आयपीएल १२ - २०१९

Submitted by भास्कराचार्य on 20 March, 2019 - 09:11

आयपीएल - २०१९ ह्या आठवड्याच्या शेवटी सुरू होते आहे. आयपीएलचा तडका बसला, की लगोलग येणार्‍या विश्वचषकाची चव अजूनच लज्जतदार होणार आहे! कोण जिंकणार, कोण चांगलं खेळणार, विश्वचषकाची संघनिवड आयपीएलमधील कामगिरीवर ठरणार का - एक ना दोन! निवडणुका असतानाही ह्यावेळी आयपीएल भारतातच असणार आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात हवा चांगलीच गरम असणार आहे. स्पर्धा सुरू होईल तशी चर्चा जोमाने होईलच. वॉर्नर-स्मिथ जोडगोळी पुन्हा क्रिकेटमध्ये परतली आहे. सॅम कुरानसारखा खेळाडू ह्या वेळेस आहे. कोहलीसारखा खंदा फलंदाज व कप्तान ह्यावेळी आयपीएल आणि विश्वचषक दोन्ही मान पटकावण्यासाठी सज्ज आहे. जयदेव उनाडकत ह्याही वेळेस भरपूर किंमत घेऊन मैदानात उतरलाय. ह्याशिवाय रशिद चहल, चहल, कुलदीप यादव ह्यांच्या फिरकीची मजा लुटता येणार आहे. एकंदरीत भरपूर मजा येणार आहे!

पहिला सामना शनिवार २३ मार्च, चेन्नई विरुद्ध बेंगालुरू असा रंगणार आहे. आपल्या संघाचं समर्थन करण्यासाठी, कौतुक करण्यासाठी, वादविवादाच्या फैरींची मजा लुटण्यासाठी, अचूक आणि मार्मिक व्यंगचित्रांनी घेतलेल्या 'फिरकी'साठी इथे आता धमाल करूया!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्याची मॅच्युरिटी अफाट आहे. >> हो. लक्ष ठेवले जाईल त्यावर आता. नव्या खेळाडूंना संधी देण्याचे काम दिल्ली कडून आता राजस्थानकडे आलेले दिसतेय.

"नव्या खेळाडूंना संधी देण्याचे काम दिल्ली कडून आता राजस्थानकडे आलेले दिसतेय." - मला कोलकताकडून सुद्धा अपेक्षा आहेत - शुभमन गिल, शिवम मावी, नागरकोटी, श्रीकांत मुंढे, निखील नाईक वगैरे लोकं त्यांच्याकडेही आहेत.

ज्याची बॅट ऑफ स्टंपच्या बाहेरच्या क्रिजपर्यंत सहज पोचते व तेंही अत्यंत वेगाने, त्या रसेलला इतर फलंदाजांना टाकतात तसे ऑफ स्टंपबाहेर चेंडू टाकत रहाणं हा एकच पर्याय आहे का ! मला वाटतं , टी20 मधे तरी , फलंदाजीच्या तुलनेत, गोलंदाजी कल्पकता, वैविध्य व धाडस यांत खूपच कमी पडते.

"मला वाटतं , टी20 मधे तरी , फलंदाजीच्या तुलनेत, गोलंदाजी कल्पकता, वैविध्य व धाडस यांत खूपच कमी पडते." -सहमत आहे.

गेल्या दोन दिवसात लिहायला जमलं नाही. पण परवा राजस्थान मस्त खेळले. सीझन च्या सुरूवातीला किमान तीन तरी मॅचेस त्यांनी शेवटी रन-अ-बॉल परिस्थितीतून घालवल्या होत्या. परवा जसं शांतपणे खेळले, तसे खेळले असते, तर आज कदाचित प्ले-ऑफ मधे पोहोचले असते. असो, जर तर ला अर्थ नाही.

काल तर गिल-लइन-रसेल ने मुंबई ला अक्षरशः लोळवलं असं लिहितालिहिता एकदम पंड्याचा काऊंटर अ‍ॅटॅक आठवला. कसला जबरदस्त खेळला! वर्ल्ड-कप ला पण त्याचा हा फॉर्म कायम राहो ही अपेक्षा आहे.

