आयपीएल १२ - २०१९

Submitted by भास्कराचार्य on 20 March, 2019 - 09:11

आयपीएल - २०१९ ह्या आठवड्याच्या शेवटी सुरू होते आहे. आयपीएलचा तडका बसला, की लगोलग येणार्‍या विश्वचषकाची चव अजूनच लज्जतदार होणार आहे! कोण जिंकणार, कोण चांगलं खेळणार, विश्वचषकाची संघनिवड आयपीएलमधील कामगिरीवर ठरणार का - एक ना दोन! निवडणुका असतानाही ह्यावेळी आयपीएल भारतातच असणार आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात हवा चांगलीच गरम असणार आहे. स्पर्धा सुरू होईल तशी चर्चा जोमाने होईलच. वॉर्नर-स्मिथ जोडगोळी पुन्हा क्रिकेटमध्ये परतली आहे. सॅम कुरानसारखा खेळाडू ह्या वेळेस आहे. कोहलीसारखा खंदा फलंदाज व कप्तान ह्यावेळी आयपीएल आणि विश्वचषक दोन्ही मान पटकावण्यासाठी सज्ज आहे. जयदेव उनाडकत ह्याही वेळेस भरपूर किंमत घेऊन मैदानात उतरलाय. ह्याशिवाय रशिद चहल, चहल, कुलदीप यादव ह्यांच्या फिरकीची मजा लुटता येणार आहे. एकंदरीत भरपूर मजा येणार आहे!

पहिला सामना शनिवार २३ मार्च, चेन्नई विरुद्ध बेंगालुरू असा रंगणार आहे. आपल्या संघाचं समर्थन करण्यासाठी, कौतुक करण्यासाठी, वादविवादाच्या फैरींची मजा लुटण्यासाठी, अचूक आणि मार्मिक व्यंगचित्रांनी घेतलेल्या 'फिरकी'साठी इथे आता धमाल करूया!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

केदार शी सहमत. मंकडिंग बद्दल वाद नाही. पण अश्विन उडी मारून थांबला, त्याही वेळी बटलर क्रीझ मधे होता, त्या फ्लो मधे जेव्हा तो बाहेर गेला, तेव्हा अश्विन ने त्याला आऊट केलं. स्पिरीट वगैरे जाऊ द्या. मुळात त्या नियमाप्रमाणे, बॉलर 'एक्स्पेक्टेड टू डिलीव्हर द बॉल' फेज मधे होता. त्यामुळे तिसर्या अंपायर ने सुद्धा बॅट्समन च्या बाजूनं निकाल द्यायला हवा होता. अश्विन ने हे आधी सुद्धा केलंय त्यामुळे ते काही अनलाईक अश्विन वगैरे नाहीये. त्या डिसमिसल मधे ग्रे असं काहीही नाहीये. संपूर्णपणे अश्विन ची आणी थर्ड अंपायर ची चूक आहे.

असो, दिल्ली ची जोरदार सुरूवात.

मुळात त्या नियमाप्रमाणे, बॉलर 'एक्स्पेक्टेड टू डिलीव्हर द बॉल' फेज मधे होता. त >> नाही रे, त्याने पूर्ण लोड् केलेले नव्हते, हात हार्डली वर गेला होता. त्याची नॉर्मल बॉलिंग अ‍ॅक्शन बघ. बटलर आधी पण एकदा मंकडिंग वर बाद झाला आहे. बटलर सुरू होण्याच्या फ्लो मधे होता नि त्याने बॉलर ने बॉल टाकला की नाही ह्याचे भान ठेवणॅ जरुरी आहे. स्ट्राईकर जर जाणून बुजून धावेसाठी सुरू करण्याची रिस्क घेत असेल तर बॉलर ला ही पूर्ण हक्क आहे. मूळ नियमामधे संदिग्धता आहे कारण लोड अ‍ॅक्शन काय हे १००% ठरवणे अशक्य आहे. त्यामूळे स्ट्राइकर ने बॉल हातातून सुटेतो क्रिजबाहेर निघणे त्याचा कॉन्शस निर्णय ठरतो.

