"ब्रो, नवीन हँडसेट घेतलाय."
"कोणता रे?"
"स्टार्क २१९."
"व्वा!"
"येस, चार्ज इन ५ सेकंडस, ७ इंच फुल स्क्रीन, सोलर पावर, 8g, अँड बेस्ट फिचर, सुपर AI चिपसेट."
"व्हॉट!"
"येस, सुपर AI, वेट, चल फोटोज क्लिक करू."
"ओके."
"बघ फोटो."
"ओ माय गॉड, क्लब च्या अंधारात सनलाईट सारखा प्रकाश टाकलाय याने फोटोत."
"हेच तर मर्म आहे ब्रो, ही नो अवर मूड, अँड इट्स लाईट नाऊ... हीही!!!"
"ब्रो सॉरी पण, मागच्या महिन्यात आपली भांडण झाली, आपली फाईट झाली, आय एम रियली अशेम्ड!"
"इट्स ओके मॅन, तशीही तुझी गर्लफ्रेंड आवडली नाही मला, ही ही!"
दोन्हीही क्लब मध्ये नाचू लागले.
नाचून दमल्यावर दोघेही बसले.
"ब्रो पण तू मागच्याच महिन्यात नवा फोन घेतला होतास ना?"
"इट्स बोरिंग यार, त्याला मूनलाईटच सेल्फी "काढता येत होती, ड्रीमलाईट नाही."
"ओके."
"यु नो व्हॉट, या फोन ने माझा जीव वाचवला."
"अरे कसं?"
"अरे, मी सोना बाथ घेत होतो, अचानक टेम्प्रेचर वाढलं. सगळे कंट्रोल खराब झालेत, शेवटी मॉमने याच्यावरून ते कंट्रोल केलं."
"नाईस."
"मग काय, सगळं घर याच्याशी कनेक्टेड ठेवलंय. अगदी कमोडच्या फ्लशपर्यंत. ही! ही! पुलीस स्टेशनसुद्धा याच्याशी कनेक्टेड आहे, शेवटी माझा काका आहे ना, तो आमच्या प्रॉपर्टीच्या मागे आहे. बघ, समोर त्याचा पोरगा नाचतोय! सो धिस फोन इज माय रियल लाईफ कंपानियन."
"जबरदस्त ब्रो!"
तेवढ्यात त्याच्या काकांच्या मुलाने त्याला आवाज दिला, दोघांनीही हाय हॅलो केलं. त्या मुलाने एक ड्रिंकचा ग्लास त्याच्या हातात देत, दुसरा आपल्या हातात घेतला.
दोघेही दारूत न्हाऊ लागले!
तो पुन्हा आपल्या मित्राजवळ आला.
"ही इज नाईस गाय...वेट मम्माचा कॉल, हा मम्मा, येस, येस....वेट मम्मा, काकाचा फोन येतोय."
त्याने आईचा फोन कट करून काकाचा फोन घेतला.
फोनवरचा आवाज कधी नॉर्मलपासून भांडणापर्यंत गेला, हे त्याला कळलंच नाही...
....आणि तो धाडकन खाली कोसळला.
"ब्रो...ब्रो... व्हॉट हॅपेन."
मित्र त्याला उठवू लागला. फोन त्याच्या हातातून गळून बाजूला पडला!
थोड्यावेळाने डॉक्टर आले,
"ही इज नो मोर."
मोबाईलच्या स्पीकर मधून अस्पष्ट आवाज येत होता,
'साले, आम्हाला AI शिकवतात होय, बघा आता AI ने आम्ही कसं तुमच्यावर राज्य करतो ते. तशीही याला रेडियेशन लेवल जास्त झाली मारायला, त्यादिवशी सोनामध्येच मारणार होतो, पण याच्या आईसमोर काही करता आलं नाही.
तसही...
WE ARE REALLY SMART PHONES NOW.... हा!हा!हा"
ही शुड डाय! - चालवा डोकं!
Submitted by अज्ञातवासी on 4 May, 2019 - 04:59
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
त्याच्या mobile ने त्याच्या mood nusar काहीतरी केलं असणार.. (तुक्का)
Tuch sang...