आज पंजाब - हैद्राबाद! चेन्नई आणी दिल्ली प्ले-ऑफ्स मधे पोहोचले आहेत. पण उरलेल्या सहापैकी पाचांना प्ले-ऑफ्स मधे जायची संधी आहे. बघू काय होतं ते.

रसेल ला सतत आउटसाईड ऑफस्टंप बॉल टाकत राहणार्‍या बॉलर्सबद्दल पहिल्याने दया वाटली आणि नंतर राग आला. हे बॉलर्स आपला आत्मविश्वास आणि लढाऊ बाणा हरवून बसल्यासारखे वाटले. एखादा बॉल असा टाकणे समजू शकतो पण ओवरमध्ये दोन-तीन वाईडस ची रिस्क घेऊन असे बॉल्स टाकत राहणे पथेटिक वाटले. केवळ अंपायरच्या वाईड देण्या-न्देण्याच्या संदिग्ध निर्णयाचा गैरफायदा घेत, काहीही करून रसेलला बॉलपासून लांब ठेवणे निगेटिव (आणि काहीसे अखिलाडू) अ‍ॅटिट्यूडचे लक्षण वाटले.
म्हणून बुमराहला आणि रबाडाला मानलं पाहिले, रसेल समोर असतांना आजिबात आउटसाईड ऑफस्टंपच्या कुबड्या न घेता ते त्यांच्या स्किलनुसार बोलिंग करत राहिले. 'मी माझे स्किल वापरणार तू तुझे वापर, let the best man win' आणि दोघांनीही आपल्या स्किलच्या जोरावर रसेलला जखडून ठेवले.
मास्टर खेळाडू बनण्यासाठी स्किल, पॉझिटिव आटिट्यूड अणि खिलाडू वृती सगळेच हवे.

*शार्प बाऊन्सर नि राऊंद द लेग शॉर्ट बॉल्स हाही एक उपाय आहे.* -
शिवाय,
1) बोलींग क्रिजचा पूर्ण वापर करत प्रत्येक चेंडूची दिशा ( लाईन) बदलणे;
2) तेज गोलंदाजांनी मधेच अॅकशन न बदलतां कटर्स टाकणे किंवा फिरकी गोलंदाजी करणे;
3) फिरकी गोलंदाजांनी न कचरतां चेंडूला ' फ्लाइट ' देणे ;
4) टप्पा बदलत व ' ओव्हर व राऊंड विकेट' बदल करत विकेट टू विकेट ' गोलंदाजी करणे , इ.इ.
हें प्रभावीपणे करण्यासाठी गोलंदाजांना खास सराव करणे, धाडस व कर्णधाराचा पाठिंबा मात्र आवश्यक. कदाचित, आपली गोलंदाजीची लयच बिघडेल या भितीने गोलंदाज असले प्रयोग करायला कचरत असतील पण फलंदाज त्याच भितीवर मात करत टी-20त अप्रचलीत खेळ करतातच ना !

राजस्थान तीनच ओव्हरसीज प्लेयर्स घेऊन खेळताहेत आज. महिपाल लोमरोर ने यंदा डोमेस्टीक मधे तरी चांगली कामगिरी केलीये. आज काय करतो ते बघू.

शेवटी rain played the spoilsport! मॅच चुरशीची झाली आणी शेवट पण थ्रिलिंग होईल असं वाटत होतं. असो. आरसीबी बाहेर पडले आणी राजस्थान सुद्धा बाहेर पडल्यात जमा आहेत. पण कोहली चा सुरूवातीचा अ‍ॅटॅक, गोपाळ ची हॅट-ट्रीक आणी राजस्थाने ने पहिल्या २ ओव्हर्स नंतर केलेली बॉलिंग जबरदस्त होती. ह्या आयपीएल मधे अंपायरिंग अधिक गचाळ आहे की फिल्डींग हा संशोधनाचा विषय आहे.

गोपाळ ची हॅट ट्रिक जबरी. क्रिक इन्फो च्या कॉमेण्टरी मधे त्याच्या ओव्हरच्या आधी कोणीतरी लिहीले की बहुधा आधीच्या गेम मधे त्याने एबी आणि कोहली दोघांनाही आउट केले होते. या ओव्हरमधे तर तिघांना केले.

