आजपासून मी डाएट करणार ... रोज १ तास चालणार ... नक्क्की म्हणजे नक्क्क्की
आज मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आहे , एक दिवस दाबून खाल्ल तर काय होतय , उद्या कव्हर करू .
आज खूप उशिर झाला उठायला , आज फिरण कॅन्सल .
आज घरी पुरणपोळ्या केल्या होत्या , पाच हाणल्या .
कित्ती हा पाऊस , आज राहू दे फिरायच .
गेले १ महिना वजन कमी करायचा प्रयत्न करतोय , पण १ किलोही कमी झाल नाही , जाऊ दे , ये अपने बसकी बात नही .
हे चित्र अनेकांच्या बाबतीत सारखच असत .
वजन कमी करायच असणार्या सगळ्यानाच इच्छा तर खूप असते , सुरूवातही बर्याचदा केली जाते , पण नंतर नंतर आता जाऊ दे , आपल्याच्यानं नाही होणार हे वर गाडी येते . हे टाळायच असेल तर एक तर मनावर संयम हवा किंवा कुणीतरी चेक ठेवणार हव . ते घरातील कुणी असेल तर सर्वोत्तम , पण आपल्याच माणसाला त्रास (?) कसा द्यायचा (उदा . त्याला आवडते पुरणपोळी असू दे , काल फार दमला होता तो आज राहू दे) म्हणून ते माणूस तुम्हाला सारख माग लागत नाही . आणि मग काय ?
त्यासाठी हा धागा . ज्याना ज्याना वजन कमी करायचय (हेल्दी वे , नो क्रॅश डाएट) त्यांचा इथे ग्रुप बनवूया .
प्रत्येकाने काय आज चांगल केल , काय चुकल याची रोज लिस्ट देऊया . चांगल करणार्याच अभिनंदन करू अन एखादा सारख चुकायला लागला त्याचे कान पकडूया , काही शंका असतील तर एकमेकाना विचारूया .
क्या बोलते भाई (और बहन ) लोग ?
लोकहो ,
आता आपण या गुणपद्धतीत बर्यापैकी सेट झालो आहोत . तर आता कंप्लिट सेट घेऊया
खाली आणखी काही पॉईंट अॅड केले आहेत , जे तसे सोपे आहेत पण ते गरजेचेही आहेत
आता थोडे जास्त सिरियसही होऊया
आणि आजपासून परत एकदा गुण मोजायला सुरू करू. फक्त यावेळी एक लक्षात ठेवा, इथे नाही लिहिले तरी तुमचे रोजचे गुण स्वतः लिहून ठेवा . एखाद दिवस काही नाही केल तर ०/१० . हे खूप महत्वाच आहे.
दर आठवड्याला ज्यांचे ७५% पेक्षा कमी असतील त्यांचे कान पकडण्यात येतील . शिक्षा काय ते नंतर सगळे मिळून ठरवू.
कोण किती चांगल करतय आणि कुणाचे कान उपटायचे आहेत हे ठरवण्यासाठी खालील पद्धत वापरू
रोज तुम्ही खालील बाबी कशा पाळता ते पाहा .
