ही शुड डाय! - चालवा डोकं!

Submitted by अज्ञातवासी on 4 May, 2019 - 04:59

"ब्रो, नवीन हँडसेट घेतलाय."
"कोणता रे?"
"स्टार्क २१९."
"व्वा!"
"येस, चार्ज इन ५ सेकंडस, ७ इंच फुल स्क्रीन, सोलर पावर, 8g, अँड बेस्ट फिचर, सुपर AI चिपसेट."
"व्हॉट!"
"येस, सुपर AI, वेट, चल फोटोज क्लिक करू."
"ओके."
"बघ फोटो."
"ओ माय गॉड, क्लब च्या अंधारात सनलाईट सारखा प्रकाश टाकलाय याने फोटोत."
"हेच तर मर्म आहे ब्रो, ही नो अवर मूड, अँड इट्स लाईट नाऊ... हीही!!!"
"ब्रो सॉरी पण, मागच्या महिन्यात आपली भांडण झाली, आपली फाईट झाली, आय एम रियली अशेम्ड!"
"इट्स ओके मॅन, तशीही तुझी गर्लफ्रेंड आवडली नाही मला, ही ही!"
दोन्हीही क्लब मध्ये नाचू लागले.
नाचून दमल्यावर दोघेही बसले.
"ब्रो पण तू मागच्याच महिन्यात नवा फोन घेतला होतास ना?"
"इट्स बोरिंग यार, त्याला मूनलाईटच सेल्फी "काढता येत होती, ड्रीमलाईट नाही."
"ओके."
"यु नो व्हॉट, या फोन ने माझा जीव वाचवला."
"अरे कसं?"
"अरे, मी सोना बाथ घेत होतो, अचानक टेम्प्रेचर वाढलं. सगळे कंट्रोल खराब झालेत, शेवटी मॉमने याच्यावरून ते कंट्रोल केलं."
"नाईस."
"मग काय, सगळं घर याच्याशी कनेक्टेड ठेवलंय. अगदी कमोडच्या फ्लशपर्यंत. ही! ही! पुलीस स्टेशनसुद्धा याच्याशी कनेक्टेड आहे, शेवटी माझा काका आहे ना, तो आमच्या प्रॉपर्टीच्या मागे आहे. बघ, समोर त्याचा पोरगा नाचतोय! सो धिस फोन इज माय रियल लाईफ कंपानियन."
"जबरदस्त ब्रो!"
तेवढ्यात त्याच्या काकांच्या मुलाने त्याला आवाज दिला, दोघांनीही हाय हॅलो केलं. त्या मुलाने एक ड्रिंकचा ग्लास त्याच्या हातात देत, दुसरा आपल्या हातात घेतला.
दोघेही दारूत न्हाऊ लागले!
तो पुन्हा आपल्या मित्राजवळ आला.
"ही इज नाईस गाय...वेट मम्माचा कॉल, हा मम्मा, येस, येस....वेट मम्मा, काकाचा फोन येतोय."
त्याने आईचा फोन कट करून काकाचा फोन घेतला.
फोनवरचा आवाज कधी नॉर्मलपासून भांडणापर्यंत गेला, हे त्याला कळलंच नाही...
....आणि तो धाडकन खाली कोसळला.
"ब्रो...ब्रो... व्हॉट हॅपेन."
मित्र त्याला उठवू लागला. फोन त्याच्या हातातून गळून बाजूला पडला!
थोड्यावेळाने डॉक्टर आले,
"ही इज नो मोर."
मोबाईलच्या स्पीकर मधून अस्पष्ट आवाज येत होता,
'साले, आम्हाला AI शिकवतात होय, बघा आता AI ने आम्ही कसं तुमच्यावर राज्य करतो ते. तशीही याला रेडियेशन लेवल जास्त झाली मारायला, त्यादिवशी सोनामध्येच मारणार होतो, पण याच्या आईसमोर काही करता आलं नाही.
तसही...
WE ARE REALLY SMART PHONES NOW.... हा!हा!हा"

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Revenge आहे हा.मागच्या महिन्यात मित्र आणि त्याच्या गर्लफ्रेंड मध्ये मेलेल्या मित्रामुळे ब्रेकअप होतो.
याचाच राग मनात ठेवुन त्याचा मित्र फोनमध्ये setting चेंज करतो तेच सांगण्यासाठी आईचा कॉल येतो पण तो कॉल ignore करतो आणि मरतो.

WE ARE REALLY SMART PHONES NOW.... हा!हा!हा">> hmm.. Kalal
Happy

मस्त एकदम
आधी कथा नीट शेवटाकडे आल्या सारखी वाटत नव्हती
पण आता मजा आली
पुलेशु

"WE ARE REALLY SMART PHONES NOW.... हा!हा!हा" यावरून स्पष्ट होत आहे की मोबाईल मुळेच तो मुलगा मेला. आणि एवढ्या वेळच तो मुलगा मोबाईलसोबत बोलत असतो आणि मोबाइल मध्ये सेटिंग बदलून त्याचा मृत्यू झाला आणि कदाचित त्याच्या मॉमने तेच सांगायला कॉल केला असेल.. मोबाइलला माणसांवर राज्य करायचं आहे म्हणून अस केलं असेल. "साले आम्हाला AI शिवकायला चालले..." असपण आलंय.. (या कथेचा असाही अर्थ निघू शकतो , आता खरा अर्थ काय आहे हे अज्ञातवासी सांगतीलचं)
पण कथा खरच खूप छान आहे मजा आली वाचून सरळ सरळ अर्थ निघण्याऱ्या कथा वाचण्यात मजा नाहीये खरी मजा तर अशी कथा वाचण्यात आहे. आणि परत हेच म्हणेन की मूड छान झाला कथा वाचून Happy

सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद!

अजून फुलवता आली असती कथा, पण क्लू सुटत गेले असते, म्हणून थोडक्यात आटपली.
कथेचा प्रेरणास्रोत - 2.0
आणि ज्यापद्धतीने AI विकसित होतय, ते बघता काही वर्षात वरील परिस्थिती निर्माण व्हायला वेळ लागणार नाही...

Pages