पुलवामा हल्ला आणि भारत पाकिस्तान संबंध

Submitted by हेला on 27 February, 2019 - 10:27

पुलवामा हल्ल्यात आपले ४४ जवान हकनाक मारले गेले. जैश-ए-मोहम्मद ह्या अतिरेकी संघटनेच्या एका आत्मघाती सदस्याने स्फोटकांचा वापर करून crpf च्या ताफ्यावर हल्ला केला. त्यानंतरच्या घडामोडी व त्यानुषंगाने अनेक बातम्या खऱ्या खोट्या येत आहेत. पाकिस्तानी व भारतीय माध्यमे, दोन्ही देशाचे अधिकारी, दोन्ही देशाचे नेते हे काय करत आहेत हे दिसत आहे. सोशल मिडीयावर युद्धज्वर ओसंडून वाहत आहे. ह्या सर्व घटनांचा येत्या निवडणुकांवर परिणाम होणार आहेच.

ह्या सर्व प्रश्नांवर एकत्रित एका ठिकाणी चर्चा करायला हा धागा काढत आहे. मायबोलीच्या नियमात राहून चर्चा करा हि विनंती... वेबमास्टर ह्या धाग्याला कुलूप घालणार नाहीत अशी अपेक्षाही आहेच.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

या सगळ्या लोकान्नी वैतागून जीव दिला तर आपल मनोरन्जन कस होइल? देशाच मात्र भल होइल.
काय कमेंट आहे .
आशि कमेंट येणे हे पण साहजिक आहे .लोकशाही ही आपण दुसऱ्या देशाची चोरली आहे .पण आपण लोकशाही च्या अजुन पण लायक नाही आणि पुढचे 1000 वर्ष तरी भारतातील सर्व लोकांना लोकशाही काय आहे हे समजायला जाईल .
ऐक व्यक्ती ऐक मत ही पद्धत खरोखर बदली पाहिजे.
मतदान चा अधिकार सुधा परीक्षा घेवून त्या परीक्षेत पास झाला तरच दिला पाहिजे .

रश्मी ताई. बालाकोटमध्ये हल्ला झालाच नाही किंवा झाला तर भारतीय सेनेने फक्त काही झाडे पाडली असल्या अक्षांश रेखांशरहित थोतांड बातम्यांवर आपण विश्वास ठेवत नसाल तर या व्हिडीओवरही ठेवू नका. पाकिस्तानने अजून एकही पत्रकाराला त्या जागेवर जाऊ दिलेले नाही यातच सगळ आल.

बाकी कुठली सत्यता तपासून पाहूदे वा नको पण त्या व्हिडिओची "सत्यता" मीडिया तपासून पाहतेय !

मी नुकताच माझ्या आध्यत्मिक शक्तीने ध्यान लावून त्या ठिकाणी जाऊन आलोय, आणि मला सांगायला अभिमान वाटतोय की मोदींनी खरोखर त्या ठिकाणी हल्ला करून 250 अतिरेकी मारलेत, आणि या वर्षीच्या निवडणुकीत मोदीच जिंकून येणार आहेत, असे दोन शब्द बोलून मी माझे उपोषण मोसंबी ज्युस पिऊन सोडत आहे.

२६३ हा आकडा खरा वाटू लागला आहे. आता सगळेच खरे बोलत असतील तर एक शक्यता आहे जी कुणीही विचारात घेतलेली नाही.
आपली विमाने एअरस्ट्राईक साठी गेली. त्यांनी बाँब टाकला. तो डोंगराच्या पायथ्याच्या दिशेने जातो आहे हे पाहताच जैश च्या त्या तळाचा म्होरक्या म्हणाला "अरे , बघता काय झेला तो बॉल " आणि मग काय..
सगळे अतिरेकी तो गोळा झेलायला जिवाच्या आकांताने खाली धावले. इतक्यात दुसरा बाँब आला. अजून काही धावले. तिसरा आला. अजून काही. असे सगळे खाली बंजी जंपींग करून गेले आणि बाँब झेलायच्या नादात मरण पावले.

