वागणुकीतले संकेत

Submitted by पशुपत on 22 January, 2019 - 01:03

मला आठवते , आमच्यावर लहानपणी असे संस्कार झाले होते कि कुणाकडे गेल्यावर कुठल्याही वस्तूला हात लावू नये , खायला मागू नये , खायला दिले तर थोडेसे खावे , आपल्यामुळे किंवा आपल्या कोणत्याही क्रुतीमुळे ज्यांच्याकडे आपण आलो आहोत त्याना कसल्याही प्रकारचा त्रास किंवा तसदी होवू नये याची नितांत काळजी घ्यावी. जेवायच्या वेळी शक्यतोवर कुणाकडे जाऊच नये. आभ्यासाला किंवा खेळायला कुण्या मित्रा कडे गेलात तर निघताना मांडलेला सगळा पसारा आवरून मगच बाहेर पडायचं !
मोठे झाल्यावर , कळायला लागल्यावर लक्षात आले कि आमची आई किती विचारी होती. किती विचारपूर्वक हे सारे तिने आम्हाला शिकवले ! दुसर्यांकडे गेल्यावर तुमचीच बडदास्त ठेवण्यात त्यांचा वेळ गेला तर शांतपणाने बसून गप्पा , विचारपूस , साहित्य-नाट्य-संगीत यावर चर्चा , माहितीची देवाण- घेवाण कशी होणार? टी व्ही वरचे कार्यक्रम - क्रिकेटच्या मॅचेस एकत्र बसून त्या घरच्या ग्रुहीणींना कशा बघायला मिळणार ? तुमचे केलेले पसारे आवरण्यात त्यांनी का वेळ घालवायचा ? त्यानाही त्यांचे उद्योग , नोकर्या आहेत , त्यांच्या हॉबीज आहेत , विरंगुळा आहे.... त्या सगळ्याचा आदर तितकाच महत्वाचा ... त्या कशात बाधा येऊ न देणे ही आपली जबाबदारी नाही का !
अशा शिस्तबद्ध वागणुकीमुळे शेजारी - पाजारी , मित्र ,नातेवाइक सगळ्यांच्या प्रेमाबरोबर नेहमी नकळत कौतुकाची शाबासकी मिळत गेली. आज पर्यंत सगळ्यांशी अतिशय घनिष्ट नाते-संबंध जोपासले गेले.

आजकाल मात्र वेगळेच चित्र दिसते. मुले वावसटपणे दुसर्यांच्या घरात धुडगूस मांडतात , वस्तू बिनधास्तपणे घेतात , हाताळतात , कुठेही कशाही टाकतात, आरडा ओरडा - किंचाळणे हेही बरोबरीने चालू असते.. आणि त्यांचे पालकही त्याना काही बोलत नाहीत , उलट थोडं जास्तच झालं तर , कौतुकाने " तो ऐकतच नाही" असे लाडाने म्हणतात ! आणि मोठ्याना या गदारोळात एक अक्षर शांतपणे बोलता येत नाही !

पुढे जाऊन आता अशी एक वेळ आली आहे कि अतिशय घनिष्ट प्रेम किंवा मैत्री म्हणजे दुसर्याला उगाचच खोड्या काढत त्रास द्यायचा , Embarrass करायचे... आणि त्यानेही ते 'प्रेमाने' सहन करायचे ... अशी व्याख्याच झालिये जणू ! आजकाल अशा जाहिरातीही पहायला मिळतात... आइसक्रीम दुसर्यासमोर धरायचे आणि तो खाऊ लागला कि त्याच्या तोंडासमोरून काढून घेऊन स्वतः च खायचे ... आणि फिदी फिदी टाळ्या देत हसायचे !

खूप जवळचा , खूप प्रेम म्हणजे हे 'असे वागण्याचा हक्क', हे कुठून आले ?

मला प्रश्ण पडतो कि फक्त मलाच हे बोचते का माझ्यासारखे इतरही आहेत कुणी ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या धाग्यावर तर मी जातच नाहीय.

आता या धाग्यावरही मूळ विषयाला धरून काही आठवलं तरच लिहीन.

सुचवणीसाठी आभार पण नो आभार Happy

ऍ मी ...त्या धाग्यावर मीच तुमचा उल्लेख केला होता.. नंतर तुम्ही offend झालात हे justified मानून काढून ही टाकला..पण तुम्ही तिथे बोलून थांबला नाहीत..तर पुढे हा प्रकार चालूच आहे.. तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न झाला असे मला म्हणायचे होते. असो.. sorry.. पण तुमचा उल्लेख काढला तरी पुढे जे तुम्ही चालवले आहे ते तरी योग्य आहे का..