Tuch sang...
कदाचित फोनच्या अतिवापरामुळे
कदाचित फोनच्या अतिवापरामुळे![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
सगळे कंट्रोल खराब झालेत शेवटी मॉमने याच्यावरुन ते कंट्रोल केलेत.
हा माझ्या कालच्या comment चा
हे कोडं माझ्या कालच्या comment चा परिणाम असावा का?
"मुलाने एक ड्रिंकचा ग्लास
"मुलाने एक ड्रिंकचा ग्लास त्याच्या हातात देत, दुसरा आपल्या हातात घेतला."
-i thought drinks ने
drinks मध्ये काही mix-up केल असेल तर ??
त्याच्या वर मोबाईल चा control नसावा.
सोपा तर्क - काकाच्या मुलाने
सोपा तर्क - काकाच्या मुलाने एक ड्रिंकचा ग्लास त्याच्या हातात दिला त्यात विष होतं.
दोन्हीही क्लब मध्ये नाचू लागले.
नाचून दमल्यावर दोन्हीही बसले.>>> इथे दोन्हीही च्या जागी दोघेही करणार का?
अजुन एक राहिलंय
अजुन एक राहिलंय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दोन्हीही क्लब मध्ये नाचू लागले.
त्याची ममा step ममा नाहीयेना.
त्याची ममा step ममा नाहीयेना.
Heart attack भांडणाने
Heart attack भांडणाने
मूड लायटिंग मुळे,किंवा
मूड लायटिंग मुळे,किंवा भांडणाच्या आवाजाच्या हाय फ्रिक्वेन्सी ने फोन चार्ज झाला, त्यातून इलेक्ट्रॉनिक करंट स्पाईक येऊन मुलाला हार्ट अटॅक आला.
भांडण आवाजाने हाय फ्रिक्वेन्सी रेझोनन्स येऊन मायक्रोवेव्ह निर्माण होऊन ब्रेन फ्राय झाला आणि मेला.
ब्रेन फ्राय
ब्रेन फ्राय![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
त्याने मोबाईल मध्ये अस एखाद
त्याने मोबाईल मध्ये अस एखाद फिचर सेट केल असेल की जेव्हा त्याला जास्त राग येईल तेव्हा ते फिचर त्याला बेहोश करेल
पण मोबाईल मध्ये काही तांत्रीक बिघाड झाल्यामुळे बेहोश न करता डायरेक्ट मारल असेल
मूड लायटिंग मुळे,किंवा
मूड लायटिंग मुळे,किंवा भांडणाच्या आवाजाच्या हाय फ्रिक्वेन्सी ने फोन चार्ज झाला, त्यातून इलेक्ट्रॉनिक करंट स्पाईक येऊन मुलाला हार्ट अटॅक आला.
>>
काकाचं कारस्थान असेल की नाही माहित नाही, पण हे लॉजिक वाचून नक्की त्याला नक्की हार्ट अटॅक येईल.
ड्रिंक्समधे जर काही मिसळलं
ड्रिंक्समधे जर काही मिसळलं असेल ( e.g, Ecstasy etc.) तर उत्तेजित होण्याने त्याचे परिणाम वाईट होत असावेत, कदाचित अशा उत्तेजित अवस्थेत काकांशी भांडण झाले आणि त्यातच मोबाईलचे काही तरी सेटींग असावे ज्यामुळे हार्ट बंद पडले असावे....
शुल्ड? ही नो अवर मूड? अरेरे
.
प्रत्येक व्यक्तीशी बोलताना
प्रत्येक व्यक्तीशी बोलताना आवाजाची पातळी ठरलेली असेल आणि आईशी बोलताना आवाज ठरल्यापेक्षा जास्त झाल्यामुळे डिव्हाईसने त्याला जागीच फ्रीज करून टाकल असेल किंवा एखाद ड्रग इंजेक्ट केल असेल सो त्याच हार्ट काही काळाकरता स्टाॅप झाल असेल तेव्हा त्यामुळे तो मृत वाटला असेल...