१ . रोजचा व्यायाम न चुकवणे (व्यायामाचा प्रकार अन वेळ प्रत्येकाने आपापल्या सोयीने ठेवा ) जे ठरवेल त्यापेक्षा थोडा कमी जास्त किंवा वेगळा झाला तरी चालेल . पण चुकवायचा नाही
२. रोजच्या आहारात २ फळे / फळभाज्या अथवा २ वेळा सॅलेड असणे (फळात केळ्/चिक्कू कमीतकमी ठेवा)
३. रोजच्या आहारात २ वाट्या मोड , डाळी , उसळी , सोया , कमी तेलाच पिठल/ झुणका (२ अंड्यांचा पांढरा भाग , चिकन किंवा फिश रोस्टेड , शिजवलेले किंवा फार कमी तेल , पनीर ) असणे
४. बेकरी प्रॉडक्ट्स न खाणे (एखादा ब्राऊन ब्रेड अन ४ मारी इज ओके) केक्स , चॉकलेट्स , शीतपेये ,मैद्याचे पदार्थ नो नो
५. बाहेरचे खाणे (ऑफिसामधले जेवण , नाश्ता वगळता) मोस्टली हॉटेलिंग टाळणे
६. रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे अन जेवण व झोप यात किमान १:३० तास अंतर ठेवणे
७ चहा , कॉफी किंवा इतर पदार्थातून डायरेक्ट साखरेचा इनटेक ३ छोट्या चमच्यापेक्षा जास्त नसणे
जर व्यायाम नाही चुकवला तर ४ पैकी ४ गुण अन इतर सर्व क्रमांक पाळले तर प्रत्येकी १ पैकी १ गुण
त्यामुळे आता रोजचे गुण १०.
म्हणजे जर तुम्ही आज व्यायाम केला अन इतर क्रमांक नाही पाळला तर तुमचे ४/१० गुण . हे रोज लिहित जा . जर २-३ दिवसानी आला तर त्या दिवसाचे मिळून १२/२० किंवा १५/३० असे लिहा .
शक्य असल्यास आधीच्या गुणांमधे अॅड करून लिहा .
मी थोड्या अंतराने ते हेडर मधे अॅड करत जाईन .
काही शंका असतील तर विचारा . याचा फायदा म्हणजे तुम्ही किती कन्सिस्टंट आहात ते कळेल , अन इतरांचे पाहून हुरूप ही येईल
आणखी एक , ही काही स्पर्धा नाही , तेव्हा प्रामाणिकपणे आपले गुण लिहा .
31 August, 2014 - 12:59
१. केदार जाधव १८२/२२०
२ सामान्य वाचक १४९/२२०
३ अदिति १३८/१८०
४ अनिरूध्द १२२/१६०
५ साती १०३/१७०
६ सीमांतिनी ५४/७०
७ मनीशा ९४/१४०
८ स्वाती२ ७०/८०
९ वर्षू नील १२१/१५०
१० देवकी १६५/२२०
११ smitaklshripad ८६/१८०
१२ पाखरू १४३/२२०
१३ खारूताई १५३/१९०
१४ दक्षिणा १०/१०
१५ पौर्णिमा १०/१०
१६ चनस ९६/१५०
१४ . चिनूक्स
१५. भानूप्रिया
१६. जाई
१७. प्रितीभुषण
१८. रीया
१९. पौर्णिमा
२० . स्मितू
२१ आनंदी
२२ पेरू
२३ डेलिया
२४ आशूडी
२५ वैदेही
२६ मंजू
२७ साधना
२८ . गीतांजली
२९ मृणाल १
३० मी_आर्या
३१ मना
३२ इश्श
३३ दक्षिणा
३४ dreamgirl
३५ दीप्स
३६ नि़क्षिपा
३७ मउ
३८ नंदिनी
३९ अमित एम
४० बीएस
४१ राजू७६
४२ वेल
४४ संदिप एस
४५ राज्या
४६ snoo
४७ शैलु
४८ अखी
४९ सहेली
५० सोनचाफा
५१ आभा
५२ धनश्री
५३ हर्मायनी
५४ मुग्धानंद
५५ आशिका
५६ सायली
५७ mrudul
५८ रमा
५९ आयडू
६० मी_चिऊ
६१ नानबा
६२ मंजू
६३ चनस
वाव अतरंगी!
वाव अतरंगी!
काय मस्त रंगीबेरंगी सॅलड्स आहेत. बघूनच खावीशी वाटतायत.
मला नुसते सॅलॅड खायचा वर काही जणांनी म्हंटल्याप्रमाणे कंटाळा येतो.
आणि विकेंड वगैरे सोशल गोष्टींमध्ये माझे सगळे दिवस काटेकोर डाएट पण होत नाही.
