पुलवामा हल्ला आणि भारत पाकिस्तान संबंध

Submitted by हेला on 27 February, 2019 - 10:27

पुलवामा हल्ल्यात आपले ४४ जवान हकनाक मारले गेले. जैश-ए-मोहम्मद ह्या अतिरेकी संघटनेच्या एका आत्मघाती सदस्याने स्फोटकांचा वापर करून crpf च्या ताफ्यावर हल्ला केला. त्यानंतरच्या घडामोडी व त्यानुषंगाने अनेक बातम्या खऱ्या खोट्या येत आहेत. पाकिस्तानी व भारतीय माध्यमे, दोन्ही देशाचे अधिकारी, दोन्ही देशाचे नेते हे काय करत आहेत हे दिसत आहे. सोशल मिडीयावर युद्धज्वर ओसंडून वाहत आहे. ह्या सर्व घटनांचा येत्या निवडणुकांवर परिणाम होणार आहेच.

ह्या सर्व प्रश्नांवर एकत्रित एका ठिकाणी चर्चा करायला हा धागा काढत आहे. मायबोलीच्या नियमात राहून चर्चा करा हि विनंती... वेबमास्टर ह्या धाग्याला कुलूप घालणार नाहीत अशी अपेक्षाही आहेच.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

https://twitter.com/virsanghvi/status/1106169945870741505

vir sanghvi
‏Verified account @virsanghvi

vir sanghvi Retweeted Sheila Dikshit

I did the interview in question. She is absolutely right. Let’s not take what she said out of context and twist it. You can see the whole interview on Virtuosity on @CNNnews18 this weekend

Sheila Dikshit
‏Verified account @SheilaDikshit

I have seen some media is twisting my comments made in an interview. Here is what I said - it may seem to some people that Mr Modi is stronger on terror but I think this is a poll gimmick more than anything else..

Happy

सत्य हेच आहे. त्यामुळे आम्हा काँग्रेसवालयाना इतरानी अक्कल शिकवू नये.

तुमच्यासारख्या दगडान्ना अक्कल शिकवणे अशक्य आहे.

पंतप्रधानपदाचा मान ठेवणं वगैरे भाजप कडून शिकावं.

Priti Gandhi ( Priti GandhiVerified account
@MrsGandhi

National Incharge of Social Media - BJP Mahila Morcha - World's largest political party! • Tweets are strictly my personal point of view • मंदिर वहीं बनाएंगे!)
‏Verified account @MrsGandhi

Dear Pakistan, Lets exchange PM's?!!!
5:56 PM - 15 Jan 2013

कालपासून चीनला संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा समितीचे स्थायी सदस्यत्व देण्याचे पाप पं. नेहरूंचे असा दावा करणारी एक पोस्ट फिरते आहे. 'हे पाप तुझ्या पणजोबाचे' असे राहुल गांधी यांनाही 'सांगण्यात' आले.
यावर जयरस बानाजी यांनी त्यांच्या भिंतीवर काही तारखा/वर्षे मांडत इतिहासाची आठवण करून दिली आहे.
१) चीनला सुरक्षा समितीचे स्थायी सदस्यत्व १९४५ साली देण्यात आले. तेव्हा भारत स्वतंत्र नव्हता व संयुक्त राष्ट्रसंघाशी नेहरूंचा काहीही संबंध नव्हता.
२) हे सदस्यत्व कुणाचे? - चिनी प्रजासत्ताक (Republic of China) की चिनी जनतेचे प्रजासत्ताक (People's Republic of China) यावर संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेत (General Assembly) १९७१ साली मतदान झाले. बहुसंख्य विकसनशील, गटनिरपेक्ष राष्ट्रांनी People's Republic of China (कम्युनिस्ट चीन) हा अधिकृत प्रतिनिधी असल्याच्या बाजूने मतदान केले. पण तेव्हा पं. नेहरूंना मरून ७ (सात) वर्षे झाली होती.

एक नम्र सूचना: नेहरूंचे भूत कायमचे गाडून टाकण्यासाठी योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली एखादा महा भूत मुक्ती यज्ञ - ५,एक हजार कोटी खर्च करून करावा.
यज्ञाचे कंत्राट उद्योग शिरोमणी अनिल अंबानी यांना द्यावे.
दुसरी अत्ताच सुचलेली ताजी सूचना: प्रत्येक ठिकाणाहून नेहरू हे नाव काढून टाकावे - तिथे हेडगेवार/ उपाध्याय/ गोळवलकर/मोदी असे नाव घालावे. - गरज पडल्यास काही ठिकाणी सावरकर हे नाव वापरावे.