पशुपत.. तुमच्या धाग्याचा इथे आधार घेतला आहे.. माफ करा..जे जाहीरपणे झालं थोड्या वेळासाठी त्यासाठी अमी ना व्यक्तिगत प्रतिसाद टाकणे योग्य वाटले नाही.

या विषयावरच्या प्रतिसादात बोलण्यासारखे खूप आहे त्यासाठी रुमाल..लवकरच येईन.

एमी बाकी सगळं जाऊ देत,
पण तुमच्या त्या पाचव्या आयटम च्या उल्लेखाने, एका आयडीने तोच उल्लेख धरून किती विकृत पातळी गाठलीये, त्याच धाग्यावर तेही एकदा वाचून या जरा!

आणि मधुराणी यांनी लगेच तो उल्लेखही काढून टाकला होता, पण तुम्ही अक्षरशः माकडाच्या हाती कोलीत दिलंय!

असो, पशुपत धाग्यावर विषयांतर झाल्याविषयी माफी असावी

मधुराणी,
मी त्या धाग्यावरदेखील परत गेलेले नाही, त्यामुळे तुम्ही प्रतिसाद काढून टाकल्याचे पाहिले नव्हते.

> तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न झाला असे मला म्हणायचे होते. > तुमचे शब्द 'समजवायचा प्रयत्न झाला' असे नसून 'समज दिली' असे होते. मराठीत बोलायचं तर explanation आणि warning मधला फरक.

===
अज्ञातवासी,

कोण किती विकृत पातळीवर जातंय ते काही माझ्या हातात नाही. ऍडमीन उडवतील धागा, आयडी त्यांना वाटलं तर.
माकड कोणी असेल तर त्याच्या हाती मी कोलीत दिलेलं नाही.

हायला!! मी काहीतरी गॉसिप मिस केलंय असं दिसतंय. Wink अभ्यास कमी पडतोय!
>> “कुणाला त्रास होणार नाही असं वागणे म्हणजे शिस्त>> मी लाकडाच्या घरात रहातो. पोरं बेड वरून उड्या मारतात, धावपळ करतात, पडतात त्याचा आजूबाजूच्या घरातल्याना नक्कीच त्रास होत असणार. म्हणून मी टाऊन हाऊस रेंट करतो, दोन मजली असेल तर खालच्या मजल्यावर बघतो. पण मुलांना गोंधळ (प्रमाणात, पण ते प्रमाण मी ठरवणार शेजारी नाही) करायला बंदी घालत नाही. रात्री 10 ते 6 आवाज होणार नाही इतपत बघतो.
सदासर्वकाळ कोणाला ना कोणाला माझ्या वागण्याचा त्रास होणारच असतो, मी त्याचा विचार सतत केला तर मला ही त्रासच होतो. इतरांचा विचार नक्कीच करावा, त्रास होत असेल तर सॉरी म्हणावं पण म्हणून आपल्या विचार करून ठरवलेल्या टर्मस सहजा सहजी अजिबात सोडू नये.
इक्विलिब्रिअम सापडतो असा माझा अनुभव आहे. आपण आनंदात राहील आणि फर्म राहिलं की आपली आणि आपल्या सानिध्याय येणारी मुलं बऱ्यापैकी ऐकतात. मुलांशी त्यांना आवडेल त्या विषयावर बोलणे हा सर्वात सोपा आणि हुकमी मार्ग आहे.

"उलट थोडं जास्तच झालं तर , कौतुकाने " तो ऐकतच नाही" असे लाडाने म्हणतात ! "

