वागणुकीतले संकेत

Submitted by पशुपत on 22 January, 2019 - 01:03

मला आठवते , आमच्यावर लहानपणी असे संस्कार झाले होते कि कुणाकडे गेल्यावर कुठल्याही वस्तूला हात लावू नये , खायला मागू नये , खायला दिले तर थोडेसे खावे , आपल्यामुळे किंवा आपल्या कोणत्याही क्रुतीमुळे ज्यांच्याकडे आपण आलो आहोत त्याना कसल्याही प्रकारचा त्रास किंवा तसदी होवू नये याची नितांत काळजी घ्यावी. जेवायच्या वेळी शक्यतोवर कुणाकडे जाऊच नये. आभ्यासाला किंवा खेळायला कुण्या मित्रा कडे गेलात तर निघताना मांडलेला सगळा पसारा आवरून मगच बाहेर पडायचं !
मोठे झाल्यावर , कळायला लागल्यावर लक्षात आले कि आमची आई किती विचारी होती. किती विचारपूर्वक हे सारे तिने आम्हाला शिकवले ! दुसर्यांकडे गेल्यावर तुमचीच बडदास्त ठेवण्यात त्यांचा वेळ गेला तर शांतपणाने बसून गप्पा , विचारपूस , साहित्य-नाट्य-संगीत यावर चर्चा , माहितीची देवाण- घेवाण कशी होणार? टी व्ही वरचे कार्यक्रम - क्रिकेटच्या मॅचेस एकत्र बसून त्या घरच्या ग्रुहीणींना कशा बघायला मिळणार ? तुमचे केलेले पसारे आवरण्यात त्यांनी का वेळ घालवायचा ? त्यानाही त्यांचे उद्योग , नोकर्या आहेत , त्यांच्या हॉबीज आहेत , विरंगुळा आहे.... त्या सगळ्याचा आदर तितकाच महत्वाचा ... त्या कशात बाधा येऊ न देणे ही आपली जबाबदारी नाही का !
अशा शिस्तबद्ध वागणुकीमुळे शेजारी - पाजारी , मित्र ,नातेवाइक सगळ्यांच्या प्रेमाबरोबर नेहमी नकळत कौतुकाची शाबासकी मिळत गेली. आज पर्यंत सगळ्यांशी अतिशय घनिष्ट नाते-संबंध जोपासले गेले.

आजकाल मात्र वेगळेच चित्र दिसते. मुले वावसटपणे दुसर्यांच्या घरात धुडगूस मांडतात , वस्तू बिनधास्तपणे घेतात , हाताळतात , कुठेही कशाही टाकतात, आरडा ओरडा - किंचाळणे हेही बरोबरीने चालू असते.. आणि त्यांचे पालकही त्याना काही बोलत नाहीत , उलट थोडं जास्तच झालं तर , कौतुकाने " तो ऐकतच नाही" असे लाडाने म्हणतात ! आणि मोठ्याना या गदारोळात एक अक्षर शांतपणे बोलता येत नाही !

पुढे जाऊन आता अशी एक वेळ आली आहे कि अतिशय घनिष्ट प्रेम किंवा मैत्री म्हणजे दुसर्याला उगाचच खोड्या काढत त्रास द्यायचा , Embarrass करायचे... आणि त्यानेही ते 'प्रेमाने' सहन करायचे ... अशी व्याख्याच झालिये जणू ! आजकाल अशा जाहिरातीही पहायला मिळतात... आइसक्रीम दुसर्यासमोर धरायचे आणि तो खाऊ लागला कि त्याच्या तोंडासमोरून काढून घेऊन स्वतः च खायचे ... आणि फिदी फिदी टाळ्या देत हसायचे !

खूप जवळचा , खूप प्रेम म्हणजे हे 'असे वागण्याचा हक्क', हे कुठून आले ?

मला प्रश्ण पडतो कि फक्त मलाच हे बोचते का माझ्यासारखे इतरही आहेत कुणी ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोसायटीतले एटीकेट्स हा तर स्वतंत्र धाग्याचा मुद्दा आहे Happy .

