पुलवामा हल्ला आणि भारत पाकिस्तान संबंध

Submitted by हेला on 27 February, 2019 - 10:27

पुलवामा हल्ल्यात आपले ४४ जवान हकनाक मारले गेले. जैश-ए-मोहम्मद ह्या अतिरेकी संघटनेच्या एका आत्मघाती सदस्याने स्फोटकांचा वापर करून crpf च्या ताफ्यावर हल्ला केला. त्यानंतरच्या घडामोडी व त्यानुषंगाने अनेक बातम्या खऱ्या खोट्या येत आहेत. पाकिस्तानी व भारतीय माध्यमे, दोन्ही देशाचे अधिकारी, दोन्ही देशाचे नेते हे काय करत आहेत हे दिसत आहे. सोशल मिडीयावर युद्धज्वर ओसंडून वाहत आहे. ह्या सर्व घटनांचा येत्या निवडणुकांवर परिणाम होणार आहेच.

ह्या सर्व प्रश्नांवर एकत्रित एका ठिकाणी चर्चा करायला हा धागा काढत आहे. मायबोलीच्या नियमात राहून चर्चा करा हि विनंती... वेबमास्टर ह्या धाग्याला कुलूप घालणार नाहीत अशी अपेक्षाही आहेच.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

<< भारत सरकारला खोटे ठरवण्याचे महान कार्य तुमच्या हातून होत राहवे .>>

------- अबकी बार भारत सरकार असे म्हणतो का ? Happy
नाही...

अडचणीत आल्यावर एक सामंजस्यवादी येतो. मग तो विशाल अंतःकरणाने म्हणतो, जाऊ द्या हो जाऊद्या... जाता जाता पुन्हा भाजपची कशी मजबुरी होती याची टेप चिकटवून जातो.>>>>>> अहो भाऊ, नाव घेऊन बोला, लेकी बोले सुने लागे कशाला?

बरं, आता भाजपा परत सत्तेत येणार नाहीये अशी बर्‍याच जणांची धारणा आहे. तर येणारे भावी पंप्र दहशतवाद वगैरे समस्यांवर कुठली पावले उचलतात ते बघु. घोडामैदान फार लांब नाही. मला फक्त हाच प्रश्न पडला आहे की देशाचा भावी पंप्र कोण असेल? राहुल गांधी? मायावती? ममता? अखिलेश? मुलायम? नितीशकुमार? चंद्राबाबु? देवेगौडा? ???? कोण ? कोण?

कुठे भेटला ? श्रीलंकेत का ?>>>>>> जामोप्या, कृपया माझी पोस्ट नीट वाचा. मी दुबई म्हंटले आहे. स्टॉपओव्हर म्हणजे फ्लाईटचा उल्लेख केला आहे. मी आजतागायत जेवढे पाकीस्तानी माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्ष बघीतलेत, त्याच्या एक पटीने देखील कोणी श्रीलंकन पाहीलेला नाहीये.

<< बरं, आता भाजपा परत सत्तेत येणार नाहीये अशी बर्‍याच जणांची धारणा आहे. >>
------ काम केले आहे असे जनतेला दिसले, वाटले आणि पटले तर पुन्हा संधी मिळेल.
विविध जाती-धर्मा मधे तेढ निर्माण करुन आपला छुपा अजेंडा रेटायचा प्रयत्न केला आहे, जोडीला खोटेपणाचा महाकळस रचला आहे असे समजल्यास विरोधात बसावे लागेल.

सर्वांचा विकास आणि भ्रष्टाचार निर्मुलन हे आवाक्याबाहेर काम आहे असे दिसते. विकासाची किंमत मोजावी लागते, आणि बहुधा कळत/ नकळत आपण अशी जबाबदारी पुढच्या पिढीवर ढकलतो.