पण तरीही माझे वजन पुन्हा वाढलेले नाही.
कारण मी ज्या दिवशी काही सोशल एंगेजमेंट वगैरे नसते तेव्हा १ पोळी विभागून दोन जेवणांमध्ये घेते. पोळी सोडल्यास ताटात असेच सॅलॅड, १ वाटी डाळ/एग/चिकन, १ वाटी भाजी असे असते. ज्या दिवशी पोळीचा कंटाळा येतो त्या दिवशी मी १ वाटी भात २ जेवणात विभागून खाते. आणि संध्याकाळी ४ च्या पुढे आयएफ करते.
दिवसाला कार्ब्स १ वाटीच्या आत खाल्ले आणि बाकीचे घटक व्यवस्थित खाल्ले तर वजन आटोक्यात राहते.
आणि आठवड्यातून ४ - ५ दिवस असा आहार घेतला की विकेंडला थोडा पाय घसरला तरी फारसा फरक पडत नाही.
२ वर्ष सतत वजन करायचे आणि व्यायाम करायचे त्यातून शिकलेली ही महत्वाची शिकवण आहे.
वजनावरचे लक्ष उडू द्यायचे नाही. पण त्यासाठी सतत झुरायचे सुद्धा नाही.
सॅलड्स मस्त.
सॅलड्स मस्त.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कार्ब्ज हवेतच असं वाटणार्यांनी नॉन-ग्लूटेन्स कार्ब्जकडे वळा. मैदा नकोच, पण गहूही कमी करा. पोळीऐवजी भाकरी खा - चांगलाच फरक जाणवतो.
थालीपिठं/भाकरी करायला वेळ नसेल तेव्हा तांदुळाची/ज्वारीची उकड हा मस्त पर्याय आहे. झटपट, चविष्ट आणि हेल्दी.
थोपुवर एक ग्रुप आहे, तिथून
थोपुवर एक ग्रुप आहे, तिथून डायेट घेते आहे. सध्या हाय प्रोटीन्स लो कार्बस् वर आहे. डाळ, तांदुळ, चिकन ब्रेस्ट, बदाम, दही, हिरवी पालेभाजी, तूप हे सगळं वजन काट्यावर मोजून घेते. दिवसाला ठराविक प्रमाणात अंडी खावी लागतात, बलकासहीत. तीन महिन्यात आठ किलो वजन कमी झाले आहे. मी व्यायाम अजिबात करत नाही नाहीतर अजून कमी झाले असते. ग्रुपचा फंडा वेगळा आहे. त्यांच्यामते वजन हा फक्त एक आकडा आहे, डायटचं मुख्य काम फॅट कमी करणे हे आहे आणि मला माझे सगळेच कपडे बरेच ढगळ होत आहेत. माझी घड्याळं आणि अंगठ्याही सैल झाल्या आहेत. डायेट देणारे त्या विषयातले आवश्यक ते शिक्क्षण घेतलेले आहेत. दर आठवड्याला अपडेट असतो आणि डायेटमध्ये बदल. कोणाचेही प्रमोशन करणे हा हेतू नाही, फक्त अनुभव सांगत आहे.
कुठला ग्रुप?
कुठला ग्रुप?
मी सध्या सॅलड्वर रात्री भागवत आहे.. ओके वाटत आहे.. पण रोजची इनग्रेडिएंड्स ची स्वतः साठी वेगळी तयारी
करावी लागते.. कारण बाकी लोक नॉर्मल खात आहेत घरात.
थोपु ग्रुप च नाव सांगा मदत होइल..
आनंदी,
आनंदी,
असे करू नका असे सुचवेन. कारण मग आपण जे फक्त चवीला चांगले आहे तेच सॅलड म्हणून खात राहतो सॅलड मधून सगळ्या भाज्या खाल्ल्या जात नाहीत. एका ठराविक काळानंतर घरचा स्वयंपाक वेगळा आणि सलाडची वेगळी तयारी यात खूप वेळ जायला लागून सलाड बंद होतात.