आमच्याकडे एक मुद्दा मला प्रकर्शाने जाणवलेला तो म्हणजे , सोसायटीतल्या कार्यक्रमात खाणं झाल्यावर कचर्याच्या टब मध्ये पेपर प्लेट्स आणि कप्स न टाकणारी मुलं आणि त्यांचे सुजाण पालक. बक्षीस समारंभ झाल्याझाल्या बक्षीसांची रॅपरस फाडून ईकडे तिकडे टाकणारी मुलं आणि त्याना एका शब्दानेही जाब न विचारणार्या कल्चरल कमिटीमध्ये असणार्या त्यान्च्या मम्मीज .

लिफ्टमध्ये , पार्किन्गमध्ये चॉकलेट , बिस्किटांचे रॅपर टाकणारी मुले , भरमसाठ फटाके फोडून झाल्यावर निदान जळक्या फुलबाज्या , फटाक्यांचे रिकामे खोके एका बाजूला सारून नठेवणारे पालक आणि मुलं .. ही लोक माझ्या नावडत्या लिस्ट मध्ये आहेत .

स्वस्ति अगदी सहमत.फटाके बॉक्स तर बघवत नाहीत.चॉकलेट किंवा चिप चे कागद सोसायटीत टाकणाऱ्या मुलांना कोणीही ओरडत नाही.स्वतःच्या सायकल रस्त्याच्या मधोमध सोडून बागेत खेळायला जाणाऱ्या मुलांना कोणी ओरडत नाही.आपण ओरडू शकत नाही कारण यांच्या पालकांशी हितसंबंध गुंतलेले असतात.
सोसायटीत लोकांनी कचरा वेगळा करून देणे वगैरे अपेक्षा केव्हाच सोडल्या आहेत.
पाव किलोमीटर जास्त पडेल असा यूटर्न घ्यायला नको म्हणून लोक 5 मिनिट थांबून, जीव धोक्यात घालून,शिव्या खाऊन रस्त्याच्या चुकीच्या बाजूने येतात.यात ओला उबर वाले,लहान मुलं पुढे उभ्या केलेल्या स्कुटी वरच्या बायका,ऍक्टिवा वाले वृद्ध अंकल सगळे असतात.
सिग्नल ला 5 सेकंद रांगेत थांबायला नको म्हणून फुटपाथवर चालणाऱ्या म्हाताऱ्या कोताऱ्याना, गर्भवती बायकांना घाबरवत सुसाट फूटपाथवरून बाईक नेतात.याच पब्लिक ला भारतात सुव्यवस्था हवी असते.अशी एखादी छान व्हॉटसप पोस्ट असेल तर ती ते 20 जणांना पुढे पाठवतात.
हळूहळू राग येणं पण कमी होत जातं.
आपण अपरिचित बनून या सगळ्यांना धडा शिकवू शकत नाही.फक्त आपल्या मुलांना 'हे बघ पुस्तकात असे नियम आहेत, आपण पाळायचे, पण समोरचा कधीकधी पाळणार नाही.आपण जपून राहायचं.' असं सेफ शिकवायचं.
(आमच्या घरात 2 मेम्बर चा चुकीच्या बाजूला येणाऱ्या समोर च्या व्यक्तींना धडकून वेगवेगळ्या वेळी अपघात झालेत.एका केस मध्ये पुढे असलेल्या हातावर धडक लागून अंगठा फ्रॅक्चर आणि दुसऱ्या केस मध्ये समोरून येणाऱ्या दुचाकीचे पिलीयन पायाला ओरबाडून खोल जखम.चारचाकी चालवताना पेडल वर दाब देता येत नाही.)

एलीव्हेटर बेस्ट प्लेस आहे मॅनर्स किती आहेत बघण्याची. >> कसं? मला उत्सुकता आहे जाणून घेण्याची.>>
अगं, फारेंडने लिहिलयं तसेच अनुभव.
अमित , अ‍ॅज लाँग अ‍ॅज मुल रिझनेबल वागत असतील तर काहीच हरकत नाही. पण,
रेस्टॉरंट मध्ये धावणे/पळने रिझनेबल असु शकत नाही अस मला वाटतं.

