पुलवामा हल्ला आणि भारत पाकिस्तान संबंध

Submitted by हेला on 27 February, 2019 - 10:27

पुलवामा हल्ल्यात आपले ४४ जवान हकनाक मारले गेले. जैश-ए-मोहम्मद ह्या अतिरेकी संघटनेच्या एका आत्मघाती सदस्याने स्फोटकांचा वापर करून crpf च्या ताफ्यावर हल्ला केला. त्यानंतरच्या घडामोडी व त्यानुषंगाने अनेक बातम्या खऱ्या खोट्या येत आहेत. पाकिस्तानी व भारतीय माध्यमे, दोन्ही देशाचे अधिकारी, दोन्ही देशाचे नेते हे काय करत आहेत हे दिसत आहे. सोशल मिडीयावर युद्धज्वर ओसंडून वाहत आहे. ह्या सर्व घटनांचा येत्या निवडणुकांवर परिणाम होणार आहेच.

ह्या सर्व प्रश्नांवर एकत्रित एका ठिकाणी चर्चा करायला हा धागा काढत आहे. मायबोलीच्या नियमात राहून चर्चा करा हि विनंती... वेबमास्टर ह्या धाग्याला कुलूप घालणार नाहीत अशी अपेक्षाही आहेच.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

काँग्रेस आणि विरोधी पक्ष आणि त्यांचे समर्थक दिवसेंदिवस कीव येण्याची हद्द पार करुन भूतदयेच्याही पलीकडे वेगाने वाटचाल करत आहेत असे दिसते आहे, त्यामुळे त्यांच्या थकल्याभागलेल्या मेंदूला आणि गात्रांना अधिक त्रास द्यावा असे वाटत नाही.

कालच्या भाषणात राहुलनी चार वेळा मसूद अझरचं नाव घेतलं. त्यात एकदा , दोभालबाबू सोडायला गेले असं म्हणताना जी लावलं, कारण त्यांना माहीत आहे, भाजप्यांसाठी तेव्हा तो जी'च होता.
आता रविशंकर प्रसाद हाफीज सईदला जी म्हणत असल्याचा व्हि डू आलाय उत्खननातून वर.

पळा पळा कोण पुढे पळे तो.
पण हेच मागच्या अंकात वेगळ्या शब्दांत सांगितलेलंत की? तरी परत एंट्री घेतलीतच.

मी पाहिले विरोधी पक्षांचे आभार मानतो की त्यांच्या मुळे मी परत प्रधान मंत्री बनू शकलो
इलेक्शन नंतर मोदींच्या भाषणात पहिले हे वाक्य आसेल

<< मी पाहिले विरोधी पक्षांचे आभार मानतो की त्यांच्या मुळे मी परत प्रधान मंत्री बनू शकलो
इलेक्शन नंतर मोदींच्या भाषणात पहिले हे वाक्य आसेल >>
-------- होय, पण त्यासाठी किमान २७२ खासदारंचा पाठिंबा मिळायला हवा. पैशांची भली मोठी थैली मोकळी केली आहे. शेकडो कोटी निव्वळ जाहिरातीवर. माल खपण्याची/ विकला जाण्याची शक्यता कमी असेल तर मोठी जाहिरात करावीच लागते.

मित्रो, देश के इतिहास मे पहिली बार एक सांसदजी ने अपने ही पक्ष के विधायकजी को अनेक कॅमेरोंको साक्षी मे रखकर जूतेसे मारा है. विधायक ने भी तत्काल जवाब मे दो तमाचे दिये.... अरे काय चालले आहे हे ? २७२ मधे हा सांसद असेल का?
https://www.youtube.com/watch?v=GtnspNxW3sA

https://www.jansatta.com/national/congress-digs-out-interview-says-ajit-...