मी यावर शोधलेला पर्याय म्हणजे घरात जी डाळ, भाजी आणि कोशिंबीर बनविणार आहेत ती कच्ची/ उकडलेली आपल्या साठी बाजूला काढायची. त्याच्यातच एक दोन ingredients वाढवून सॅलड बनवायचे.
Ok barobar aahe
Ok barobar aahe
@आनंदी- SQUATS नावाचा ग्रुप
@आनंदी- SQUATS नावाचा ग्रुप आहे. पहिले एक दोन महिने फक्त बघा तिथे काय चालते ते. त्यांचा डाएट रेसीपीचाही ग्रुप आहे. तुमचा डाएट चार्ट तुम्ही स्वत: बनवू शकता त्यांचे टूल्स वापरून. तिकडे पोस्ट केल्यावर ते तपासून देतात आणि सुधारणापण सांगतात.
धन्यवाद
धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अतरंगी मस्त फोटो.
अतरंगी मस्त फोटो.
प्रोटिन पॉवडर बद्दल काय मत
प्रोटिन पॉवडर बद्दल काय मत आहे सगळ्यांचे.. मला पि सि ओ एस चा त्रास आहे. वजन पटकन उतरत नाही..
थायरॉईड सारख आणि काही विशेश खाल्ल नाही तरी वाढत राहत.
डायबेटिक लोकांसाठीचा डाएट मला सुट करतो. प्रोटिन पॉवडर विषयी थोडा संभ्रम आहे.
व्हे हा प्रसिद्ध ब्रँड आहेच .. पण हर्बल लाईफ वगैरे पण आहेच..
काय फायदे तोटे..?
सवय लागते.. सोडल्यावर वजन झटपट वाढते ई. ऐकुन आहे. नक्की माहित नाही.
कोणाचा अनुभव असेल तर शेअर करा..
सुरुवातीचे थोडे दिवस १-२ महिना घ्यायचा विचार आहे..
प्रोटिन पॉवडर विषयी थोडा
प्रोटिन पॉवडर विषयी थोडा संभ्रम आहे.>>>>>> माझी शेजारीण न्यूट्रलाईट घेते.२ वर्षे झाले असतील.बारीक होतीच,पण आता अजून बारीक झाली आहे.मस्त वाटते.तिच्याकडे पाहून मलाही घ्यावेसे वाटल्यामुळे तिला विचारले की याने केस गळतात का,तर ती म्हणाली माझे गळले नाहीत.पण बर्याच जणींचे गळतात.त्यावर व्हिटॅमिन घ्यायला लागते.बारीक होण्यासाठी फक्त प्रो.पा घेऊन चालत नाही,त्याबरोबर डायट आणि व्यायाम हवा.
दुसरीही शेजारीण प्रो.पा घेऊन बारीक झाली आहे.अर्थात वरच्या गोष्टींसकट.
शेअर कराव वाटलं म्हणुन ही
शेअर कराव वाटलं म्हणुन ही पोस्ट..
२ आठवडे झाले जिम जॉइन करुन आज..
फ्रेश वाटत आहे..वेट्चा जास्त विचार करत नाहिये..
किती झालं ते बघितल ही नाहिये..
डाएट पाळत आहे..
सकाळी जिम आधी
१) ग्रीन टी.. अॅपल..
नंतर
२) थोडे स्प्राउट
३) ओट्स उपमा.. (कांदा टोमॅटो ब्रोकोली)
४) फ्रुट्स
५) १.५ भाकरी +भाजी..
६) बटर मिल्क..
७) परत फळं
८) पालक सुप (कांदा लसुण नो कॉर्न फ्लोअर )आणि डाळी मिक्स भिज्वुन बारीक करुन
डोसा-१
हे पाळत आहे..
