्याने काय होणार या उत्सुकतेने आलेले advocate बर्वे प्रमिलाताईंच्या मागेच बसलेले.. अभिजित आणि पुष्कर सगळं नीट आहे ना याची पुन्हा पुन्हा खात्री करत होते..एवढ्यात पुकारा झाला आणि judge साहेब कोर्टात हजर झाले.. ते आल्या आल्या सर्वजण उभे राहिले.. कोर्टाची कार्यवाही सुरू करण्यात यावी असं judge साहेबानी म्हटल्याबरोबर कामकाज सुरू झालं..
“ आरोपी मिस. अनघा भावे यांचं आपला एक्स बॉयफ्रेंडशी, म्हणजेच शुभमशी काही कारणाने मोठं भांडण झालं.. भांडण इतकं विकोपाला गेलं की आरोपीच्या मनात शुभमविषयी तिरस्कार आणि राग निर्माण झाला!! शेवटी आरोपीला शुभमबद्दल असलेला राग, द्वेष आवरेना आणि म्हणूनच तिने शुभमचा बदला घ्यायचं ठरवलं आणि तिने शुभमच्या खुनाचा प्लॅन केला!! आणि त्यानुसार दिनांक 11 मार्च 2019 रोजी रात्री सव्वाबाराच्या सुमारास शुभमचा स्वतःच्याच घरी पोटात चाकू खुपसून खून केला!! पण तेवढ्यावरच आरोपीचं समाधान न झाल्याने तिने विव्हळत पडलेल्या शुभमच्या छातीवरही चाकूने सपासप वार केले.. आणि शुभमचा निर्घृणपणे हत्या केली!!!” अभिजितने अनुवर आरोप केले.. अनु अजूनही अभिजीतकडे पाहत होती.. अभिजितचे आरोप ऐकून अनु सुन्न झाली होती.. प्रमिलाताईंना तर रडू आवरेना..
“ आणि म्हणूनच माझी कोर्टाला अशी विनंती आहे की कलम 302 नुसार आरोपीला फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात यावी!! That’s all your honour..” एवढं बोलून अभिजित थांबला आणि आपल्या जागी जाऊन बसला.. अभिजितचं हे असं बोलणं अनुसाठी खूप मोठा धक्का होता!!अविश्वासाने तिने अभिजीतकडे पाहिलं..कोर्टात नक्की काय सुरू आहे लोकं काय बोलतायत हे सगळं तिला ऐकू येईनासं झालं..शून्यात नजर लावून ती शांतपणे उभी होती..
“ आरोपीच्या वकिलांना फिर्यादी वकिलांनी केलेले आरोप मान्य आहेत का??” judge साहेबांनी पुष्करला विचारलं.. “ नाही!!advocate कुलकर्णींनी माझ्या अशिलावर केलेले सर्व आरोप साफ खोटे आहेत,याची कृपया कोर्टाने नोंद घ्यावी..” एवढं बोलून पुष्कर खाली बसला..
“ तुम्हांला अस म्हणायचंय की आरोपी मिस. अनघा यांनी खूप वेळा माझ्या अशिलाला जीवे मारण्याची धमकी दिलीय?? किंवा अस बोलून दाखवलंय.??” अभिजीने मोनिकाला म्हणजेच शुभमच्या आत्ताच्या गर्लफ्रेंडला विचारलं.. साक्ष देण्यासाठी अभिजीनेच तिला साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं..
“ हो!! खूप वेळा!!” मोनिका म्हणाली.. “ मला आठवतंय मी आणि शुभमने एकत्र येणं अनघाला मुळीच आवडलं नव्हतं. त्यामुळेच ती I will kill you, तुला मरायचंय का माझ्या हातून?? अशा प्रकारच्या धमक्या द्यायची. येता जाता आम्ही कुठेही एकत्र दिसलो की ती आम्हा गळ्यावरून हात फिरवून ‘मेलात आता तुम्ही’ आशा प्रकारे हावभाव करून दाखवायची.. फक्त मीच नाही बाकी अनेक जणांनी पहिलंय तिला असं करताना..मला पूर्ण खात्री आहे.. हिनेच मारलंय शुभमला.. हिला जास्तीत जास्त शिक्षा करा your honour!!! मोनिका ओरडून म्हणाली..
“ ऑर्डर!! ऑर्डर!!!” judge साहेबांनी तिला शांत राहण्याचा इशारा दिला.. अभिजितने एकदा judge साहेबांकडे पाहिलं आणि मोनिलकाला ‘ thank you.’ म्हणून आपल्या जाग्यावर जाऊन बसला.. “आरोपीचे वकिल विचारायचे असल्यास साक्षीदाराला प्रश्न विचारू शकतात..” judge साहेबानी पुढे proceed करण्यास सांगितलं..
