आयपीएल १२ - २०१९

Submitted by भास्कराचार्य on 20 March, 2019 - 09:11

आयपीएल - २०१९ ह्या आठवड्याच्या शेवटी सुरू होते आहे. आयपीएलचा तडका बसला, की लगोलग येणार्‍या विश्वचषकाची चव अजूनच लज्जतदार होणार आहे! कोण जिंकणार, कोण चांगलं खेळणार, विश्वचषकाची संघनिवड आयपीएलमधील कामगिरीवर ठरणार का - एक ना दोन! निवडणुका असतानाही ह्यावेळी आयपीएल भारतातच असणार आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात हवा चांगलीच गरम असणार आहे. स्पर्धा सुरू होईल तशी चर्चा जोमाने होईलच. वॉर्नर-स्मिथ जोडगोळी पुन्हा क्रिकेटमध्ये परतली आहे. सॅम कुरानसारखा खेळाडू ह्या वेळेस आहे. कोहलीसारखा खंदा फलंदाज व कप्तान ह्यावेळी आयपीएल आणि विश्वचषक दोन्ही मान पटकावण्यासाठी सज्ज आहे. जयदेव उनाडकत ह्याही वेळेस भरपूर किंमत घेऊन मैदानात उतरलाय. ह्याशिवाय रशिद चहल, चहल, कुलदीप यादव ह्यांच्या फिरकीची मजा लुटता येणार आहे. एकंदरीत भरपूर मजा येणार आहे!

पहिला सामना शनिवार २३ मार्च, चेन्नई विरुद्ध बेंगालुरू असा रंगणार आहे. आपल्या संघाचं समर्थन करण्यासाठी, कौतुक करण्यासाठी, वादविवादाच्या फैरींची मजा लुटण्यासाठी, अचूक आणि मार्मिक व्यंगचित्रांनी घेतलेल्या 'फिरकी'साठी इथे आता धमाल करूया!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुलदीप आणि चहाल शिवाय अजून एक स्पिनर घ्यायचाच असेल तर कृणाल पांड्याला घावे. डिकेला आणि रायडूला घरी बसवावे. पृथ्वी किंवा शुभनम ची निवड होणार काय?.

काल हैदराबाद काहिच्या काही हरले. यंग बॉईज डिसीचे फॉर्मात. Happy

*.......जरा अती प्रमाणात होतय ह्या एडिशन मधे.* -
100% सहमत. मला तर हे friendly, exhibition सामने असल्या सारखंच वाटतं .

जिंकतेय जिंकतेय असं वाटता वाटता अचानक टीम्स ने गियर बदलत किंवा कोलॅप्स होत मॅच हारणं, रन- अ - बॉल सिच्युएशन मधे अनावश्यक शॉट्स मारून बॅट्समन ने आऊट होणं, हे जरा अती प्रमाणात होतय ह्या एडिशन मधे.

>> अगदी मनातल बोलला . अन खर सांगू , जर ताहिरच्या ओवर खेळून काढल्या तर बाकी csk attack ला वाटेल तस झोडपता येत हे माहित असून जर लिन अन रसेल त्याच्या ओवरला चुकून विकेट टाकत असतील तर मग त्यांचा अन सगळ्या केकेआर च्या थिंक टँकच्या बुद्धीला सलाम ..

पंत पडले , कार्तिक चढले !
पंतसाठी हें blessings in disguise ठरो ! वेळीच मिळालेला हा धक्का त्याच्या उज्वल भविष्याचा पाया ठरो !
विजय शंकरला तया शेवटच्या षटकातलया निर्णायक दोन विकेटस खूपच लाभदायी ठरल्या !!
भारतीय संघाला शुभेच्छा!

"हे माहित असून जर लिन अन रसेल त्याच्या ओवरला चुकून विकेट टाकत असतील तर मग त्यांचा अन सगळ्या केकेआर च्या थिंक टँकच्या बुद्धीला सलाम" - खरं आहे. परवा मुंबई विरूद्ध राजस्थान सहज जिंकत असताना उगाचच मॅच 'थरारक' झाली. स्मिथ आणी सॅमसन च्या विकेट्स बुमराह च्या जेन्युइनली चांगल्या बॉल ला पडल्या. पण त्रिपाठी आणी लिविंग्स्टन चे शॉट्स हॉरिबल होते. गल्ली क्रिकेट मधे सुद्धा कुणी अशा विकेट्स फेकणार नाही - ते सुद्धा एक एक रन काढून मॅच जिंकता येण्यासारखे असताना. त्रिपाठी आणी लिविंग्स्टन, दोघंही आपआपल्या डोमेस्टीक क्रिकेट मधे अनुभवी क्रिकेटपटू आहेत. कालचा हैद्राबादचा कोलॅप्स सुद्धा अनाकलनीय होता. असो.

