आयपीएल - २०१९ ह्या आठवड्याच्या शेवटी सुरू होते आहे. आयपीएलचा तडका बसला, की लगोलग येणार्या विश्वचषकाची चव अजूनच लज्जतदार होणार आहे! कोण जिंकणार, कोण चांगलं खेळणार, विश्वचषकाची संघनिवड आयपीएलमधील कामगिरीवर ठरणार का - एक ना दोन! निवडणुका असतानाही ह्यावेळी आयपीएल भारतातच असणार आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात हवा चांगलीच गरम असणार आहे. स्पर्धा सुरू होईल तशी चर्चा जोमाने होईलच. वॉर्नर-स्मिथ जोडगोळी पुन्हा क्रिकेटमध्ये परतली आहे. सॅम कुरानसारखा खेळाडू ह्या वेळेस आहे. कोहलीसारखा खंदा फलंदाज व कप्तान ह्यावेळी आयपीएल आणि विश्वचषक दोन्ही मान पटकावण्यासाठी सज्ज आहे. जयदेव उनाडकत ह्याही वेळेस भरपूर किंमत घेऊन मैदानात उतरलाय. ह्याशिवाय रशिद चहल, चहल, कुलदीप यादव ह्यांच्या फिरकीची मजा लुटता येणार आहे. एकंदरीत भरपूर मजा येणार आहे!
पहिला सामना शनिवार २३ मार्च, चेन्नई विरुद्ध बेंगालुरू असा रंगणार आहे. आपल्या संघाचं समर्थन करण्यासाठी, कौतुक करण्यासाठी, वादविवादाच्या फैरींची मजा लुटण्यासाठी, अचूक आणि मार्मिक व्यंगचित्रांनी घेतलेल्या 'फिरकी'साठी इथे आता धमाल करूया!
ऑल राउंडर हे सगळ्यात सेफ
ऑल राउंडर हे सगळ्यात सेफ करिअर आहे क्रिकेटमध्ये..... all time in demand!
मुंबई इंडियन्सने आता तरी
मुंबई इंडियन्सने आता तरी पोलार्ड आणि मलिंगा यांच्या जागी दुसऱ्या खेळाडूंना संधी दिली पाहिजे
केकेआर 60-5 वरून 185 !!! रसेल
केकेआर 60-5 वरून 185 !!! रसेल व कार्तिक या जोडीला मानलं.
पृथ्वी !!! उगवता तारा ! Has
पृथ्वी !!! उगवता तारा ! Has class & aggression !!
सुपरओव्हर!!
सुपरओव्हर!!
येस.. कोलकाता जिंकू शकतं,
येस.. कोलकाता जिंकू शकतं, दिल्लीवाल्यांनी हातातली मॅच घालवली
शॉ किंवा पंतला ते शॉट मारायची
शॉ किंवा पंतला ते शॉट मारायची काही गरज नव्हती, चुकीच्या वेळी आऊट झाले, त्यांना सहज मॅच जिंकता आली असती.
DC vs KKR
शेवटच्या ओव्हर मध्ये रबाडाचे यॉर्कर भारी होते का शॉ चे 99 रन्स?
DC vs KKR
बेस्ट मॅच ऑफ धिस आयपील सो फार
मस्त झाली मॅच!
मस्त झाली मॅच!
शॉची बॅटींग, कुलदीपची ती २०वी ओव्हर आणि रबाडाची सुपरओव्हर.... मजा आ गया!
DC हा या आयपीएलचा ' Dark
DC हा या आयपीएलचा ' Dark Horse ' तर नाही ना ठरणार !!
*मुंबई इंडियन्सने आता तरी पोलार्ड आणि मलिंगा यांच्या जागी दुसऱ्या खेळाडूंना संधी दिली पाहिजे* -
आतां 'मुंबई ' हा सचिनचा संघ नाहीय. तरीही हेही नाहीं बोलायच- दिल्लीत उगवते व मुंबईत मावळते तारे भरलेत !!