ह्या आयपीएल मधे अंपायरिंग अधिक गचाळ आहे की फिल्डींग हा संशोधनाचा विषय आहे. >> १०० % सहमत .

चहाल चा तो पहिला चेंडू बाहेरच्या वाईड लाईन पेक्षा बाहेर होता, असा वाईड आमच्या गल्लीच्या अंपायरन दिला असता तर मारामार्या झाल्या असत्या Wink

*.... तर मारामार्या झाल्या असत्या * - इथंही झाल्या असत्या पण इथं लाखांच्या पटींत दंड असतो ना !! Wink

"इथंही झाल्या असत्या पण इथं लाखांच्या पटींत दंड असतो ना !!" - Happy खरंय भाऊ. आणी तरिही लोकं ग्राऊंडवर येऊन अंपायरशी वाद घालतात, एकमेकांना वेडाऊन दाखवतात, तोंडात मारतात. मला तर हे सगळं कोरिओग्राफ्ड वाटतं. असो.

आजची मॅच प्रचंड कंटाळवाणी झाली. आता प्लेऑफ्स ची वाट बघतोय.

तरिही लोकं ग्राऊंडवर येऊन अंपायरशी वाद घालतात > > अरे एकदाच केलं ना धोनीने ? करोडो कमावणार्‍यांना लाखाच्या दंडाने काय फरक पडणार आहे. NFL मधे हेच होते ना ? दंड असूनही लोक हुज्जत घालता, वेडावून दाखवतात वगैरे.

पण तरिही, एकदाच केलं म्हणून ती नियमबाह्य कृती क्षम्य नाहीये. >> काहीच्या काही र काय रे ? "क्षम्य नाहीये.". एकदाच केलय हेच मह्त्वाचे आहे. उदाहरणे नसून ते उदाहरण होतेय. "तोंडात मारतात." हे भज्जीचे आहे तेही एकदाच झालय ना ? वेडावून दाखवणे फक्त IPL मधेच चालते का ? अंपायरशी निर्णयावरून भांडणे नि सामना सोडून देणे (गावस्कर, चॅपेल) , बॉलरला मारायला निघणे (मियांदाद) ही उदाहरणे IPL बाहेरची आहेत. हे सगळे फक्त " मला तर हे सगळं कोरिओग्राफ्ड वाटतं. " ह्याला उद्देशून आहे. भावनेच्या भरात होता अशा गोष्टी हे एव्हढे साधे सरळ कारण चालणार नाहि का ?

मला खरच ह्या सगळ्या गोष्टी कोरिओग्राफ्ड वाटतात. हरभजन, धोनी, कोहली, धवन (वेडावून दाखवणारा) वगैरे अन्यत्र जंटलमन्स गेम खेळणारे, खूप मोठं नाव असलेले खेळाडू आयपीएल मधे जेव्हा tantrums करतात, तेव्हा त्या रिअ‍ॅलिटी शोज मधे भांडणार्या सेलिब्रेटीज (म्युझिक का महामुकाबला मधलं शान आणी शंकर महादेवन चं भांडण) सारखं हे ठरवून केल्यासारखं वाटतं. असो.

*मला तर हे सगळं कोरिओग्राफ्ड वाटतं. * - मलाही वाटतं कीं आयपीएल मधला इंटरेस्ट टिकवून ठेवायला ही केविलवाणी धडपड सुरू झालीय !

*मला तर हे सगळं कोरिओग्राफ्ड वाटतं. * - मलाही वाटतं कीं आयपीएल मधला इंटरेस्ट टिकवून ठेवायला ही केविलवाणी धडपड सुरू झालीय !

>> अती सर्वत्र वर्जयेत ...
आता खरोखर क्रिकेटचा ओव्हरडोस होतोय , मॅच बघायची म्हणून कॉलेज / ऑफिसला दांड्या मारणारी माझी मित्र मंडळी जेव्हा कुणाची मॅच होती , कोणाचे किती पॉईंट्स आहेत , याबाबतही अनभिज्ञ असतात , तेव्हा हे फार जाणवत .