हे तर सगळीकडेच दिसते. आपला तो बाब्या हा attitude सर्वत्र आहेच. ऐकत नाही म्हणाले की झाले. मला आई म्हणून असे वाटते की आपल्या मुलांना शिस्त लावण्यात कमी पडलो अशी भावना मनाच्या कोपऱ्यात असते पण ते कबूल करायची तयारी नसते. त्याच वेळी आपल्या मुलापेक्षा जास्त शिस्तीत वाढलेले मूल समोर आले की त्याचे कौतुक होते आणि कुठेतरी ते शिस्त वाले मूल उजवे ठरते पण मनात स्पर्धा असल्याने ते स्वीकारले जाऊ शकत नाही.
सध्या पालकांना मुलांची अडचण होते असे वाटते.. त्यांची मते ऐकून त्यांनी मुलांना जन्माला कशाला घातले असे ही वाटू शकते पण नवीन काळातल्या बऱ्याच गोष्टी ज्या आधी मिळाल्या नाहीत त्या पूर्ण पणे उपभोगायच्या आहेत आणि त्यामुळे मुलांना जे हवे ते दिले जाते.
जे हवे ते घ्या पण गप्प बसा आणि आम्हांला enjoy करू द्या हा stand एकदा घेतला की मुलांना पण त्याची सवय लागते..काय केले की पालक आपले ऐकतात याचा अंदाज येतो..आणि मग अशा कृती करायचे प्रमाण वाढत जाते. आणि मुले असे वागताना सगळ्यांच्या समोर त्यांना दटावयाचे धाडस पालक करत नाहीत. एकुलती एक मुले असतील तर प्रश्नच मिटला.
या धाग्यात मुलांच्या उद्धट बोलण्याचा ही उल्लेख हवा. समोर माणसे असतील तर काका काकू म्हणून त्यांनी दिलेल्या प्रश्नाचे उत्तर तरी द्यायला हवे पण ही मुले ऐकलेच नाही असे म्हणून पुढे जातात. आणि आई वडिलांना सांगितले की तो तसाच वागतो हे उत्तर येते.

माझ्या एकंदर अनुभवावरून आणि आई म्हणून मला मुलांच्या पेक्षा त्याच्या पालकांची चूक वाटते. आणि जो पालक शिस्त लावतो त्याला नावे ठेवली जातात किंवा मुलांना मोकळे सोडण्या बद्दल सल्ला दिला जातो याचे आश्चर्य वाटते.
मुलं ती मुलंच. बाकीच्या मुलांना अनिर्बंध वागताना बघून त्यांनाही आपणही असेच करावे असे वाटते. अजून चांगले वाईट ची समज आलेली नसते. म्हणून एकाने गोंधळ केला की तो वाढत जातो आणि मोठ्याना त्रास होतो

आम्ही अपार्टमेंटमध्ये राहतो तिथे 'हमेशा की तरह' लोक गॅलरीत कपडे वाळत घालतात. आम्ही अजिबात असे करत नाही पण आमच्या वरच राहणार्‍या बाई सर्रास ओल्या गच्च साड्या आमच्या किचनला लागुन असलेल्या बाल्कनीतून खाली सोडून देतात. सगळे पाणी बाल्कनीत येते, म्हणजे ती जणू आम्ही वापरायचीच नाही असे. सुरुवातील त्यांना एकदोनदा प्रेमाने समजवले की तुम्ही साड्या वाळत घालताय तर घाला पण निदान नीट पिळून तरी वाळत घाला. तर आम्हालाच वरुन शहाणपण शिकवायचे, की "त्याला काय होतंय, सगळेच असे करतात. तुम्ही अ‍ॅडजस्ट करायला पाहिजे थोडे, अपार्टमेंटमध्ये राहतो, आमच्या वर राहणारेही हेच करतात, आम्ही त्यांना कधी बोललो नाही असे.. तुमच्या आधीचे राहणारे होते ते कधी आम्हाला बोलले नाहीत, तुम्हीच फार कटकटे आहात."

मागच्याच महिन्यात बाल्कनीत आम्ही गादी ठेवलेली आणि तिने वरुन परत गच्च ओल्या साड्या सोडून दिल्या. बदाबदा गादीवर पाणी पडले. कडाक्याचे भांडण झाले. तिचा मुलगा आणी मी चांगलेच हमरीतुमरीवर आलो. मला म्हणू लागला की तुम्ही अ‍ॅडज्स्ट करायला पाहिजे. मी म्हटले मी का म्हणून अ‍ॅडजस्ट करायचे? मी का कोणाचे घेऊन खातो का कि तुम्ही माझ्या फ्लॅटचे भाडे भरता?