डाएटिशिअन ला भेटायचा प्लॅन आहे..
जॉब मुळे नो टाईम लिटरली..
मुख्य म्हण्जे जिम करु शकेन याचा कॉन्फिडन्स आला आहे..
प्रोटिन पॉवडर्चा मी पण विचार करुन पाहिला.. व्हेज अस्ल्यामुळे..
Namskaar heart....mala vajan
Namskaar heart....mala vajan kami karaych ahe..madat karal ka?
नमस्कार... मी काही
नमस्कार... मी काही महिन्यांपासून वजन कमी करण्याच्या प्रयत्न करतेय. आधी काही महिने वजन आणि इंचेस खूप पटापट कमी झाले पण आता ४ महिन्यात वजन जराही कमी झालेले नाही:(
बाजरी ची भाकरी चालते का?
बाजरी ची भाकरी चालते का?
बाजरी कशी आहे वजन कमी करायला?
(No subject)
नमस्कार , बरेच दिवस झाले , हा
नमस्कार , बरेच दिवस झाले , हा धागा वर काढायच मनात होत , पण माझच वजन ८२ ८३ मधे घुटमळत होत![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
गेल्या महिन्यात मात्र परत जोर केला , अन आज फायनली परत ७९.६ दिसले .
परत एकदा मी हीच मेथड वापरली अन तसेच रिजल्ट मिळाले , आता परत हे सुरूच ठेवायच आहे , कुणी आहे का माझ्याबरोबर यायला तयार ?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
केदार, मस्त!
केदार, मस्त!
धन्यवाद , देवकी
धन्यवाद , देवकी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझा प्रतिसाद कुठे गेला?
माझा प्रतिसाद कुठे गेला?
मी आहे. गेल्या वर्शी ९८ वरुन
मी आहे. गेल्या वर्शी ९८ वरुन ७५-७६ पर्येन्त कमी केलय वजन. व्यायाम अनि योग्य आहार ही पद्धत वापरुन. अजुन १० किलो कमी करायचय आता.
Dakshinaa..
Dakshinaa..
Tumhala number pathvlay...
Please add me in WhatsApp group.
रोज सकाळी टेनीस खेळून वजन कमी
रोज सकाळी टेनीस खेळून वजन कमी केलं.
मला जरा मदत हवी आहे.
मला जरा मदत हवी आहे.
माझे वजन ७६ किलो आहे, उंची १६४ सेमी. गेली अनेक वर्षे मी विविध प्रकारे वजन कमी करण्याचा प्रयत्न केला, पण १-२ किलो पलिकडे वजन कमी होत नाही. जेवणावर, खाण्यावर ताबा आहे. व्यायाम खूप करणे जमत नाही, आठवड्यातून ४-५ वेळा सकाळी सूर्यनमस्कार किंवा वेगळे व्यायाम. रोजच्या ७-८००० स्टेप्स चालणे होते, जे बहुदा कमी आहे. ऑफिसात बसणे खूप होते असे वाटले की उठून चालून येते.
तर कृपया मार्गदर्शन करा.
सकाळी ६ वाजता- १ कप गरम पाणी, चहा अथवा कॉफी १ कप (मग मुलांची तयारी, जेवण बनवणे इ ह्यातून वेळ काढून १५ मिनिटे व्यायाम होतो)
सकाळी ८ वाजता- २ ब्रेड स्लाईस (व्हाईट अथवा ब्राऊन, जो असेल तो) टोमॅटो, चीज, काकडी
किंवा दूध पोहे किंवा सिरीयल्स आणि दूध, एखादे फळ.
दुपारी ११.३०- ऑफिसात जेवण - सॅलड्स (सॅलड बार आहे), मेन डिश- व्हेज / नॉन व्हेज ( पोर्शन गेले ४ वर्षे कमी केलाय), क्लिअर सूप्स असतील तरच घेते. ऑफिसातले डेझर्टस हे पुडिंग्स इ. असतात, खूप गोड नसतात, अगदीच हवेसे वाटले तर ३ चमचे होतील इतकाच पोर्शन असतो, तो घेते.
