लव्ह इन ट्रबल भाग- 5

Submitted by स्वरांगी on 16 May, 2019 - 11:40

लव्ह इन ट्रबल भाग- 5
“ हिला कुठेतरी पहिल्यासारखं वाटतंय..” मि. बर्वे अनुचा मोबाईलवरचा फोटो पाहत ते म्हणाले. सध्या शुभमचा खून हा चर्चेचा विषय असल्याने त्याचेच अपडेट्स ते पहात होते.
“ तिच्याकडे बघून वाटत नाही की ही कुणाचा खून करेल, पण आजकाल कुणाचं काय सांगता येतंय!!” पुष्कर म्हणाला..
“ तुला काय वाटतं?? अप्पासाहेबांच्या मुलाचा खून करून ती सहीसलामत सुटेल?? आणि सुटली तरी बाहेर आल्यावर तिचं करियर तर होऊ शकणार नाही..” बर्वे म्हणाले.
तेवढ्यात पुष्करचा मोबाइल वाजला. स्क्रीनवरचं नाव बघून पुष्कर चकित झाला. त्याचा असा चेहरा पाहून बर्व्यांनी विचारलं “कुणाचा फोन आहे रे?”
“अभिजितचा!!” पुष्कर आश्चर्याने म्हणाला..
“ मग त्यात एवढं surprised होण्यासारखं काय आहे??!!” बर्व्यांनी न कळून विचारलं..
“ अभिजीतचा मला फोन आलाय!! तो दोन वर्षं माझ्याशी बोलत नाहीये!!” पुष्कर आनंदाने म्हणाला..
बर्वे काही बोलणार तेवढ्यात थांबायची खूण करून पुष्करने घसा खाकरून घेतला,
आ..आ.. हॅलो.. हॅलो.. त्याने बोलण्याची प्रॅक्टिस करून मग कॉल उचलला…
“ हॅलो? हा बोल ना.. नाही कामात नाहीये..” पुष्करने शक्य तेवढा आवाज नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न केला.

“ एवढं कर…ओके??” अभिजितने थंड आवाजात बोलून फोन कट केला आणि टेबलवर मोबाईल टाकला.. तो सावधान मध्ये शून्यात नजर लावून उभा होता..
“ तुम्हाला पुष्करचं तोंडही पहायचं नसतं तरी तुम्ही त्याला फोन केलात..” झेंडे अभिजीतकडे सहानुभूतीने पाहत होते..
अचानक अभिजीतने दोन्ही हातानी केस धरले आणि डोकं खाजवायला सुरवात केली!! त्याला चिडचिड सहन होत नव्हती..
“अस वाटतं की… असं वाटतं की…केस उपटून टाकावेत स्वतःचे!!” अभिजित दात ओठ खात म्हणाला.. त्याने झेंडेंकडे पाहिलं.. ते त्याच्याकडे केविलवाणे होऊन पाहत होते.. त्यांना खूप काळजी वाटत होती अभिजितची..अभिजीतने हाताने केस सारखे केले..
“निघुया??” बॅग उचलून तो म्हणाला..

