Submitted by वावे on 15 March, 2019 - 05:14
आमच्या घराच्या परिसरात दिसलेल्या पक्ष्यांची ही प्रकाशचित्रं आहेत. जवळजवळ सगळीच प्रचि माझ्या कॅनॉन
पॉवरशॉट SX 430 IS या पॉइंट अँड शूट कॅमेर्याने काढलेली आहेत. या कॅमेर्याला ४५ x झूम असल्यामुळे लांबच्या पक्ष्याचाही फोटो बर्यापैकी स्पष्ट येतो.
ही मैना किंवा साळुंकी ( Common Myna)
१
2
जंगल मैना ( Jungle Myna)
१
२
कोतवाल ( Black Drongo)
१
२
३
तांबट ( White-cheeked Barbet )
१
२
पोपट ( Rose- ringed Parakeet)
१
२
आणि हा हळद्या ( Indian Golden Oriole)
१
२
ही हळद्याची मादी
पुढचा भाग
अवतीभवतीचे पक्षी-२
https://www.maayboli.com/node/69306
पक्ष्यांची इंग्रजी नावं किरण पुरंदरे यांच्या ' पक्षी- आपले सख्खे शेजारी' या पुस्तकातून साभार
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भारीच
भारीच
कित्ती सुंदर
कित्ती सुंदर
हा कॅमेरा फोटोग्राफी मधलं काही जास्त ज्ञान नसणार्यांना वापरता येतो का ?
स्मिता आणि किल्ली, धन्यवाद!
स्मिता आणि किल्ली, धन्यवाद!
स्मिता, हो, वापरायला अगदी सोपा कॅमेरा आहे. वजनाला हलका आहे आणि भरपूर झूम होत असल्यामुळे ट्रिपला वगैरे न्यायला उत्तम!
व्वा वावे, तुमच्या नंदनवनात
व्वा वावे, तुमच्या नंदनवनात आहोत असे वाटले फोटू बघून
किती मनोहारी शेजार आहे!सगळेच
किती मनोहारी शेजार आहे!सगळेच फोटो मस्त आहेत.दुसर्या फोटोतील मैनेच्या डोळ्यातील पांढरे वर्तुळ लक्ष वेधून घेते.
वाह, किती मस्त
वाह, किती मस्त
वा !!! अप्रतिम फोटो आहेत.
वा !!! अप्रतिम फोटो आहेत. दुसऱ्या फोटोतील पोपट जणू रागाने बोलतोय "don't shoot without permission"
सगळेच फोटो सुंदर. अप्रतिम.
सगळेच फोटो सुंदर. अप्रतिम. तांबट मी पहिल्यांदा पाहिला.
(वॉटरमार्क टाका हो अगोदर. )
प्राचीन, देवकीताई, हर्पेन,
प्राचीन, देवकीताई, हर्पेन, गोल्डफिश, शाली, मनःपूर्वक आभार
गोल्डफिश, कल्पना आवडली
शाली, वॉटरमार्क कसा टाकतात ते मला माहीत नाही
सुंदर!
सुंदर!
मस्त! हळद्या भारीय सगळ्यात
मस्त! हळद्या भारीय सगळ्यात आणि मग कोतवाल.
सुंदर फोटो. वॉटरमार्क टाकून
सुंदर फोटो. वॉटरमार्क टाकून त्याचा विचका न केल्याबद्दल विशेष आभार. _/\_
कॉपीराईटची काळजी वाटत असेल तर फोटोच्या मेटाडेटामध्ये तुमचे नाव टाका आणि creative commons चे लायसन्स वापरा, अशी विनंती.
फोटोवर अगदी मधोमध, बटबटीत वॉटरमार्क टाकून चांगल्या फोटोचं वाटोळं करायचं असेल तर "मिसळपाव"वर एक सानिकास्वप्नील तै आहेत, त्यांची शिकवणी घ्या.
उबो कॉपीराइटची वगैरे काळजी
उबो कॉपीराइटची वगैरे काळजी नाही.
ॲमी, हो, हळद्या खूप सुंदर असतो. तेजस्वी पिवळा रंग सुंदर दिसतो त्यांचा. किती फोटो काढू आणि किती नाही असं होतं!
