विबासं - शतशब्दकथा

Submitted by किल्ली on 14 May, 2019 - 09:58

"आपल्या नात्याला ५-६ वर्षे झाल्यामुळे तोचतोचपणा आला आहे"
"काहीतरी थ्रिलिंग आणि इंटरेस्टिंग झालं पाहिजे"
"ह्या प्रश्नाचं उत्तर आहे माझ्याकडे"
"काय?"
"विबासं"
तो फक्त हसला.
"असं छद्मी हास्य करून काही साध्य होणार नाहीये. मला काहीतरी वेगळं केलंच पाहिजे आणि ते म्हणजे विबासं. हे माझं निश्चितपणे ठरलंय"
"बरं, मग? माझा काय संबंध? तुला हवं ते करायला तू स्वतंत्र आहेस"
"संबंध नाही कसं? ही समस्या तुझ्यामुळेच निर्माण झाली आहे. तूच हा गुंता सोडवायला हवास. मी आज विबासं करू शकत नाही ते केवळ तुझ्यामुळे. जरा गंभीरपणे विचार कर. तुलाही ह्यातून कदाचित जीवनातले हरवलेले थ्रिल गवसेल"
"बास कर बडबड………………………………………………………………….................................................................

मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे”

---------------------------------------------------------------------------
**किल्ली**
--------------------------------------------------------------------------

मागे एकदा कमिट केल्याप्रमाणे मी हे विबासं केले आहे.
ह्य शशक ची प्रेरणा कोणती हे अख्या माबोला माहिती आहे. Wink Proud
कृपया केवळ मनोरंजन म्हणून ह्या कथेचा आस्वाद घ्यावा. Happy Happy
रच्याकने,
विबासं म्हणजे विवाह बाह्य संबंध

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तिले असे वाटत होते कि लग्न झाल्याशिवाय बागेत एकत्र फिरणे योग्य नाही. आणि तिला तर त्याच्याबरोबर विविध बागांमध्ये संचार करणे थ्रिलिंग आणि इंटरेस्टिंग वाटत होते. Lol असो. जोक्स अपार्ट. मस्त जमली आहे मोजक्या शब्दांत. वेगवेगळे वाचक वेगवेगळे अर्थ काढू शकतात. हेच अल्पशब्दकथांचे वैशिष्ट्य. त्यात हि कथा पुरेपूर यशस्वी झाली आहे Happy

वेगवेगळे वाचक वेगवेगळे अर्थ काढू शकतात. हेच अल्पशब्दकथांचे वैशिष्ट्य,त्यात हि कथा पुरेपूर यशस्वी झाली आहे>>>११११

धन्यवाद सोनाली, नन्द्या, च्रप्स , mr.pandit, अतुल Happy
तिले असे वाटत होते कि लग्न झाल्याशिवाय बागेत एकत्र फिरणे योग्य नाही. आणि तिला तर त्याच्याबरोबर विविध बागांमध्ये संचार करणे थ्रिलिंग आणि इंटरेस्टिंग वाटत होते>>>>>> Lol
आवडलंय हे Happy

चांगली जमली आहे कथा.
आवडीचा विषय असूनपण Agony aunt अ‍ॅमी तै यांचा काहीच प्रतिसाद इथे दिसला नाही म्हणून चुकचुकल्यासारखे वाटले. Light 1

आवडीचा विषय असूनपण Agony aunt अ‍ॅमी तै यांचा काहीच प्रतिसाद इथे दिसला नाही म्हणून चुकचुकल्यासारखे वाटले. Light 1

Submitted by उपाशी बोका on 16 May, 2019 - 19:45>>>> एमीचा कमेंट मिस केला, त्यांचे कमेंट रेअलिस्टिक असतात म्हणून

पिसाळलेल्या कुत्ते सारखे गॉड गॉड नसतात त्यांचे कमेंट

मला कळलीही आणि आवडलीही.
पण सहमत मी हर्पेन यांच्याशी आहे. विवाह बाह्य संबंधात हल्ली पहिल्यासारखे थ्रिल राहिले नाही. खरी कमाल तर हल्ली एकच एक संबंध राखण्यात आहे.. गेले वीस वर्षे मी एकच एक बाईशी (गर्लफ्रेंडशी) संबंध राखून आहे अशी पोस्ट फेसबूकवर टाकून शेकडो लाईक्स आणि वाहवा मिळवण्यात खरी मजा आहे.

