आयपीएल १२ - २०१९

Submitted by भास्कराचार्य on 20 March, 2019 - 09:11

आयपीएल - २०१९ ह्या आठवड्याच्या शेवटी सुरू होते आहे. आयपीएलचा तडका बसला, की लगोलग येणार्‍या विश्वचषकाची चव अजूनच लज्जतदार होणार आहे! कोण जिंकणार, कोण चांगलं खेळणार, विश्वचषकाची संघनिवड आयपीएलमधील कामगिरीवर ठरणार का - एक ना दोन! निवडणुका असतानाही ह्यावेळी आयपीएल भारतातच असणार आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात हवा चांगलीच गरम असणार आहे. स्पर्धा सुरू होईल तशी चर्चा जोमाने होईलच. वॉर्नर-स्मिथ जोडगोळी पुन्हा क्रिकेटमध्ये परतली आहे. सॅम कुरानसारखा खेळाडू ह्या वेळेस आहे. कोहलीसारखा खंदा फलंदाज व कप्तान ह्यावेळी आयपीएल आणि विश्वचषक दोन्ही मान पटकावण्यासाठी सज्ज आहे. जयदेव उनाडकत ह्याही वेळेस भरपूर किंमत घेऊन मैदानात उतरलाय. ह्याशिवाय रशिद चहल, चहल, कुलदीप यादव ह्यांच्या फिरकीची मजा लुटता येणार आहे. एकंदरीत भरपूर मजा येणार आहे!

पहिला सामना शनिवार २३ मार्च, चेन्नई विरुद्ध बेंगालुरू असा रंगणार आहे. आपल्या संघाचं समर्थन करण्यासाठी, कौतुक करण्यासाठी, वादविवादाच्या फैरींची मजा लुटण्यासाठी, अचूक आणि मार्मिक व्यंगचित्रांनी घेतलेल्या 'फिरकी'साठी इथे आता धमाल करूया!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

यंदाची आयपीएल कंटाळवाणी चाललीये असं मलाच वाटतय, की सार्वत्रिक भावना आहे कुणास ठाऊक. पण ह्या धाग्यावर सुद्धा हळू हळू वर्ल्डकप विषयी चर्चा सुरू झाल्याचं पाहून आश्चर्य नाही वाटलं. बंगळूरू आणी राजस्थान चा सतत होणारा डाऊनफॉल ह्या स्पर्धेतली चुरस कमी करतोय.

यंदाची आयपीएल कंटाळवाणी चाललीये असं मलाच वाटतय, की सार्वत्रिक भावना आहे कुणास ठाऊक. पण ह्या धाग्यावर सुद्धा हळू हळू वर्ल्डकप विषयी चर्चा सुरू झाल्याचं पाहून आश्चर्य नाही वाटलं. बंगळूरू आणी राजस्थान चा सतत होणारा डाऊनफॉल ह्या स्पर्धेतली चुरस कमी करतोय. >>

I guess Quality of cricket also matters. Only matches that go to last over (intentionally or unintentionally Wink ) is not sufficient to keep interest I guess .

Yesterday also how can you go from 85 of 48 to 50 of 18 without losing wicket , I would prefer it to be fixed than being such bad cricket Happy

केदार खरंय (म्हणजे फिक्सिंग चं नाही, पण क्वालिटी चं). खेळाडूंच्या दर्जाचा आणी अनुभवाचा विचार करता फारच सुमार खेळतायेत. ह्यापेक्षा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी मधल्या मॅचेस जास्त चांगल्या झाल्या होत्या (अगदी मणिपूर, नागालँड वगैरे टीम्स चा अपवाद वगळता).

*यंदाची आयपीएल कंटाळवाणी चाललीये असं मलाच वाटतय, की सार्वत्रिक भावना आहे कुणास * - जे इतक्या मोठ्या संख्येने, खर्च करून सामन्यांना हजेरी लावताहेत, त्याना सोडून इतरांना ही आयपीएल कशी वाटतेय हा सवालच चुकीचा असावा. कारण, खेळाची गुणवत्ता, दर्जा , खरी चुरस इ.इ. आयपीएलसाठी दुययम आहेत, हें सत्य नाकारतां येत नाही. मनोरंजनाला पोषक असेल तेवढीच गुणवत्तेची कदर असणं , त्यामुळे स्वाभाविकच आहे.

"जे इतक्या मोठ्या संख्येने, खर्च करून सामन्यांना हजेरी लावताहेत, त्याना सोडून इतरांना ही आयपीएल कशी वाटतेय हा सवालच चुकीचा असावा." - भाऊ, आपण सुद्धा सबस्क्रिप्शन घेऊन (मी तर केवळ आयपीएल आणी वर्ल्डकप साठी हॉटस्टार चं सबस्क्रिप्शन घेतलय. बाकी काही पहाण्यासारखं नाहीये तिथे), वेळ काढून मॅचेस बघतो. आणी खरं सांगायचं तर क्रिकेट वरच्या प्रेमासाठी ह्या मॅचेस बघतो. त्यामुळे हे प्रश्नचिन्ह अगदीच गैरलागू नसावं असं वाटतं.

