आयपीएल १२ - २०१९

Submitted by भास्कराचार्य on 20 March, 2019 - 09:11

आयपीएल - २०१९ ह्या आठवड्याच्या शेवटी सुरू होते आहे. आयपीएलचा तडका बसला, की लगोलग येणार्‍या विश्वचषकाची चव अजूनच लज्जतदार होणार आहे! कोण जिंकणार, कोण चांगलं खेळणार, विश्वचषकाची संघनिवड आयपीएलमधील कामगिरीवर ठरणार का - एक ना दोन! निवडणुका असतानाही ह्यावेळी आयपीएल भारतातच असणार आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात हवा चांगलीच गरम असणार आहे. स्पर्धा सुरू होईल तशी चर्चा जोमाने होईलच. वॉर्नर-स्मिथ जोडगोळी पुन्हा क्रिकेटमध्ये परतली आहे. सॅम कुरानसारखा खेळाडू ह्या वेळेस आहे. कोहलीसारखा खंदा फलंदाज व कप्तान ह्यावेळी आयपीएल आणि विश्वचषक दोन्ही मान पटकावण्यासाठी सज्ज आहे. जयदेव उनाडकत ह्याही वेळेस भरपूर किंमत घेऊन मैदानात उतरलाय. ह्याशिवाय रशिद चहल, चहल, कुलदीप यादव ह्यांच्या फिरकीची मजा लुटता येणार आहे. एकंदरीत भरपूर मजा येणार आहे!

पहिला सामना शनिवार २३ मार्च, चेन्नई विरुद्ध बेंगालुरू असा रंगणार आहे. आपल्या संघाचं समर्थन करण्यासाठी, कौतुक करण्यासाठी, वादविवादाच्या फैरींची मजा लुटण्यासाठी, अचूक आणि मार्मिक व्यंगचित्रांनी घेतलेल्या 'फिरकी'साठी इथे आता धमाल करूया!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

" धोनीला बॅक अप म्हणून कार्तिकला स्थान द्यावे. पण हा पंत नको." - कार्थिक ने मिळालेल्या संधी वाया घालवल्या आहेत, टीम मधे त्याच्याविषयी फारसं पॉझिटीव्ह मत नाहीये, वन-डे मधे मधल्या फळीत इनिंग बिल्ड करण्याचं त्याचं कसब वादग्रस्त आहे - असं सगळं मागे एकदा संजय मांजरेकरनं लिहीलं होतं. खखोदेजा.

पंत ला परिस्थितीनुरूप खेळ करण्याची, इनिंग बिल्ड करण्याची, विकेटेकीपर म्हणून डीआरएस घेताना बॉल कुठे पडला होता वगैरे सांगण्याची परिपक्वता लवकर यावी अशी आशा आहे. नाहीतर आणखीन एक अतुल बेदाडे, विनोद कांबळी, रिकार्डो पॉवेल म्हणून त्याची वर्ल्ड क्रिकेट मधे नोंद व्हायला वेळ लागणार नाही.

"पंत आपली राष्ट्रीय संघातील जागा गृहीत तर धरत नाहीय ना" - वन-डे / टी-२० मधे तसंही त्याचं स्थान पक्कं नाहीये अजून. टेस्ट मधे जरी तो साहाच्या बराच पुढे निघून गेला असं वाटत असलं, तरी मला सारखं ते रिअर व्ह्यू मिरर वर लिहीलेल्या वाक्यासारखं 'ऑब्जेक्ट्स इन मिरर आर क्लोजर दॅन दे अ‍ॅपियर' वाटतं.

बंगळुरू ची सुरूवात तरी चांगली झालीये. आज साऊदी मुळे बॉलिंग पण स्ट्राँग वाटतीये (तरी अजून एखादा चांगला बॉलर हवा. अगदीच चहल आणी साऊदी वर सगळं अवलंबून ठेवणं कठीण आहे. जर स्कोअर २००+ असेल, तर ठीक आहे). बघू आता उरलेली ३/४ मॅच कशी खेळतात ते.

"पंत आपली राष्ट्रीय संघातील जागा गृहीत तर धरत नाहीय ना" - वन-डे / टी-२० मधे तसंही त्याचं स्थान पक्कं नाहीये अजून. टेस्ट मधे जरी तो साहाच्या बराच पुढे निघून गेला असं वाटत असलं >> मला वाटते कि barring injury update, Pant is has pretty much locked on test team keeper. धोनी निव्रुत्त होत नाही तोवर कार्थिक क पMत कि अजून कोणी हा प्रश्नच अनुत्तरीत राहणार आहे. तोवर संध्या दिल्या जातील पण बदल होणार नाही.

२०० झाले RCB चे. कोहली नि ABD ने सगळे frustration काढलेले दिसतेय.

"२०० झाले RCB चे." - चांगलाय स्कोअर. एबी आणी विको थोडे चुकीच्या वेळी आऊट झाले, नाहीतर अजून १५-२० रन्स वाढल्या असत्या. केकेआर कडे फायरपॉवर आणी मोमेंटम आहे चेस करण्यासाठी. बघू काय होतं ते.

