गेले दोन-तीन दिवस मी खूपच अस्वस्थ होते. त्याला कारणही तसेच होते - माझ्या मधाळ, एकसुरी संसारात अचानक काहितरी कमी आहे असे मला जाणवले. माझे डोळे खाडकन उघडले, त्या उघड्या डोळ्यांनी काहितरी वाचले आणि मला माझ्या संसारातील उणीव स्पष्ट दिसायला लागली. अचानकच जीवनात कसलीतरी पोकळी का काय म्हणतात ती जाणवायला लागली. हेच ते.... हेच कमी होते माझ्या घरात - विबासं! ही आपली खुपच बेसिक अशी नैसर्गिक आणि मानसिक गरज आहे असं कळल्यामुळे तर आजवर आपली फारच भावनिक कुचंबणा झाल्याचा साक्षात्कार झाला. मी काही वर्षांपूर्वी जशी होते तशीच राहिलेय या विचाराने भलतीच डिप्रेस्ड झाले आणि मी ठरवले ... आजवर जे जगले ते जगले ... यापुढे मात्र ही उणीव भरून काढायचीच. हाकानाका.
एकदा मनावर घेतल्यावर 'प्रोजेक्ट विबासं' च्या बारीकसारील डिटेल्स भरणं चालू झालं. आता कशी बरं पावलं टाकावीत पुढे? हं .... आधीच एक नंबर मनाशी ठरवून ठेवलेला बरा. सुरवातीला किमान दोन डझन विबासंचं टारगेट ठेवलं. तेवढे झेपतील आपल्याला. आपण १२ करू आणि नवर्याच्या गळ्यात पण १२ मारूयात. सुखदु:ख सारखी वाटायची तर विबासं पण वाटून घेतलेले बरे असा प्रॅक्टीकल विचार केला.
संध्याकाळी नवरा घरी आल्यावर त्याला चांगला जेवायखायला घालून हा विषय काढायचा असं ठरवलं. त्याप्रमाणे तो आला, जेवला आणि मग नेहमीप्रमाणे तंगड्या पसरून टिव्ही बघत बसला. मी आपली आजूबाजूलाच घुटमळत राहिले. जाहिराती सुरू होताक्षणी मी विषयाला वाचा फोडलीच. "अरे, जरा एक प्रोजेक्ट करायचाय आपल्या दोघांना मिळून." नवराच तो. तो काय नविन काम हाती घेतोय! "हे बघ, तु जे काही ठरवलंय ते तुझं तुच कर हा. मला मधेच घालू नकोस. अजून पाहिजे तर बायका ठेव."
आता हे काय????? हा तर सगळ्यालाच एक वेगळा अँगल देत होता. पण मी ठरवलं ते काय आपल्याला जमायचं नाही .... आपण आपलं 'प्लेन व्हॅनिला विबासं" वरच फोकस ठेवायचा. झोपायला जाण्याआधी बरीच नावं डोळ्यापुढे आली. मग त्यातली कुठली कुठली नावं कोणत्याही फोरमवर देणं योग्य ठरणार नाही याची मनाशी छाननी केली...... २४ नावं शोधणं सोपं नाही.......
सकाळी उठले तेव्हा मस्त प्रसन्न वाटत होते. छानशी पहिल्या धारेच्या चहाची तलफ आलेली. गाणं गुणगुणत मी दार उघडलं तर काय? दाराशी दुधाची पिशवीच नाही. दरवाजा बंद करत असतानाच दुधवाला आला. माझा वैताग त्याच्यावर लगेच काढला. मी माझे रागावलेले डोळे त्याच्यावर रोखून बोलले. "वेळेवर का नाही दुध टाकत हल्ली? किती उशीर होतो!" तर माझ्या डोळ्यांना डोळे भिडवून तो म्हणतो कसा "मॅडम, आम्ही काय करणार? ही दुधाची गाडीच हल्ली उशीरा येते बघा. तुम्ही लोकांनी समजून नाही घेतलं तर आम्हा गरीबांचं काय होणार? मलाही बायको-पोरं आहेत. महागाई वाढलीये. उद्यापासून सगळ्यात पहिले तुमच्याकडेच दुध टाकीन. बास?" अन गेला तो.
दुध पातेल्यात ओतून गॅसवर गरम करायला ठेवत असतानाच मला जाणवले. अरे, मी माझ्या भावना दुधवाल्यापाशी मोकळ्या केल्या. त्यावर त्यानेही त्याच्या मनीचे गुज मला सांगितले. म्हणजे?... म्हणजे?? .... माझा पहिला विबासं झाला की काय? अग्गबाई, कळलंच नाही हे कसं घडलं ते! अहाहा, त्या पहिल्यावहिल्या विबासंची मोहिनी मनावर असतानाच .... नवरा स्वैपाकघरात आला आणि चहात लुडबुड करायला लागला. मला एक धक्का मारून त्याने बाजूला ढकलले... हॅ! पण त्याचं काय! विवाहच झाल्यामुळे मला आता अज्जिबात म्हणजे अज्जिबातच रोम्यँटिक वाटले नाही.
घरातली कामं झटपट आवरून, नवर्याला ऑफिसला पाठवून, दुसर्या चहाचा कप हातात घेऊन मी सोफ्यावर ऐसपैस बसले आणि पुढच्या २३ विबासं ची स्वप्ने बघू लागले.........