दुपारी ३ वाजता १ कप कॉफी, बिस्किट्स, कधी ड्राय फ्रूट्स- अंजीर, प्लम्स, बदाम.
संध्याकाळी ५ वाजता- चिवडा किंवा घावन, भेळ, मुगाचे सॅलड इ.
रात्री ७.३० ला जेवण- वर्षानुवर्षे १.५ पोळी भाजी, आमटी एक वाटी घेते आहे. भात जेवतेच असे नाही, भाताबद्दल प्रेम नाही. एखादी कोशिंबीर खाते.
पिझ्झा इ. खाणे अगदीच कमी आहे, खाल्लाच तर महिन्यातून एखादवेळा. बाहेर ईंडियन रेस्टॉरंटमध्ये खाणे ३-४ महिन्यातून एकदाच.
रविवारी चालायला जायला जमते ५ किमी तरी चालते. तरी वजनाचा काटा हलत नाही.
इंटरमिटंट फास्टिंग करून बघा.
इंटरमिटंट फास्टिंग करून बघा. मायबोलीवर अनेक धागे आहेत त्याबद्दल.
हॅलो फ्रेंड्स. नुकत्याच
हॅलो फ्रेंड्स. नुकत्याच केलेल्या शारिरीक चाचणी मधे असे कळलेय की वजन कमी करण्याची गरज आहे. १) साधारण ५.६ उंची असलेल्या भारतिय स्त्री चे वजन किती असायला हवेत?
सिंगापोर च्या स्त्रियांच्या तुलनेत भारतिय स्त्री चे वजन जास्त असावे असा अंदाज आहे म्हणुन विचारले.
आयडियल वजन त्यांच्या तक्त्यात ६१ आहे. माझे ६७ आहे.
२) आठवड्यातून १ दा डिनर सोडले तर वजन आटोक्यात येऊ शकेल का? (आठवड्यातून ५ दिवस व्यायाम निदान अर्धा तास ईच टाईम, घरगुती साधे जेवण, तळलेले पदार्थ वर्ज्य / अत्यंत कमी + शुगर कोन्ट्रोल मधे आहे)
३) भात रोज १ वेळा तरी खाणे होते, ते आठवडा तून ४ दाच असे करता उपयोग होईल का?
आयडियल वेट चार्ट पेक्षा
आयडियल वेट चार्ट पेक्षा बहुतेक बॉडी कॉम्प स्केल वर फॅट परसेन्ट, व्हिसेरल फॅट, बोन मास याचे प्रमाण बघून जास्त चांगले ठरेल असे वाटते.
येस अनू. ते आकडे आहेतच.
येस अनू. ते आकडे आहेतच. ओव्हरऑल ५-७ किलो वजन कमी करण्या कडे कल आहे सद्ध्या.
ह्या असल्या चुकीच्या माहिती
ह्या असल्या चुकीच्या माहिती मुळे अनेक जीवाला मुकले आहेत.
श्रीदेवी त्याचे खास उदाहरण मीठ खायचे सोडून दिले होते.
गेला जीव
तुमचे वजन किती आहे ह्या
तुमचे वजन किती आहे ह्या पेक्षा.
तुमच्या शरीराची लवचिकता किती आहे.
तुम्ही किती वेगाने चालू शकतं.
किती वेगाने पळू शकता.
तुमचे स्नायू किती मजबूत आहेत.
तुमची पचन संस्था किती सक्षम आहे..
मधुमेह तुम्हाला नाही ना?
नजर कशी आहे ऐकण्याची क्षमता किती आहे.
झोप नीट लागते ना.
हे सर्व घटक तुमचे वजन किती आहे ह्या पेक्षा किती पटी नी जास्त महत्वाचे आहेत
Pages