“ आता माझं काही खरं नाही!! आता मेलोच मी!!
‘हे भगवान मुझे उठा ले!!’ अशी वाक्य आपण बऱ्याच situation मध्ये म्हणतो, किंवा ऐकतो.. पण म्हणून आपण, किंवा ती सर्व माणसं लगेचंच मरून जातात का??!!” पुष्करने मोनिकाला विचारलं..
“ तुम्हाला असं नाही वाटत की माझे अशील यांनीही अशाच प्रकारे हे वाक्य शुभमला उद्देशून बोलले असतील.??”
“ अनघा हे खून करण्याचा उद्देशानेच म्हणालेली!! ती मस्करीत किंवा काहीतरी निरर्थक बोलायचं म्हणून नाही बोलली.. तिला असं करायचं होतं म्हणून म्हणाली.. आणि तिने ने करून दाखवलंसुद्धा!!” मोनिका ठामपणे म्हणाली.
“पण मला तर अस कळलंय की तुम्हीही असच काहीसं माझ्या अशिलाला म्हणालात!!” पुष्करने गुगली टाकली.
“ काय??” मोनिकाने आश्चर्याने विचारलं.. तिला आठवलं, शुभमचा खून झाल्या रात्री ती पोलीस स्टेशनमध्ये गेली होती अनुला जाब विचारायला..
“ का मारलंस तू माझ्या शुभमला??” मोनिका रडत, ओरडत अनुच्या अंगावर धावून गेली तोच लेडी कॉन्स्टेबलनी तिला धरून ठेवलं.
“ तुला बघवलं नाही ना की शुभम तुला टाकून माझ्याकडे आला??! काय मिळालं तुला हे करून?? मी तुला अशी सोडणार नाही.. I will kill you!!!! I will kill you अनघा!!!” मोनिका रागाने किंचाळत अनुवर धावून गेली..
आणि आत्ता हे सगळं मोनिकाला आठवलं..
“ ते… मी..” मोनिका गोंधळली..
“ आता हे तर तुम्ही नक्कीच मस्करीत म्हणाला नसाल!!!
“ मग तर असं म्हणायला हरकत नाही की तुम्हीही भावी खुनी आहात!??तुम्ही मारू शकता माझ्या अशिलाला!!” पुष्करने मोनिकाला जाब विचारला.. मोनिका यावर निरुत्तर झाली..
“ज्या रात्री शुभमचा खून झाला त्या रात्री मला शुभमने साधारण 10.30 च्या आसपास फोन केलेला!! आणि त्यानेच मला सांगितलं की तो अनुशी बोलायला गेला तेव्हा अनुने त्याचा हात मुरगळला!! आम्ही थोडा वेळ बोललो आणि नंतर त्याने अचानक फोन कट केला.!! मला वाटतंय तेव्हाच अनुने त्याच्या पोटात सुरा खुपसला असेल..” शुभमचा मित्र रोहित, त्याला witness box मध्ये बोलावण्यात आलं तेव्हाच त्याने हा खुलासा केला..
“ तुम्ही म्हणालात की तुम्हाला शुभमचा फोन आलेला साधारण 10.30 च्या दरम्यान आणि बोलता बोलता अचानक त्याने फोन कट केला.. हो ना?? आणि तुमचं अस conclusion आहे की नेमकं त्याच वेळी अनुने त्याला चाकुने भोसकलं बरोबर??” पुष्करने विचारलं..
“ फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, मिस्टर रोहित, शुभमचे कॉल डिटेल्स मी चेक केलेत.. त्यात त्याने ठीक 10 वाजून 23 मिनिटांनी तुम्हाला कॉल केला आणि तो कॉल फक्त 16 मिनटं चालला.. आणि शुभमचा खून याच्या खूप नंतर म्हणजे साधारण 12- 12.15 च्या सुमारास घडला.. त्यामुळे तुम्ही काढलेलं conclusion तर साफ चूक आहे.. आणि राहिला प्रश्न शुभमचा हात मुरगळण्याचा!! तर तेव्हा शुभमने जबरदस्ती माझ्या अशिलाचा हात धरला होता आणि सेल्फ डिफेन्स म्हणून केली गेलेली action होती ती..” पुष्करने ठामपणे अनूची बाजू मांडली..
