"आपल्या नात्याला ५-६ वर्षे झाल्यामुळे तोचतोचपणा आला आहे"
"काहीतरी थ्रिलिंग आणि इंटरेस्टिंग झालं पाहिजे"
"ह्या प्रश्नाचं उत्तर आहे माझ्याकडे"
"काय?"
"विबासं"
तो फक्त हसला.
"असं छद्मी हास्य करून काही साध्य होणार नाहीये. मला काहीतरी वेगळं केलंच पाहिजे आणि ते म्हणजे विबासं. हे माझं निश्चितपणे ठरलंय"
"बरं, मग? माझा काय संबंध? तुला हवं ते करायला तू स्वतंत्र आहेस"
"संबंध नाही कसं? ही समस्या तुझ्यामुळेच निर्माण झाली आहे. तूच हा गुंता सोडवायला हवास. मी आज विबासं करू शकत नाही ते केवळ तुझ्यामुळे. जरा गंभीरपणे विचार कर. तुलाही ह्यातून कदाचित जीवनातले हरवलेले थ्रिल गवसेल"
"बास कर बडबड………………………………………………………………….................................................................
मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे”
---------------------------------------------------------------------------
**किल्ली**
--------------------------------------------------------------------------
मागे एकदा कमिट केल्याप्रमाणे मी हे विबासं केले आहे.
ह्य शशक ची प्रेरणा कोणती हे अख्या माबोला माहिती आहे.
कृपया केवळ मनोरंजन म्हणून ह्या कथेचा आस्वाद घ्यावा.
रच्याकने,
विबासं म्हणजे विवाह बाह्य संबंध
किल्ले, विबासं भलताच रोमांचक
किल्ले, विबासं भलताच रोमांचक आहे.
धन्यवाद प्राची
धन्यवाद प्राची
शेवटचं वाक्य सिक्सर
शेवटचं वाक्य सिक्सर
धन्यवाद अज्ञातवासी
धन्यवाद अज्ञातवासी
नाही समजली.
नाही समजली.
मला हि नीटशी नाही कळली ...
मला हि नीटशी नाही कळली ...
मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे>> म्हणजे या दोघांचं लग्नं झालेलं नाही .. .. विवाह च झालेला नाही तर मग ती विबासं ला अर्थ काय ? आणि कसं करणार!?
कि हे असं आहे >> लग्न होऊन ऑलरेडी विबासं चालू आहे आणि तो म्हणतो मी लग्न करायला तयार आहे ?!(म्हणजे नायिकेचं दुसरं लग्न .. )
किल्लीचे म्हणजे आहे की विबासं
किल्लीचे म्हणने आहे की विबासं करण्यासाठी विवाह गरजेचा आहे. त्यामुळे तु लग्न कर म्हणजे मी विबासं करायला मोकळी. असं काहीसं.
विबासं करण्यासाठी भले विवाह करायची वेळ आली तरी तयारी आहे, पण विबासं झालेच पाहीजे.
लई लांबचा विचार करुन राह्यली किल्लीतै.
मस्त लिहिलंय.किल्लीतै
मस्त लिहिलंय.किल्लीतै
धन्यवाद अंजली, मन्या
धन्यवाद अंजली, मन्या
@शाली: साधारण तुम्ही म्हणताय तसच काहीसं डोक्यात होत कथा लिहिताना
मला अंजली कुल सारखाच प्रश्न
मला अंजली कुल सारखाच प्रश्न पडला होता.
थोडी गडबड वाटते कथा.
चांगला प्रयत्न आहे.
चांगला प्रयत्न आहे.
मला काहीतरी वेगळं केलंच पाहिजे आणि ते म्हणजे विबासं. >>
गडबड इथे आहे
विबासं मधे वेगळे ते काय...... इथे डझनावारी होतात, उठता बसता होतात.
छान आहे शशक !!! दुसऱ्यांदा
छान आहे शशक !!! दुसऱ्यांदा वाचताना कळली. शालीदा प्रमाणेच मी विचार केला. लग्न केल्याशिवाय दुसरा पार्टनर पकडला तर त्याला विबांस नाव देता येणार नाही आणि लग्न केल्यावर दुसऱ्या पार्टनर बरोबर रिलेशन ठेवल्यावर जे थ्रिल येते ते मिळवण्यासाठी सध्याच्या पार्टनर बरोबर तिला लग्न करायचे आहे.
धन्यवाद सिम्बा, गोल्डफिश आणि
धन्यवाद सिम्बा, गोल्डफिश आणि हर्षद
वि बा सं याचा कोणी अर्थ
वि बा सं याचा कोणी अर्थ सांगाल का??
N मला कथा काय समजली नाही...
बहुदा त्या शब्दाचा अर्थ समजला नाही म्हणून असेल
दुसर्यांदा वाचल्यावर कळाली...