रश्मी ताई. तो विडीओ बालाकोट शी संबंधित नाही.>>>>> ओके !!

रश्मी ताई. बालाकोटमध्ये हल्ला झालाच नाही किंवा झाला तर भारतीय सेनेने फक्त काही झाडे पाडली असल्या अक्षांश रेखांशरहित थोतांड बातम्यांवर आपण विश्वास ठेवत नसाल तर या व्हिडीओवरही ठेवू नका. पाकिस्तानने अजून एकही पत्रकाराला त्या जागेवर जाऊ दिलेले नाही यातच सगळ आल.>>>>>> पाकडे ( आता बिपीनचंद्र माझ्या नावाने ओरडत आले तरी चालेल ) आतापर्यंत कधी खरे बोलले आहेत की ते आता बोलतील. भरीस भर त्यांच्या बाजूने ते पिचपिचे आहेतच त्यांना साथ द्यायला. कारण आता पिचपिचे भारताला सबळ पुरावे मागतायत मसुदला आरोपी सिद्ध करायला.

बाकी कुठली सत्यता तपासून पाहूदे वा नको पण त्या व्हिडिओची "सत्यता" मीडिया तपासून पाहतेय !>>>>> ओके !!

आम्ही airstrike केला आणि त्या airstrike मध्ये 350 अतिरेकी मारले गेले .
आणि अशा प्रकारची कारवाई करण्याची धमक bjp सरकारनी दाखविली आहे .विरोधी पक्ष केंद्रात सत्तेवर असताना देशावर खूप सारे अतिरेकी हल्ले झाले पण तेव्हाच्या सरकारने देश हित बाजूला ठेवून बोटचेपे धोरण स्वीकारले .
पण विरोधी पक्ष airstrike var शंका उपस्थित करून पाकिस्तान ल मदत होईल अशी भूमिका घेत आहे .
राष्ट्रहितासाठी काही माहिती गुप्त ठेवणे गरजेचं आहे त्यामुळे सरकार airstrike Che पुरावे जाहीर करू शकत नाही .
ही bjp ची स्टेटमेंट खूप झाली

<<राहुल गांधी यांचा मोठा प्लस पॉइंट म्हणजे व्यक्ती प्रामाणिक आहे. राजकारणात एव्हढे प्रामाणिक लोक टिकाव धरत नाहीत. सहकार्‍यांचे ते एकतात, मान देतात आणि सर्वांना सोबत नेतात. जमिनीवर पाय आहेत आणि अतिशय साधी रहाणी - उच्च विचारसरणी.>>>
अरे अजून कीती चापलुसी करणार , राहुल गांधी ह्यांची साधी राहणी आणि बँकॉक ला सुट्टी , अमेरिकेत सुट्टी, युरोप मध्ये सुट्टी काय पार्टी ने स्पॉन्सर केले होते का . अरे तो माणूस खरंच जर हुशार असता तर १० वर्ष सरकार मध्ये असताना एखाद मंत्रिपद सांभाळून दखवला असत .. एक तरी गोष्ट सांगा जी राहुल गांधी मुळ देशात लोकांच्या आयुष्यात बदल घडवून गेली. काँग्रेस मध्ये दुसरे लायक उमेदवार नाहीत का कि राहुल गांधी ला पार्टी चा प्रमुख बनवले.

बाकी विषय हा आहे कि भारत आणि पाकिस्तान चे संबंध काय राहतील. काँग्रेस आयटी सेल चे लोक फिरून फिरून मोदी वरच येणार..

राजेशभाऊ, व्यक्तिगत हल्ले आणि असंबद्ध विनोद सुरु झाले कि समजायचं कि समोरच्याकडे वाद घालायला काही मुद्दा शिल्लक नाही किंवा समोरच्याला स्वतःला तोंडघशी पडण्याची जाणीव झालेली आहे किंवा तसे भविष्य दिसत आहे . मोठ्या मनाने माफ करून टाका..