सीमा, तुझ्याशी सहमत आहे. पण कोणी असं करत असेल आणि मुल चार वर्षाच्या खालचं असेल आणि पालकांचं सांगूनही हाय ऑन शुगर असल्याने ऐकत नसेल तर मला नाही येत हल्ली राग. एम्पथी वाटते Happy
लांब बसून आपल्याला त्या मुलाला काय समस्या आहे, स्पेशल नीड आहे का याची अजिबातच काही कल्पना नसते. आणि अशावेळी त्या पालकांनी मुल दंगा करेल म्हणून पब्लिक प्लेसेसना जाउच नये असं तुलाही नक्कीच वाटत नसेल याची मला खात्री आहे. असे सगळे विचार मनात येऊन मी दुर्लक्ष करतो.

अशावेळी त्या पालकांनी मुल दंगा करेल म्हणून पब्लिक प्लेसेसना जाउच नये असं तुलाही नक्कीच वाटत नसेल याची मला खात्री आहे. >>> येथे पोस्ट लिहीणारी व्यक्ती एखाद्या वाईट हेतूने, किंवा एखादा स्वार्थी/एकतर्फी विचार डोक्यात ठेवून लिहीत नाहीये हे गृहीत धरणे व तशी कर्टसी/वैचारिक उदारता असणे यात काही मजा नाही. माबोवरची इतर चर्चा पाहिली तर त्याच्या उलट गृहीत धरून खवचट पोस्ट्स टाकल्याने बाफ खमंग होतात याची नोंद घ्यावी Wink

या धाग्यावरचे प्रतिसाद वर्तमानपत्रांच्या शनिवार - रविवार पुरवणीत एक सदर म्हणून छापण्यासारखे आहेत.
हे नागरिकांनी वाचले आणि विचार्पूर्वक स्वतःत बदल करायला सुरूवात केली तर भारत हा निश्चितत सुजाण देश होइल.

मुलांनी पब्लिक ठिकाणी पळापळी करणं, आवाज करणं, खेळणं ह्या गोष्टी वेगळ्या आणि वस्तूंचा विध्वंस करणं, वस्तू फेकणं, लोकांना लाथा बसतील अश्या पद्धतीनं बसणं ह्या गोष्टी लहान मुलं आहेत म्हणून इतरांनी सोडून द्याव्या/सहन कराव्या असं मला वाटत नाही. स्पेशल नीडस् मुळे अशी वर्तणूक होत असेल तर सूज्ञ माणसं नक्कीच अ‍ॅडजस्ट करतील (त्यात पण काही महाभाग असतीलच की जे तेवढी माणुसकी दाखवणार नाहीत), पण ते त्यांच्यापर्यंत पोचलं तर. अशी काही शक्यता असेल असं सर्वांनी गृहीत धरावं आणि असे सगळे प्रकार सहन करावेत ही अपेक्षा जरा जास्त आहे.

मुलांनी पब्लिक ठिकाणी पळापळी करणं, आवाज करणं, >>>>>>> या वाक्यातील आवाज करणं मला अगदी हायलाईट करावंसं वाटतं. काही लोक पब्लिक प्लेस मध्ये एवढ्या जोरात गप्पा मारतात ( बोरबरच्या दुसऱ्या व्यक्तीशी किंवा फोन वर) की सहनशक्ती संपून जाते. एक तर अखंड बोलायच आणि ते ही उच्च स्वरात. ठिकाण अगदी शांत रम्य आणि वेळ अगदी मॉर्निंग वॉकची असेल तरिही त्यांना भीड नसते. एवढ्या सकाळी एवढे बोलायचा उत्साह बाकी फिरणाऱ्या लोकांची सकाळ वाईट करतो.

एक विशिष्ट कम्युनिटी, कायम मोठंमोठ्या ग्रुप्समध्ये ट्रिप्स, पिकनिक्स, हॉटेल्समध्ये फिरत असते. हे आपापसात आपल्या जाड जोरकस आवाजात बोलतातच, पण यांची ढीगभर मुलं पळापळ, रडणं, ओरडणं यांनी वैताग आणतात. आम्ही काही फेवरीट प्युअर व्हेज रेस्टॉरंटस केवळ या लोकांच्या गर्दीमुळे बॅन केली आहेत.