अगदी मजेशीरच आहे की.
अगदी मजेशीरच आहे की.
भुकेपोटी, भूक भागवण्यासाठी माणसे काहीही करतात हे ऐकून होतोच पण 'भूक' भल्या भल्यांना किती मोटीव्हेट करू शकतो हे कळून थक्क व्हायला झाले
मामी
मामी
मामी
मामी
(No subject)
मामी धमाल!!!
मामी धमाल!!!
मस्त
मस्त
हॅ! पण त्याचं काय! विवाहच
हॅ! पण त्याचं काय! विवाहच झाल्यामुळे मला आता अज्जिबात म्हणजे अज्जिबातच रोम्यँटिक वाटले नाही. >>
नवरा बायको नाते नंतर नंतर
नवरा बायको नाते नंतर नंतर मोनोटोनस होत जाते. बरं झालं मामी घर का मुर्गा दाल बराबर असं म्हणाल्या नाहीत.
हे पुन्हा वर आलं
हे पुन्हा वर आलं
ओके किल्ली चं उत्खनन.
किल्ली, या लेखामागची प्रेरणा माहितीये का तुला?
सस्मित ताई, हो माझंच उत्खनन.
सस्मित ताई, हो माझंच उत्खनन.. काहीतरी हलकं फुलक वाचायची इच्छा झालेली, हे वाचून मजा आली.. म्हणून सर्वांना लाभ मिळावा ह्या हेतूने वर काढला..
प्रेरणा नाही माहीत ग, तूच सांग ह्या अजाण बालिकेला
मी तुझ्या प्रश्नाचा अनुल्लेख
मी तुझ्या प्रश्नाचा अनुल्लेख करतेय
किसिके दिल मे प्यास पैदा करके
किसिके दिल मे प्यास पैदा करके उसे अधुरी छो ड ना ठीक नही बेटा!
सांग सांग प्रेरणा काय ते
एवढं उत्खनन करतेस. शोध की
एवढं उत्खनन करतेस. शोध की तुझं तुच
कुठे शोधू ते तरी सांग
कुठे शोधू ते तरी सांग
विबांस, चोवीशी, गझलाकार,
विबासं, चोवीशी, गझलाकार, ज्यांचा फॅनक्लब आहे असे माबोवरचे सिनीयर लेखक, माझेही फेव्हरेट लेखक अशा काही शब्दखुणा आहेत.
बघ काही सापडतंय का
हा लैच भोचकपणा चाललाय हा आपला
लै भाव खातेय तायडी, कामाला
लै भाव खातेय तायडी, कामाला लावलंस ना आता
थेट नाही का मिळणार, लिंक म्हणते मी.. विपु कर
विबासं, चोवीशी, गझलाकार,
विबासं, चोवीशी, गझलाकार, ज्यांचा फॅनक्लब आहे असे माबोवरचे सिनीयर लेखक, माझेही फेव्हरेट लेखक अशा काही शब्दखुणा आहेत. >>
सापडत नाहीये, जाउ देत...
सापडत नाहीये, जाउ देत...
अगं विपु केलीये.
अगं विपु केलीये.
पण माझ्याच विपुत कशी दिसते मी तुला केलेली विपु ?
विठ्ठलाला सगळ्या आसमंताची
विठ्ठलाला सगळ्या आसमंताची माहिती असते
कम्बख्त किल्ले, मग तुला
कम्बख्त किल्ले, मग तुला गम्मत कळलीच नाहीये
अगं विपु केलीये.>> वाचली,
अगं विपु केलीये.>> वाचली, रीप्लाय पण दिला
नैतर काय
गम्मत कळलीच नाहीये>>>>> नैतर काय
कम्बख्त किल्ले, मग तुला गम्मत
कम्बख्त किल्ले, मग तुला गम्मत कळलीच नाहीये >>>>>>
हा वीकेण्ड विबासं के नाम, सगळ वाचुन खोदुन काढते आता!!
वाचली, रीप्लाय पण दिला>>>
वाचली, रीप्लाय पण दिला>>> तुझ्या आधी ४-५ जणांनी वाचलं असेल ते
वीकेण्ड विबासं के नाम>>>>>>>>> ऑ!
तुझ्या आधी ४-५ जणांनी वाचलं
तुझ्या आधी ४-५ जणांनी वाचलं असेल ते>> जगात सगळ्यांना ज्ञानप्राप्ती व्हावी अशीच अस्मादिकांची ईच्छा आहे
वीकेण्ड विबासं के नाम >> २४
वीकेण्ड विबासं के नाम >> २४ किल्ली असा नवा धागा येणार तर!
किल्ली दोन फोन वापरा विबासे
किल्ली दोन फोन वापरा विबासे करणार असाल तर. लवकर पकडल्या नाही जाणार. शुभेच्छा ☺️
एकच फ़ोन आहे तो महिन्यातून
एकच फ़ोन आहे तो महिन्यातून अर्धे दिवस घरी विसरते, 2 कसे सांभाळू
खूपच बालिश प्रश्न आहे पण मला
खूपच बालिश प्रश्न आहे पण मला खरच माहिती नाही म्हणून विचारतेय..
विबास म्हणजे काय..?
Pages