राजेश १८८ चला गप्पा मारू.
पृथ्वीचं वय किती आहे ? ती कशी बनली ? इथपासून सुरू करूयात.

ओहो आता लक्षात आले... हा शष्प जेव्हा दुसऱ्यांच्या अकला बुद्धी काढत असतो तेव्हा त्याच्याकडे मुद्दे नसतात म्हणून. अब एक पे कायम रेणा .........

<< राफेल कराराबाबत राहुल गांधींच्या सर्व वक्तव्यांमध्ये किती प्रामाणिकपणा आहे? >>
------ ते विरोधी पक्षनेते आहेत, त्यांच्या शंकांचे निरसन करण्याचे काम सरकारचे आहे. काही प्रश्न निरर्थक असतील तर कालांतराने लोकांना कळेलच.
पण आज तरी सरकारी बाजू लंगडी दिसत आहे. आज एक, उद्या दुसरे. आज कागद हरवले, उद्या माहिती हरवली. अरे तुम्ही साधी माहिती सुरक्षित नाही ठेवत तर देश कसा ठेवणार?
फ्रांसचे माजी राष्ट्राध्यक्ष यांनी सप्टेबर २०१८ मधे सांगितले ह्तो होते "फ्रांस सरकारने रिलायंसचे नाव नॉमिनेट करावे यासाठी भारत सरकारने आग्रह धरला" त्यांच्याच शब्दात "We did not have a say in this."
ते खोटे बोलत असतील अशी एक शक्यता आहे. पण माझे सरकार दर -दिवशी शब्दांची फिरवा फिरवी करते... कुणावर जास्त विश्वास ठेवायचा ?
---------------------

<< गोध्रा हत्याकांडानंतर झालेली दंगल हत्या वगैरे चुकीचे होते हे मोदींनीही "सांगितले". गोरक्षकांनी केलेल्या कृती चुकीच्या आहेत आणि त्याबद्धल राज्य सरकारांनी कारवाई करावी हेही मोदींनी "सांगितले". परंतु मोदींनी सांगितले ते खोटेपणाने आणि राहुल गांधींनी पूर्ण प्रामाणिकपणाने असं तुम्हाला म्हणायचंय का? >>
-------- गोराक्षरांनी केलेली कृती चुकीची आहे हे सांगायला अनेक दिवस /आठवडे लागतात.... त्यांनी सांगितले, मान्य पण मग रिझल्ट काय ? निरपराधी लोकांना मारणे थांबले नाही... किती ? १ -२ घटना नाही... तब्बल पन्नास हत्या/ हल्ले झाले आहेत.
अगदी पोलीसांना लक्ष करण्यापर्यंत या राक्षसांचे धाडस वाढले आहे. आता अगदी अलगद पणे प्रत्येक प्रकरणावर पडदा पडेल. काही प्रकरणांमधे पडला आहे, काही मधे प्रक्रिया सुरु आहे ... उ प्र. मधे पोलीस अधिकार्‍याची हत्या केल्याचा आरोप असणार्‍या व्यक्तीच्या घरच्यांनी 'हत्यार नंतर पोलीसांनी ठेवले'.

राजकीय इच्छा शक्ती असेल तर निरपराध्यांवरिल असे हल्ले २४ तासात थांबण्याचे कसब मोदी/ भाजपा / संघ परिवारात आहे. तसा मेसेज अजुन मिळाला नाही. तसा Strong मेसेज मिळाला असता तर.... वेगळे चित्र बघायला मिळाले असते.
---------------------