हे वाचण्याच्या आधी डोळे का नाही फुटले ?>>>>> खूप वाईट वाटले हे बघुन. खरेच त्याच वेळी अमृतसरला इंधन भरतेवेळी, कमांडोज ( कमांडोज तयार पण होते अ‍ॅक्शन घ्यायला ) आत पाठवले असते, तर हे नराधम त्याच वेळी फासावर लटकले असते. काही वेळेस कठोर व्हावे लगते, ईलाज नसतो. त्या अतीरेक्यांनी धमक्या दिलेल्या असल्या तरी कमांडोज च्या अ‍ॅक्शन च्या वेळेस पाच- पन्नास अजून गेले असते, पण आज जी परीस्थिती आहे ती तरी आली नसती. मला माहीत आहे की त्या पाच पन्नासात मी किंवा माझे नातेवाईक असते तर हे एवढे सोपे वाटले नसते.

काय माहीत, एवढे भिकारी बनुन सुद्धा हे पाकीस्तानी अतीरेक्यांनाच पोसतायत. Angry

मागे दुबईला स्टॉप ओव्हरच्या वेळी एक पाकीस्तानी माणुस भेटला होता. जाम शिव्या देत होता त्यांच्या सरकारला. म्हणाला देशात अनेक प्रांत तुकडे व्हायच्या बेतात आहेत, लोकांना खायला अन्न, पाणी नाहीये तरी यांना युद्धाची पडली आहे. मी माझ्या बायका मुलांना घेऊन आता युरोप नाहीतर अमेरीकेत सेटल होईन पण परत पाकीस्तानात जाणार नाही.

काही वेळेस कठोर व्हावे लगते, ईलाज नसतो. >> दुस-या पक्षाने जर ही कृती केली असती तर भाजप्यांची प्रतिक्रिया काय असती ? स्वतः हा अतिरेकी सोडून इतरांना पाकिस्तानी म्हणताना यांना लाजा वाटतात का ? म्हणून हा आरसा दाखवावा लागतो.

स्वतः हा अतिरेकी सोडून इतरांना पाकिस्तानी म्हणताना यांना लाजा वाटतात का ? म्हणून हा आरसा दाखवावा लागतो.>> जबराट Biggrin

मागे दुबईला स्टॉप ओव्हरच्या वेळी एक पाकीस्तानी माणुस भेटला होता. जाम शिव्या देत होता त्यांच्या सरकारला. म्हणाला देशात अनेक प्रांत तुकडे व्हायच्या बेतात आहेत, लोकांना खायला अन्न, पाणी नाहीये तरी यांना युद्धाची पडली आहे. मी माझ्या बायका मुलांना घेऊन आता युरोप नाहीतर अमेरीकेत सेटल होईन पण परत पाकीस्तानात जाणार नाही.

यात हिंदुस्तानी , भारत घातले तर ?

यात हिंदुस्तानी , भारत घातले तर ?
भारत हा युद्धखोर देश नाही ह्याच तर दुखणं आहे .आणि त्यामुळेच शेजारी सुसाट सुटलेत

मला माहीत आहे की त्या पाच पन्नासात मी किंवा माझे नातेवाईक असते तर हे एवढे सोपे वाटले नसते.
अपहरण केलेले विमान यात्री ची सुटका झाल्यानंतर तरी सरकार लष्करी कारवाई करू शकले असते आणि त्याला नाईलाजाने का होईना जगाला पाठिंबा देणे भाग होते .
पण आशा प्रकारची कारवाई सुधा वाजपेींनी कराविशी वाटली नाही .
ते सुदा शांततेचे भक्त फक्त होते .अहिंसावादी

यात हिंदुस्तानी , भारत घातले तर ?>>>> तुम्ही घालुन बघा. Proud कारण मला भेटलेला पाकीस्तानी होता, भारतीय नव्हता.

<< जाम शिव्या देत होता त्यांच्या सरकारला. म्हणाला देशात अनेक प्रांत तुकडे व्हायच्या बेतात आहेत, लोकांना खायला अन्न, पाणी नाहीये तरी यांना युद्धाची पडली आहे. मी माझ्या बायका मुलांना घेऊन आता युरोप नाहीतर अमेरीकेत सेटल होईन पण परत पाकीस्तानात जाणार नाही. >>

------- अगदी असाच अनुभव माझाही आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, "स्वातंत्र मिळाल्यावर पाकिस्तानला भारता सारखे नेतृत्व (म्हणजेच जवाहरलाल मोतीलाल नेहरु) मिळाले नाही हे आमचे दुर्दैव, तुम्ही लोक नशिबवान आहात ".