एकदम बरोबर फेफे ! भाऊंनी हे कसे ठरवले हे कळून घेण्याची उत्सुकता आहे " कारण, खेळाची गुणवत्ता, दर्जा , खरी चुरस इ.इ. आयपीएलसाठी दुययम आहेत, हें सत्य नाकारतां येत नाही. " कारण जगतल्या सगळ्याच फ्रँचआईज वाल्या स्पर्धा ह्या दर्जेदार नसल्या तर लोकांचा सपोर्ट कमी होउ लागतो नि तो bottom line ठरवतो अशी माझी समजूत आहे.

सामने मीं पण पहातोच.
जिद्द व दर्जेदार खेळ यामुळे निर्माण झालेली चुरस व मनोरंजनासाठी कृत्रिमपणे निर्माण केलेली चुरस या गोष्टी पुराव्यानिशी सिध्द करायचया नसून जाणवण्याच्या आहेत. उदा., काल मुंबै विरूद्ध माॅरिसने 19व्या षटकात कुनालला पहिले तीन अप्रतिम याॅरकर टाकले. नंतर हार्दिकला तीन टपपयातले फुलटाॅस, दोन षटकार व तिसरा चौकार ( 16 धांवा ) ! हें जगातल्या सर्वोत्तम गोलंदाजाकडूनही होवूं शकतं पण या आयपीएलमधे तें इतक्या वारंवार होतंय म्हणून शंकेची पाल चुकचूकते. *फ्रँचआईज वाल्या स्पर्धा ह्या दर्जेदार नसल्या तर लोकांचा सपोर्ट कमी होउ लागतो नि तो bottom line ठरवतो अशी माझी समजूत आहे.* - मला वाटतं, bottom line दर्जा नसून, मनोरंजन आहे ,असं तर नाहीं!
माझं perception चूकीचं असूं शकतं, चूकीचं असूंदेच !!

झक मारली आणि वर त्या माॅरिसचंच उदाहरण दिलं ; काढूनच टाकला ना त्या बिचारयाला द.आफ्रिकेचया विश्वचषक संघातून ! Wink

bottom line दर्जा नसून, मनोरंजन आहे ,असं तर नाहीं! >> मला वाटले bottom line पैसा आहे. तो ब्रँडींग झाल्याने येतो. पण ते व्हायला जिंकणे भाग होते. (एका लिमीटच्या बाहेर हरणारी टीम स्पॉन्सरकडून किंवा Ad मधे सपोर्ट केली जाणार नाही हे उघड आहे). मग त्यानुषंगाने दर्जा मिळवणे भाग आहे. अशी साखळी असेल.

उमेश ने शेवटच्या ओव्हरमधल्या लेंथ्स सुमार होत्या. टेस्ट मॅचेस खेळलेल्या बॉलरकडून इतकी सामान्य बॉलिंग अपेक्षित नाहीये.

रहाणे ची कॅप्टन्सी अखेर अपेक्षितपणे स्मिथ कडे गेली. होपफुली राजस्थान ला ह्याचा फायदा होईल.

कालपासून बर्याच ठिकाणी 'बिचारा', 'खतरनाक' वगैरे धोनी चं कौतुक वाचलं. मला तरी त्याने ब्राव्हो सारख्या एस्टॅब्लिश्ड बॅट्समनसमोर सिंगल्स नाकारणं, उमेश यादव ने अगदीच क्लब लेव्हल ची बॉलिंग करणं हे खटकलं. हे दोघंही आंतरराष्ट्रीय सामन्यात असं करतील का? आणी केलं तर ते योग्य असेल का? मागे दिनेश कार्थिक ने कृणाल पंड्या समोर असताना शेवटच्या ओव्हर ला सिंगल नाकारून स्वतः मॅच जिंकायचा अयशस्वी प्रयत्न केला होता, तेचा त्याच्यावर टीका झाली होती. ह्यावरून, 'काय म्हटलय ह्यापेक्षा कुणी म्हटलय ह्यालाच अधिक महत्व आहे' हे पु. लं. चं असा मी असामी मधलं वाक्य आठवलं.

उमेश ने शेवटच्या ओव्हरमधल्या लेंथ्स सुमार होत्या. टेस्ट मॅचेस खेळलेल्या बॉलरकडून इतकी सामान्य बॉलिंग अपेक्षित नाहीये. >> +१. MOM ऊमेश होता, त्याच्याशिवाय शेवटची over एव्हढी रंगतदार झाली नसती Wink

फे फे तू धोनीची मुलाखत ऐकलीस का नंतरची ? सिंगल्स नाकरण्याचे कारण त्याने नीत सांगितले आहे. मला तरी पटले. उमेश ला धोनी डोळे मिटून रीड करू शकत असेल ह्याची खात्री आहे मला. त्यामूळे धक्कादायक नाही वाटला हा प्रकार मला. मोइन ने आधीच्या सामन्यामधे शेवटची over टाकलेली ती बघता त्यालाच देतील असे वाटलेले.