“ आरोपी अनघा भावे तुम्हाला या बाबतीत काही बोलायचं असल्यास तुम्हाला बोलायची परवानगी आहे.” Judge साहेबानी अनघाला तिची बाजू मांडण्याची संधी दिली..
“ मला मान्य आहे की मी शुभमचा तिरस्कार करत होते.. त्याचा राग राग करत होते… तो माझ्याशी जे वागला त्याची शिक्षा त्याला मिळावी असंही मला वाटत होतं..पण म्हणून त्याचं आयुष्य संपून जावं अशी इच्छा कधीच व्यक्त केली नाही..” अनु अगदी शांतपणे सगळं सांगत होती..
“ मी त्याला, ‘ मी तुझा जीव घेईन’, ‘मरायचंय का तुला?’ अस बोलायचे पण, त्यावेळी मला जे वाटलं तेच मी म्हटलं!! त्यात त्याला जीवे मारावं असा माझा अजिबात हेतू नव्हता.. आणि मला जर त्याला काही करायचं असतं तर मी अशी सगळीकडे बोलत फिरले नसते..लोकं नेहमी जे बोलतात, ते करतातंच असं नाही..
“मला खात्री आहे!! प्रत्येकीला आपल्या आयुष्यात एकदातरी आपल्या बॉयफ्रेंड किंवा नवऱ्याला ठार मारावसं वाटत असेल!!!” अनु वाट्टेल ते बोलून गेली. पुष्करने मनातच कपाळावर हात मारला.. अभिजितने तिच्याकडे शांतपणे पाहिलं.. सगळेजण तिच्याबद्दल कुजबुज करू लागले..
“ अशी काय ही मुलगी??!! काहीही बोलते!! हिनेच खून केला असेल त्याचा!!!”असं सगळेजण आपापसांत कुजबुजू लागले..judge साहेबही तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागले.. तिच्या या स्टेटमेंटने सगळीकडे एकच गोंधळ झाला.. काय झालं म्हणून अनु इकडे तिकडे पाहू लागली..
“ म्हणजे?? फक्त मलाच असं वाटतं का??” अनुने स्वतःशीच मनातल्या मनात विचारलं.. आणि कपाळावर हात मारून मान खाली घातली..
“ आजचं कामकाज इथेच थांबवण्यात येत..” अस सांगून कोर्टाने पुढची तारीख दिली…संध्याकाळपर्यंत अनुचं हे स्टेटमेंट सगळीकडे viral झालं होतं.. न्युज चॅनल्स, यु ट्यूब, फेसबुक सगळीकडे अनुच्या ह्या वाक्याची चर्चा होती..
इकडे अभिजित फॉरेन्सिक लॅबमध्ये रिपोर्ट्स न्यायला आला होता..त्याच्या हातात दोन्ही रिझल्ट असलेली envelope देण्यात आली.. अभिजित आपल्या घरी हॉलमध्ये सोफ्यावर बसून ते results चेक करत होता… त्याने एकापाठोपाठ एक दोन्ही results चेक केले.. त्याचे डोळे विस्फारले गेले.. थकून त्याने डोळ्यांवरचा चष्मा काढून सोफ्यावर अंग टाकलं..
आज ह्या केसच्या सुनावणीचा दुसरा दिवस होता.. अनुला पोलिस गाडीतून खाली उतरवून तिला घेऊन कोर्टाकडे निघाले.. अनु जशी गाडीतून खाली उतरली तसे प्रेस वाले, रेपोर्टर्स, कॅमेरामन यांनी अनुभोवती एकच गराडा घातला..अनुवर प्रश्नांचा भडिमार केला जात होता.. कॅमेरामन खचाखच फ्लॅश मारून फोटो काढत होते.. पोलीस कसेबसे त्यांना बाजूला करत, वाट काढत आत नेऊ लागले… अभिजीतही तिथे पोचला.. तिला पोलिसांनी नेताना त्याने एकवार पाहिलं तोच अनुचं त्याच्याकडे लक्ष गेलं.. ती मागे वळून वळून त्याच्याकडेच पाहत होती.. त्याने एकदा तिच्याकडे पाहिलं आणि तो पुढे चालू लागला..
“Your honour मला या केस संदर्भात एक महत्वाचा पुरावा सादर करायचा आहे...हाच तो पुरावा!!” अभिजितने आपल्या हातात असलेली चाकू असलेली प्लास्टिक बॅग judge साहेबांकडे दिली..
“ हाच तो सूरा ज्याने शुभमचा खून करण्यात आला आणि त्यावर शुभमचं रक्तही लागलेलं आहे..” अभिजित म्हणाला..