<< तर येणारे भावी पंप्र दहशतवाद वगैरे समस्यांवर कुठली पावले उचलतात ते बघु. घोडामैदान फार लांब नाही. मला फक्त हाच प्रश्न पडला आहे की देशाचा भावी पंप्र कोण असेल? राहुल गांधी? मायावती? ममता? अखिलेश? मुलायम? नितीशकुमार? चंद्राबाबु? देवेगौडा? ???? कोण ? कोण? >>
------ ते जनतेने मतपेटी द्वारे निवडून दिलेले खासदार ठरवणार... २००४ च्या निवडणूकी च्या आधी मनमोहनसिंग यांचे नाव पंतप्रधान पदाच्या शर्यती मधे कुठे होते? त्यांचे प्रधानपदासाठीचे नाव निवडणूकी नंतरच समोर आले ना ? तसेच आताही होणार. पर्याय अनेक आहेत, आणि अजुन निर्माण होतील.
वरच्या यादीत मोदी यांचे नाव पण लिहा... त्यांना पण दुसर्‍या टर्म मधे स्वारस्य आहे.

राहुल गांधी? मायावती? ममता? अखिलेश? मुलायम? नितीशकुमार? चंद्राबाबु? देवेगौडा? ???? कोण ? कोण? >>>> यांच्यापैकी कुणी झाला तर काय प्रॉब्लेम असणार आहे ?

<< यांच्यापैकी कुणी झाला तर काय प्रॉब्लेम असणार आहे ? >>

------- थोडे पुढे मी असेही म्हणेन पंतप्रधानांचे नाव आधी दिसायलाच हवे हे काही गरजेचे नाही. लोकांची तशी मागणी पण नसते. हे उगाचच "तुमच्या पंतप्रधान पदासाठीच्या उमेदवाराचे नाव काय हे सांगा. आमचे तर नाव ठरलेले आहे." लोकशाही मधे बहुमत ज्या पक्षाकडे आहे त्या पक्षाचे खासदार ठरवतात त्यांचा नेता कोण असायला हवा.

नितीशकुमार? >>>>> मला बेसिकली नितीशकुमार आवडतात. त्यांची वै. राजकीय धोरणे सोडुन द्या, पण बिहार मूळ पदावर आणण्यात त्यांना थोडे तरी यश मिळाले आहे. गुन्हेगारांवर ते वचक ठेवु शकतत. राहुल गांधींचा मी विचारही करणार नाही, कारण केवळ ते गांधी आहेत म्हणून मला नको आहेत असे नाही तर त्यांना राजकीय परीपक्वता अजून यायची आहे, जी नितीशकुमार सारख्या लोकांमध्ये आहे.

मायावती, ममता, अखिलेश, देवेगौडा हे नकोत, चंद्राबाबु चालतील.

जनता तर हे ठरवेलच की कोणाला सत्ता द्यायची, कोणाला नाही. डॉ मनमोहन सिंग यांना परत चान्स मिळण्याची शक्यता कमी दिसते. मला आवडतात ते. पण या वेळी सारखे असे वाटते आहे की त्रिशंकु यायची शक्यता जास्त आहे.

तुम्हाला काय वाटते हे महत्वाचे नाही. अनेकांना ते हवे आहेत. तुम्हाला हवे तेच निवडायचे तर नोटबंदट्सारखे निर्णय घेणारे लोक निवडून द्यावे लागतील. मोदींनी फक्त व्यापा-यांसाठी देह चंदनासारखा झिजवला. बाकीच्यांचे काय ?

रघुराम राजन सारख्या माणसाला नोटाबंदीला विरोध करतो म्हणून हाकलणाऱ्या, अरविंद पानगडिया, अरविंद सुब्रमण्यम यांना पळवून लावणाऱ्या, इराणीबाईंना मंत्री करणाऱ्या , पर्रिकरांना अंधारात ठेवून राफेलचा करार करणाऱ्या माणसाकडे देश चालवण्यासाठी लागणारी परिपक्वता नक्कीच असणार.
राहुल अपरिपक्व आहे हा प्रचार फार प्रभावी आहे.
कर्नाटकातली धोबीपछाड आणि तीन राज्यांतले निकाल, सूट बूट की सरकार ते चौकीदार ही चोर ही जिव्हारी लागलेली वचनं ही अपरिपक्वता दाखवत नाहीत.
आपण कोणत्या प्रचाराला बळी पडतोय हे समजायला लोकांनी मोदी आणि राहुल दोघांची गेल्या वर्षातली भाषणं ऐकावीत.
मोदींचं पुद्दुचेरी को वणक्कम आणि डिसलेक्सियाप्रकरण पहावं.