वर्ल्ड-कपची टीम बरीचशी अपेक्षित आहे. रायडू ने त्याची संधी स्वतःच्या हातानं घालवली. पंत च्या पुढे कार्थिक ची निवड अनुभव ह्या निकषावर झाली, हे सुद्धा योग्यच आहे. इतक्या मोठ्या स्पर्धेत अनुभवाचं महत्व मोठं आहे. २००३ च्या फायनल ला ज्या झहीर खान च्या अननुभवामुळे फायनला हातातून निसटायला सुरूवात झाली होती, त्याच झहीरखान ने २०११ मधे अनुभवाच्या जीवावर सामने फिरवले / जिंकवले होते. मिडल ऑर्डर अजूनही वीक वाटतेय. आयपीएल मधला धोनी आणी बाहेरचा धोनी वेगळा असतो. त्यामुळे धोनी, जाधव, कार्थिक / शंकर अशी मिडल ऑर्डर बॅक टू बॅक मॅचेस मधे किती चिकाटीनं चांगला परफॉर्मन्स देऊ शकतील ह्यावर भारतीय संघाची वाटचाल अवलंबून आहे. ह्या टीम ला शुभेच्छा!

माझी starting playing 11:
रोहित
धवन
कोहली
धोनी
कार्तिक
केदार
हार्दिक
जडेजा
भुवी
कुलदीप
बुमराह

८/9 नंबर पर्यंत बॅटींग, ३ सीमर्स, ३ स्पिनर्स
All bases covered at least on paper

विश्वचषक संघ निवडणार्‍या सदस्यांची ' लायकी '

भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद असून देवांग गांधी, शरणदीप सिंह, जतिन परांजपे आणि गगन खोडा हे या समितीचे सदस्य आहेत. पण आश्चर्याची बाब म्हणजे भारतीय संघाची निवड करणारे हे सदस्य फारसे क्रिकेट खेळलेले नाही. या सदस्यांनी मिळून केवळ ३१ एकदिवसीय सामने खेळले आहेत.

एमएसके प्रसाद – ४३ वर्षीय प्रसाद हे यष्टीरक्षक आणि फलंदाज म्हणून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले. यात त्यांनी सहा शतकं ठोकली. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रसाद यांनी एकूण ६ कसोटी आणि १७ एकदिवसीय सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांच्या केवळ १३१ धावा असून ६३ ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या आहे.

देवांग गांधी – देवांग गांधी हे ४७ वर्षांचे आहेत. त्यांनी एकूण ४ कसोटी आणि ३ एकदिवसीय सामने खेळले आहेत. ३ सामन्यात देवांग यांनी 1केवळ ४९ धावा केल्या आहेत.
शरणदीप सिंह – शरणदीप सिंह यांना एकूण ३ कसोटी आणि ५ एकदिवसीय सामन्यांचा अनुभव आहे. शरणदीप यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये केवळ ४७ धावा केल्या आहेत.

"विश्वचषक संघ निवडणार्‍या सदस्यांची ' लायकी '" - हे लोकसत्ता त वाचलं. पण उगाच कळ काढायचा प्रकार आहे. ह्या लॉजिकप्रमाणे तेंडुलकर, द्रविड, गांगुली वगैरे लोकांचीच निवड-समिती बनवावी लागेल.

काय विनोदी argument आहे हे. बर ह्या समिती ने निवडलेल्या संघातल्या खेळाडूंनी एकूण ३१ पेक्षा कमी एक दिवसीय सामने खेळले असते तर justifiable झाले असते का ? Happy उगाच कळ काढायचा प्रकार आहे हे पटले.

मुंबई जिंकले..... हार्दिक पांड्याने कडक ओढली मॅच.... नेगीला काय दिली यार १९ वी ओव्हर!

शंकर हा माझ्या मते (अजुन तरी) हार्दिक पांड्याचा बॅकअप आहे.... दोघे एका वेळी संघात नसतील बहुतेक!
भुवी मला all time आवडतो त्यामुळे Bhuvi over shami in my starting 11
जडेजाला त्याच्या क्विकर डिलिव्हरीज, बॅटींग आणि फील्डिंगमुळे संघात घ्यावे असे मला वाटते.... कुलदीप आणि चहल ला आलटून पालटून वापरता येईल!