“ कशी आहेस बाळा तू ?? काय होऊन बसलं हे!!!” अनुची आई रडवेली झालेली.. अनूची आई गावी राहायची.. अनुचे वडील ती लहान असतानाच वारले.. पुढे अणूंची सगळी जबाबदारी आईवर येऊन पडली.. अनूची आई
।प्रमिलाताई अंगणवाडी सेविका होत्या. कष्ट करून त्यांनी अनुला वाढवलं आणि शिक्षणासाठी मुंबईत पाठवलं..अनुला अटक झालेली ऐकून त्यांना धक्काच बसला..
“ आई तू माझी अजिबात काळजी करू नकोस!! मी अगदी व्यवस्थित आहे आणि मी लवकरच सुटेन इथून बघच तू..” अनु आईला समजावत म्हणाली..
“अशी कशी काळजी करू नको !! इथे माझं लेकरू काय करत असेल, कसं राहात असेल, काय खात असेल याचा विचार करून करून डोळ्याला डोळा नाही माझ्या..” प्रमिलाताई मुसमुसत म्हणाल्या.
“ जेवण बरं असतं का ग ??” त्यांनी न राहवून अनुला विचारलं.. अनु त्यावर काहीच बोलली नाही.. “ तुझ्या लॉकअप मधल्या बायका नीट वागतात का ग तुझ्याशी?? की त्रास देतात तुला?? प्रमिलाताईंनी काळजीने विचारलं..
“ अग उलट सगळ्या जणी मला घाबरून असतात..या लॉकअपमध्ये मी डॉन आहे!! बाकीच्या सगळ्याजणी चोरी, मारामारी असल्या छोट्या गुन्ह्यासाठी आत आल्यात.. मी एकटी खुनाच्या आरोपाखाली आलेय इथे त्यामुळे सगळ्याजणी मला टरकुन असतात.!!” अनु हसत आईला हसवण्यासाठी म्हणाली. याही परिस्थितीत अनु आपली काळजी करतेय हे पाहून त्यांना गहिवरून आलं..
“ चला मॅडम, वेळ संपली भेटीची वेळ संपली!!” हवालदार घड्याळ बघत म्हणाला..
“ मी रोज येत जाईन हा तुला भेटायला.. खरं तर बेल ऑर्डरच आणली असती तुला सोडवायला पण एवढे एकरकमी पैसे नाहीयेत ग द्यायला.!!” प्रमिलाताई काकुळतीने म्हणाल्या.
“इट्स ओके ग आई..तू नको काळजी करू माझी आणि रोज भेटायला नाही आलीस तरी चालेल. जायचा यायचाही खर्च होतोच ना!!” अनु आईला समजावत म्हणाली..
जाता जाता प्रमिलाताईंनी अनुचा हात घट्ट पकडला.. आणि त्या स्पर्शाने सांगितलं, “ घाबरू नको!! मी कायम आहे तुझ्यासोबत..”

“अजून कशी नाही आली ही??” पुष्कर घड्याळ बघत म्हणाला.. “आत्ता पर्यंत यायला हवं होतं..” तो मनाशीच म्हणाला.. तेवढ्यात त्याला बाहेरून पावलांची चाहूल लागली म्हणून त्याने दाराला कान लावला.. तेवढ्यात अनुने दरवाजा उघडला आणि दरवाजा थाडकन पुष्करच्या डोक्यावर आपटला!!
“ आई गं!!! “ पुष्कर कळवळला.
“ ओह गॉड!! I am soo sorry !! माझं लक्षच नव्हतं .. खूप जोरात लागलं का हो??” अनुने काळजीने विचारलं..
“ आज दुसऱ्यांदा दार आपटलंस तू माझ्या डोक्याला!! हाहाहा!!” पुष्कर हसत म्हणाला. अनु पाहतच राहिली..अभिजीतच्या सांगण्यावरून तो आता अनघाच्या बाजूने ही केस लढणार होता..आणि त्यासाठीच तो अनुला भेटायला पोलीस स्टेशनला आला होता..
“ तुझ्यात आणि अभिजीतमध्ये काय नातं आहे??” पुष्करने बसत विचारलं.
“ मी त्यांच्याकडे इंटर्न म्हणून काम करत होते महिनाभर.” अनु म्हणाली.
“ Thank you so much!!!” पुष्कर म्हणाला.
“ कशाबद्दल??” अनुने न कळून विचारलं.
“ तुझ्याचमुळे अभिजीतने मला कॉल केला आणि त्यानेच मला तुझं वकीलपत्र घ्यायला सांगितलं...” पुष्कर म्हणाला..
“ तुम्हाला मला कोणते प्रश्न नाही विचारायचे??” अनुने विचारलं.
“ विचारायचंय ना!! तू शुभमचा खून केलास की नाही???” पुष्करने विचारलं.
“ नाही!!” अनु ठामपणे म्हणाली..
“ एवढंच विचारायचं होतं मला.. हाहाहाहा!! पुष्कर हसत म्हणाला..अनु नुसतच त्याच्याकडे पाहत राहिली..

