१६६५च्या मार्च महिन्यात शिवाजीराजे मराठा आरमाराची पहिली मोहीम संपवून गोकर्ण महाबळेश्वर येथे पोचले होते. मराठा हेरांनी पक्की बातमी आणली. मिर्झाराजा जयसिंग लाखभर फौज घेऊन स्वराज्यावर चालून येतोय. राजांनी घाईघाईने राजगड गाठला. औरंगाबादहून निघालेल्या शाही फौजा सासवडला पोचल्या होत्या. २९ मार्च रोजी पुरंदरला वेढा पडला. १५ दिवस घमासान लढाई झाली. १४ एप्रिल रोजी पुरंदरचा जोडकिल्ला वज्रगड मुघलांनी काबीज केला. आता अंतिम लढाई सुरु झाली होती. किल्लेदार मुरारबाजी यांनी जीवाची बाजी लावली. मराठा इतिहासामध्ये ते अमर झाले. आजही तुम्ही कधी पुरंदरला गेलात तर मुरारबाजींचा पुतळा बघून त्यांच्या शौर्याची गाथा कळते. किल्लेदाराबरोबर किल्लाही पडला.
तह व्हायच्या आधी शिवाजीराजांनी मिर्झाराजाला एक पत्र पाठवले होते. या पत्रामधून तत्कालीन परिस्थितीचे आणि शिवरायांच्या मन:स्थितीचे यथार्थ चित्रण झाले आहे. हे पूर्ण पत्र वाचावे असेच आहे. पत्रामध्ये राजे म्हणतात,"तुर्काचा जवाब तुर्कितच दिला पाहिजे."
सर्वत्र सुरु असलेल्या परिस्थितीचा अंदाज घेऊन राजांनी मुघलांशी तह करायचे ठरवले. पुरंदरचा तह घडला. १६ वर्षात जे कमावले ते सर्व या तहात राजांनी गमावले. लढण्याची किमान ताकद शिल्लक राहिली होती. सोबत होती ती फक्त प्रचंड आत्मविश्वासाची, निर्धाराची, जिजाउंच्या आशीर्वादाची आणि स्वराज्यस्वप्न साकार करायचेच ह्या ध्येयाने झपाटलेल्या सोबतींची. तहानंतर शिवाजीराजे कुतुबशहा आणि आदिलशहाच्यासाथीने मुघलांविरुद्ध संयुक्त आघाडी उभी करतील अशी भिती मिर्झाराजाला होती म्हणून त्याने बादशहाला कळवले की 'कुठल्याही परिस्थितीत शिवाजीला आपल्याकडे वळवून घ्यायला हवे. त्यासाठी मी शिवाजीला आपल्या दरबारी पाठवत आहे.' मिर्झाराजाने राजांना आग्रा येथे जाण्यास तयार केले आणि त्याप्रमाणे ५ मार्च १६६६ रोजी राजे आग्रा येथे जाण्यास निघाले. स्वतःच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त खुद्द औरंगजेबाने त्यांना पत्र पाठवून आमंत्रित केले होते. 'मनात कुठलीही चिंता किंवा शंका न ठेवता मला भेटायला या. आपला येथे सत्कार केला जाईल आणि तुम्हाला पुन्हा दख्खनेत जाण्याची मुभा असेल.' मजल-दरमजल करत शिवाजीराजे १२ मे रोजी तेथे पोचले.
................ आणि 'दिवाण-ए-खास' मध्ये जे घडले तो इतिहास आहे.
जोगळेकर त्यांच्या सह्याद्री ग्रंथात म्हणतात,''आग्र्याच्या किल्ल्यात कोणाची मर्दुमकी प्रकट झाली असेल तर ती श्री शिवछत्रपति महाराजांची. धन्य त्यांची की मोगल साम्राज्य वैभवाच्या कळसावर व सामर्थ्याच्या शिखरावर असताना आणि स्वतः एकाकी असताना त्यांनी शहेनशहाचा जाहीर निषेध केला. धन्य त्यांची की हे वैभव पाहून स्वदेशी परत आल्यावर त्यांनी मोगलांचे अनुकरण करून रंगमहल उठवले नाहीत, तर त्यांच्या प्रतिकारासाठी, त्यांच्याच मूलखातून गोळा केलेल्या लूटी मधून, स्वदेशाच्या स्वातंत्र्य-साधनेसाठी जागोजागी दुर्गम दुर्ग उभारले."