By Sandeep Pendse

काळीमाऊ, तुला काय म्हणायचं आहे? अमेरिकेने १९५० आणि रशियाने १९५५ मध्ये भारताला ती ऑफर दिलीच न्हवती? सोच के जबाब दो...

Informally,su^stionshavebeenmadebytheUnitedStatesthatChinashouldbetakenintotheUnitedNationsbutnotintheSecurityCounal,andthatIndiashouldtakeherplaceintheSecurityCouncil.WecannotofcourseacceptthisasitmeansfallingoutivithChinaanditwouldbeveryunfairforagrratcountrylikeChinanottobeintheSecuntyCouncil.Wehave,therrfore,madeitcleartothosewhosuggestedthisthatwecannotagreetothissuggestionWehaveevengonealittlefurtherandsaidthatIndiaisnotanxioustoentertheSecurityCounalatthisstage,eventhoughasagreatcountrysheoughttobethere.ThefirststeptobetakenisforChinatotakeherrightfulplaceandthenthequestionofIndiamightbeconsideredseparatel

त्यांनी योग्य तेच केले. नेहरुद्वेष असला की योग्य पण अयोग्य होते आणि मोदीभक्तीत अयोग्यही योग्यच वाटते.

चला मान्य केले कि नेहरू नि काही तरी केले , दोष हाच आहे कि ६० वर्ष सत्ता भोगली पण जेव्हा शक्य होते तेंव्हा हे मुद्दे सोडवले नाही आणि आता सगळं दोष घालून मोकळा व्हायचा ..

६० वर्ष सत्ता भोगली पण जेव्हा शक्य होते तेंव्हा हे मुद्दे सोडवले नाही आणि आता सगळं दोष घालून मोकळा व्हायचा ..
--- असे किती वर्षे अजून रडणार आहात? किती वर्षे नेहरू नेहरू करणार आहात? तुम्ही काय दिवे लावले ते कधी सांगणार? आता जो उच्छाद मांडत आहात त्याचे काय त्याची उत्तरे नेहरुला मागायची का? त्या नेहरू ने जर इतके बिघडवून ठेवले आहे तर तुम्ही कशाला रडायला सत्तेवर बसला आहात का? ४४ जवान मेले त्याचा दोष नेहरुचा? काश्मीरमध्ये संपत आलेला दहशतवाद परत जागा केला त्याचा दोष नेहरुचा? मसूद अजर सोडला त्याचा दोष नेहरूचा? सर्जिकल स्ट्राईक करून काही उपयोग नाही होत त्याचा दोष नेहरूचा? नाचता येईना अंगण वाकडे, स्वयंपाक येईना ओली लाकडे. मोदी आणि भाजप म्हणजे फक्त तोंडाची आग .. कस पाहणारी परिस्थिती आली की नेहरुवर दोष ढकलायचा... गेली कित्येक वर्षे हेच चालले आहे..

नशीब नेहरू असा रडका नव्हता.

असे किती वर्षे अजून रडणार आहात?- रडत कोणी बसल नाही, पुलवामा हमला नंतर सरकारने केलेले प्रयंत्न दिसले नाही का ? युनो मध्ये उठवलेला आवाज दिसला नाही का ? फक्त काँग्रेस अशी आहे कि प्रत्येक गोष्टीला मोदी लाच जबाबदार धरत आहे जणू काय ह्यांचे सरकार गेले तेंव्हा देशात आणि सीमेवर सगळे अबाधीत होते आणि मोदी ने मागील ५ वर्षात सगळे बिघडवले , साफसफाई करणे म्हणजे कचरा दिसू नये अश्या ठिकाणी लपवणे म्हणत नाहीत , तो साफच करावा लागतो. काँग्रेस ने असे वातवरण तयार केले कि बघ आम्ही किती सफाई ठेवली होती. आणि मोदी ने कचरा केला ..

<< इथे तावातावाने सर्व ओंबळे च नाव घेताय त्यांच्या family la मदत सोडा पण त्यांचा जो पुतळा आहे चौपाटीवर तिथे जावून त्यांना हार घालून त्यांची आठवण तरी कोण काढते आहे का . >>
------- त्यांच्या बद्दलचा आदर हा त्यांच्या पुतळ्याला हार घातल्यानेच व्यक्त होतो का?