हे 'तुम्ही थोडे अ‍ॅडज्स्ट केले पाहिजे' ही कन्सेप्ट किती विचित्र आहे हे त्या प्राण्याला समजवत होतो पण त्याच्या डोक्यात काही शिरत नव्हते. दुसर्‍यांच्या जागेत अतिक्रमण करुन वरुन त्यांना अ‍ॅडज्स्ट करा सांगणे महानच आहे. बरे, आपला कोणाला त्रास होतोय अशी जराही कुणकुण लागली तर आपण आपले वागणे सुधारुन घेतो, त्याला अ‍ॅडज्स्ट करणे म्हणतात असे माझे मत तर दुसर्‍याचा त्रास मुकाट सहन करुन घेणे अ‍ॅडज्स्ट करणे म्हणावे असा त्याचा आग्रह.

आता अपार्टमेंटमध्ये आम्ही फार कटकटे भांडकुदळ अशी प्रतिमा झाली आहे, आणि मी ह्या गोष्टीला अजिबात भीक घालत नाही. आपण कुणाच्या अध्यातमध्यात नसतो, तर कुणी आपल्या येऊ नये ही साधी अपेक्षा, तीही लोकांना आजकाल समजत नाही.

संदीप,
अगदी सेम अनुभव आहे माझाही. फक्त ते साड्या वाळत घालत नव्हते तर खिडक्या धुवत होते पाणी टाकुन. खिडकीचे ग्लास डोअर आणि ग्रिलमधे असलेल्या १ फुट जागेत २-३ महिने जमा झालेली कबुतराची घाण सगळी माझ्या टेरेस डोअरवर येऊन पडायची.

अमितव, मुलांनी दंगा नाही करायचा तर कुणी करायचा? तोही त्यांच्या शिकण्याचा, समृध्द होण्याचा महत्वाचा भाग आहे. प्रत्येकाचाच प्रत्येकाला काही ना काही त्रास असतो आणि तो गृहीतही धरलेला असतो. म्हणूनच शेजारी शक्यतो तक्रार करत नाहीत व आपणही. पण सार्वजनीक ठिकाणी कसे वागावे याचे काही संकेत आहेत आणि ते मुलांनी पाळायला हवेत एवढच मला म्हणायचं होतं. मुलांचा पसारा आवरण्यात आईला आनंदच असतो पण मुलांनी आपले स्टडी टेबल नेटके ठेवणे, वस्तू जागच्या जागी ठेवणे या गोष्टी अपेक्षीत आहे. मोठ्या व्यक्तिंचा आदर करणे, बसमधे दुसऱ्यांना आपली जागा देणे, इतरांना शक्य होईल तेवढी मदत करणे, वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तींच्या चर्चेत लक्ष न घालणे या सारख्या गोष्टी मुलांना शिकवल्याच पाहीजे असे मला वाटते. अर्थात पालकांचीही काही जबाबदारी आहेच. जसे तुम्ही करता तसे मुलांना आपल्या प्रमाणात दंगा करू दिला पाहीजे, उलट पालकांनीही त्यात सामील व्हायला हरकत नाही. मुलांबरोबर नेहमी बरोबरीच्या नात्याने संवाद साधला पाहीजे. “तु लहाण आहेस अजुन” हे वाक्य तर नकोच. त्यांच्या बोलण्यावर विश्वास पाहीजे. तो विश्वास आहे हे मुलांना जाणवले पाहीजे. आणि असे बरेच काही.

अज्ञातवासी,

कोण किती विकृत पातळीवर जातंय ते काही माझ्या हातात नाही. ऍडमीन उडवतील धागा, आयडी त्यांना वाटलं तर.
माकड कोणी असेल तर त्याच्या हाती मी कोलीत दिलेलं नाही.>>>>

एमी तुम्ही एका धाग्यावर शिस्त पाळावी, असं लिहिल्यामुळे, तर दुसऱ्या धाग्यावर त्या विकृतीने बेशिस्त व (नीचपणाची) अत्युच्च पातळी गाठली व त्यातही तुमच्या एका प्रतिसादाचा वारंवार उल्लेख आल्याने तुम्ही काहीतरी लिहाल अशी अपेक्षा मी केली एवढंच.
पण विनाकारण काहीही अपेक्षा करणं चूकच, नाही का? म्हणून या चुकीबद्दल मी माफी मागतो!
आणि तसंही अडमीन कडे रीतसर तक्रार केल्यानंतर तो आयडी, धागा उडालाच आहे, त्यामुळे, मी तुम्ही धागा उडवावा, किंवा आय डी उडवावा या उद्देशाने लिहिलंच नाही.
आफ्टर ऑल, चुकीच्या ठिकाणी दाद मागणं, ही चूकच ठरते!
Wink