“ चाकूवर लागलेलं रक्त शुभमचं आहे की नाही हे चेक करण्यासाठी तो मी फॉरेन्सिक लॅबमध्ये सबमिट केला होता आणि त्याचे results यायचे होते. त्यामुळेच मी हा पुरावा याआधी सादर करू शकलो नाही याची कोर्टाने नोंद घ्यावी..” अभिजीतने त्याची बाजू मांडली.. judge साहेबांनी तो चाकू आणि त्याचे रिपोर्ट्स चेक केले…
“ Objection your honour!! कोणतीही पूर्वकल्पना न देता सादर केलेला पुरावा आहे हा.. आणि पोलीस तपासात त्यांना घटनास्थळी कोणत्याही प्रकारचं हत्यार मिळालं नाही.. त्यामुळे अचानक advocate कुलकर्णींनी सादर केलेला पुरावा संशयास्पद आहे!!! तो पुरावा बनावट नसेल हे कशावरून??” पुष्करने शंका उपस्थित केली..
“ Objection overruled !! कोर्ट हा पुरावा accept करेल पण त्याआधी कोर्टाला फॉरेन्सिक डिपार्टमेंटच्या डॉक्टरांचं स्टेटमेंट ऐकायचं आहे..”
“ तुमचं काय मत आहे की शुभमला पोटात झालेल्या जखमेशी सादर केलेल्या चाकूचा आकार तंतोतंत जुळतो??” अभिजीतने डॉ. साळुंकेंना विचारलं..
“ हो नक्कीच!! जर आपण शुभमचा शरीरावर झालेले वार आणि पोटाला केलेली जखम यांचं नीट निरीक्षण केल्यास हेच हत्यार खुनासाठी वापरलं आहे हे नक्की कळतं..” डॉ. साळुंके म्हणाले.. उलट तपासणीसाठी पुष्कर समोर आला.
“ घटनास्थळी झालेल्या तपासणीत पोलिसांना कोणतंही हत्यार मिळालं नाही. पण अचानक आता ते हत्यार घटनास्थळीच मिळालं यात तुम्हाला काही काळंबेरं वाटत नाही?? असही होऊ शकतं की शुभमच्या कापड्यांवरचं रक्त ह्या चाकूला लावून बनावट पुरावा तयार करण्यात आला?” पुष्करने विचारलं..
“ होऊ शकतं!! पण याचा काहीच पुरावा नाहीये..” डॉ. साळुंके म्हणाले..
“ पण म्हणजेच हा पुरावा बनावट असल्याची शक्यता नाकारता येत नाही, बरोबर??” पुष्करने विचारलं.
“ बरोबर!!” साळुंके म्हणाले.
“ That’s all your honour!!” एवढं बोलून पुष्कर थांबला..
थोड्या वेळाने कोर्टाने अभिजीतला त्याच फायनल स्टेटमेंट सादर करायला सांगितलं.. अभिजीतने सगळ्यांकडे एकदा पाहिलं आणि घसा खाकरत त्याने बोलायला सुरुवात केली..
“ 11 मार्च 2019 रोजी रात्री सव्वाबाराच्या सुमारास आरोपी अनघा काळे हिने आपापसातील वादविवादामुळे माझे अशील शुभम फडके यांना चाकू खुपसून ठार मारलं.. आणि त्याकहा पुरावा आत्ताच मी तुमच्यासमोर सादर केलाय ज्यावर शुभमच रक्त आहे आरोपीच्या हाताचे ठसे दोन्ही आहेत.. अनघा काळे यांनी पोलिसांना आणि कोर्टाला खोटं स्टेटमेंट देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे.. त्यांनीच हा खून केल्याचं पुराव्यानिशी सिद्ध झालंय.. त्यामुळे माझी कोर्टाला अशी विनंती आहे, की आरोपीला कलम- 302 नुसार एक प्रतिष्ठित आणि निष्पाप व्यक्तीचा खून केल्याप्रकरणी, 15 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावावी!!” अभिजितने अनघाला खुनी ठरवलं.. एवढं बोलून तो आपल्या जागी जाऊन बसला.. पुष्कर त्याच हे बोलणं ऐकून हतबल झाला.. प्रमिलाताई तर ओक्साबोक्शी रडू लागल्या..