वॉर्न नि अप्टन ने spirit of the game मधे असे करायला नको होते वगैरे म्हणणे मात्र गमतीशीर आहे. Wink

"त्याची नॉर्मल बॉलिंग अ‍ॅक्शन बघ." - कुठली? ऑफ-स्पिन वाली, लेग-स्पिन वाली की हे असले माकड-चाळे करतो तेव्हाची? सॉरी, मला तुला दुरूत्तर नाही करायचं पण अश्विन ने केलेला प्रकार outrageous होता. नियमात संदिग्धता आहेच. आणी म्हणूनच थर्ड अंपायर ने तरी ते अपील फेटाळायला हवं होतं. क्रिकेट खेळताना, नॉन-स्ट्राईकर ने बॉलर अ‍ॅक्शन मधे असताना थोडं बॅक-अप करणं स्वाभाविक आहे. अश्विन थांबला, त्याने उडी मारल्यावर (संपल्यावर) बटलर ला पुढे जायची संधी दिली आणी मग आऊट केलं. खेळण्यातलं स्किल संपलं असेल, तर कॉमेंट्री वगैरे मधे करियर करता येईल त्याला, हे असले चीप प्रकार करण्यापेक्षा.

>>अश्विन ने हे आधी सुद्धा केलंय त्यामुळे ते काही अनलाईक अश्विन वगैरे नाहीये.

हो का?
हे माहित नव्हत मला!

क्रिकेट खेळताना, नॉन-स्ट्राईकर ने बॉलर अ‍ॅक्शन मधे असताना थोडं बॅक-अप करणं स्वाभाविक आहे. अश्विन थांबला, त्याने उडी मारल्यावर (संपल्यावर) बटलर ला पुढे जायची संधी दिली आणी मग आऊट केलं. >> थोडं बॅक-अप करणं नी क्रीजच्या बाहेर जाणे ह्यात फरक नाही का ? आणि त्यात बटलर चा दोष नाही ? अश्विन थांबला त्यात बटलर परत येऊ शकला असता पण त्याचे लक्ष नव्हते. का नव्हते ? कारण तो advantage घेत होता. त्याचा परीणाम त्याने भोगला. मला उलट अश्व्नि चे कौतुक वाटले कि त्याने कुठेही 'मी बटलरला परत येता यावे म्हणून थांबलो' वगैरे विधाने केली नाहीत उलट flow of the game मधे केले असे म्हटले.

नियमामधे संदिग्धता असणे ही प्लेयर ची चूक नाही. जी advantage बटलर घायला बघतोय तोच बॉलरलाही दिलाच पाहिजे. पॅरीटी का नको इथे ?

हे माहित नव्हत मला! >> २०१२ मधे केले होते बहुधा. मजेची गोष्ट म्हणजे बटलरलाही लंकेमधे सेनानायकेने असे आधी बाद केले होते.

""थोडं बॅक-अप करणं नी क्रीजच्या बाहेर जाणे ह्यात फरक नाही का ? आणि त्यात बटलर चा दोष नाही ?" - बटलर जितका क्रीझ च्या बाहेर गेला होता - ते सुद्धा अश्विन ची उडी कंप्लीट झाल्यावर त्यात काहीही चूक नाहीये. किंबहूना अश्विन ने थांबून त्याला त्या फ्लो मधे बाहेर जाऊ दिलं आणी मग बेल्स उडवल्या. हे काही instinctive वगैरे नव्हतं. अश्विन चं कौतुक तर बिलकूल नाही वाटलं मला. धडधडीत रडीचा डाव खेळणार्याचं कसलं कौतुक?

"जी advantage बटलर घायला बघतोय तोच बॉलरलाही दिलाच पाहिजे. पॅरीटी का नको इथे ?" - बटलर ने जो 'advantage' घेतला तो जिथे जिथे क्रिकेट खेळलं जातं तिथे तिथे सगळेच बॅट्समेन घेतात. आता तोच 'advantage' अश्विन कसा घेणार? क्रीझ च्या मागून बॉलिंग करून?

"२०१२ मधे केले होते बहुधा." - आणी सेहवाग ने अपील मागे घेतलं होतं. अश्विन च्या रडीच्या डावाला त्याचा पाठिंबा नव्हता.

"मजेची गोष्ट म्हणजे बटलरलाही लंकेमधे सेनानायकेने असे आधी बाद केले होते." - सेनानायके ने त्याला एकदा वॉर्न केलं होतं. मुळात मंकडिंग लीगल आहे की नाही हा प्रश्नच नाहीये. मी ह्या आधी मंकडिंग च्या विरोधात कधीच इतकं लिहीलं नाहीये. पण कालचं मंकडिंग ही फसवणुक होती, म्हणून मी त्याचा इतका निषेध करतोय.