@शाली अनुमोदन,

पसारा घालणं मुलांना जमत असेल, तर त्यांना आवरायलाही शिकवलं पाहिजे.(अर्थात ही शिकवणही त्यांच्या वयानुरूप झाली पाहिजे)

संदीप, त्या साड्या तुम्हाला दिसतात का? म्हणजे तुमच्या छताच्याही खालपर्यंत येतात का? तसं असेल तर मग तुम्ही तुमच्या बाल्कनीच्या क्षेत्रात छताला लागून काहीतरी अडकवा, जेणेकरून त्या साड्यांना इजा होईल, आणि तुम्ही तुमच्या बाल्कनीत काही लावले तर कुणी काही म्हणू शकणार नाही.

हे असं वागणं हा शेवटचा उपाय असतो अशा लोकांच्याबाबतीत. फक्त ते करताना आपण काही अनिवार्य कारणास्तव असं करतोय असं भासवलं तर मग पुढे आणखी भांडण होण्याची शक्यता कमी.

वर सगळ्यांनी लिहिलेले अनुभव रोज इथेतिथे येत असतात. परवा मी लिफ्टमधून खाली गेले. आमची लिफ्ट ग्रिलच्या दारांची असल्यामुळे बाहेर कोण आहे हे आतून आधीच दिसतं. एक १०-११ वर्षांचा स्थूल मुलगा अगदी दारात (जवळपास चिकटून) उभा आहे हे दिसलं. त्याच्याबरोबर त्याची आई आणि एक-दोन आणखी माणसं होती. लिफ्ट थांबताक्षणी तो मुलगा दार जोरात खेचून आत घुसू लागला. मी म्हणाले मी बाहेर येऊ का आधी? परिणाम शून्य. मी अक्षरशः कशीबशी बाहेर पडले. त्यानंतर मग त्याची आई त्याला म्हणाली "अरे असं नाही करायचं"! काय नाही करायचं आणि का नाही करायचं त्याबद्दल काहीच नाही!

लोकांच्या मानसिकतेला आपण काहीही करू शकत नाही.

संदीप, त्या साड्या तुम्हाला दिसतात का? म्हणजे तुमच्या छताच्याही खालपर्यंत येतात का?
-- हो. आमच्या किचन मध्ये अंधार होइल अशा पद्धतीने. शेवटचे भांडण झाले त्यानंतर तो त्रास बंद झाला.

मधुराणी , माझा तर अस अनुभव आहे कि मुले काहीही सांगायला गेलो तर ती काहीसुद्धा ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतात. लगेच ' मग तुम्ही नाही का ते तसं करत !" हे त्यांचं तयार असतं.
आणि आणखीन एक , कुणा दुसर्याचे उदाहरण दिले तर मग तर मुद्दामच ती गोष्ट दुर्लक्षित करतात.

सोसायटीत तर इतक्या गोष्टी सहन कराव्या लागतात ! कॉमन पार्किंग मधे वाहने लावणे ! लिफ्ट्चा दरवाजा उघडा ठेऊन निघून जाणे किंवा शांतपणे गप्पा मारत बसणे ... तुमची घाईच्या वेळेला चिडचिड होतेच

आपली चिडचिड होते कारण आपण नियम आणि शिस्त दोन्ही पाळतो. ज्यांना या पासून सुटका हवी आहे ते सोयीस्कर वागतात.
सध्या आमच्या अपार्टमेंट मध्ये कॉमन light वापरून घराचे furniture करण्याचा प्रकार झाला आणि 10 12 लोकांनी आक्षेप घेतल्यावर आम्ही पहिल्या मजल्यावर राहतो आणि लिफ्ट न वापरता त्याचे maintainance भरतो त्यामुळे तुम्ही बोलू नका असे उत्तर आले.. काय करायचे यावर.

कॉमन पार्किंग चा दुरुपयोग ही तर डोक्यात जाणारी गोष्ट आहे. बाकीचे गाड्या स्वतःच्या पार्किंग मध्ये पण घालू शकत नाहीत अशा रीतीने पाहुण्यांच्या गाड्या लावलेल्या असतात.

आणि मी ज्यांच्या बद्दल बोलतेय त्यांनी शेजारच्या बांधकामाचा त्रास होतो तर ते बंद व्हावे अशी police complaint केलेली आहे..

काय बोलायचं. लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण म्हणावे नाहीतर काय..