धोनीचं मॅच हारल्यानंतरचं फिलॉसॉफीच्या जंगलात भटकलेलं भाषण, आणी त्यातच प्रामाणिकपणे चुकांवर बोट न ठेवता, चलाखीनं घुसवलेलं 'अ‍ॅड सॉल्ट टू टेस्ट' लॉजिक मला कधीच भावत नाही. हाईंडसाईट इज ऑलवेज ट्वेंटी ट्वेंटी प्रकार असतो. तरी हल्ली , 'मी हे आधीच ओळखलं होतं' प्रकार ऐकू येत नाहीत. नाहीतर पूर्वी आंतरराष्ट्रीय सामन्यात हारल्यावर ते पण असायचे.

धोनीचं मॅच हारल्यानंतरचं फिलॉसॉफीच्या जंगलात भटकलेलं भाषण, >>> Lol पूर्वी ऋषीमुनींनी जीवनाची कोडी सोडवली वगैरे का? Happy

धोनीबद्दल हल्ली फारच तिरकस अभिप्राय वाचायला मिळतात . ' धोनीचा ' कूलनेस ' ढोंगीपणाचा वाटतो , असंही कुठंतरी आताच वाचलं . खरंच धोनी बदललाय कीं मावळत्या सूर्याला असं बोलण्याची पद्धतच असते !

कॅप्टन कूल सीमारेषा ओलांडून मैदानात येऊन अंपायर्सशी हुज्जत घालायला लागला की इतर वेळचा कूलनेस ढोंगीपणाचा वाटणारच. Proud

हो. ऐकलं. कॅल्क्युलेशन्स, रिस्क्स etc. >> "हाईंडसाईट इज ऑलवेज ट्वेंटी ट्वेंटी" हे वर तूच म्हणालास ना रे Happy

धोनीबद्दल हल्ली फारच तिरकस अभिप्राय वाचायला मिळतात . > > +१ धोनीबद्दल फारसे प्रेम नाही पण मलाही हे जाणवलेय.

"पूर्वी ऋषीमुनींनी जीवनाची कोडी सोडवली वगैरे का?" - बिंगो!! Happy

"खरंच धोनी बदललाय कीं मावळत्या सूर्याला असं बोलण्याची पद्धतच असते !" - धोनी लिमिटेड ओव्हर्स क्रिकेट मधे एक चांगला कॅप्टन होता, प्लेयर होता. पण हल्ली मिडीयामधून वगैरे त्याला डोक्यावर घेण्याचा प्रकार अति आढळतो असं मला वाटतं. कदाचित आपण कुठल्या बाजूने बघतो ह्यावरून हे ठरतं असं मला वाटतं.

चला धोनी जाउ दे, आजच्या सामन्याबद्दल बोला. मधे कोहलीपेक्षा रोहित अधिक चांगला कप्तान थरेल वगैरे चर्चा झाली होती. अश्विन ने ज्या तर्‍हेने पंजाब हँडल केलय ते बघता भारत एका चांगल्या कप्तानाला मुकला असे वाटते.

सगळ्यात तळाला असल्यामूळे बंगलोरला उगाचच पाठींबा Happy

left right batsmen combination एव्हढ्या रोलीगीयसली फॉलो करण्यामधे MI चा हात कोणि कधीच धरू शकेल असे वाटत नाही. किती तो अट्टाहास आहे. भयंकर आटापीटा करतात राव.

काय खेळला एबी!!! वेडा माणूस आहे तो. शेवटच्या ३ ओव्हर्स मधे ६४ रन्स काढल्या. बंगळुरू जिंकले तर मजा येईल.

काही काही लोकांना नेतृत्वाचं प्रेशर मानवतं (अश्विन, रोहित शर्मा) आणी काही जणांना नाही मानवत (रहाणे). अर्थात फॉर्मॅट ने सुद्धा फरक पडत असावा. हाच रहाणे टेस्ट मधे छान कॅप्टन्सी करतो. वन-डे मधे कल्पक कॅप्टन्सी करणारा धोनी टेस्ट मधे कॅच-अप गेम खेळायचा.

एबी ने मजा आणली, बर्‍याच दिवसांनी पूर्वीचा एबी बघायला मिळाला. बर झाला रीटायर झाला ते Happy

हा स्कोर कमी आहे RCB बॉलर्स साठी. कोहली ने मागच्या मॅच मधे benchmark दिला होता. Wink

Pages