आता समजले- अविका म्हणजेच समाधी.
रच्याकने हे पिसाळलेला कुत्रा काय भानगड आहे?>>>> डोक्यावर पडला का तू कटप्पा, पिसाळलेला कुत्रा बोलणारे सगळे एक आय डी का?
खरेच तो पिसाळलेला कुत्रा योग्य वागला तुझ्याशी, नको तिथे नाक खुपसायची सवय आहे तुला.

मी , अविका नाहीये

पण समज असली , रादर अविका असो की कोणी अजून , तुला का इतकी पडलीये Angry

एक शेवटचे सांगते, माझ्या नादाला लागायचे नाही,

एक शेवटचे सांगते, माझ्या नादाला लागायचे नाही,
:- ठीक आहे अविकाजी.
पण तुम्ही उत्तर नाही दिले - पिसाळलेला कुत्रा म्हणजे नक्की कोण ओ?

एक होता पिसाळलेला कुत्रा जो पहिला दुसऱ्याला पिसाळलेला कुत्रा बोलायचा पण तुझे कमेंट वाचून त्यांचा तू पण त्यातलाच आहे हे कळले

समाधी
Just ignore him

भुंकायची सवय आहे ह्याला

ऋन्मेष, हायझेनबर्ग आणि किल्ली माझे प्रेरणास्थान आहेत, त्यामुळे किल्ली यांच्या धाग्यावर गोंधळ नको.
पण या ड्यु आयडी ची ही जी शंका होती ती या प्रतिसादांमुळे कन्फर्म झाले.
एकच विशेषण वापरायची चूक केली तुम्ही, त्यामुळे पकडल्या गेलात.

पण या ड्यु आयडी ची ही जी शंका होती ती या प्रतिसादांमुळे कन्फर्म झाले.
एकच विशेषण वापरायची चूक केली तुम्ही, त्यामुळे पकडल्या गेलात.>>>> Rofl

कटप्पा, डोक्यावर पडला तू, ते विशेषण वापरण्याची कॉपी rights आहेत का कुणाकडे, तसे असेल तर सांग ब्बा
अजून ज्यांनी ज्यांनी त्याला पिसाळलेला कुत्ता बोलले ते सगळे माझे ड्यु आहेत, ठीक आहे, बाकी चालू दे तुझे मी ड्यु आहे की नाही हे तू शोधत बस
पण त्या आधी स्वतः खरी ओळख दाखव
मुद्दाम असे बोलून शेपटी पायात घालून पळणारा तू, बस भुंकत,
एक ठिकाणी दंगे करायची हिम्मत नाही मग कधी इथे कधी तिथे रहा भुंकत

खरेतर ह्या स्पष्टीकरणाची काहीएक गरज नाही, तरी एक सांगते, मी अविका नाही. हा आता मला थोडा अंदाज आहे की ती/तो नक्की कोण आहे. पण मला ते इथे सांगावेसे वाटत नाही. तसेही हल्ली मी ज्या त्रासात आहे, त्यातून निघण्यासाठी धडपडतेय, त्या पुढे इथे जे चाललेय ते...असो.

कटप्पा, तुमची प्रेरणा स्थळे कोणी असो, मला त्याच्याशी काही लेणे देने नाही, पण मला उद्देशून काही बोललेले मी खरेच खपवून घेणार नाही. मी तुम्हाला कधीच काही बोलले नाही तरी तुम्ही मला ट्रोल करताय, हे लक्षात असू द्या.

अरे वा
आली अजून एक मला ओळखणारी Proud

किल्ली नेहमीच प्रतिसाद नाही देता आला तरीही तुम्ही लिहीलेल्या कथा आवडतात मला...ईतर कथांच्या तुलनेने ही कथा ओके ओके च वाटली.

आधी नीट कळली नव्हती. मग प्रतिसादातुन कळली.
काय एकेक प्रेरणा घेतात हा लेखक लोक Lol
काहीतरी वेगळं करायचंय तर करुन करुन काय तर विबासं Happy आणि पुन्हा त्यासाठी आधी विवाह पण करायचा Lol हे राम!! Lol

कथा विनोदी असेल ,किंवा कथेत विडंबन असेल तर ती कथा टाईमपास म्हणून घेता येईल .
पण विवाह बाह्य संबंध हा काही विनोदी विषय नाही अनेक नात्यांची वीण अशा संबंधामुळे ढीली होते किंवा तुटते .
मुलांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते .

कथा छान आहे .पण, लोक मनोरंजनाच्या धाग्याची पण वाट लावतात.

Pages