होपफुली याचा वर्ल्ड कप वर परिणाम होऊ नये , कारण त्याही ९३ मॅचेस आहेत Happy

*होपफुली याचा वर्ल्ड कप वर परिणाम होऊ नये* - शक्यता कमी असावी. कारण, 1) विशवचषकाची प्रतिष्ठा , जिद्द आगळीच असते व 2) 50 षटकांच्या सामन्यांत खरं कौशल्य, डांवपेंच याचा कस टी20 च्या तुलनेत कितीतरी अधिक प्रमाणात लागतो.
अर्थात, 'होपफुली' हें आहेच !

धोनी चांगला कॅप्टन आहे नि कोहली बेक्कार कॅप्टन आहे असे काही लोक म्हणाले.
पण मला आश्चर्य वाटते की कोहलीची टीम अगदी खालच्या टोकाला कशी? त्याच्या टीममधे कुणि चांगले खेळाडूच नाहीत का? इतर टीम मधे तरी कुणि सगळेच मास्टर खेळाडू नसतात.
केदार जाधव, तुम्ही स्वतः या आय पी एल मधे खेळताहात ना? तुमचे काय मत? तुम्ही काही यावर प्रकाश टाकू शकाल का?

"अरे मी पोस्ट edit करत होतो रे. वरचे बघ कृपया" - गंमत म्हणजे मी माझी ओरिजिनल पोस्ट लिहीताना ह्या (गावसकर, मियांदाद वगैरे) उदाहरणांचा विचार केला होता. पण त्यात आणी आज घडणार्या घटनांमधे एक मोठा फरक असा आहे की गेल्या काही वर्षांत क्रिकेट चे नियम अधिक कडक झाले आहेत. त्या काळी ह्या गोष्टी चालून गेल्या. अंपायर च्या निर्णयावर नाखुशी दाखवणे हा प्रकार तर सर्रास व्हायचा. पॅड ला बॉल लागल्यावर बॅट ला लागून गेल्याची खूण करणं वगैरे, आजच्या क्रिकेट मधे नियमबाह्य असणार्या गोष्टी त्या काळी चालून गेल्या.

भावनेच्या भरात गोष्टी घडू शकतात. पण हल्ली च्या काटेकोर नियम आणी प्रोफेशनसिझम च्या काळात ह्या गोष्टी आंतरराष्ट्रीय स्तरावर क्वचित घडतात. पण आयपीएल सारख्या स्पर्धेत अंपायर वर टीका करणे (ह्यात अगदी कोहली, धोनी सुद्धा आहेत) वगैरे गोष्टी सहजतेनं केल्या जातात. म्हणून मला असं वाटतं की टीआरपी वाढवण्याचा तो भाग असावा का. मी मॅच फिक्सिंग वगैरे म्हणत नाहीये, पण ह्या क्रिकेटबाह्य गोष्टी केवळ चघळण्यासारखे किस्से तयार करण्यासाठी करतात का अशी मला शंका आहे इतकच.

असो, आज मुंबई वि. हैद्राबाद. मुंबई, कोलकता, पंजाब आणी राजस्थान च्या चाहत्यांनी मुंबई ला पाठिंबा द्यावा.

एक बॉल, ७ रन्स जिंकायला, ६ रन्स टाय व्हायला असताना यु डिलिवर ए गुड लेंग्थ बॉल? अरे तो बॅट्स्मन यॉर्कर वर छक्का मारायच्या मन:स्थितीत असताना त्याला तु हलवा देतोस??

एन्टरटेन्मँट, एन्टरटेन्मँट, एन्टरटेन्मँट!!!

एक बॉल, ७ रन्स जिंकायला, ६ रन्स टाय व्हायला असताना यु डिलिवर ए गुड लेंग्थ बॉल? अरे तो बॅट्स्मन यॉर्कर वर छक्का मारायच्या मन:स्थितीत असताना त्याला तु हलवा देतोस??
एन्टरटेन्मँट, एन्टरटेन्मँट, एन्टरटेन्मँट!!! >>

हेच लिहायला आलो होतो.

८ बॉल २५ , बुमराह २ हाय फुलटॉस काय टाकतो ?

हमको येडा समझो , पर इतना भी नही Happy

Pages