"भुवी मला all time आवडतो त्यामुळे Bhuvi over shami in my starting 11" - भुवनेश मला सुद्धा आवडतो. पण सद्ध्याच्या फॉर्म चा विचार करता, शामी ला प्राधान्य मिळेल असं वाटतं. इंग्लंड मधे समर च्या सुरूवातीला जर थोडा जरी स्विंग मिळाला, तर बुमराह, शामी च्या बरोबरीनं, पंड्या (नॉट मच ऑफ अ स्विंग बॉलर), आणी शंकर चा उपयोग होऊ शकेल. अशा वेळी फिंगर स्पिनर म्हणून जडेजा पेक्षा २ रिस्ट-स्पिनर्स जास्त प्रभावी ठरू शकतील असं वाटतं. अर्थात हे प्रतिस्पर्धी टीम, ग्राऊंड, हवामान, फिटनेस अशा अनेक प्रकारांवर अवलंबून आहे.

बंगलोर ची वीक बॉलिंग त्यांना परत एकदा डुबवणार आहे. उमेश यादव लीड बॉलर असणार्या टीम ला जिंकण्यासाठी नेहमीच २००+ स्कोअर ची तयारी ठेवायला हवी.

खेळाडू म्हणून असलेली ' लायकी ' व प्रशिक्षक, निवड समिती सदस्य, व्यवस्थापक ,एवढंच काय पण कर्णधार म्हणूनही असलेली ' लायकी ' , या दोन भिन्न गोष्टी आहेत व त्यात गल्लत न करणंच बरं. शिवाय, समजा, सचिन, सौरभ, द्रविड यांची निवडसमिती असती, तर अशी काय वेगळी विश्वविजेती टीम उपलब्ध खेळाडूंतून ते निवडणार होते !!

टीम निवडण्यासाठी खेळ खेळायलाच पाहिजे असा निकष असता तर मग त्यावर बोलण्यासाठी पण व्यवस्थित खेळायचा अनुभव पाहिजे असा निकष लावायला पहिजे इथे...

टीम निवडण्यासाठी खेळ खेळायलाच पाहिजे असा निकष असता तर मग त्यावर बोलण्यासाठी पण व्यवस्थित खेळायचा अनुभव पाहिजे असा निकष लावायला पहिजे इथे...>> अहो हिमेशभाई आम्ही काय पण बोललो/लिहिले काय फरक पडतो, पण निस चे तसे नाही. चुकिच्या संघ निवडीने गेल्या वर्षी दोन सिरीज गेल्या.

माझ्या मते आहे त्या परिस्थितीत बरी टीम निवडली आहे. धोनी जखमी झाला तर कर्तिक हवा हे लॉजिक पटण्यासारखे आहे.
गेल्या वर्षी एंग्लंड मधे जडेजाचा फ्लॉप शो होता. त्याची कशाला निवड केली कोण जाणे. कृणाल जास्त बरा होता.

भारतीय संघाला मनःपूर्वक शुभेच्छा. Happy

बुमराह, शामी च्या बरोबरीनं, पंड्या (नॉट मच ऑफ अ स्विंग बॉलर), आणी शंकर चा उपयोग होऊ शकेल. >> in general शमी जेंव्हा समोरच्या बाजूने टाईट बॉलिंग होत असते तेंव्हा भयंकर effective ठरतो. काहिसे कुलदीप सारखेच. नीत काँबो केले तर अतिशय potent बॉलिंग ठरेल आपली.

राहाणे खाली येणार असेल तर एक जागा गेल्यातच जमा आहे त्यामूळे फार काही फरक पडेल असे वाटत नाही. बिन्नी एखादी मॅच अशी खेळतोच.

राजस्थान कडे फायरपॉवरच नाहीये. उगाच आज स्टोक्स खेळेल, उद्या टर्नर खेळेल अशा आशेवर रहातात आणी बॅटींग मधला ७०-८०% वेळ रहाणे, सॅमसन, स्मिथ वगैरे एकाच प्रकारच्या बॅट्समन वर घालवतात. वूडन स्पूनच्या शर्यतीत बंगळुरू बहुदा त्यांना मागे टाकेल. रहाणेने टेस्ट वर लक्ष केंद्रीत करावं आणी तिथे भक्कम स्थान निर्माण करावं.

केदार जाधव हा त्याच्या गोलंदाजीच्या अनोख्या शैलीमुळे, क्रीजचा पूर्ण वापर करत चेंडूचया 'लाईन 'मधे सतत बदल करत असल्याने ह्या विश्वचषकात surprise element म्हणून चमकणयाची शक्यता आहे. थोडा धोका पत्करून, कल्पकतेने त्याचा वापर केलयास तो प्रभावी ठरूं शकतो.

Pages

Back to top