एकही पत्रकार परिषद न घेतलेले मोदी हे देशाच्या इतिहासातले पहिले पंतप्रधान असावेत.

<< राहुल गांधींचा मी विचारही करणार नाही, कारण केवळ ते गांधी आहेत म्हणून मला नको आहेत असे नाही तर त्यांना राजकीय परीपक्वता अजून यायची आहे, जी नितीशकुमार सारख्या लोकांमध्ये आहे. >>
------- राहुल गांधी यांचा मोठा प्लस पॉइंट म्हणजे व्यक्ती प्रामाणिक आहे. राजकारणात एव्हढे प्रामाणिक लोक टिकाव धरत नाहीत. सहकार्‍यांचे ते एकतात, मान देतात आणि सर्वांना सोबत नेतात. जमिनीवर पाय आहेत आणि अतिशय साधी रहाणी - उच्च विचारसरणी.

किंचाळणार्‍या अर्णब ने दिल्ली दंगली बद्दल प्रश्न विचारल्यावर त्यांचे उत्तरात कुठेही त्याने लपवालपवी केली नाही, काँगेसचे काही लोक होते हे मान्य केले आहे. हत्या, त्यानंतरची दंगल चुकीचे होते हे त्यांनी सांगितले.
आता मोदींना २००२ च्या दंगलीचा प्रश्न विचारा.... ते सरळ हात झटकणार.... निरपराधी लोकांची झालेली हत्या यांची कुठेही जबाबदारी घेतलेली नाही... आजपर्यंत.
याला राजकीय परीपक्वता म्हणायचे का ?

गोराक्षसांना चरण्यासाठी मोकाट रान दिले... अरे मग पोलिसांचे काम काय ?
या राक्षसांनी निरपराध लोकांना केवळ गोमांस खाल्याचा संशय आला, गोमांस बाळगले म्हणुन, गोमांसाची वाहतुन केली म्हणुन... धरले, झ्डले, मारले.... मारुन टाकले.
देशाच्या गृहमंत्र्यांची काही प्रतिक्रिया ? चुप्प.
देशाच्या सर्वशक्तीशाली पंतप्रधानांची या विषयावर प्रतिक्रिया ? पहिले अनेक दिवस चुप्प... गोराक्षसांना जो मेसेज जायचा आहे तो जातो. ते त्यांची कार्य करतात. आणि त्यांच्या विरोधात काहीच कृती न करता हे यांची राजकीय परीपक्वता दाखवतात.

एका विशिष्ट धर्माच्या १८ कोटी लोकांच्या मनात टोकाची असुरक्षिततेची भावना निर्माण करण्याला राजकीय परीपक्वता म्हणायचे का? मला कुठल्याही धर्माचे वेड नाही आहे, ध्रुवीकरणाच्या धोरणामुळे पुढचा काळ भयानक दिसतो आहे. तो तसा नसायला हवा, आपल्याकडे प्रश्न खुप आहेत, त्यात अजुन भर नको.

या व इतर अनेक प्रश्नांवर काहीही ठोस कृती न केल्यामुळे गुंडांचे धाडस वाढत आहे... आता तर गोराक्षस पोलीस अधिकार्‍यांवर, आणि पोलीस चौकीवर पण हल्ला करायला आणि त्यांना जिवे मारायला कमी करत नाही.

काळा पैसा आणि नोट बंदी: यावर खुप चर्चा झाली आहे. अत्यंत घिसाड घाईने घेतलेला अविचारी निर्णय होता.
काळा पैशाविरुद्ध लढायला इच्छाशक्तीचा अभाव आहे हे पदोपदी दिसले.