बटलर ने जो 'advantage' घेतला तो जिथे जिथे क्रिकेट खेळलं जातं तिथे तिथे सगळेच बॅट्समेन घेतात. >> म्हणजे ते चुकीचे आहे हे मान्य आहे तरीही त्याला counter act करणे रडीचा डाव होतो ? Happy

"म्हणजे ते चुकीचे आहे हे मान्य आहे" - मी काही चूक आहे वगैरे मान्य नाही केलं. तो नॉर्म आहे असं सांगतोय. नॉन-स्ट्राईकर जर बॉलर ने रन-अप स्टार्ट केल्यावर बॅक-अप केलं तर ते चुकीचंच आहे, पण बॉलर ने पॉपिंग क्रीझ मधे उडी मारून बॉल टाकण्यापर्यंत तो आल्यावर नॉन-स्ट्राईकर ने बॅक-अप करणे हा नॉर्म आहे. त्याला जर तू अ‍ॅडव्हांटेज म्हणत असशील, तर ते जगभर चालतं असं म्हणतोय मी.

आश्विन काही काळ थांबून गोलंदाजी करायचा, ती खर म्हणजे रन आउट करायची ट्रीक होती हे आता कळतय. Happy भंकसपणा नुसता.
पंत आणि पृथ्वी काल सेट होउन आउट झाले. २०० स्कोर पुन्हा एकदा होउ शकत होता.

अश्विनच्या त्या बाद करण्याबद्दल आपण नियमाचा कितीही कीस काढला तरीही शेवटीं त्याने तसं न केलेलंच बरं झालं असतं, हा विचार मनातून जात नाहीं.

@विक्रमसिंह

१. काल विकेट स्लो होतं, त्यामुळे एवढे रन्स झाले नाहीत, श्रेयसचा आधी बॅटिंग करण्याचा निर्णय योग्य होता.

३. डॅरेन ब्राव्होला डेथ ओव्हर्स मध्ये फोर आणि सिक्स मारणं, अशक्य आहे, तिथे दिल्लीवाले फसले, त्यामुळे स्कोर कमी झाला.

२. सीएसकेच्या बॅटिंग वेळेस, एकोणिसावी ओव्हर रबाडाला द्यायला हवी होती, त्याने विसावी ओव्हर भारी टाकली, सीएसके सेकंड लास्ट बॉलवर जिंकले.

दिल्ली चं टीम सिलेक्शन रिस्की आहे. अजून एखादा भरवशाचा बॅट्समन हवा असं वाटतं. कदाचित मॉरीस आल्यावर त्यांना तो आधार मिळेल. तिवातिया पेक्षा लमिच्छाने जास्त प्रभावी ठरू शकेल असं वाटतं.

आज पंजाब वि. केकेआर! केकेआर ने सुरूवात चांगली केलीये, पण इडन गार्डन वर चेस करणं सोपं आहे. त्यांना मोठा स्कोअर करावा लागेल. अजून तरी दोन्ही विकेट्स बॅटींग एण्ड ने च पडल्या आहेत. ;). रच्याकने, मंकडिंग चं नाव बदलून अश्विनिंग करावं का? Happy

भाऊ, आयपीएल सुरू झाल्यावर इतक्या उशीरा तुमची ह्या धाग्यावर एण्ट्री!!

१६ बॉल्स मधे एक बाऊंड्री आणी एक विकेट. केकेआर ला हे परवडण्यासारखं नाहीये. इडन गार्डन वर चेस करणं सोपं आहे.

>>अश्विनच्या त्या बाद करण्याबद्दल आपण नियमाचा कितीही कीस काढला तरीही शेवटीं त्याने तसं न केलेलंच बरं झालं असतं, <<
असहमत. हाफवॉली करता (किंवा अजाणतेपणे) बॅट्स्मन क्रिज सोडुन बाहेर आल्यावर विकेटकिपरने स्टंपिंग करण्यासारखाच मांकडिंग हा प्रकार आहे; तो नॉन-स्ट्रायकरच्या बाबतीत घडतो हाच काय तो फरक...

*विकेटकिपरने स्टंपिंग करण्यासारखाच मांकडिंग हा प्रकार आहे;* - साॅरी ! याबाबतीत सहमत होणं मला तरी अशक्य आहे !

"विकेटकिपरने स्टंपिंग करण्यासारखाच मांकडिंग हा प्रकार आहे;* - साॅरी ! याबाबतीत सहमत होणं मला तरी अशक्य आहे !" - भाऊ - सहमत.