पहिले तर bjp समर्धक आणि काँग्रेस समार्धक हा शब्द योग्य नाही .
त्या ऐवजी airstrike झाला आणि दहशत वादी मारले गेले असे समजणारे आणि तशी मत व्यक्त करणारे mybolikar परिवाराचे सदस्य आणि airstrike झालाच नाही अतिरेकी मेलेचं. नाहीत अशी मत व्यक्त करणारे mybolikar परिवाराचे सदस्य असे विभाजन करावे ही विनंती .
इथे सर्व संभावित मुद्यावर चर्चा झाली आहे फक्त ह्याच विषयाशी संबंधीत आलेला मुद्दा पाकिस्तान मीडिया ची भूमिका ह्या विषयात काय होती आणि पाकिस्तानच्या विरोधी पक्षांची भूमिका काय होती ह्या वर चर्चा झाली नाही ती सुधा झाली पाहिजे .
मध्ये मी त्या संदर्भात पोस्ट टाकली होती पण आपल्याच सन्माननीय सदस्यांनी ती उडवून लावली

सध्या मसूद अझहर वरुन वातावरण तापलेले आहे आणि मसुद अझहरला कुणि सोडले असा प्रश्न विचारला जातोय. त्यावर तो निर्णय सर्वपक्षीय बैठकीत सहमतीने घेण्यात आला होता असे उत्तर भाजप समर्थकांकडून आले.

खालील पोस्ट मी एका ठिकाणी वाचली. जाणकार हि माहिती खरी कि खोटी हे सांगतील का? संबंधित प्रकरणात कुणी काय भूमिका घेतली यापेक्षा निर्णय काय होता यावर सध्या लक्ष केंद्रित करूया.

१) डिसेंबर १९८९ मुफ्ती महंमद सईद यांच्या कन्येच्या सुटकेसाठी ५ अतिरेकी सोडले -पंतप्रधान व्हि पी सिंग

२) जानेवारी १९९२ गुलाम नबी आझाद यांच्या मेव्हण्यासाठी ३ अतिरेकी सोडले - पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव

३) आॅगस्ट १९९१ सैफुद्दीन सोज यांच्या मुलीच्या सुटकेसाठी १ अतिरेकी सोडला - पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव

४) आॅगस्ट १९९१ इंडियन ऑइल चा अधिकारी के दोराईस्वामी यांच्या सुटकेसाठी ६ अतिरेकी सोडले - पंतप्रधान - पी व्ही नरसिंहराव

५) मार्च १९९२ काश्मीरचे माजी मंत्री मीर लाजसन यांच्या मुलाच्या व ए के धर शास्त्रज्ञ ,टी के रैना यांच्या सुटकेसाठी ७ अतिरेकी सोडले - पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव

<< "राफेल असते तर वेगळे चित्र दिसले असते" >> यात तुम्हाला बालिश नक्की काय वाटलं? >.
------ संसदेत जे पांतप्रधान या विषयावर उत्तरे देणे टाळतात, चर्चेतही भाग घेत नाही आणि बाहेर राफेलचे मार्केटिंग करत आहे असे चित्र देशाच्या पंतप्रधान पदाला शोभत नाही.

या वक्तव्याचे टायमिंग अगदीच चुकीचे आहे. येथे ते आपल्या सैन्याच्या / जवानांच्या क्षमते बद्दल त्यांच्या शौर्य बहादुरी बद्दलच शंका घेत आहेत. तसा उद्देश नसेलही. असे मान्य करणे म्हणजे आपण अतिरेक्यांचा/ दहशतवाद्यांचा सामना करण्यात कमी पडलो अशी अस्पष्ट कबुली देणे आहे.

युद्ध/ लढाई सैन्याच्या केवळ बहादुरीवर जिंकल्या जाते... कुठली शस्त्रे हातात आहेत या वरुन नाही. तुकाराम ओंबळे यांच्या कडे असे कुठले मोठे शस्त्र होते जेव्हा त्यांनी कसाबच्या हातात AK ४७ असतांना त्याच्या वर झडप घातली ? साधी लाठी. जेव्हा २० गोळ्या शरिरात गेल्या पण पकड सुटली नाही, अनेकांचे प्राण वाचवले... आणि शेवटी त्याला पकडण्यात/ अटक करण्यात यश आले.

अभेद्य समजली जाणारी पॅटन रणगाडे (१९६५ युद्ध).... शेवटी भेदली गेलीच... कशी ? शस्त्रे बाजारत विकत मिळतात... पण बहादुरी मिळत नाही.