मानव, धन्यवाद!
वावे खुप खुप सुंदर ग.
वावे खुप खुप सुंदर ग.
माझ्याकडे येणारा तांबट वेगळा आहे. डोळ्याभोवती लाल रंग असतो त्याच्या. रोज ओरडत असतो तो ओरडला की मी बेचैन होते कारण तो फोटो काढायला दिसतच नाही. कधीतरी पटकन कुठूनतरी उडताना दिसतो.
धन्यवाद जागूताई!
धन्यवाद जागूताई!
हा White-cheeked Barbet आहे. आत्ता नेटवर वाचलं तेव्हा कळलं की हा दक्षिण भारतात दिसतो. महा रा ष्ट्रात दिसत नसणार. महाराष्ट्रात दिसणारा तांबट म्हणजे Coppersmith Barbet किंवा Crimson-breasted barbet.
सुंदर फोटो
सुंदर फोटो
फार सुंदर. कॅमरा आणिआझुम
फार सुंदर. कॅमरा आणिआझुम दिल्याबद्दल धन्यवाद. मुलीला पक्षांचे फोटो काढायचे आहेत. याची किंमत बरी वाटल्यास घेणार आहे.
धन्यवाद srd.
धन्यवाद srd.
किंमत १५,००० च्या आसपास असावी.
छान फोटो . बाकी तांबटचा आवाज
छान फोटो . बाकी तांबटचा आवाज ... तो सह्याद्रीत फिरताना कायम सोबत करतो.
उपाशी बोका वॉटरमार्क टाकणे ही
उपाशी बोका वॉटरमार्क टाकणे ही कला आहे. शोधल्याशिवाय तो दिसत नाही. आजकाल बरेचदा आपले फोटो हे आपलेच आहे हे प्रुव्ह करावे लागते. मेटाडाटा सहज इरेझ करता येतो.
Chhan photo
Chhan photo
हे पण मस्तच ! पोपटाने बरं
हे पण मस्तच ! पोपटाने बरं फूल पकडलंय चोचीत !! सुरेखच! त्याच्या शेपटीच्या रंगाची शेड कसली भारी आहे !!
जंगल मैना कसली भेदक वाटतेय ! तांबट ला काहीतरी दिसलय खायला बहुतेक.. नीट निरखून खात्री करतोय असं वाटतंय
सुंदर प्रचि... पक्षांचे
सुंदर प्रचि... पक्षांचे सगळे मुड छान टिपले आहेत.
White-cheeked Barbet आहे. आत्ता नेटवर वाचलं तेव्हा कळलं की हा दक्षिण भारतात दिसतो. महा रा ष्ट्रात दिसत नसणार >> पश्चिम घाटात दिसतो.
योगेश, Vega, अंजली,
योगेश, Vega, अंजली, इंद्रधनुष्य, आभारी आहे.
पश्चिम घाटात दिसतो>> अच्छा!
मस्त...
मस्त...
किती छान!
किती छान!
सुंदर फोटो. आवडले.
सुंदर फोटो. आवडले.
.
कोतवाल बसला आहे ते सावरीचे झाड आहे ना!
दत्तात्रय साळुंके, गजानन आणि
दत्तात्रय साळुंके, गजानन आणि नरेंद्र गोळे, धन्यवाद!
ते झाड सावरीच्याच वर्गातलं असावं, पण नाव माहीत नाही.
हा त्या झाडाच्या फुलांचा फोटो
@ नरेंद्र गोळे
@ नरेंद्र गोळे
पण एकंदरीत झाडाची पानं , फुलं आणि ती केळीसारखी पण लंबगोल फळं बघून ते White silk cotton tree किंवा kapok tree असावं असं दिसतंय . जावा कॉटन, सिल्क कॉटन (Java cotton, silk-cotton) असं पण म्हणतात याला .
@वावे त्याची जी फळं दिसतायत ती सुकल्यावर त्यातून कापूस बाहेर पडतो का ?
आणि याच सगळ्यात मोठं झाड बंगलोर मधेच आहे
इथे मिळेल
किती सुंदर फोटो. मस्तं.
किती सुंदर फोटो. मस्तं.