केकेआर २१८ - रसेल पुन्हा जबरदस्त खेळला. बिचारा शामी! एक फिल्डर ३०-यार्ड सर्कल मधे कमी असणं चांगलच भोवलं पंजाब ला. आता गेल काय करतो ते बघायला मजा येईल.

विकेटकिपरने स्टंपिंग करण्यासारखाच मांकडिंग हा प्रकार आहे;* - साॅरी ! याबाबतीत सहमत होणं मला तरी अशक्य आहे !" >>>>>
भाऊ, तुमच्या मताशी सहमत!!!

>>साॅरी ! याबाबतीत सहमत होणं मला तरी अशक्य आहे !<<

इंटरेस्टिंग! दोन्हि बाबतीत निव्वळ स्कोर करण्याच्या हेतुने बॅट्स्मन क्रिजच्या बाहेर गेला (बॉल इज इन प्ले), आणि त्याला स्टंपआउट केलं गेलं यात फरक काय? दोन्हि नियमाला धरुन आहेत. अ‍ॅम आय मिसिंग समथिंग?

अश्विन आजपण रडला ... लहान मुलासारख चौथ्या अंपायर बरोबर भांडून ४ धावा घेतल्या .
बर्य्याच दिवसानी I am starting to Hate an Indian Player.
एवढा गुणी खेळाडू अशा पातळीवर येताना पाहून वाईट वाटत .

चौथ्या अंपायर बरोबर भांडून ४ धावा घेतल्या ??
बॉल डेड नव्हता , थ्रो केलेला बॉल दोन्हि स्टंपच्या बाजूने डेड झालेला नसतना दुसर्‍या फिल्डरकडून सुटला आणि चौकार मिळाला .
त्यात रडण्यासारखे काय ?? हक्काच्या रन्स आहेत .
भारतीय खेळाडू हक्कासाठी भांडत आहेत हे बघून बरे वाटले

*अ‍ॅम आय मिसिंग समथिंग?* - विकेटकीपरने स्टंप करून बाद करणे यांत गोलंदाज व विकेटकीपर यांचं कौशल्य आहे व फलंदाजाची धोका पत्करून खेळण्याची जिगर आहे .
' मांकडींग 'मधे याचा पूर्ण अभाव आहे . (अर्थात, हें माझं मत . )

"भारतीय खेळाडू हक्कासाठी भांडत आहेत हे बघून बरे वाटले" - हे सगळं बांग्लादेश, (पुर्वीची) श्रीलंका ह्या मार्गावर चाललय. 'सतत आपल्याला कुणीतरी उपेक्षेनं मारून राहिलाय, ही भुमिका घेणं गरजेचं आहे' हे पु. लं. चं वाक्य आठवलं.

आज मुंबई वि. बंगळुरू. जरी कागदावर दोन्ही संघ तुल्यबळ असले तरी मुंबईचं पारडं जड वाटतय.

१. आरसीबी डिव्हिलर्सला ओपन करायला का पाठवत नाही काय माहित. त्याने पटेल बरोबर ओपनिंग करावे अन विराटने चौथ्या क्रमांकावर येऊन फिनिशरची भूमिका पार पाडावी

२. आरसीबीकडे दोन चांगले स्पिनर आहेत, चहल आणि अली. शर्मा, डिकॉक, सूर्यकुमारला स्पिनर विरुद्ध नीट खेळता येत नाही. मला वाटतं आज आरसीबी जिंकेल.

"शर्मा, डिकॉक, सूर्यकुमारला स्पिनर विरुद्ध नीट खेळता येत नाही." - शर्मा लेग स्पिनर समोर अडखळतो. त्यामुळे मला आज चहल सुरूवात करेल असं वाटलं होतं. पण उमेश यादव ला मधल्या ओव्हर्स किंवा डेथ ओव्हर्स देणं आत्मघातकी ठरू शकतं म्हणून बहुदा तसं केलं नसावं.

>>विकेटकीपरने स्टंप करून बाद करणे यांत गोलंदाज व विकेटकीपर यांचं कौशल्य आहे<<

ठिक आहे; तुम्ही कौशल्याचा मुद्दा आणतांय आणि मी म्हणतोय कि दोन्हित तांत्रिक्दृष्ट्या फरक नाहि. बाय्दवे, मांकडिंग करायला हि एक प्रकारची नॅक असावी लागते. आता ते कौशल्य आहे कि नाहि यावर दुमत असु शकतं...

Pages