बेशट्रोचं शतक झालं, आरसीबीला
बेशट्रोचं शतक झालं, आरसीबीला एक विकेट सुद्धा घेता येईना, आरसीबी बॅटिंगच्या जोरावर जिंकू शकतं, पण बॉलिंग बोथट आहे
वॉर्नरचंही शतक!
वॉर्नरचंही शतक!
वॉर्नर इज अनस्टॉपेबल सो फार!
वॉर्नर इज अनस्टॉपेबल सो फार!
डीविलीयर्स आणि कोहली स्वतः
डीविलीयर्स आणि कोहली स्वतः असताना हितमायेर ला पाठवण्याच प्रयोजन मला अजूनही समजलेलं नाही.
अशी कॅप्टनसी वर्ल्ड कप ला तरी करू नको बाबा!
हितमायेर आउट!
हितमायेर आउट!
दीविलीयर्स आउट!
दीविलीयर्स आउट!
बंगळुरू चे सामन्यातील आव्हान
बंगळुरू चे सामन्यातील आव्हान संपल्यात जमा!!!
आजच्या कॉमेंट्री मधलं सगळ्यात
आजच्या कॉमेंट्री मधलं सगळ्यात सुंदर वाक्य!
आपको स्टार्स नही, टीम मॅच जिताती है!!!
हैदराबादचं अभिनंदन!
RCB आणि RR ह्या तळाचे दोन्ही
RCB आणि RR ह्या तळाचे दोन्ही संघ बघितले तर एकाचा कॅप्टन अतिआक्रमक, खुपच जास्त एक्सप्रेसीव्ह आणि व्होकल तर दुसऱ्याचा अति शांत, गुडीगुडी आणि संत माणूस!
कॅप्टन नेहमीच balanced हवा नाहीतर मग टीम्स तळाशी जाउन बसतात!
@स्वरुप
@स्वरुप
मागच्या वर्षी हीच राजस्थानची टीम प्ले ऑफ मध्ये पोहचली होती
कशी पोहोचली होती?
कशी पोहोचली होती?
बटलरने एकहाती काढल्या होत्या बऱ्याचश्या मॅचेस!
*कॅप्टन नेहमीच balanced हवा
*कॅप्टन नेहमीच balanced हवा नाहीतर मग टीम्स तळाशी जाउन बसतात!* -
वाॅरनर, बटलर, एबीडी, रसेल....असले खेळाडू ' balanced team, balanced captain ' इत्यादी प्रचलीत संकल्पनांना सुरुंग लावायलाच तर आयपीएल खेळतात !
आपलं पोरगं रसेल, वाॅरनर होणार, बघच तूं ! इतर पोरं दगड मारून आंबे, चिंचा पाडतात तर हा नारळ पाडायला बघतोय !
@ स्वरुप
@ स्वरुप
स्टॅट्स चेक केले, खालील माहिती मिळाली.
मागच्या वर्षी, राजस्थान रॉयल्स पंधरा मॅचेस खेळले, त्यातल्या सात मॅच जिंकले होते.
त्यातले मॅन ऑफ द मॅच
बटलर 3 वेळा
संजू सॅमसन २ वेळा
जोफ्रा आर्चर एकदा
श्रेयस गोपाळ एकदा
राजस्थान टीमकडे हातातला किंवा
राजस्थान टीमकडे हातातला किंवा अनुकूल परिस्थितीतला सामना हातातून घालवायची विशेष कला आहे. उनाडकट ला बसवायला हवं..... स्टेडियम च्या बाहेर.
काल दिल्ली नशिबवान ठरले. केकेआर ने दोन्ही वेळा मॅच खेचली होती. शॉ चा अनुभव कमी पडला. त्यानी मॅच जिंकून द्यायला हवी होती.
RCB desperately need a leadership change.
टी-20 फाॅरमॅटमधे स्टॅटसवरून
टी-20 फाॅरमॅटमधे स्टॅटसवरून भाकीतं करणं म्हणजे काल मुठीत घेतलेली चैपाटीवरची वाळू आज नेमकी शोधण्यासारखं आहे , हें माझं मलाही आगाऊपणाचं वाटणारं मत !!