आम्ही कश्मीर मध्ये फिरताना (आमचं बॅड लक), या कम्युनिटीची एक मोठी फॅमिली दोन-तीन स्पॉट्स आमच्या आगे मागे फिरत होती. ट्रिप मधला तो दिवस त्यांच्या कल्लोळामुळे वाया गेल्यात जमा झाला. हेवनली जागा सुद्धा कंपनीमुळे हेल कशा होतात याच उदाहरण. ( हे वाक्य आमच्या बरोबरच्या युरोपियन ग्रुपच)

सगळे छान लिहित आहेत. वाचुन आपणही स्वतःमधे काय बदलायला हवं हे कळतंय Happy

वर कुणीतरी लिहिल्याप्रमाणे मलाही रांगेत, ट्रेनमधे उभं असताना बाया अगदी खेटुन उभ्या राहिल्या की राग येतो.
मीरा, विशिष्ट कम्युनिटी साठी +१. ट्रेनमधेही असतोच हा त्रास.

ह्या विशिष्ट कम्युनिटीच्या लग्नात एक अख्खा दिवस घालवल्यानंतर मला त्यांच्या भाषा यायला लागली होती. Wink

वर कुणीतरी लिहिल्याप्रमाणे मलाही रांगेत, ट्रेनमधे उभं असताना बाया अगदी खेटुन उभ्या राहिल्या की राग येतो.+1111

आरडा ओरडा - किंचाळणे हेही बरोबरीने चालू असते.. आणि त्यांचे पालकही त्याना काही बोलत नाहीत , उलट थोडं जास्तच झालं तर , कौतुकाने " तो ऐकतच नाही" असे लाडाने म्हणतात >>> पालकच सुसंस्कृत नसतील तर मुले काय करणार! आमच्या ११ मजली सोसायटीत ८ व्या मजल्यावरील रेस्क्यू टेरेस मुळे डक्टच्या पोकळीचे दोन भाग झाले व बंदिस्त भागात किंचाळण्याचा आवाज खूपच मल्टिप्लाय होतो. लॉबी हे काही खेळण्याचे ठिकाण नाही. खेळासोबत किंचाळणे ही प्रतिक्षिप्त क्रिया असते. तरी सोसायटीत भरपूर जागा आहे

वाचुन आपणही स्वतःमधे काय बदलायला हवं हे कळतंय Happy. >>>>>. पशुपत, तुमच्या धाग्याचा उद्देश सफल झाला. Happy

काही गोष्टी इतक्या अंगवळणी पडलेल्या असतात की त्या चूक आहेत हेच कळत नाही किंवा कधी कधी विचारात हरवणं, फोन मध्ये बिझी असणं अशा कोणत्याही कारणाने नकळत होत असतात. पण असे लेख, अशी मतं वाचली की त्याची मनातल्या मनात नोंद केली जाते आणि ती चूक टाळली जाऊ शकते. अजून येऊ द्यात तुमची मतं आणि विचार.

काही गोष्टी इतक्या अंगवळणी पडलेल्या असतात की त्या चूक आहेत हेच कळत नाही किंवा कधी कधी विचारात हरवणं, फोन मध्ये बिझी असणं अशा कोणत्याही कारणाने नकळत होत असतात. पण असे लेख, अशी मतं वाचली की त्याची मनातल्या मनात नोंद केली जाते आणि ती चूक टाळली जाऊ शकते. >>> +१

>>फोन मध्ये बिझी असणं
Happy
ऑफिसमधे चालताना फोनमधे डोकं खुपसून चालणार्‍या लोकांपासून फार सावध रहावं लागतं. समोरून येत असतील तर त्यांच्या हिशोबाने आपण लेन पकडायची, आणि ते फोनच्या तंद्रीत लेन बदलत नाहीत ना याकडे बारीक लक्ष ठेवायचं, आपल्या पुढे चालत असतील तर कधी मागे वळतील वगैरे काही सांगता येत नाही.
हे फार कॉमन झालंय सध्या.