अनु थंडपणे शून्यात पाहत होती.. सगळंच संपलं होत.. अनुच्या डोळ्यातलं पाणी रडून रडून आटलं होतं.. तिला बोलायला काहीच शिल्लक राहिलं नव्हतं…तिने तसंच थंड, भावनाशून्य नजरेने अभिजीतकडे पाहिलं… तोही तिच्याकडेच पाहत होता.. का कुणास ठाऊक पण त्याच्या डोळ्यात थोडं गिल्ट जाणवलं..ती अजूनही त्याच्याकडे पाहत होती.. त्याच्याकडून आता तिची काहीच अपेक्षा राहिली नव्हती.. आपण इतके दिवस ज्याला ओळखतो तो हाच का ?? असं अनुला वाटून गेलं..
“ फक्त एका पुराव्यावरून, माझ्या आशिलाला गुन्हेगार ठरवता येऊ शकत नाही your honour!!! जो पुरावा कोर्टासमोर सादर केला गेला, तो खरा आहे की खोटा हे अजूनही सिद्ध झालेलं नाही!! तो पुरावा खोटा आहे हे जसं सिद्ध नाही झालेलं तसंच तो खरा आहे हेही अजून सिद्ध झालेलं नाही!! त्यामुळे माझे अशील….”
“ एक मिनिट!!” पुष्करचं बोलणं मधूनच तोडत अभिजित म्हणाला आणि अचानकच उठून बोलायला पुढे आला..सगळेजण अभिजीतकडे पाहू लागले.. तो अचानक समोर आल्याने पुष्करही गडबडला.. सर्वजण आपापसात कुजबुजू लागले.. तो असा अचानक उठल्यामुळे अनघाही त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागली..
“ आरोपीचे वकील बोलत आहेत हे तुम्हाला माहीतेय ना advocate कुलकर्णी??तुम्ही अचानक का थांबवलं त्यांना??” judge साहेबानी अभिजीतला जाब विचारला..
“ I am sorry your honour!! पण मला कोर्टासमोर अजून एक पुरावा सादर करायचा आहे..” अभिजित मोठ्याने म्हणाला…
क्रमशः
काल आमच्याकडे नेटवर्क
काल आमच्याकडे नेटवर्क नसल्यामुळे हा भाग मला माबोवर टाकता आला नाही.. त्यामुळेच आज टाकलाय.. उद्यापासून आमच्याकडे पाहुणे मंडळींची गडबड असणारे .. त्यामुळे पुढील भागाचे टंकलेखन करायला वेळ मिळणार नाही.. पण जमेल तसं रोज थोडं थोडं टंकून 2-3 दिवसांच्या फरकाने पुढचे भाग टाकायचा प्रयत्न करेन..
Interesting..!कथेवर तुमची पकड
Interesting..!कथेवर तुमची पकड हळुहळु घट्ट होऊ लागलीए.
पु.भा.प्र!
कथा उत्तमच चालली आहे परंतु
कथा उत्तमच चालली आहे परंतु काही ठोस चुका खूप खटकत आहेत त्यामुळे न राहवून सांगते. अनुच नाव 3 वेळा बदललं आधी कुलकर्णी मग भावे आणि मग काळे . मन लावून वाचताना ते खटकतं एवढंच. चुका काढण्याचा किंवा टिका करण्याचा हेतू नाही.
माफ करा हा चुकून झालं ते..
माफ करा हा चुकून झालं ते.. मला ती चूक कशी दुरुस्त करता येईल सांगाल का प्लिज??
जबरदस्त!!!
जबरदस्त!!!
पकड आणि वेग दोन्ही घेतेय कथा!
पुभाप्र!!!
मस्त जा रहे हो... आडनावांचा
मस्त जा रहे हो... आडनावांचा जरा घोळ झालाय ते एडिट करा फकत.
मस्त वेग घेतेय कथा! मुद्देसूद
मस्त वेग घेतेय कथा! मुद्देसूद मांडणी आहे. पुढील भागास्तव शुभेच्छा आणि प्रतिक्षेत ...
Next part...
Next part...
मस्त पकड घेते आहे कथा.
मस्त पकड घेते आहे कथा.
Aho taka ho next part lavkar,
Aho taka ho next part lavkar, mast ahe kahta. 1 number.
> “मला खात्री आहे!!
> “मला खात्री आहे!! प्रत्येकीला आपल्या आयुष्यात एकदातरी आपल्या बॉयफ्रेंड किंवा नवऱ्याला ठार मारावसं वाटत असेल!!!”
.
.
.
.
“ म्हणजे?? फक्त मलाच असं वाटतं का??” अनुने स्वतःशीच मनातल्या मनात विचारलं.. आणि कपाळावर हात मारून मान खाली घातली.. >
छान चालूय. पुभाप्र.