अरे इरफान पठाण त्या कोहलीची एव्हडी पण स्तुती नको करू रे, नायतर तूला सिलेक्ट करायचा तो वर्ल्ड कप टीममध्ये.

*धोनीला बॅक अप म्हणून कार्तिकला स्थान द्यावे. पण हा पंत नको." - * साहा, संजू सॅमसन यांचयावरही आतांच काट मारणं अन्यायकारक ठरेल.
संदीप शर्मा हा मला एक हुषार व डोकं चालवून व शांत ठेवून गोलंदाजी करणारा वाटतो. त्याचा ' सलोअर वन ' खूपच फसवा वाटतो.

"साहा, संजू सॅमसन यांचयावरही आतांच काट मारणं अन्यायकारक ठरेल." - साहा ला वन-डे मधे स्थान मिळणं जरा अवघड वाटतं. संजू गेल्या २-३ सीझन्स पासून रणजीमधे विकेटक्पिईंग करत नाहीये रेग्युलरली. ह्या सीझन मधे तर तो प्लेयिंग ११ मधे पण नियमित नव्हता.

आज रसेल काय (कायच्या काय!) खेळला. व्वा!! तोंडातला काय, पण पार आरसीबी च्या पोटापर्यंत पोहोचलेला विजय त्यानं हिसकावून काढला. आरसीबी चा कॉन्फिडन्स पार रसातळाला गेला असेल आज.

या सीजनला आरसीबीला कदाचित एक ही मॅच जिंकता येणार नाही, तसं झालं तर बरंच होईल, पुढच्या वर्षी नवीन संघ आणि कॅप्टन घेऊन मैदानावर उतरता येईल.

आरसीवी च्या मॅच ला टॉस खूप महत्वाचा आहे. त्यावर ठरतं की आरसीबी रन्स नी हारणार की विकेट्सनी. Happy (व्हॉट्सअ‍ॅप साभार)

गोलंदाजी विरुद्ध फलंदाज जसे कल्पक व नाविन्यपूर्ण फटके शोधून काढतात, तसं फलंदाजांच्या विरोधात गोलंदाजीत फारच कमी होतं, असं वाटतं. आतां तर रसेलसारख्या विरूद्ध फक्त ऑफ स्टंपच्या जास्तीत जास्त बाहेर चेंडू टाकणं हा जणूं एकच पर्याय आहे, इतकी गोलंदाजी हतबल वाटते. कुणी तरी जरा कल्पकतेने व धाडसाने वेगळे प्रयोग करणं अत्यावश्यक आहे.

आंद्रे रसलने काल खुप धुतला आरसीबीला.

विराट आयपीएल क्रिकेट खेळतोय की गल्ली क्रिकेट.
आरसीबीला आता नविन कँप्टनची नितांत गरज आहे.

दिल्ली विरुद्ध केकेआरच्या मॅचमध्ये, सुपर ओव्हरला, रबडाने रसेलला चांगल्या यॉर्करवर बोल्ड केले होते.
विकेट स्लो असेल, तर असे सिक्स मारणे अवघड आहे.
बाऊन्सर, शॉर्ट पिच बॉल, यॉर्कर, वाईड यॉर्कर, किंवा हाल्फ व्हॅली असे अनेक पर्याय आहेत.

आरसीबी पहिल्या पासून चांगला बॉलर शोधण्यात उदासीन आहे, ही आत्ताची परिस्थिती नसून, मागच्या तीन वर्षापासून ते फक्त बॅटिंगच्या जोरावर मॅच जिंकत होते, पण आता त्यांनी गेल, केएल राहुलला, शेन वॉटसन काढून टाकलं, हा निर्णय आत्मघाती होता, इथे आरसीबी फसले.

आता बॅटिंगची पूर्ण मदार कोहली आणि एबीडीवर आहे, हे दोघे फसले की आरसीबीला रन्स करता येत नाहीत. त्यात बॉलिंगमध्ये चहलला साथ द्यायला कोणीच नाही, नेहरा चहलला काय टिप्स देत असेल देव जाणो. प्रत्येक टीमकडे डेथ ओव्हर्ससाठी चांगला फास्ट बॉलर आहे, तसं आरसीबीने कडे नाही. ऑक्शनमध्ये फास्ट बॉलरचे खूप ऑप्शन होते, पण आरसीबीने कधी लक्षच दिले नाही.

चांगला बॉलर नकोच असेल, तर निदान कोहलीने बॉलिंग करावी.
काल कोहलीने बॉलिंग केली असती तर कदाचित, रसेलला एवढ्या रन्स काढता आल्या नसत्या.

*काल कोहलीने बॉलिंग केली असती तर कदाचित, रसेलला एवढ्या रन्स काढता आल्या नसत्या.* - त्यापेक्षा, ' काल कोहलीने कॅप्टनशीप केली नसती तर केकेआरला सामना जिंकणं अशक्य होतं ', असं म्हणणं अधिक वास्तवतेला धरून होईल ! Wink

काल रसलला क्रिकेटचा बॉल फुटबॉलच्या आकारा एव्हढा दिसत असावा. त्याच्या झंझावाता समोर कोणिहि टिकणं मुष्किल होतं...