किंवा काकाने त्याला एखादी अशी न्युज सांगितली असेल कि तो ते ऐकून शाॅकनेच मेला असेल.....
विलभ, कोणाला का होईना हार्ट
विलभ, कोणाला का होईना हार्ट ऍटॅक आला म्हणजे लॉजिक पृव्ह झालं ☺️☺️☺️☺️☺️☺️
येऊ द्या तर्क अजून!
येऊ द्या तर्क अजून!
"हेच तर मर्म आहे ब्रो, ही नो
"हेच तर मर्म आहे ब्रो, ही नो अवर मूड, अँड इट्स लाईट नाऊ... हीही!!!"
He knows our mood
"ही इज नाईस गाय...वेट मम्माचा कॉल, हा मम्मा, येस, येस....वेट मम्मा, काकाचा फोन येतोय."
He is a nice guy
"ब्रो...ब्रो... व्हॉट हॅपेन."
What happened
प्रश्न विचारले तर चालतील का... (येस ऑर नो )
![Bw](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/bw.gif)
माझ्या मते काकाच्या मुलाने विष नाही दिलेलं, कारण तसं जर असतं तर भांडण न होताही मृत्यू व्हायला हवा होता
L Lawliet.
L Lawliet.
नक्की विचारा नो प्रॉब्लेम.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वरच्या करेक्शन विषयी एकच सांगेन. येस, इंग्लिश ग्रामर नुसार वरची वाक्ये करेक्ट आहेत, पण बोलतात काही वर्ड्स सायलेंट होतात, काहींचा वापर होत नाही.
अटलिस्ट पार्टी किंवा क्लब मध्ये तरी.
अँड वेटिंग फॉर सम रियली वाईल्ड गेस फ्रॉम यु!
त्याला पेसमेकर बसवलेला आहे.(?
त्याला पेसमेकर बसवलेला आहे.(?)
तो ही फोनशी कनेक्टेड आहे. (?)
फोनला याचा मूड कळतो.
फोनवर काका अचानक भांडायला लागले - हायपर झाले.
हा नव्हता झाला. पण फोनला वाटलं हाच खूप हायपर झाला.
त्याने ताबडतोब पेसमेकरला संदेश पाठवला, हळू पपं क४, हृदयाचे ठोके धीमे कर.
पेसमेकरने आज्ञा पाळली. याला बोलता येईना, काकांचा आवाज वाढतच गेला, हाच आणखी हायपर होतोय समजून फोन पेसमेकरला आणखी कंट्रोल करत गेला आणि शेवटी हृदय बंद पडून तो कोसळला.
मानव १. नो २. नो
मानव १. नो
२. नो
इथले गेसेस वाचायला मजा येतेय.
इथले गेसेस वाचायला मजा येतेय.
आई काकांशी संधान बांधून आहे.इस्टेट स्वतःला मिळावी, काकांचा वाटा असेल त्यात थोडा म्हणून तिने काकांना फोन करायला लावून भांडायला लावले.आणि भांडण चालू असताना तिने रिमोटली मुलाच्या हृदयाचे ठोके कमी केले.
पार्टीत बघणाऱ्याना भांडणाने अपसेट होऊन हार्ट अटॅक आला असंच वाटेल.
1. जर त्या व्यक्तीने त्या
1. जर त्या व्यक्तीने त्या हँडसेटच्या ऐवजी दुसरा कोणता हँडसेट घेतला असता तर त्याचा मृत्यू झाला असता का?
2. जर मागच्या महिन्यात त्या दोन व्यक्तींमध्ये भांडणं नसती झाली तरीही मृत्यू झाला असता का?
मी ती करेक्शन्स सहज म्हणून सांगितली होती... कथेचा प्लॉट तो नसल्याने तिथे काही फरक नाही पडत
@L Lawliet
@L Lawliet
दोन्ही प्रश्नांचा उत्तराशी थेट संबंध असल्याने उत्तर देता येणार नाही!