डोकलाम, पुलवामा- त्याची शिक्षा म्हणुन अतिरेक्यांच्या तळावर केलेले हल्ले, कुठेही मला राजकीय परीपक्वता दिसलेली नाही.

राफेलच्या केस मधे किती लपवा - लपवी सुरु आहे. आधी माहितीची कागदपत्रे चोरीला गेली होती, नाही आता त्यातली माहिती चोरीला गेली. दर-रोज नवे एक ऐकायला / वाचायला मिळते. प्रश्नाला अयोग्य प्रकारे, गलथान पणे हाताळणे याला राजकीय परीपक्वता म्हणायचे का?

राफेल असते तर वेगळे चित्र दिसले असते अशी बालिश प्रतिक्रिया कशी दिली जाते? प्रतिक्रिया देणारी व्यक्ती सर्वशक्तीशाली पंतप्रधान असतील तर?

आधी म्हटल्याप्रमाणे... २०१४ च्या आधी देवगौडा सर्वात अकार्यक्षम पंतप्रधान होते असा माझा समज होता... आज देवगौडा नंबर दोन वर आहेत.

हिंदी भाषिक राज्य सोडून कोणत्याही राज्यातील व्यक्ती प्रधानमंत्री म्हणून निवडला जावा आस माझे वैयतिक मत आहे .

मी आडमार्गाने मायावती,अखिलेश,नितीश,आणि तुमच्या डोक्यात असलेले नाव राहुल गांधी ह्याच्या नावाला विरोध करून मोदींचं नाव सुचवतो आहे आस वाटतं आसेल तर तुम्ही चुकत आहात .
हिंदी भाषिक राज्यात अजुन सुधा मुस्लिम स्त्रिया बुरख्यात आहेत आणि हिंदू स्त्रिया पूर्ण चेहरा पदरानी झाकत आहे त्या राज्यात स्त्रिया ना स्वतंत्र नाही पुरुष जेवल्या नंतर स्त्रियांनी जेवावे आशि त्यांची मत आहेत .
हिंदी भाषा आसलेल्या राज्यात जातीयवाद खूप आहे हा ब्राह्मण,हा दलीत,हा ठाकूर,असे प्रकार तिकडे सर्रास चालत.
आशा समाजातून निवडून आलेला प्रतिनिधी देशाला आधुनिक जगात घेवून जावू शकणार नाही हे ऐक कारण आहे .
आणि दुसरं कारण हिंदी भाषेची जबरदस्ती करायचा प्रयत्न होईल .
आणि ह्या दोन्ही गोष्टी देशाच्या आरोग्याला हानिकारक आहेत

मी आडमार्गाने मायावती,अखिलेश,नितीश,आणि तुमच्या डोक्यात असलेले नाव राहुल गांधी ह्याच्या नावाला विरोध करून मोदींचं नाव सुचवतो आहे आस वाटतं आसेल तर तुम्ही चुकत आहात .
हिंदी भाषिक राज्यात अजुन सुधा मुस्लिम स्त्रिया बुरख्यात आहेत आणि हिंदू स्त्रिया पूर्ण चेहरा पदरानी झाकत आहे त्या राज्यात स्त्रिया ना स्वतंत्र नाही पुरुष जेवल्या नंतर स्त्रियांनी जेवावे आशि त्यांची मत आहेत .
हिंदी भाषा आसलेल्या राज्यात जातीयवाद खूप आहे हा ब्राह्मण,हा दलीत,हा ठाकूर,असे प्रकार तिकडे सर्रास चालत.
आशा समाजातून निवडून आलेला प्रतिनिधी देशाला आधुनिक जगात घेवून जावू शकणार नाही हे ऐक कारण आहे .
आणि दुसरं कारण हिंदी भाषेची जबरदस्ती करायचा प्रयत्न होईल .
आणि ह्या दोन्ही गोष्टी देशाच्या आरोग्याला हानिकारक आहेत