जैशच्या बालकोटमधील तळावर मध्यभागी एक मशीद होती. एअर स्ट्राइकमध्ये या मशिदीचे काहीही नुकसान झालेले नाही. भारताने मशिदीला कुठलाही धक्का न लावता हा हल्ला केला. त्यावरुन एअरस्ट्राइकच्या अचूकतेची कल्पना येते.  हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे. या कारवाईत नेमके किती दहशतवादी ठार झाले त्याबद्दल अहवालात कुठलीही ठोस माहिती दिलेली नाही. जैशच्या तळावर एक गेस्ट हाऊस होते. जैशचा म्होरक्या मसूद अझहर त्याचा भाऊ अब्दुल रौफ अझहर आणि जैशचे कमांडर इथे थांबायचे.

पाच दिवस आधी २६३ मो. फोन होते... कारवाई नंतर सगळेच मो. फोन बंद पडले. असे केव्हा होण्याची शक्यता आहे?
हृदय बंद पडल्यावर व्यक्ती गेली आहे असे डॉक्टर सांगतात.... आता इलेक्ट्रॉनिक युगात मोबाइल बंद पडल्यावर अतिरेकी मारले गेले असावेत असे लॉजिक असेल.
मी EXCEL-2018 वापरुन उत्तर काढले आहे, J9 या सेल मधे २६३ हा आकडा rounding केल्यावर ३०० उत्तर मिळाले....
S_2019.jpg

मशिदीला धक्का लागला नाहीच. जे लोक प्रार्थना करत होते त्यांना पण धक्का लागला नाही. ज्यांच्या जवळ शस्त्रे (ए के ४६, ४७, ५६) आहेत, स्फोटके आहेत अशाच व्यक्तींना टिपले आहे. लेझर गायडेड म्हणजे अगदी ३ से. मी. अचुकतेने लक्ष्यावर मारा करण्याची क्षमता.

सर्व हास्यास्पद होत चालले आहे. कंदाहारच्या वेळेला विरोधी पक्षा सोबत चर्चा केली होती तर मग या वेळेला काय झाले? असे हास्यास्पद खुलासे, खोट्या बातम्या पसरवल्यावर आणि ते बॅक फायर झाल्यावर पडझड थांबवण्यासाठी अजुन खोटे...

शब्दांची फिरवा - फिरवी च्या बाबतीत यांना कुणी हरवणार नाही असा यांचा समज आहे. जगाबद्दलचे प्रचंड अज्ञान आहे हे अजुन एकदा प्रकर्षाने जाणवले.

भारत हा युद्धखोर देश नाही ह्याच तर दुखणं आहे .आणि त्यामुळेच शेजारी सुसाट सुटलेत

ऑ ? अजून युद्धखोर झाला नाही ? 5 वर्षे झाली ना सत्ताबदल होऊन ?

अडचणीत आल्यावर एक सामंजस्यवादी येतो. मग तो विशाल अंतःकरणाने म्हणतो, जाऊ द्या हो जाऊद्या... जाता जाता पुन्हा भाजपची कशी मजबुरी होती याची टेप चिकटवून जातो.
मग हल्ल्याची संधी मिळाली की पिसाळलेला येतो. भुंक भुंक भुंकण्याचा प्रयत्न करतो. त्यामागे तर्कदुष्टता, प्रचंड अज्ञान आणि नाकलन या गोष्टी असतात.
ते बॅकफायर व्हायला लागलं की मग एक जण येतो. तो अशुद्ध मराठीत वायझेड प्रतिसाद लिहू लागतो. कशाचा कशालाच संबंध नाही.

Pages