माझा दुसरा तर्क या वाक्या
माझा दुसरा तर्क या वाक्या वरुन....
" मित्र त्याला उठवू लागला. फोन त्याच्या हातातून गळून बाजूला पडला!"
- एक तर फोन त्याच्या हातातून गळून पडल्यानंतर त्याच्या मित्रांने काही तरी केल असाव, फोन हातात असताना ते शक्य नसेल. अस करण्या मागे कारण म्हणजे त्यांच आधी भांडणं झालेलं होतं.
तेवढ्यात त्याच्या काकांच्या
तेवढ्यात त्याच्या काकांच्या मुलाने त्याला आवाज दिला, दोघांनीही हाय हॅलो केलं. त्या मुलाने एक ड्रिंकचा ग्लास त्याच्या हातात देत, दुसरा आपल्या हातात घेतला.
दोघेही दारूत न्हाऊ लागले!
तो पुन्हा आपल्या मित्राजवळ आला.>>>>
तो दारू पिऊन येईपर्यंत त्याचा मित्राने मोबाईलचे सेटींग्ज बदलवले असतील आणि ते त्याचा हिशेबात नसल्यामुळे कुठेतरी चूक होऊन तो मेला....
दुसऱ्या व्यक्तीने पहिल्या
दुसऱ्या व्यक्तीने पहिल्या व्यक्तीचा planned खून केला (काकाच्या मदतीने)
जेव्हा पहिली व्यक्ती आणि काकाचा मुलगा बोलत होते तेव्हा दुसऱ्या व्यक्तीने फोन मध्ये काही चेंजेस केले. नंतर ठरल्याप्रमाणे काकाचा फोन आला, आणि काकाने त्याला एकदम काहीतरी अनपेक्षित (आणि maybe खोटी) बातमी सांगितली (तुझ्या आईने प्रॉपर्टी माझ्या नावावर केली वगैरे)
पहिली व्यक्ती short tempered होती, व त्याला calm करण्यासाठी त्याच्या आईने काही विशिष्ट सेटिंग्ज ठेवली होती जी दुसऱ्या व्यक्तीने बदलली होती
त्यामुळे तो हँडसेट त्याचा मूड ओळखू शकला नाही... आणि कशामुळेतरी मृत्यू झाला... इतर उपस्थित लोकांना असाच वाटेल की भांडणामुळे मृत्यू झाला
पण मृत्यू कशामुळे झाला हे मला नाही कळलं... हार्ट पेशंट एवढी दारू नाही पिणार त्यामुळे धक्का बसून मृत्यू व्हायची शक्यता नाही त्यामुळे कदाचित फोन मुळेच मृत्यू झाला असावा (कदाचित आई पण involved वगैरे(?))
he was in a mood to kill
he was in a mood to kill
phone guessed it.. and it sent signals accordingly.
it misunderstood - to kill whom..
(सॉरी हां हे काय च्या काय)
(सॉरी हां हे काय च्या काय)
फोन 5 सेकंदात चार्ज होतो.एनर्जी सोर्स/मेन्स/स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणून वापरता येतो.
काकांनी भांडणात काही कोड वर्ड वापरून फोन ला एनर्जी सोर्स बनण्याच्या सूचना दिल्या आणि करंट ने हार्ट अटॅक येऊन मुलगा गेला.काकांनी भोळ्या आईशी गप्पा मारून सोना चे कंट्रोल बिघडले होते त्यावेळी मोबाईल वरून कसे कंट्रोल केले हे जाणून घेतले होते.
कंट्रोल असं वागतायत हे मुलाला कळून त्याने ai मोड स्टॉप करून मॅन्युअल मोड चालू करू नये म्हणून त्याला काकांच्या मुलाने आधी भरपूर दारू पाजली आहे.(मशीन कंट्रोल/जीव वाचवायला टाकलेले करेक्शन फिचर माणसांचा जीव घेते याचे आताचे उदाहरण म्हणजे बोइंग मॅक्स 8 विमानातले प्लेन स्टॉल प्रिव्हेन्ट करायला नवे टाकलेले mcas फिचर.)
Pages