परिणाम ठरलेला होता. राजे नजरकैदेत टाकले गेले. अर्थ स्पष्ट होता. मृत्यू.... कधी? केंव्हा? कसा? काहीच ठावूक नव्हते. दख्खनेतून जयसिंगने 'शिवाजीस मारू नये. तसे केल्यास इकडे परिस्थिती हाताबाहेर जाईल पण इकडे सुद्धा येऊ देऊ नये' असे पत्र औरंगजेबाला पाठवले. औरंगजेबाने राजांना काबुल मोहिमेवर पाठवायचे ठरवले. अर्थात राजांनी बादशहाची कुठलीच गोष्ट मानायला साफ नकार दिला. परिस्थिती अधिक बिकट होत होती. कुठल्याही क्षणी आपला मृत्यू समोर येईल हे राजांना ठावूक होते. अखेर एक योजना आखली गेली. थरारनाट्य ठरले. राजांबद्दल आग्र्याच्या बाजारात अफवा पसरत होत्या. खुद्द जसवंतसिंग औरंगजेबाला सांगत होता. 'शिवाजीकडे दैवी शक्ती आहे. तो १४-१५ हात लांब उडी मारू शकतो. एका फटक्यात ४०-५० कोस अंतर तो चालून जातो.' दुसऱ्या दिवसापासून बादशाहने स्वतःभोवतीची सुरक्षा अधिक वाढवली. राजांबरोबर असलेले संभाजीराजे मात्र नजर कैदेत नव्हते. त्यांना फिरायला मुभा होती. त्यांच्या सोबत सर्जेराव जेधे आग्र्याबद्दल इत्यंभूत माहिती काढत. योजना हळूहळू पुढे सरकत होती. ७ जून रोजी राजांनी सोबत असलेल्या सर्व सेवक आणि सैन्याला परत दख्खनेत पाठवून दिले. सोबत होते फक्त संभाजीराजे, हिरोजी फर्जंद, सर्जेराव, रघुनाथ बल्लाळ कोरडे, त्र्यंबक सोनदेव डबीर आणि मदारी मेहतर.
१७ ऑगस्ट १६६६. दिवसा-ढवळ्या, १००० सैनिक खडा पहारा देत असताना राजे नजरकैदेतून पसार झाले. ते नेमके कसे निसटले ह्याबाबाबत कुठलाच ठोस पुरावा उपलब्ध नाही. 'मिठाईचा पेटारा'ची कथा जी काल्पनिक आहे ती मुघली कागदपत्रांमधून घेतलेली आहे. औरंगजेबाने शोध मोहीम काढली. पण आता खूप उशीर झाला होता. एक थरारक पलायन यशस्वी झाले होते. राजांनी मुघलांची शेवटची चौकी २० ऑगस्ट रोजी चक्क खोटे दस्तक दाखवून पार केली. चौकीदार होता लातिफखान. औरंगजेबाला जेंव्हा हे कळले तेंव्हा त्याने 'लातिफखान बेवकूफ है' असे उद्गार काढल्याची नोंद मुघल कागदपत्रांमध्ये आहे. आता संभाजीराजांना मथुरेला विश्वासरावांकडे ठेवून शिवाजीराजे वेगाने पुढच्या मार्गाला निघाले. आपल्या ९ वर्षाच्या मुलाला मागे ठेवून जाताना त्यांना काय वाटले असेल...!!!