@राजेश१८८, प्रतिसाद "सेव्ह" केल्यावर लगेच "रिफ्रेश" करू नका, त्यामुळे तुमचे प्रतिसाद दोनदा सेव्ह होतात. त्याऐवजी कृपया आधीच्या प्रतिसादांच्या पानावर जाऊन पुन्हा "शेवट" या पानाच्या लिंक वर क्लीक करा.

https://www.loksatta.com/desh-videsh-news/dead-bodies-of-terrorist-trans...>>>.>>>> मला आश्चर्य या गोष्टीचे वाटतेय की मी इथे काल आणी आज दोन्ही वेळा एअर स्ट्राईक बद्दल लिंक दिली तर त्या विषयी कोणीच काही बोलत नाही. Uhoh उलट लगेच दुसर्‍या पोस्टी टाकुन विषय भरकटवला जातोय. Proud

सरकार जाऊ दे, पण मला सैन्यावर विश्वास आहे. आणी ते आता सिद्ध होतयं. Happy म्हणजे नुसतीच झाडे बेचीराख नाही झाली तर बरीच मने पण बेचीराख झालीत. Sad

राहुल गांधी यांचा मोठा प्लस पॉइंट म्हणजे व्यक्ती प्रामाणिक आहे. राजकारणात एव्हढे प्रामाणिक लोक टिकाव धरत नाहीत. सहकार्‍यांचे ते एकतात, मान देतात आणि सर्वांना सोबत नेतात. जमिनीवर पाय आहेत आणि अतिशय साधी रहाणी - उच्च विचारसरणी. >>

राफेल कराराबाबत राहुल गांधींच्या सर्व वक्तव्यांमध्ये किती प्रामाणिकपणा आहे?

किंचाळणार्‍या अर्णब ने दिल्ली दंगली बद्दल प्रश्न विचारल्यावर त्यांचे उत्तरात कुठेही त्याने लपवालपवी केली नाही, काँगेसचे काही लोक होते हे मान्य केले आहे. हत्या, त्यानंतरची दंगल चुकीचे होते हे त्यांनी सांगितले. >>>

आणखी राजीव गांधींची हत्या करणाऱ्या लोकांना माफ केले..
गोध्रा हत्याकांडानंतर झालेली दंगल हत्या वगैरे चुकीचे होते हे मोदींनीही "सांगितले". गोरक्षकांनी केलेल्या कृती चुकीच्या आहेत आणि त्याबद्धल राज्य सरकारांनी कारवाई करावी हेही मोदींनी "सांगितले". परंतु मोदींनी सांगितले ते खोटेपणाने आणि राहुल गांधींनी पूर्ण प्रामाणिकपणाने असं तुम्हाला म्हणायचंय का?

आता मोदींना २००२ च्या दंगलीचा प्रश्न विचारा.... ते सरळ हात झटकणार.... निरपराधी लोकांची झालेली हत्या यांची कुठेही जबाबदारी घेतलेली नाही... आजपर्यंत.
याला राजकीय परीपक्वता म्हणायचे का ? >>

निरपराधी लोकांच्या हत्यांची जबाबदारी घेणे म्हणजे नक्की काय? नेहेरु / राजीव / इंदिरा / राहुल यांनी पंजाबेतर भागातील शीख हत्याकांड, १९४८ ला ब्राह्मणांची घरे जाळण्याचे प्रकार, श्रीलंकेतील तामिळ लोकांची हत्या (दहशतवादी असले तरीही) यांची जबाबदारी नक्की कशी घेतली?

गोराक्षसांना चरण्यासाठी मोकाट रान दिले... अरे मग पोलिसांचे काम काय ? >>

या लोकांना नक्की कसा आवर घालता येईल यावर काही उपाय कुणीही सुचवलेला ध्यानात येत नाहीय. त्याचवेळी गायींना चोरून नेण्याचे प्रकार कसे आटोक्यात आणता येतील यावरही उपाय सुचवलं तर बरं होईल.

