काकबळी

Submitted by pintee on 4 March, 2019 - 02:29

श श क ( शत शब्द कथा ) लेखनाचा हा पहिलाच प्रयत्न आपल्या सूचनाचे स्वागत
आकाशात घोंघावणार्या कावळ्यांकडे प्राची विमनस्कपणे बघत होती.पुन्हापुन्हा तिची नजर पिंडावर जात होती. व्यथित असणारे नातेवाईक कुतूहल,आशा,चिंता,अपराधीपण अशा भावनेत बुडून गेले होते.त्यांची कुजबुज चालू होती. या सगळ्यापासून अलिप्त असणाऱ्या आप्पांकडे बघताना तिचे मन कडवट विचाराने भरून गेले.नजर जमिनीत रुतवून ते निश्चलपणे उभे होते.नेहमीसारखाच त्यांच्या मनाचा थांग कोणालाच लागत नव्हता . यांच्यामुळेच सुखापासून फारकत झाली तिची. कुणाकडे जाण्याचे स्वातंत्र नाही की मोकळेपणाने बोलण्याचे समाधान नाही.पुन्हा एकदा नव्याने तिला उमाळा आला.जन्मभर बिचारी त्यांच्याच तालावर नाचत होती.कशा आधीच्या पिढीतील बायका जाच सहन करायच्या, तिला नव्याने प्रश्न पडला.

तेवढ्यात “आशा...” आप्पाचा करडा स्वर पुन्हा कानावर आला.आणि पिंडाच्या रोखाने एका कावळ्याने सूर मारला

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान कथा ...
केवळ योगायोग माझ्या आगामी कथेतले एक ग्रामीण पात्र म्हणते...
आवं ते सरकारी बेनं तलाठी वर वर चांगली खादीची कापडं घालतं पण म्हणतयं खा आधी. आवं आमच्या गावातलं तलाठी गचाकलं . दहाव्याला पिंडाला कावळा शिवना. तवा त्याचा तलाठी लेक उठला आन म्हणला आजवर सातबारा द्यायला ५० घ्यायचो आता तुमच्या वाट्याचं आजून ५० घील, तवा कावळा लगीच शिवला. आता हाय का ख-याची दुनिया.

Pages