ऑफिसात तर सर्वात कमी शिस्त असते Sad

* फ्लोअरवर आपल्या जागेवरून जोरजोरात कलिगला हाका मारणे.
* बिझनेस कॉल सुरू असताना एक तर तो फोन स्पिकरवर असतो आणि त्यात ४-५ लोक कोंडाळं करून बसलेले असतात, त्या फोन चा आवाज इतका मोठा असतो की आपले कामातले लक्ष उडते.
(एकदा मी एका मुलाला जाऊन बोलले होते की तु असाच कॉल 'लाऊड' ठेवलास तर तुझं काम मी आपोआप शिकेन)
* ऑफिसमध्ये सर्वांनी आपला मोबाईल सक्तिने व्हायब्रेटींग मोड वर ठेवला पाहिजे हे माझे मत (वै) पण लोक आपला मोबाईल डेस्कवर (बोंबलता) सोडून कुठेतरी मिटिंग रूम मध्ये बसलेले असतात. एकेक फोन इतके अगम्य असतात की ते सायलेंट कसे करावेत हे ही कळत नाही.
* माझ्या अगदी शेजारच्या बे मधली मुलगी सतत काहितरी खात (अ‍ॅक्चुली चरत) असते. त्याचा कुडुमकुडुम आवाज... Uhoh
* तिच मुलगी माझ्या लॅपटॉपची पिन अनेकदा न विचारता सॉकेटमधून काढून टाकून स्वतःचा मोबाईल दिवसेंदिवस चार्जिंग ला लावते, काढला की माझी पिन परत लावेल तर शपथ. Uhoh
* आमच्या बिल्डिंग कडे जायला दोन रोलिंग गेट्स आहेत, ज्यात यायला दोन जायला दोन असे मार्ग आहेत. मी लंच टाईमला ऑफिसला जाते त्यामुळे तेव्हा कँटिन कडे जाणारा लोंढा हा येणार्‍यांचा विचार न करता चारही दरवाज्यातून बाहेर पडत असतो, कित्येकदा आपण मुजोरी केल्याशिवाय आपल्याला प्रवेशच मिळत नाही.
* कंपनीच्या बसेस निघण्याच्या जवळ जवळ पाऊण तास अगोदर स्टॉप ला येऊन थांबतात. लोक तेव्हा निघून (पाऊण तास अगोदर) बसमध्ये जागा पकडून पुढे टपरीत जाऊन चहा/खाऊ करून जवळच्याच एका कॉमन बिल्डिंग मध्ये जाऊन स्वाईप आऊट करतात आणि बस मध्ये जाऊन बसतात. (हे मी पण केलेलं आहे पण खूप कमी)
* एकूण नविन फ्रेशर्स वगैरे असतील तर त्यांना डेकोरम चे भान नसते असे माझ्या लक्षात आले. अगदी कालच ५व्या मजल्यावर काही कामासाठी गेले तर आधी दरवाज्यातून २-३ मुले बाहेर आली, मग ३-४ मुली आल्या आणि त्यातली एक मुलगी हासत हासत आधी आलेल्या मुलांपैकी एकाच्या अंगावर ऑलमोस्ट पडलीच.. मी Uhoh नुकतेच जॉईन झालेले आणि प्रोजेक्ट न मिळालेले फ्रेशर्स हे सुद्धा कँटिन मध्ये असं वर्तन करताना जरूर दिसतात.
* आमच्या कंपनीच्या बस मध्ये (रात्रीच्या) खूप जागा असते एक मुलगी चक्क खिडकीला पाठ लावून पाय पसरून बसते रोज. Uhoh चपला बूटांसकट Sad
* दुसरी अजून एक मुलगी... बसमध्ये चढल्या चढल्या सॅक उघडून खाणे काढते, सांडते, सुदैवाने पाकिट बसमध्ये टाकत नाही. पण त्याच मुलिने एकदा अजस्त्र पॅकिंग मध्ये आलेले हेडफोन्स उघडून त्याचे खोके निव्वळ सॅक मध्ये बसत नाही म्हणून तसेच सिटवर सोडून दिले आणि उतरली.

वाढदिवस केक तोंडाला फासणं आवडत नाही.पण हल्ली सगळेच करतात त्यामुळे चालवून घेतले.
(स्वतःला नाही, दुसऱ्या एकाचा बड्डे होता)
आज कंपनीतल्या लहान मुलांच्या तोंडून बर्थडे बम्प म्हणून मुलांना हॉस्टेल च्या दुसऱ्या मजल्यावरून खाली वाळूत फेकून देत होतो वगैरे ऐकून केक फासणं एकदमच निरुपद्रवी आणि निरागस आणि क्युट वाटायला लागलं.(बहुधा मजले कमी उंचीचे असतील.)