पण एकत्र जाणे धोक्याचे होते तेंव्हा त्यांना काळजावर दगड ठेवून तो निर्णय घ्यावा लागला असणार. तिकडे आग्र्यामध्ये रघुनाथ बल्लाळ कोरडे व त्र्यंबक सोनदेव डबीर हे शिवाजी महाराजांचे अत्यंत जवळचे साथीदार फुलौतखानाला सापडले. शिवाजीराजांचे आग्र्याहून सुटकेचे गुढ उकलवून घेण्यासाठी यांचे आनन्वित हाल करण्यात आले. पण त्या स्वामिनिष्ठांच्या मुखातून 'ब्र' ही निघाला नाही. बोलले असते तर संभाजीराजे मथुरेतून खासच पकडले गेले असते, व दोघांनाही औरंगजेबाने मालामाल केले असते. राजांनी थेट दख्खनेचा रस्ता न धरता मुघलांच्या आवाक्याबाहेरचा मार्ग घेतला होता. मथुरेवरून अलाहाबाद - बनारस - गया - गोंडवन आणि तिथून गोअळकोंडा. वाटेत ठिकठिकाणी शत्रूशी त्यांची गाठ पडली. त्यांनी संन्याश्याचा वेश धारण केला. जास्तीतजास्त प्रवास पायी केला. अथक परिश्रम करून राजे दख्खनेत पोचले. पण अजून संभाजीराजे मथुरेमध्येच होते. शिवाजीराजे राजगडी पोचल्याची बातमी आग्र्याला पोचली तेंव्हा मुघलांची शोध मोहीम थांबली. रस्ता अधिक सुरक्षित झाल्यावर विश्वासराव संभाजीराजांना घेऊन खुद्द राजगडी पोचले.
हताश झालेला औरंगजेब आता फारसे काही करू शकत नव्हता. आता काय कधीच काही करू शकत नव्हता. त्याच्या मनात एकच सल होता. 'एक क्षणाच्या निष्काळजीपणाचं पर्यावसान शिवाजीच्या पलायनात झाल्यामुळे खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. मराठ्यांबरोबरच्या युद्धाला आता कधीही अंत नाही.'
३१ वर्षानंतर '२१ फेब्रुवारी १७०७' रोजी म्हातारा बादशहा हाच सल घेऊन 'अल्लाला प्यारा' झाला. दख्खन तो कधीच जिंकू शकला नाही...
औरंगजेबाने महाराजांना
औरंगजेबाने महाराजांना विश्वासात घेऊन त्यांना कैदेत टाकले असेल आणि पलायनाचा प्लॅन हा मिळून ठरवला असेल.
नवीन Submitted by किरणुद्दीन on 1 February, 2019 - 16:10
<<
महाराजांचा आग्र्याहून पळण्याचा प्लॅन,
औरंगजेब व शिवाजी महाराज या दोघांनी मिळून बनविला, असे तुम्हाला म्हणायचे आहे का ?
--
खतरनाक इतिहास संशोधन आहे हे.
औरंगजेबाने महाराजांना
औरंगजेबाने महाराजांना विश्वासात घेऊन त्यांना कैदेत टाकले असेल आणि पलायनाचा प्लॅन हा मिळून ठरवला असेल.>>>>> बापरे
काहीही
खतरनाक इतिहास संशोधन आहे हे.
खतरनाक इतिहास संशोधन आहे हे. >>> प्रतिसाद पूर्ण वाचा. मराठीत लिहीले आहे. इतिहास संशोधन हा शब्द कुठे सापडला तेव्हढा कॉपी पेस्ट करावा ही नम्र विनंती.
प्रतिसाद पूर्ण वाचा. मराठीत
प्रतिसाद पूर्ण वाचा. मराठीत लिहीले आहे. इतिहास संशोधन हा शब्द कुठे सापडला तेव्हढा कॉपी पेस्ट करावा ही नम्र विनंती.
नवीन Submitted by किरणुद्दीन on 1 February, 2019 - 16:44
<<
मी, तुम्ही नविन इतिहास संशोधन केले असे अजिबात म्हटले नाही.
तुम्ही म्हणताय तश्या घटनांचा इतिहास जर कुणी नव्याने समोर आणला, तर ते इतिहास संशोधन खतरनाक असेल असे मी म्हटले.