*RCB desperately need a leadership change.* - पुढे राष्ट्रीय संघाबददलही असं म्हणायची पाळी न येवो !!
*RCB desperately need a
*RCB desperately need a leadership change.* - पुढे राष्ट्रीय संघाबददलही असं म्हणायची पाळी न येवो !!>>>>सध्या भारतीय टीमचा कर्णधार धोनीच आहे. ऑस्ट्रेलिया सिरीज मध्ये शेवटचे काही सामने धोनी खेळला न्हवता तेव्हा कोहलीच्या नेतृत्वाखाली झालेली ससेहोलपट सगळ्यांनी पाहिली. मला तरी वाटतंय कॅप्टनशीप स्किल कोहलीपेक्षा शर्माकडे जास्त आहे.
>>@ स्वरुप
>>@ स्वरुप
स्टॅट्स चेक केले, खालील माहिती मिळाली.
मागच्या वर्षी, राजस्थान रॉयल्स पंधरा मॅचेस खेळले, त्यातल्या सात मॅच जिंकले होते.
त्यातले मॅन ऑफ द मॅच
बटलर 3 वेळा
माझ्या आठवणीप्रमाणे ते तीन सामने जे बटलरने एकहाती ओढले ते लीगमधले शेवटचे ३-४ सामने होते.... त्याआधी राजस्थानची हालत खराब होती... अचानक टीम मॅनेजमेंटला बटलरला ओपनिंगला पाठवायची बुद्धी झाली आणि राजस्थान अखेरीस प्लेऑफ्सला पोहचले... त्यातला एक सामना मुंबईविरुध्द होता जो जिंकल्यामुळे मुंबई बाहेर पडून राजस्थान आत आले!
त्यामुळे ते आकडे जरी ३ च MoMs दाखवत असले तरी त्याचे महत्त्व खुप जास्त होते!
आणि बटलर परत गेल्यावर राजस्थान परत ढेपाळले!
>>राजस्थान टीमकडे हातातला
>>राजस्थान टीमकडे हातातला किंवा अनुकूल परिस्थितीतला सामना हातातून घालवायची विशेष कला आहे.
अगदी अगदी!
पण आजकाल राजस्थान हरल्याचे तितकेसे वाईट वाटेनासे झालेय
"जिंकता जिंकता हरण्याचा त्यांनी सराव केला
अन उदास उगा न होण्याचा मीही ठराव केला"
काल अंपायर एस. रवी कोहली ला
काल अंपायर एस. रवी कोहली ला म्हणाला असेल, 'this is IPL, not a club level cricket'.
"पण आजकाल राजस्थान हरल्याचे तितकेसे वाईट वाटेनासे झालेय" - couldn't agree more. उद्या तर रॉयल्स वि. आरसीबी आहे. जास्त वाईट खेळणारी टीम स्वतःचं (तळाचं) स्थान अबाधित ठेवेल. उनाडकट ला खेळवलं नाही रॉयल्स नी, तर बंगळुरू ला जिंकणं अवघड जाऊ शकतं, नाहीतर उनाडकट हा सिंगल हँडेड मॅचविनर आहे - प्रतिस्पर्धी संघाचा.
"पुढे राष्ट्रीय संघाबददलही असं म्हणायची पाळी न येवो" - खरय. मला तरी शास्त्री-कोहली थिंक टँक पोकळ वासा वाटायला लागलाय. उद्दामपणा आणी वैय्यक्तिक ब्रिलियंस हे त्याचे हायलाईट्स आहेत. असो. वह कहानी, फिर कभी!
आज दिल्ली वि. पंजाब. काय नविन घडणार ह्याची उत्सुकता आहे. बहुदा ऑब्स्ट्रक्टींग द फील्ड, लॉस्ट बॉल, पेनल्टी फॉर रनिंग ऑन द डेंजर एरिया वगैरे
एकंदरीतच ह्या आयपीएलमध्ये माल
एकंदरीतच ह्या आयपीएलमध्ये माल कमी आणि मसाला जास्त अशीच परिस्थिती वाटते आहे. क्रिकेटची पातळी काही खास वाटली नाही आजपर्यंत.
Pages