जिंकली मुंबई
अल्झारी जोसेफ च्या रूपाने नवा हिरा मुबंई ला सापडला .

*आजच्या दोन्ही मॅचेस बोरींग झाल्यात/चालल्यात!* - थोडा वेळ धीर धरला असतात तर एका नवोदित गोलंदाजाचा एक अफलातून बोलींग स्पेल व त्यामुळे झालेला मुंबईचा रोमांचक विजय पहायला मिळाला असता. अलझारी आयपीएलचया पदार्पणात 6 बळी !!!!

>>थोडा वेळ धीर धरला असतात तर एका नवोदित गोलंदाजाचा एक अफलातून बोलींग स्पेल

त्याबद्दल वाद नाही पण पहील्या ३-४ ओव्हर्समध्येच बऱ्यापैकी स्पष्ट झालेले की मुंबई मॅच जिंकेल ते!

हैद्राबादची मिडल ऑर्डर आणि लोअर मिडल ऑर्डर कोलमडते वॉर्नर लवकर आउट झाला की!

*बाऊन्सर, शॉर्ट पिच बॉल, यॉर्कर, वाईड यॉर्कर, किंवा हाल्फ व्हॅली असे अनेक पर्याय आहेत.* अलझारीने काल बहुतांश गोलंदाजी ' विकेट टु विकेट ' केली . इतर फाॅरमॅटस मधला हा प्रचलीत पर्याय खुबीने वापरल्यास टी-20 तही परिणामकारक ठरूं शकतो, हेंच त्याने दाखवून दिलंय !

स्वरूप कालच्या मॅचेस कंटाळवाण्या झाल्या असं म्हणत असशील तर आज कंटाळवाणेपणाचा कडेलोट झाला. पंतविषयी मला हल्ली नवीन अतुल बेदाडे होतो की काय अशी शंका यायला लागलीये. राजस्थान ने स्ट्रॅटेजीप्रमाणे रसेल ला बॅटींग मिळूच नाही दिली. Happy

तेच लिहायला आलो होतो.... आजच्या मॅचेस महाबोरींग!

नरीन माझा कॅप्टन होता fantasy league मधला आणि त्याने घसघशीत पॉइंट्स मिळवून दिले हाच काय तो फायदा म्हणायचा!

किती कंटाळवाणे सामने होते कालचे, यांच्यापेक्षा आमचे बायोलॉजी केमिस्ट्रीचे लेक्चर बरे असायचे अशी म्हणण्याची वेळ आलीये आता.

वर्ल्ड कपसाठी कोहलीच्या ऐवजी रोहित हवा कप्तान म्हणून असे article हल्ली जास्त circulation मधे दिसताहेत असे वाटतेय. पण मूळात रोहितच्या सध्याच्या IPL नि त्या आधीच्या काही दौर्‍यांमधल्या सामन्यांमधल्या form कडे बघून मूळात रोहितच past reputation वर वर्ल्ड कप खेळणार आहे हे उघड आहे. अशा वेळी अजून जबाबादारी त्याच्या डोक्यावर टाकणे कितपत सयुक्तिक ठरेल ?

खेळाडूंचा इंटरेस्ट संपत चाललाय आयपीएल मधला >> खेळाडूंचा माहित नाही आपला नक्की संपतोय. पूर्ण रिबूट जरुरी आहे सगळ्या संघांचे नि format चेही.

वर्ल्डकपमध्ये बॅकप विकेटकीपर आणि बॅट्समन म्हणून पंत किंवा कार्तिक दोघांपेक्षाही पार्थिव पटेलला न्यावे. गरज पडल्यास ओपनिंगलाही जावू शकतो हा आणखीन महत्वाचा अ‍ॅडव्हांटेज आहे. पटेल खेळत असला तर रोहित - पटेलनी ओपनिंगला यावे आणि धवनने मिडल ऑर्डरमध्ये खेळावे.

वर्ल्डकपमध्ये सर्वात महत्वाचा प्रॉब्लेम मिडल ऑर्डरचा आहे. रोहित, धवन, कोहली, धोणी, हार्दीक पंड्या, भुवनेश्वर, बुमराह हे सातजण जवळपास स्टार्टींग इलेव्हनमध्ये नक्की असणार. उरलेल्यांपैकी चहल किंवा कुलदीप आणि बहुतेक शमी किंवा सिराज / खलीलला खेळवण्याची शक्यता वाटते. मग उरले दोन स्पॉट ते म्हणजे मिडल ऑर्डरमधले. त्यापैकी एक बहुतेक केदार जाधव असेल. दुसरा कोण?

मिडल ऑर्डरला खेळवण्यासाठी कृणाल पंड्या किंवा जाडेजा हा सरप्राईज ऑप्शन ठरु शकेल. खासकरुन कृणाल, कारण जाडेजाच्या तुलनेत त्याची बॅटींग बरीच मॅच्युअर वाटते लिमिटेड ओव्हर्समध्ये.

आऊट ऑफ द ब्ल्यू ऑप्शन म्हणून श्रेयस अय्यर किंवा युवराजही सरप्राईज सिलेक्शन असू शकते.

Pages