कोट करताना संदर्भ सोडून कोट
कोट करताना संदर्भ सोडून कोट केले नाही ते नेमका अर्थ पोहोचतो. अर्थात सामान्य बुद्धीच्या माणसाचे हे मत आहे. इतरांवर बंधनकारक अजिबात नाही.
महारा़जांनी प्रसाद
महारा़जांनी प्रसाद दिलेल्यांपैकी टुमणे लावले असावे.
बाय द वे मिठाई किंवा 'प्रसाद' म्हणून काय वाटले जात होते किंवा असावे काही अंदाज करुन पहा...
दर गुरुवारी दत्ताचा वाटलेला प्रसाद खायला आग्र्यामधील रत्यावरील फकीर, भिकार टाकार, दरवेश, त्यांच्यावर पाळत ठेवणारे हेर, फौलादखानाचे शिपाई यांनी बादशाहाकडे रदबदली करून काय निष्पन्न होईल याचा अंदाज करुन पहावा...
ओकसाहेब
ओकसाहेब
माझी शंका आहे ही. मला फक्त पेटा-यातून पलायन ही एकच शक्यता कथांमधून ठाऊक आहे. कारण ही शाळेपासून शिकवली गेली आहे.
मात्र त्या कथेतल्या प्रमाणे महाराजांना तुरूंगात ठेवलेले नव्हते. आमच्या पुस्तकात तर अक्षरशः जेल वगैरे दाखवले होते. महाराजांना एका हवेलीत ठेवले होते. तिथे महाराजांनी आजारपणाचे निमित्त केले. या काळात त्यांना विरक्ती येत आहे असे त्यांनी वारंवार बोलून दाखवले होते.
दरम्यानच्या काळात महाराजांनी आपले हेर आजूबाजूला पसरवले होते. ते बातम्या काढत असत. ही मला आजवरच्या कथात ऑथेंटीक वाटलेली शक्यता.
मात्र पहा-यावर सुमारे एक हजार सैन्य होते. तसेच किल्ल्याभोवती सैन्य होते. आग्र्यापासून दूरवर लष्करी छावण्या होत्या. पुण्यापर्यंतच्या रस्त्यात तपासणी नाके तर होतेच. शिवाय औरंगजेबाचे गुप्तहेर होते. अनेक सरदार, छोटी मोठी मांडलीक राज्ये होती. या सर्वातून निसटणे ही शक्यता खूप अवघड वाटते.
आता जर तुम्ही शोध घेतला तर आढळेल की बादशहाने मी शिवाजीला अफगाणिस्तानच्या मोर्च्यावर पाठवण्याचे ठरवले आहे असे म्हटल्याचे आढळेल. महाराजांचा घात करण्याऐवजी ही घोषणा करणे मला आश्चर्यकारक वाटते.
तसेच इराणच्या मोर्च्यावर बादशहाने किल्ल्याभोवतीचे सैन्य तसेच अनेक मोर्चे पाठवून दिले.
ज्या दिवशी महाराजांनी पलायन केले, नेमके त्याच दिवशी बादशहाने शिकारीचे आयोजन केले होते आणि त्यासाठी किल्ल्यातील काही सैनिक त्याच्यासोबत गेले होते.
हा घटनाक्रम पाहता माझ्या मनात एक शक्यता आली.
या शक्यतेला इतिहास म्हणा असा कुठचाही आग्रह मी धरलेला नाही. अर्थात याला मूर्खपणा समजून स्मायल्या टाकण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. नाही का ?
अशी शंका येऊच नये असे म्हणणे असेल तर राहीले.
औरंगजेबाने महाराजांना
औरंगजेबाने महाराजांना विश्वासात घेऊन त्यांना कैदेत टाकले असेल आणि पलायनाचा प्लॅन हा मिळून ठरवला असेल.>>>>
सीवा तुम बेशक दक्खन जावो, इन
सीवा तुम बेशक दक्खन जावो, इन बेवकुफ लोगों को कल मैं गाफील रखता हू, मै भी शिकार करने के बहाने जंगल चला जाता हू.