इकडे पुष्कर आणि अनु बोलत असताना अभिजित आणि झेंडे मात्र घटनास्थळी, जिथे शुभमचा खून झाला, तिथे पोचले होते..त्यांनी पार्किंग मधलं cctv फुटेज चेक केलं. त्यात अनु घरी आल्याचं, शुभमशी झालेल्या भांडणाचं रेकॉर्डिंग होतं पण त्यानंतर
light गेल्यामुळे अनु घरातून बाहेर पडल्याचा किंवा कुणी अनोळखी व्यक्ती बाहेरून आत आल्याचा कोणताही पुरावा नव्हता..
“ ज्याने शुभमचा खून करण्यात आला ते हत्यार मिळालं का??” अभिजितने झेंडेना विचारलं..
“ नाही अजून, पण तपास सुरू आहे.” झेंडे म्हणाले.
“ मग जवळच्या दुसऱ्या पोलीच चौकीतून काही कळलं??” अभिने विचारलं.
“ मी चौकशी केलीय. 13 सेंटीमीटर लांब आणि 3.5 सेंटीमीटर रुंद चाकू कुठे मिळाल्यास कळवायला सांगितलं आहे..” झेंडे म्हणाले..
“ ओके.. आता आपण आत जाऊनच चेक करू अजून काही सापडतं का ते.” अभि म्हणाला आणि दोघ घरात शिरले.आत शिरल्यावर लगेचच दारात शुभमचा मृतदेह पडलेला तिथे मार्किंग करण्यात आलं होतं. रक्ताचे डाग अजूनही तसेच होते फरशीवर.
अभिजित खिडकीपाशी आला. अनुने सांगितल्याप्रमाणे तिने चष्मा लावला नव्हता त्यामुळे जरी कुणी बिल्डिंग मध्ये घुसलं असलं तरी तिला त्याचा चेहरा दिसणार नव्हता..
“ झेंडे!! अगदी छोट्यात छोटी संशयास्पद गोष्ट जरी दिसली तरी मला लगेच सांगा..” अभि इकडे तिकडे निरखून पाहत म्हणाला..हॅन्डग्लोव्हज घालून दोघेही एक एक गोष्ट बारकाईने तपासून पाहत होते..
“ तुम्ही त्या दिवशी या एरियात कोणती वेगळी घटना म्हणजे भांडण वैगरे घडली आहे का ते बघितलं का??” अभिजीतने विचारलं..
“ हो तेही बघितलं मी पण अस काहीच संशयास्पद आढळून आलं नाही..” झेंडे म्हणाले..
“ एकदा बिल्डिंगमधल्या सगळ्या लोकांकडे पण चौकशी करून बघू की खून झाला त्यावेळी ते कुठे कुठे होते आणि काय करत होते.. काहीतरी clue नक्कीच मिळेल..” अभिजित म्हणाला. इकडे झेंडेंनी एक डायरी चेक करायला घेतली . ते एक एक पान उलटंत होते तेव्हा त्यांचं लक्ष एका मजकुराकडे गेलं , आणि ते पाहतच राहिले.
“ आज नेहमीप्रमाणेच कुलकर्णी सरांनी खूप मनस्ताप दिला!!” अनघाने रोजनिशीत लिहिलं होतं. त्यांनी अभिजीतकडे पाहिलं नेमकं तेव्हाच अभिजीतचं लक्ष झेंडेंकडे गेलं..
“ काय झालं?? काय आहे त्यात??” अभिजित त्यांच्यासमोर येत म्हणाला.
“ काही नाही!!” अस म्हणत झेंडे ती डायरी आपल्या मागे लपवू लागले. अभिजीतने हात पुढे केला तस झेंडेंनी आपला हात त्याच्या हातात देत शेकहॅण्ड केलं आणि हसले.. अभिजीतने दुसरा हात पुढे केला तस त्यांनी नको म्हणून मान हलवली..अभिजित हात मागे न घेता तसाच झेंडेंकडे शांतपणे पाहत राहिला. शेवटी नाईलाजाने त्यांनी डायरी अभिजीतच्या हातात दिली..त्याने डायरी उघडून पहिली आणि वाचलं.. कपाळावर आठ्या आणत त्याने झेंडेंकडे पाहिलं..
