अवतीभवतीचे पक्षी-१

Submitted by वावे on 15 March, 2019 - 05:14

आमच्या घराच्या परिसरात दिसलेल्या पक्ष्यांची ही प्रकाशचित्रं आहेत. जवळजवळ सगळीच प्रचि माझ्या कॅनॉन
पॉवरशॉट SX 430 IS या पॉइंट अँड शूट कॅमेर्याने काढलेली आहेत. या कॅमेर्याला ४५ x झूम असल्यामुळे लांबच्या पक्ष्याचाही फोटो बर्यापैकी स्पष्ट येतो.

ही मैना किंवा साळुंकी ( Common Myna)
myna1.jpg

myna2.jpg

2

जंगल मैना ( Jungle Myna)

jungle_myna.jpg

jungle_myna2.jpg

कोतवाल ( Black Drongo)
drongo1.jpg


drongo2.jpg


drongo3.jpg

तांबट ( White-cheeked Barbet )

barbet.jpg

barbet2.jpg

पोपट ( Rose- ringed Parakeet)
popat1.jpg

popat2.jpg

आणि हा हळद्या ( Indian Golden Oriole)

golden_oriole1.jpg

golden_oriole2.jpg

ही हळद्याची मादी

golden_oriole_female.jpg

पुढचा भाग
अवतीभवतीचे पक्षी-२
https://www.maayboli.com/node/69306

पक्ष्यांची इंग्रजी नावं किरण पुरंदरे यांच्या ' पक्षी- आपले सख्खे शेजारी' या पुस्तकातून साभार Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कित्ती सुंदर
हा कॅमेरा फोटोग्राफी मधलं काही जास्त ज्ञान नसणार्यांना वापरता येतो का ?

स्मिता आणि किल्ली, धन्यवाद!
स्मिता, हो, वापरायला अगदी सोपा कॅमेरा आहे. वजनाला हलका आहे आणि भरपूर झूम होत असल्यामुळे ट्रिपला वगैरे न्यायला उत्तम!

किती मनोहारी शेजार आहे!सगळेच फोटो मस्त आहेत.दुसर्‍या फोटोतील मैनेच्या डोळ्यातील पांढरे वर्तुळ लक्ष वेधून घेते.

प्राचीन, देवकीताई, हर्पेन, गोल्डफिश, शाली, मनःपूर्वक आभार Happy
गोल्डफिश, कल्पना आवडली Happy
शाली, वॉटरमार्क कसा टाकतात ते मला माहीत नाही Happy

सुंदर फोटो. वॉटरमार्क टाकून त्याचा विचका न केल्याबद्दल विशेष आभार. _/\_
कॉपीराईटची काळजी वाटत असेल तर फोटोच्या मेटाडेटामध्ये तुमचे नाव टाका आणि creative commons चे लायसन्स वापरा, अशी विनंती.

फोटोवर अगदी मधोमध, बटबटीत वॉटरमार्क टाकून चांगल्या फोटोचं वाटोळं करायचं असेल तर "मिसळपाव"वर एक सानिकास्वप्नील तै आहेत, त्यांची शिकवणी घ्या.

उबो Happy कॉपीराइटची वगैरे काळजी नाही.
ॲमी, हो, हळद्या खूप सुंदर असतो. तेजस्वी पिवळा रंग सुंदर दिसतो त्यांचा. किती फोटो काढू आणि किती नाही असं होतं!
मानव, धन्यवाद!

वावे खुप खुप सुंदर ग.
माझ्याकडे येणारा तांबट वेगळा आहे. डोळ्याभोवती लाल रंग असतो त्याच्या. रोज ओरडत असतो तो ओरडला की मी बेचैन होते कारण तो फोटो काढायला दिसतच नाही. कधीतरी पटकन कुठूनतरी उडताना दिसतो.

धन्यवाद जागूताई!
हा White-cheeked Barbet आहे. आत्ता नेटवर वाचलं तेव्हा कळलं की हा दक्षिण भारतात दिसतो. महा रा ष्ट्रात दिसत नसणार. महाराष्ट्रात दिसणारा तांबट म्हणजे Coppersmith Barbet किंवा Crimson-breasted barbet.

फार सुंदर. कॅमरा आणिआझुम दिल्याबद्दल धन्यवाद. मुलीला पक्षांचे फोटो काढायचे आहेत. याची किंमत बरी वाटल्यास घेणार आहे.

धन्यवाद srd.
किंमत १५,००० च्या आसपास असावी.

उपाशी बोका वॉटरमार्क टाकणे ही कला आहे. शोधल्याशिवाय तो दिसत नाही. आजकाल बरेचदा आपले फोटो हे आपलेच आहे हे प्रुव्ह करावे लागते. मेटाडाटा सहज इरेझ करता येतो.

हे पण मस्तच ! पोपटाने बरं फूल पकडलंय चोचीत !! सुरेखच! त्याच्या शेपटीच्या रंगाची शेड कसली भारी आहे !!
जंगल मैना कसली भेदक वाटतेय ! तांबट ला काहीतरी दिसलय खायला बहुतेक.. नीट निरखून खात्री करतोय असं वाटतंय Happy

सुंदर प्रचि... पक्षांचे सगळे मुड छान टिपले आहेत.

White-cheeked Barbet आहे. आत्ता नेटवर वाचलं तेव्हा कळलं की हा दक्षिण भारतात दिसतो. महा रा ष्ट्रात दिसत नसणार >> पश्चिम घाटात दिसतो.

योगेश, Vega, अंजली, इंद्रधनुष्य, आभारी आहे.

पश्चिम घाटात दिसतो>> अच्छा!

मस्त...

सुंदर फोटो. आवडले.
.
कोतवाल बसला आहे ते सावरीचे झाड आहे ना!

दत्तात्रय साळुंके, गजानन आणि नरेंद्र गोळे, धन्यवाद!

ते झाड सावरीच्याच वर्गातलं असावं, पण नाव माहीत नाही.
हा त्या झाडाच्या फुलांचा फोटो

tree.jpg

@ नरेंद्र गोळे
पण एकंदरीत झाडाची पानं , फुलं आणि ती केळीसारखी पण लंबगोल फळं बघून ते White silk cotton tree किंवा kapok tree असावं असं दिसतंय . जावा कॉटन, सिल्क कॉटन (Java cotton, silk-cotton) असं पण म्हणतात याला .
@वावे त्याची जी फळं दिसतायत ती सुकल्यावर त्यातून कापूस बाहेर पडतो का ?
आणि याच सगळ्यात मोठं झाड बंगलोर मधेच आहे Wink
इथे मिळेल