उधर पोहचते ही मुझे खुषीहाली
उधर पोहचते ही मुझे खुषीहाली का खत लिखना, तेरे ये दोस्त को निंद नही आयेगी तब तक
सर्वातून निसटणे ही शक्यता खूप
सर्वातून निसटणे ही शक्यता खूप अवघड वाटते.>>> डबल साईझच्या अफजलखानाच्या गोटात जाऊन त्याला यमसदनी धाडणाऱ्या माणसासाठी पलायन हा डाव्या हाताचा मळ आहे. आग्र्याहून पलायन ही तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आकलनशक्ती पलीकडची गोष्ट आहे.
नशीब त्या अफजलखानाला मारला
नशीब त्या अफजलखानाला मारला नाहीतर उद्या बोलले असते 'हा घटनाक्रम पाहता माझ्या मनात एक शक्यता आली की एव्हड्या मोठ्या अफजलखानाला मारणं केवळ अशक्य होतं म्हणून महाराज फक्त गळाभेट घेऊन परत आले'
प्रश्न: शिवाजी महाराज
प्रश्न: शिवाजी महाराज आग्र्याहून कसे निसटले.
उत्तर: आदल्या रात्री शिवाजी महाराज आणि औरंग्या एकत्रच जेवण करत होते, औरंग्या बोलला अरे सीवा अजून किती वेळ राहणार इथे जा घरी, तुझ्या राहण्याचा जेवणाचा अतिरिक्त खर्च माझ्या बजेटवर येतोय. पाहिला ना ताज महाल, लाल किल्ला अजून पाहण्यासारखे काही शिल्लक नाही आता तू परत आपल्या गावी जा. माझे सरदार पण तुझ्या महालाबाहेर उभे राहून कंटाळले असतात, फौलाद खान रोज कमरेला आयोडेक्स लावून तुझ्या महालाबाहेर उभा असतो, तू एक काम कर मी उद्या शिकारीला गेलो की लगेच निसट, आणि जंगलाजवळ ये तिथे मी तुझी वाट पाहत उभा असेल, मग अर्धा रस्ता मी तुझ्या सोबत येईल नंतर तू तुझ्या वाटेने जा मी माझ्या वाटेने, ठरलं तर मग डन.
राजकारणाच्या धाग्यावर तुटून
राजकारणाच्या धाग्यावर तुटून पडणारे आणि इथे आपल्याला न भावणारे तर्क वाचल्यावर पिसाटून स्मायल्या टाकणारे यांच्यात फरक दिसत नाही
चालू द्या बोकलत तुमचे. तुमच्या कल्पना वास्तवाला धरून आहेत.
बाकी ते शिकार बिकार , द्या सोडून राव !
पेटा-यांची कथा काल्पनिक आहे
शांतेचं कार्ट चालू आहे मधे एक डायलॉग आहे
घाबरून हसणे !
बोकलतरावांनी आज संतापाने हसणे ही नवीन संज्ञा बहाल केली. अहो बोकलतराव, शक्यता आहे म्हटलंय, एव्हढं काय मनाला लावून घ्यायचं ते ? अगदी सकाळी सकाळी सहा सहा प्रतिसाद दिले तरी मन भरलेले दिसत नाही. तुम्हाला मला फटकवायचे असेल तर सांङा, येऊन भेटतो सांगाल तिथे. तेव्हढेच समाधान !
औरंगजेबाला सेक्युलर ठरवायची भीती वाटत असेल तर तसा माझा कुठलाही इरादा नाही. ताण घेऊ नये. मस्त जेवण करा, फिरून या. आजदाच दिवस मजेत घालवा पण संतापाने विपर्यास करून स्मायल्या टाकू नका राव. लै कीव येऊन राहिली.
आता शांत झाला असाल तर लेख वाचा पुन्हा (वाचला असेलच म्हणा, तुम्ही काय कमी हुषार आहात का ?)