जाणकार हि माहिती खरी कि खोटी हे सांगतील का? >>
असे लिहून वाटेल ते चिकटवले की जबाबदारी संपली, नै का?

असे लिहून वाटेल ते चिकटवले की जबाबदारी संपली, नै का?

अजिबात नाही, मी ही गुगलुन माहीतीत थोडी भर घालीन. ते मी जाणकारांना उद्देशून लिहिलंय, तुम्ही मनावर घेउ नका.

उदय भाउ

युद्ध/ लढाई सैन्याच्या केवळ बहादुरीवर जिंकल्या जाते. कुठली शस्त्रे हातात आहेत यावरुन नाही याबद्धल तुम्ही शहिद झालेल्या ओंबळेंचे व जिवंत राहिलेल्या कसाबचे उदाहरण दिले. पुस्तकी दुनियेत अशी उदाहरणे चालतात. प्रत्यक्ष व्यवहारात ज्याच्याकडे चांगली हत्यारे तोच जिंकतो. खास करून सध्याच्या युगात जिथे तंत्रज्ञान युद्धाचे स्वरूप ठरवते. १९६२ च्या युद्धात चीनच्या मध्यम क्षमतेच्या मशिनगन भारतीय हलक्या क्षमतेच्या मशीनगन्स ना भारी पडल्या त्या बहादुरी कमी असल्यामुळे नक्कीच नसाव्यात.

ते विरोधी पक्षनेते आहेत, ( मला वाटलं कि खर्गे आहेत! कारण ते त्या सीबीआय प्रमुखाच्या निवडणुकीच्या पॅनल वर होते ना? )
काही प्रश्न निरर्थक असतील तर कालांतराने लोकांना कळेलच. पंतप्रधानांनी हवाई दलाकडून ३०००० कोटी हिसकावून घेतले नि अंबानीला दिले हे वाक्य तुम्हाला खरं वाटत असावं कदाचित. किंवा राफेलचे कागदपत्र पर्रीकरांच्या बेडरूम मध्ये आहेत हे वाक्य.? किंवा मग अजित डोवाल मसूद अझहरला सोडायला स्वत: गेले होते हे वाक्य? अशी खोटी माहिती राहुल गांधी का पसरवत आहेत? हि गंभीर बाब नाहीय का?

कागदपत्रांच्या कॉपी ची चोरी आणि माहिती लीक होण्याच्या प्रकरणासंबंधित सरकारने आजच सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलेय. ती बातमी सविस्तर वाचावी.

राजकीय इच्छा शक्ती असेल तर निरपराध्यांवरिल असे हल्ले २४ तासात थांबण्याचे कसब मोदी/ भाजपा / संघ परिवारात आहे. >> ते कसं काय बुवा?

गोध्रा हत्याकांड आणि त्यानंतरची गुजरात दंगल व त्यातील हत्याकांडाविरुद्ध मोदींनी दर्शविलेले निषेध याबाबत तुम्ही काहीच लिहिले नाही. ते खोट बोलण आहे का?

https://jagatapahara.blogspot.com/2019/03/blog-post_12.html?m=1

मसूद अझहरला सोडण्याचा निर्णय सर्वपक्षिय बैठकीच्या संगनमताने झाला होता.. त्यासाठी एकट्या वाजपेयी किवा भाजपा सरकारला दोष देण्यात अर्थ नाही..

सगळेच राजकारणी सारखेच..पण राहुल गांधीसारख्या माकडाच्या हाती सत्ता देण्यापेक्षा मोदी केव्हाही चांगलेच. .मोदी राहुलशिवाय एक नवा पर्याय हवा...

टीप...मी कुठल्याच पक्षाचा समर्थक किंवा विरोधक नाही..हे माझं फक्त व्ययक्तीक मत आहे ...