मी महात्मा गांधींच्या यांच्या कुठल्याही पुतळ्याला कधीही हार घातलेला नाही. कधी अवशक्ताच वाटली नाही, पण आदर हा मनापासुन आहेच. मनोमन हात जोडल्या जातो आणि तेच महत्वाचे असते. नपेक्षा पुतळ्याला "फोटो" काढण्यापुरता हार घालायचा पण मनात चरफडत रहायचे आणि सायंकाळी महात्म्याला शिव्या द्यायच्या.

पुतळ्याला "फोटो" काढण्यापुरता हार घालायचा पण मनात चरफडत रहायचे आणि सायंकाळी महात्म्याला शिव्या द्यायच्या. >>

हे इतर लोक मनात चरफडत राहतात वगैरे कसकाय ठरवलं जातं उदयभाऊ? म्हणजे तुम्हाला एखादी सिद्धी वगैरे प्राप्त आहे का ज्यामुळे तुम्हाला दुसर्याच्या मनात काय आहे याचा ठाव जगातील कुठल्याही भागात बसून घेता येतो? या सिद्दीच्या संकेतांना तुम्ही पुरावे म्हणून कसे रेकॉर्ड करता?

नेहरू आणि सुरक्षा परिषदेतली पर्मनंट जागा - शशी थरूर यांनी थोडक्यात स्पष्ट केलंय.
https://twitter.com/ShashiTharoor/status/1106487734967762944

Remember that India could not have replaced China on the Security Council without an amendment to the @UN Charter. Such an amendment could not have passed over the USSR's veto, which at the time (well before the Sino-Soviet split) it would have exercised.
So Nehru did not "give the Indian permanent seat to China". There was no Indian seat to give & it was far from certain the US idea would have worked.
रशिया अमेरिका शीतयु द्धाचाच हा भाग म्हणायला हवं.

पाच वर्षां नंतरची रशियन ऑफर फार तर हुलकावणी होती.

बरं पण, या (२०१४) आधी भा रताला आणि भारताच्या को णत्याही नेत्याला जागतिक मंचावर कसलीही किंमत नव्हती ना?

https://youtu.be/jP1H68ikSvw

मनमोहन सिंगांच्या दुसर्या टर्ममधील G20 समिट मधील काही बोलकी दृश्ये. 1:31 पासून पुढे पाहावे.

इतके पॉप्युलर आणि प्रभावशाली असून मोदीजी अझहर मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करुन घेऊ श्कले नाहीत. चीनला लाल लाल आंखे दाखवणार होते पण नेहरु आड आले म्हणतात. पूअर चॅप!

<< इतके पॉप्युलर आणि प्रभावशाली असून मोदीजी अझहर मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करुन घेऊ श्कले नाहीत. चीनला लाल लाल आंखे दाखवणार होते पण नेहरु आड आले म्हणतात. पूअर चॅप! >>

----- ते चीन अध्यक्षासोबत झुला झुलताचे जगप्रसिद्ध फोटो.... पुढे चर्चे मधी काहीच प्रभाव नाही पाडता आला? चार वेळा त्यांनी UNSC मधे खोडा घातला.
https://www.rediff.com/news/special/what-modi-told-xi-in-ahmedabad/20170...

पाकच्या शरिफांशी अगदी घरच्या सारखे संबंध होते... शाल देणे, मिठाई - साडीचा आहेर स्विकारणे / देणे, लग्नाला हजेरी लावणे, मस्त मेजवानी.... मग तेव्हा का नाही मसुद किंवा हाफिज मागितला? काहीच प्रभाव पाडता आला नाही.

नमस्कार व्हॉटअबाउटकरांनो, मी मनमोहन सिंगांबाबत लिहिलंय, अगदी कुठपासून व्हिडीओ बघायचा तेही सांगितलं.

अर्धवटांनी सांगावं आणि इतरांनी ते ऐकावं असं होत नाही. ज्याला साधारण बुद्धी आहे तो हे बघेल

चौकीदाराचं आडनाव थापा का असतं ?
https://www.youtube.com/watch?v=CYIysdM3Y7w

ज्याला हे शक्य नाही तो गर्दीत घुसून उगीचच लगट करत त्याचे व्हिडीओ बनवत बसेल.

अर्धवटांनी सांगावं आणि इतरांनी ते ऐकावं असं होत नाही.
>> माझंही हेच मत आहे, खास करून त्या पढतमूर्खांबद्धल जे कुजकट कॉमेंट करतात नि दुसऱ्यांची अक्कल काढतात.

Pages