तर लेखात असे म्हटलेय की पेटा-यांची कथा काल्पनिक आहे (शक्यता नाही, काल्पनिकच). तुम्हाला मान्य दिसतेय हे. नाहीतर आधीच स्मायल्या पडल्या असत्या. आता हे मान्य असेल तर वर्गात जेव्हां पेटा-याची कथा शिकवली तेव्हां स्मायल्या नसल्याने प्रत्यक्षच जमिनीवर गडाबडा लोळन घेतली असणार तुम्ही... !!
मास्तरने विचारल्यावर मग तुम्ही म्हणाला असाल
औरंगजेब आणि महाराज जेवायला बसले होते. महाराज म्हणाले पेटारे मागवू का ?
बादशहा म्हणाला " बेशक ! लेकीन आदमी के साईज के मंगाओ ताकि मुझे शक नही होगा "
बोकलतराव, असं झालेलं का ?
पण ही कथा मुघलांच्या कागदपत्रात आहे असे लेखात म्हटलेले आहे. मी नाही लेखक म्हणतोय. तुम्ही वाचत नाहीत राव नीट. आता कथा काल्पनिक आहे आणि ती मुघलांच्या कागदपत्रात आहे तर याबाबतीत तुमची एखादी कथा वाचायला लैच आवडेल. बघा जमलं तर..
नाही हो तसं काही नाहिये पण
नाही हो तसं काही नाहिये पण औरंगजेबाने शिवाजी महाराजांना पळायला मदत केली हा तर्कच एवढा मजेशीर आहे की चार ओळी लिहाव्याशा वाटल्या. असो
काय हे बोकलत ? एकदम लॉजिकल ?
काय हे बोकलत ? एकदम लॉजिकल ? मला वाटले परत विपर्यास , शाहीस्तेखान, शिवाजीचा जन्मच झाला नाही म्हणून अजून दहा प्रतिसाद आले असतील. लैच निराशा झाली. अशाने तुमच्याबद्दलचा आदर नष्ट होईल ना !
तुम्ही रॉबीनहूड म्हणून उच्च होताच, बोकलत म्हणूनही महाउच्च आहात !!
औरंगजेबानेच नाही तर मिर्झा राजे जयसिंगानेही मदत केली असा प्रवाद आहे साहेब. नाहीतर तुमच्याच तर्काने अफजलखानाला मारणा-या महाराजांनी औरंगजेबाचे आमंत्रण स्विकारून चूक केली अशी एक स्टोरी पुन्हा तुम्हीच लिहाल. कुठे तरी महाराजांना खात्री असावी म्हणून गेले असावेत. ही खात्री त्यांना मिर्झा राजे जयसिंहांनी दिली असेल किंवा अन्य कुणी दिली असेल. पण आमंत्रण देऊन बादशहा घात करेल असे त्यांना वाटले नसावे हे नक्की.
म्हणूनच बादशहाने त्यांना नजरकैदेत ठेवले तेव्हां त्याच्यावर शाहीस्तेखान किंवा अन्य सरदारांचे दडपण असावे असे म्हटले जाते. बादशहाने महाराजांची हत्या न करता त्यांना अफगाणिस्तानच्या मोहीमेवर पाठवणार आहे असे जाहीर केले ( जमल्यास ओकसाहेबांसोबत बसून कागदपत्रे चाळा).
तुम्हाला अर्थातच हे सर्व विनोदी वाटत असणार. सामान्यबुद्धी म्हणून माफ करा हो.
एव्हढं काय त्यात ?
बरं बरं
बरं बरं
मजेशीर कथांच्या मालिकेत अजून एक कथा वाचायला आवडली असती.
अफजलखानाचा कोथळा महाराजांनी बाहेर काढला म्हणून त्यांनी पेटा-यातून पलायन केले हे शक्य आहे. तर कोथळा बाहेर काढला म्हणून औरंगजेबाच्या आमंत्रणाला फसणे शक्यच नाही. अशी चूक होणे नाही. सबब आग्य्राला महाराज गेलेच नाहीत. त्यामुळे औरंग्याने अटक केली हे खोटे आहे. फक्त पेटा-यातून पलायन हे खरे ..
