Submitted by माउ on 7 May, 2019 - 18:00
ओसरते शांत दुपार उन्हाचा भार नभाला होतो
सांजेची उसवुन शीव सूर्य रेखीव नव्हाळी देतो
वाळूत पसरते लाट थेंब मोकाट नाचुनी जाती
काठास बिलगते ओल अंतरी खोल आर्जवे उरती
पाण्यात चिमुकले पाय पांढरी साय स्पर्शिण्या जाती
थेंबांची होता फुले हरखुनी मुले वेचुनी घेती
मातीत खेळते पोर कुणी चितचोर स्वप्न आवरते
अलवार गुंफते ऊन तिच्याहातून सांज सावरते
केसांत अबोली फूल सुगंधी भूल वा-यात वाहे
नाही जगताचे भान तिला अभिधान नभाचे आहे
ती टपोर हसते खास निरागस आस होतसे बाधा
खेळात हरवुनी जात उरे सा-यात सानुली राधा
डोळ्यांत उजळते स्वप्न, तिच्यातच मग्न, सांधते माती
मातीत उभा श्रीरंग, दिसतसे दंग, चिमुकल्या हाती
- रसिका
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
ती टपोर हसते खास निरागस आस
ती टपोर हसते खास निरागस आस होतसे बाधा
खेळात हरवुनी जात उरे सा-यात सानुली राधा
डोळ्यांत उजळते स्वप्न, तिच्यातच मग्न, सांधते माती
मातीत उभा श्रीरंग, दिसतसे दंग, चिमुकल्या हाती
अप्रतिम! खुप छान!
आवडली.
किती सुंदर कल्पना आणि सुरेख
किती सुंदर कल्पना आणि सुरेख लयबद्ध. खुप आवडली
अहाहा ! नितांतसुंदर !
अहाहा ! नितांतसुंदर !
चाहता क्र. 14
उन्हाचा भार, सांजेची शीव,
उन्हाचा भार, सांजेची शीव, आर्जवे, राधा - श्रीरंग! सुंदर आहे सगळं काही. खूप छान.
मस्स्तच !! खूप आवडली !
मस्स्तच !! खूप आवडली !
काठास बिलगते ओल अंतरी खोल आर्जवे उरती >> हे निव्वळ अप्रतिम
उन्हाचा भार, सांजेची शीव, आर्जवे, राधा - श्रीरंग! सुंदर आहे सगळं काही>>+१११
सुंदर
सुंदर
खूप खूप धन्यवाद सर्वांना!!!
खूप खूप धन्यवाद सर्वांना!!!
लाजवाब
लाजवाब
वा! वा! क्या बात है!! एकाहून
वा! वा! क्या बात है!! एकाहून एक सुंदर.
अत्यंत मनोरम. धन्यवाद.
अत्यंत मनोरम. धन्यवाद.
धन्यवाद पुरंदरे शशांक,
धन्यवाद पुरंदरे शशांक, शंतनू आणी प्राचीन!
उत्तम रचना असतात आपल्या
उत्तम रचना असतात आपल्या
चालीत म्हणता येतात !