दक्षिणा त्या बॉक्समुळे माझ्याकडेही भरपूर पसारा व्हायचा. ऍमेझॉन pantry च्या बॉक्सेस तर विचारायला नको.
पण शुकर है मेरे बॉस के बच्चे की शाळा का, इतके क्राफ्ट चे प्रोजेक्त देते ना, की बॉस आर्जव करून म्हणतो, 'अज्ञातवासी, बॉक्स मिळेल का?' आणि मीही मोठ्या मानभावीपणे छुटकूस बॉक्स चुटकीसरशी काढून देतो Lol

वाढदिवस केक तोंडाला फासणं आवडत नाही.>>
अगदी!!

नतर तर मला केक खाण्याची इच्छाच रहात नाही.. दाढीचा फोम तसाच दिसतो!! Wink

कंपनीत जाण्या-येण्यासाठी बसचा वापर करत असाल तर खालील गोश्टींचा अनुभव आला असेल

१. बसमधून उतरताना खिडक्या तशाच उघड्या टाकून उतरणे
२. बर्याच वेळा थंडीच्या दिवसात खिडक्या उघड्या ठेवल्यामुळे इतराना त्रास होतो याचे भान नसणे
३. स्टॉपवर रस्त्यापासून खूप लांब दुकानाच्या वळचणीला थांबणे आणि बस आल्यावर सावकाश रमत गमत येणे
४. हमखास वेळेपेक्षा उशीरा येणे आणि बसमधल्या मित्राला फोन करून बस थांबवणे

वाढदिवस केक तोंडाला फासणं आवडत नाही.>>
अगदी!!

नतर तर मला केक खाण्याची इच्छाच रहात नाही.. दाढीचा फोम तसाच दिसतो!+१११११११११

३. स्टॉपवर रस्त्यापासून खूप लांब दुकानाच्या वळचणीला थांबणे आणि बस आल्यावर सावकाश रमत गमत येणे >> हे मी एका कलिगचे २००८ ते २०१३ या डोळ्यांनी पाहिले आहे. मित्रच आहे खरंतर तो माझा पण वेळेच्या बाबतीत अत्यंतिक ढिसाळ. मी माणिक बागेत बस मध्ये चढल्यावर त्याला मिस्ड कॉल द्यायची. तो रहायचा पानमळ्यात तरिही त्याची बस चुकायची. पानमळा ते फर्ग्युसन कॉलेज अशी त्याची बस पकडायची रेंज होती. घरापासून बस स्टॉप अगदीच २००-३०० मिटर असेल, कधी पठ्ठ्या चालत नाहिच यायचा, धाकट्या भावाला पळवायचे... कारण रोजच उशिर व्हायचा.

सेम गोष्ट कॅब वाल्यांसोबत कित्येक एम्प्लॉयी करतात. एक कलिग ५ वर्ष युकेत राहून आल्यावर न जाणे स्वतःला काय समजत होता.. रोज कमीत कमी १५-१७ मिनिटं तो ड्रायव्हर ला थांबवून ठेवायचाच. कित्येकदा ऑफ रूट ला पिकप नसूनही तिथले एम्प्लॉयी रोस्टर मध्ये असले तर ड्रायव्हर ने फोन वर थोडी कटकट केली की लगेच हे सुपरवायझर ला फोन करून ड्रायव्हर ला तो पिकप करायला लावणार, एक तर त्या ऑड रस्त्यावर जायचे, त्यातून अजून खुन्नस म्हणजे उशिरा येणार... ते पण रमत गमत.. फक्त बदला म्हणून.

ह्या विषयावर आजपर्यंत असंख्य धागे निघाले आहेत. दरवेळी हीच चर्चा होते. भारत देशाच्या बाहेर ह्यातील एक टक्काही अनागोंदी दिसत नाही. ही ओरबाडण्याची, बेजबाबदारपणाची, रासवट मनोवृत्ती भारतात कोठून येते? फरक पडेल असं वाटतं का तुम्हाला? आणि फरक पडायला काय करायला लागेल?

>> भारत देशाच्या बाहेर ह्यातील एक टक्काही अनागोंदी दिसत नाही.<<
यावरहि धागे निघालेले आहेत; टुरिस्टस आणि एफओबीज च्या गंमतीजंमतीवर...

Pages