कारण कोथळा बाहेर काढला होता. तुमच्या आमच्या आकलनाबाहेरच्या गोष्टी आहेत या !
बोकलत बरोबर का ? तुमची कथा हो !!! माझी नाही .
दादा, शक्यतांवर एव्हढं पिसाळायचं नसतं. इच्चारायचं !!
अफजलखानाचा कोथळा महाराजांनी
अफजलखानाचा कोथळा महाराजांनी बाहेर काढला म्हणून त्यांनी पेटा-यातून पलायन केले हे शक्य आहे. तर कोथळा बाहेर काढला म्हणून औरंगजेबाच्या आमंत्रणाला फसणे शक्यच नाही.
<<
महाराजांनी संभाजीसहित पेटार्यात बसून पलायन केले असेल ही शक्यता मला देखील शून्य वाटते. त्याऐवजी श्रीमान योगी कादबंरीत ज्याप्रमाणे देसाईनी आग्राहून पलायन हा प्रसंग उभा केलाय त्याप्रमाणे पेटारे वाहणार्या कहारचे वेष घेऊन महाराज आग्रातून बाहेर पडले असतील ही शक्यता जास्त वाटते.
ह्याच कादबंरीची प्रस्तवाना लिहिणारे नरहर कुरुंदकर लिहितात की, आग्रातून परत दक्षिणेत जाण्यासाठी औरंगजेबाने जारी केलेले ऑफिशियल गेटपास नरवर घाटीतील चौक्यांवर दाखवून शिवाजी महाराज आग्रा शहराबाहेर पडले.
महाराज कैदेत पडल्यानंतर त्यांनी जवळच्या माणसांना पुन्हा दक्षिणेत जाऊ द्यायची विनंती औरंगजेबाकडे केली होती व औरंगजेबाने राजांची विनंती तात्काळ मान्य करुन तीनशे रिटर्न गेटपास जारी केले होते. या नीनशे पैकी एकादा गेटपास चौक्यांवर दाखवून महाराज आग्रातून बाहेर पडले असण्याची शक्यता अजीबात नाकारता येत नाही.
बरे बाकीचे चालू दे यथासांग...
बरे बाकीचे चालू दे यथासांग....
पण
>>>>>>महारा़जांनी प्रसाद दिलेल्यांपैकी टुमणे लावले असावे.
बाय द वे मिठाई किंवा 'प्रसाद' म्हणून काय वाटले जात होते किंवा असावे काही अंदाज करुन पहा...
दर गुरुवारी दत्ताचा वाटलेला प्रसाद खायला आग्र्यामधील रत्यावरील फकीर, भिकार टाकार, दरवेश, त्यांच्यावर पाळत ठेवणारे हेर, फौलादखानाचे शिपाई यांनी बादशाहाकडे रदबदली करून काय निष्पन्न होईल याचा अंदाज करुन पहावा...>>>>
हा प्रतिसाद गंडलेला वाटतो.
मूळ प्रतिसादात "सरदारांना प्रसाद दिला " अर्थात मार दिला असा उल्लेख आहे.
सीवा मेरे दोस्त कैसे हो तुम
सीवा मेरे दोस्त कैसे हो तुम बहोत दिन हो गये खत नही आया सब खैरियत तो है ना? अगर कुछ भी परेशान करने वाली चीज है तो तेरा ये दोस्त औरंग्या बैठा है इधर, बस याद करना जान कुर्बान करने के लिये भी पुढे मागे नही बघणार
किरणुद्दिन.. असे काही झाले
किरणुद्दिन.. असे काही झाले नसेल... महाराज स्वतःच्या हिमतीवर कैदेतून बाहेर पडलेत. त्या औरंग्या च्या मेहर बानी वर नाही. उगाच अकलेचे तारे तोडू नका
उगाच अकलेचे तारे तोडू नका >>>
उगाच अकलेचे तारे तोडू नका >>> आता आपला आदेशच आहे म्हटल्यावर मी पामर काय बोलणार ? मला जगायचंय साहेब.
Pages