“ हे वाचून असं वाटतं की अनघाला शुभमला नाही, तुम्हाला ठार मारायचं होत!!” झेंडे मोठ्याने हसत म्हणाले. तेवढ्यात त्यांना फोन आला म्हणून ते कॉल रिसिव्ह करून बाहेर बोलायला गेले.
अभिजीतने डायरी टेबलवर ठेवली आणि तो सगळीकडे नजर फिरवू लागला, तेवढ्यात त्याला फ्रिजखाली काहीतरी चमकलेलं दिसलं.. तो फ्रिजजवळ जाऊन खाली वाकून पाहू लागला.. तेवढ्यात झेंडे आतमध्ये आले आणि म्हणाले,
“ पोलीस स्टेशन मधून फोन आला होता .. इथून सात किलोमीटर अंतरावर एक ठिकाणी रस्त्यालगतच्या असलेल्या गवताळ भागात त्यांना चाकू मिळालाय ज्यावर रक्त आहे आणि मेजरमेन्ट पण सेम आहेत..”त्यांचं बोलून पूर्ण होतंय तोच अभिजितने फ्रिजखाली हात घालून ती वस्तू बाहेर काढली.. तो रक्त लागलेला चाकू होता..झेंडे आश्चर्याने पाहू लागले..
“ असाच दिसत असेल ना तो चाकू??” अभिजित हातातला चाकू पाहत म्हणाला.. झेंडे अविश्वासाने अभिजित आणि त्या हत्याराकडे आलटून पालटून पहात होते.. “अजून तिच्यावर खटला का नाही भरला तुम्ही??” अप्पासाहेब अभिजीतवर ओरडले.
“ सर, माझा तपास अजून सुरू आहे... अजून खून ज्या हत्याराने झाला ते किंवा साक्षिदार काहीच मिळालं नाहीये. तीही गुन्हा कबूल करायला तयार नाहीये..” अभिजित शांतपणे म्हणाला.
“ हत्यार मिळालं नाहीये तर ते मिळेल.. आपण मिळवू.. मी तुम्हाला ते मिळवून देईन!!! तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की ती मुलगी माझ्या मुलाची खुनी आहे आणि तिला जास्तीत जास्त शिक्षा मिळायला हवी!! समजलं की नाही??” अप्पासाहेबांनी दरडावून विचारलं.. अभिजित शांतपणे उभा होता..
हाततला चाकू बघून हाच प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर उभा राहिला..
“ पोलिसांनी जेव्हा इथली झडती घेतली तेव्हा त्यांना काही मिळालं होतं?? त्यांनी नीट चेक केलं नाही का?? अभिजीतने झेंडेना विचारलं.
“ खूप वेळ झडती घेतली त्यांनी!! अक्ख घर उलटं पालटं करून बघितलं त्यांनी पण काहीच नाही मिळालं!!” झेंडे आश्चर्य व्यक्त करत म्हणाले.
“पण आत्ता ते हत्यार माझ्या हातात आहे..” अभिजित डोळ्यासमोर चाकू नाचवत म्हणाला..
“ मग ह्या दोन चाकूपैकी खरा चाकू कोणता?? काहीच कळेनासं झालंय मला तर!!” झेंडे म्हणाले..
“ फॉरेन्सिक लॅब मध्ये जाऊया.. मगच काय तो खरा प्रकार कळेल..” अभिजित म्हणाला आणि दोघे लगेचंच तिकडे रवाना झाले..