संसदेत जे पांतप्रधान या विषयावर उत्तरे देणे टाळतात, चर्चेतही भाग घेत नाही आणि बाहेर राफेलचे मार्केटिंग करत आहे असे चित्र देशाच्या पंतप्रधान पदाला शोभत नाही.-
राफेल च्य मुद्द्या वर निर्मला सीतारामन ह्यांनी मुद्देसुत उत्तर दिली आहेत ना संसदेतच मग ती का नाही मान्य केली , का समजली नाही राहुल गांधी ना , मोदींनी सुद्धा संसदे मध्ये बोलले आहेत कि कुठलाही घोटाळा झाला नाही तरी पण मन भरला नाही, मग सर्वोच्च नायालयाने सांगितले तरीही मन भरले नाही , मग कॅग ने सांगितले तरीही मन भरले नाही , आता तुम्हीच सांगा त्यांना एकदा,..नाही तर आम्हाला रोज ३० हजार , ४० हजार, ४५ हजार करोड असे आकडे ऐकावं लागेल ..

देशाच्या पंतप्रधान ला चोर म्हणणे सोपे आहे कारण लोकशाही आहे ,पण ते सिद्ध करून दाखवायचा ना .. स्वतः आधीच बेल वर बाहेर आहे, न्यायालयाने नॅशनल हेराल्ड ला दिल्ली मधली इमारत सरकार जमा करायला सांगितली जी AJL ने यंग इंडिया ज्याचे शेअर गांधी फॅमिली कडे आहे त्यांना आंदण केली होती ..
https://www.indiatoday.in/india/story/national-herald-ajl-eviction-heral...

National herald case भारतीय सरकारच्या मालमत्तेशी संबंधित आहे का? करदात्यांचे पैसे चोरलेत का तिथे? सरकरिपदाचा गैरवापर? नक्की काय कोणी सांगेल का?

https://en.wikipedia.org/wiki/AJL-National_Herald_Panchkula_land_grab_scam

the Congress government gave the National Herald 3,500 square meters of plot number C-17 in Sector 6 of Panchkula in Haryana in 1982 [during Bhajan Lal's Indian National Congress rule] to publish a newspaper, but for ten years, there was no newspaper published from here. Hence, as per the rules the land should have been returned to the government, but the ownership was illegally transferred to AJL/National Herald by Hooda government in 2013. This case and National Herald's possession of INR 2000 crores worth land are being currently investigated by the Central Bureau of Investigation Against the advise of HUDA officials to re-advertise the plot for auction and to honor the legal precedence/remembrance (prior rejections of AJL's application for the re-allotment), HUDA re-allotted it to AJL in 2005 at the original 1982 rates with interest

काँग्रेस ने त्यांच्या कार्यकाळात हि जमीन AJL ला पेपर काढण्यासाठी म्हणून दिली होती, पण दहा वर्ष तिथे काहीही केले नाही , कायद्यानुसार हि जमीन परत अदीग्रहीत करण्याची जबाबदारी सरकारची होती पण सरकार काँग्रेस चे होते , त्यांनी जमीन ताब्यात घेतली नाही आणि नंतर AJL ने यंग इंडिया नावाच्या कंपनी ला त्यांचे ९९% शेअर्स अतिशय स्वस्त दारात विकले, हि यंग इंडिया कंपनी गांधी फॅमिली ची आहे , ह्या AJL चे असे देशभरात जी मालमत्ता आहे त्याची एकूण बाजार भावात किंमत अरबो रुपयांमध्ये आहे , जी मालमत्ता सरकारी म्हणजेच करदात्याची आहे .. हे फक्त एक उदाहरण आहे काँग्रेस च्या लुटीचे ..पीक ऑफ आईसबर्ग ..

पुलवामाशी संबंधित घडामोड, चीन ने चौथ्यांदा खोडा घातला आहे. >>
चला म्हणजे मोदींच्या आंतरराष्ट्रीय मुसद्देगिरीवर टीका करायला आणखी एक पॉईंट मिळाला. आता फक्त दिवस मोजतोय केव्हा राहुलजी यावर दोन मोलाचे शब्द बोलतील याची.

Pages