दुसर्यांदा वाचल्यावर कळाली...
@ मधुरा, विबासं = विवाह
@ मधुरा, विबासं = विवाह बाह्य संबंध. आता परत वाचून बघा मग कळेल
वि बा सं याचा अर्थ कोणी
वि बा सं याचा अर्थ कोणी सांगाल का? ? >>विवाह बाह्य संबंध
मला हि नीटशी नाही कळली ...
मला हि नीटशी नाही कळली ... हो मला पण! मग शाली आणि अंजली कूल यांचे प्रतिसाद वाचल्यावर कळतेय असं वाटलं.
धन्यवाद मधुरा, तेजय, देवकी
धन्यवाद मधुरा, तेजय, देवकी
कथा मजेमजेत विबास हा विषय घेऊन लिहिली आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर, नायिकेला 'त्या'च्यासोबतच्या नात्यात थ्रिल हवं आहे, म्हणून ती त्याला म्हणते की तुझ्यामुळे बोर झालंय, तू फक्त प्रियकर आहेस, नवरा असतास तर विबास करून मोकळी झाले असते.
ह्याचा आणखी एक अर्थ असा असा निघू शकतो की, ती प्रपोझ करतेय त्याला लग्नासाठी, आधी त्यावरून त्यांचं बोलणं झालेलं आहे , असं काहीतरी ...
वाचकांपर्यंत कितपत पोचलीये कथा माहिती नाही, प्रयत्न फसला का??
प्रयत्न फसला का??----- अजिबात
प्रयत्न फसला का??----- अजिबात नाही
उलट इकडे होणाऱ्या नवरदेवालाही लग्नामुळे स्वताला मिळू शकणाऱ्या ओपर्चुनिटीज (विबासं) दिसू लागल्याने तोही लगेच बोलतोय की बस कर बडबड... मी लग्नाला तयार आहे.
इन शॉर्ट -- ह्याचा सिक़्वेल बनु शकतो
धन्यवाद वीक्ष्य
धन्यवाद वीक्ष्य
थोडक्यात सांगायचे झाले तर,
थोडक्यात सांगायचे झाले तर, नायिकेला 'त्या'च्यासोबतच्या नात्यात थ्रिल हवं आहे, म्हणून ती त्याला म्हणते की तुझ्यामुळे बोर झालंय, तू फक्त प्रियकर आहेस, नवरा असतास तर विबास करून मोकळी झाले असते.>>> मग प्रेम बाह्य संबंध करायचा. हाकानाका
<<मग प्रेम बाह्य संबंध करायचा
<<मग प्रेम बाह्य संबंध करायचा. हाकानाका Happy>>
विबासं हा शब्द मायबोलीवर एक meme झाला असल्याने, कथा विबासं बद्दल आहे. फुटकळ फसवाफसवी बद्दल नाही.
विविध बाबल्यांशी संबंध
विविध बाबल्यांशी संबंध
हे झाले लग्ना आधीचे वि बा सं
@ मधुरा, विबासं = विवाह बाह्य
@ मधुरा, विबासं = विवाह बाह्य संबंध. आता परत वाचून बघा मग कळेल
नवीन Submitted by गोल्डफिश on 15 May, 2019 - 04:27
>>>>
Thanks @गोल्डफिश
आता पुन्हा वाचल्यावर समजली ...
वाचकांपर्यंत कितपत पोचलीये
वाचकांपर्यंत कितपत पोचलीये कथा माहिती नाही, प्रयत्न फसला का??
Submitted by किल्ली on 15 May, 2019 - 08:22
प्रयत्न फसला का??-----
छे छे...!! मला अस काही म्हणायचं नाहीय ...
फक्त माबो किंवा मिपा वर सर्रास असे शॉर्ट फॉर्म्स वापरतात ..
पण मला बरेचदा त्यांचे संदर्भच लागत नाहीत ...
अगदी मला पुलेशू याचा पण अर्थ नुकताच कळला... ..
म्हणून बाकी काय नाही ...
विबासं हा शब्द मायबोलीवर एक
विबासं हा शब्द मायबोलीवर एक meme झाला असल्याने, कथा विबासं बद्दल आहे.>> हो माहिती आहे.
विबासं हि फसवाफसवी नसते का?
ओपन मॅरेज मध्ये नसते.
ओपन मॅरेज मध्ये नसते.
ओपन मॅरेज हा जिवलगाऽऽऽऽऽऽ चा
'ओपन मॅरेज' हा जिवलगाऽऽऽऽऽऽऽऽऽ चा परिणाम का!
प्रतिसाद वाचल्यावर कळाली
प्रतिसाद वाचल्यावर कळाली
विविध बाबल्यांशी संबंध
हे झाले लग्ना आधीचे वि बा सं >>>>
Pages