“ प्लीज चेक करा की ह्या दोन्ही चाकूंवर शुभमचं रक्त आहे की नाही.” अभिजित दोन्ही प्लास्टिक बॅग मध्ये बंद केलेले चाकू टेबलवर ठेवत म्हणाला.
“ आणि हो!! हे टॉप सीक्रेट राहील..” अभिजित लॅबमधल्या वर्करना म्हणाला..
“ टॉप सीक्रेट??” समोरच्या व्यक्तीने आश्चर्याने विचारलं..
“हो.. हा चाकू जो घटनास्थळी मिळाला तो सीक्रेट नाहीये..हा दुसरा चाकू जो घटनास्थळापासून लांब रस्त्यालगत मिळाला तो टॉप सीक्रेट आहे!!” अभिजित म्हणाला..

“ आपल्याला खरंच भेटायची गरज आहे का??” अभिजित वैतागत पुष्करकडे पाठ करत खुर्चीत जाऊन बसला.. अनुला भेटून झाल्यानंतर पुष्करने अभिजितला हॉटेल मध्ये भेटायला बोलावलं होतं.
“ मग?? भेटलास अनघाला?? अभिजीतने पुष्करकडे न पाहता थोडं मॅन वळवून विचारलं..
“ हम्म..भेटलो मी तिला!!” पुष्कर पाठमोरं बसलेल्या अभिजीतकडे पाहत म्हणाला.
“ By the way!! मी तुला तिचं वकीलपत्र घ्यायला सांगितलं कारण मला वाटलं की ती या परिस्थितीत नाही मॅनेज करू शकणार काही..” अभिजित म्हणाला..
“ हम्म!! तसंही opposite side ला अप्पासाहेब आहेत म्हंटल्यावर कुणीच तिच्या बाजूने लढायला तयार नसत झालं.. मीही तू म्हणालास म्हणून तयार झालो.”
“ हे बोलून दाखवलंच पाहिजे का??” अभिजीतने विचारलं.
“ I am going to do my best!!” पुष्कर म्हणाला.
“ Good!! मी नाही थांबवणार तुला..” अभिजित म्हणाला.
“ मला हे म्हणायचंय की मी ही केस काहीही करून जिंकणार!!” पुष्कर म्हणाला.
“ बघू कोण जिंकतं ते !!” अभिजित म्हणाला.
“ म्हणजे तू अनघाला शिक्षा करणार!! तुला जिंकायचं आहे म्हणून??” पुष्करने चकित होऊन विचारलं..
“ कोणत्याही वकिलाला हरायला नाही आवडणार!!” अभिजित म्हणाला.
“हम्म..” पुष्कर यावर काहीच बोलला नाही..
“ झालं असेल तर निघतो मी..” अभिजित खुर्चीतुन उठून चालू पडला..
“ अभिजीत!! अरे थांब!! कुठे चाललास??” पुष्कर धावत जाऊन त्याला अडवत म्हणाला.
“ तू विसरलास का?? की मला तुझं तोंडही बघायला आवडत नाही??” अभिजित तोंड वाकडं करून म्हणाला..
“ म्हणजे तू मला कधीच माफ करणार नाहीस का??” पुष्करने विचारलं..
“ऑफ कोर्स नाही!!” अभिजीत जिना उतरत म्हणाला..
“ पण मी तुझा पिच्छा सोडणार नाही.. भेटू आपण कोर्टात.. पुन्हा भेटू आपण कळलं?? आय लव्ह यु अभिजित!!!” पुष्कर ओरडत म्हणाला..

अभिजित झेंडेंशी बोलत होता.. उद्या कोर्टात केस उभी राहणार होती.. त्याविषयीचे त्यांचं discussion चालू होतं. फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट्स अजून यायचे होते..
“ जर मिळालेल्या दोन्ही चाकूंवर शुभमचं रक्त असेल!!”
“ तर काय??!” झेंडेंनी उत्सुकतेने विचारलं..
“ तर हा खून अनघाने केला नसेल..” अभिजित ठामपणे म्हणाला..
क्रमशः
टीप- कथेत पात्रं खूप असल्यामुळे प्रत्येकाची व्यक्तिरेखा आणि त्यांचा एकमेकांशी असलेला संबंध दाखवणं मला गरजेचं वाटतं.. त्यामुळे कथा थोडी मोठी होणारे.. भाग जास्त होणारेत.. मी नियमित भाग टाकेनच..पण माबोकरांनी समजून घ्यावं..तुम्हा सगळ्यांच्या आत्ता पर्यंतच्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद!!!

Group content visibility: 
Use group defaults

I don't know, पण ही कादंबरी वाचताना मीच।लिहिलंय का, असं वाटत.
उदा...
“ पण मी तुझा पिच्छा सोडणार नाही.. भेटू आपण कोर्टात.. पुन्हा भेटू आपण कळलं?? आय लव्ह यु अभिजित!!!” पुष्कर ओरडत म्हणाला..>>>>
असला ट्विस्ट तर मी नक्कीच टाकला असता...
Lol

छान लिहीत आहात... पुभाप्र

".....आय लव्ह यु अभिजित!!!” पुष्कर ओरडत म्हणाला.. "..... देवा !! हा काय ट्विस्ट म्हणायचा आता ? Wink कृ.ह.घ्या

आय लव्ह यु अभिजित!!!” पुष्कर ओरडत म्हणाला.. "..... देवा !! हा काय ट्विस्ट म्हणायचा आता ?>>> मला वाटते, अभिजित च्या गर्ल फ्रेंड सोबत ज्याचे लफडे होते तो पुष्कर असावा, टिपिकल एकदम

> मला वाटते, अभिजित च्या गर्ल फ्रेंड सोबत ज्याचे लफडे होते तो पुष्कर असावा > +१.
चांगला आहे हा भाग देखील. आज वाचला.