एका विशिष्ट धर्माच्या १८ कोटी लोकांच्या मनात टोकाची असुरक्षिततेची भावना निर्माण करण्याला राजकीय परीपक्वता म्हणायचे का? >>

हे मत व्यक्तिसापेक्ष आहे. मला १८ कोटी लोकांच्या मनात असुरक्षिततेची भावना दिसत नाही. गोरक्षक मुद्द्यावर नक्कीच नाही. पण ट्रिपल तलाक या मुद्द्यावरून नक्कीच अस्वस्थता आहे.

काळा पैशाविरुद्ध लढायला इच्छाशक्तीचा अभाव आहे हे पदोपदी दिसले. >>

दोन-तीन पदांची उदाहरणे द्याल का?

डोकलाम, पुलवामा- त्याची शिक्षा म्हणुन अतिरेक्यांच्या तळावर केलेले हल्ले, कुठेही मला राजकीय परीपक्वता दिसलेली नाही.>>

डोकलाम , पुलवामा विरूद्ध भारतीय प्रतिसादात राजकीय परिपक्वता नव्हती? मग तुमच्यामते काय करायला हवे होते?

राफेलच्या केस मधे किती लपवा - लपवी सुरु आहे. आधी माहितीची कागदपत्रे चोरीला गेली होती, नाही आता त्यातली माहिती चोरीला गेली. दर-रोज नवे एक ऐकायला / वाचायला मिळते. प्रश्नाला अयोग्य प्रकारे, गलथान पणे हाताळणे याला राजकीय परीपक्वता म्हणायचे का? >>

राफेलच्या केसमध्ये नक्की काय लपवाछपवी चालू आहे आणि कोणापासून माहिती लपवली जात आहे असं तुम्हाला वाटत?

सुप्रीम कोर्ट आणि CAG दोन्ही संस्थांनी ती माहिती वाचलीय. या दोन्ही संस्था मोदींच्या मिंध्या आहेत असं तुमचं मत आहे काय?

राफेल असते तर वेगळे चित्र दिसले असते अशी बालिश प्रतिक्रिया कशी दिली जाते? प्रतिक्रिया देणारी व्यक्ती सर्वशक्तीशाली पंतप्रधान असतील तर?

"राफेल असते तर वेगळे चित्र दिसले असते" >> यात तुम्हाला बालिश नक्की काय वाटलं?

आधी म्हटल्याप्रमाणे... २०१४ च्या आधी देवगौडा सर्वात अकार्यक्षम पंतप्रधान होते असा माझा समज होता... आज देवगौडा नंबर दोन वर आहेत.

हे सापेक्ष मत आहे. माझ्या मते पहिल्या नंबरवर मनमोहन सिंग आहेत.

मायबोली वरच्या तमाम नमोरुग्णांची अवस्था मे मध्ये निकाल लागल्यानंतर खरोखरच वाईट होणार आहे. आजारपण तीव्रतेने उफाळून येणार आहे. त्यात प्रामुख्याने मूळव्याध,बद्धकोष्ठ,स्किझोफ्रेनिया,गळू,हृदयविकार या आजारांचा समावेश असेल.
भारतात रहात असतील तर ठीक आहे. पण दुसऱ्या कोणत्या देशात रहात असतील तर उपचारांचे खर्च परवडणार नाहीत. त्यांनी मे नंतर आयुष्मान भारत योजनेत उपचार करून घ्यावेत हि सूचना देऊन ठेवत आहे.
आयुष्मान योजनेसाठीचे अर्ज स्थानिक सुविधा केंद्रात मिळण्याची सोय केलेली आहे.

मायबोली वरच्या तमाम नमोरुग्णांची अवस्था मे मध्ये निकाल लागल्यानंतर खरोखरच वाईट होणार आहे.

या सगळ्या लोकान्नी वैतागून जीव दिला तर आपल मनोरन्जन कस होइल? देशाच मात्र भल होइल.

Pages