एक राहूनच गेले ...
इथल्या विषयांतराला श्रीयुत सिंबा यांनी सुरुवात केली ... खरे तर काडी टाकली म्हणायला हवे ! त्याना काय शिक्षा द्यावी बरे ??
वर्गाबाहेर दहा उठाबशा किंवा पायाचे अंगठे धरून उभे रहा हो तास संपेपर्यंत !

( सिंबा : हलके घ्या .. तणाव घालवणे इतकाच हेतू आहे हे लिहिण्यामागे !)(असे वर्गाबाहेर उभे रहायला मिळावे म्हणून आम्ही काही तासाना मुद्दामखोडुया करायचो आणि मग तास संपेपर्यंत शाळाभर भटकत फिरायचो)

हलकेच घेतोय,काळजी नसावी
इकडे काही रामायण झालाय हे कळून, वाचून रिप्लाय देई पर्यंत सगळे मूव्ह ऑन झाला होतात, त्यामुळे परत माझी बाजू मांडणारा वगैरे रिप्लाय टाकला नाही.

वाफ इतरत्र रिलीज केली आहे,

Submitted by सिम्बा on 23 January, 2019 - 15:55 >>>> हे बरं आहे. आग एकीकडे लावून वाफ दुसरीकडे Happy

छान चर्चा चालू आहे. जेवढे वाचताहेत त्यातल्या आपण काही जणांनी तरी यातून काही शिकलो तरी हा धागा आणि त्याचा उद्देश धन्य.
धर्म, देश, संस्कृतीनुसार काही मॅनर्स बदलत असतील, पण ज्या कॉमन चांगली व्यक्ती असण्याच्या कृती आहेत, त्याची एक लिस्ट बनवायला हवी. ( उदा लिफ्ट बद्दल कोणी लिहिलं आहे) यातल्या बऱ्याच गोष्टी common sense च्या असतात, पण तरी बऱ्याच लोकांना ( सीमा नको म्हणाली तरी लिहिते, मुख्यतः भारतीयांना) झेपत नाहीत. आणि त्या लहानपणापासून शिकवल्या तरच सहज स्वीकारल्या जातात.

Submitted by मीरा.. on 23 January, 2019 - 16:10>>>अगदी सहमत.

मुळात बेशिस्त वागुन काही फायदा होत असेल तर वागायलाही हरकत नाहि. पण तसा काही फायदा होताना दिसत नाही. मी एकदा ट्रॅफीकचे सगळे नियम तोडुन गाडी चालवली आणि तेच अंतर सगळे नियम पाळत चालवली. फक्त पाच मिनिटांचा फरक पडला ते अंतर पुर्ण करण्यात.
बारकाईने लक्ष दिले तर एक गोष्ट लक्षात येते की शिस्तीत वागण्यापेक्षा बेशिस्तपणा करायला जास्त एनर्जी लागते. तरीही लोक असे का वागतात काही समजत नाही.

पुन्हा विषयाकडे वळूया का? Happy

शिस्त ही फक्त वागणुकितच नव्हे तर संभाषण, पैसे देणे-घेणे , नातेसंबंध, एखाद्याला आपण देतो ती वागणूक या सर्वात, अगदी आयुष्यात पदोपदी शिस्त ही हवीच.

* फारएन्ड ची लिफ्ट बद्दलची पोस्ट खूपच मनोरंजक आहे. परवा मी लिफ्ट मध्ये एकटिच होते लिफ्ट खाली पोहोचली आणि एक बाई अचानक आतमध्ये घुसली. मी तिला अत्यंत वाईट लूक द्यायचा प्रयत्न केला पण तिने माझ्या नजरेला नजर दिली नाही. एक बाई मुलिला शाळेत ज्या (पिकप बॉय) बरोबर सोडते तो लिफ्ट धरून ठेवतो आणि ही पोरिच्या पाप्या घेत बसते. Uhoh लिफ्ट चे असंख्य किस्से आहेत.

* दुसरं म्हणजे उधार पैसे देणे-घेणे यातही शिस्त असली पाहिजे. आपण पैसे घेतो ते जरूर लक्षात ठेवावे, आणि दिलेल्या वेळेला अथवा अगोदरच परत करावेत. अशाने आपला शब्द मानला जातो आणि पुढे मदत मागावयास ते दार उघडे राहते.
मी ऑफिसातल्या एका गरजूला बहिणिच्या लग्नासाठी काही हजार रक्कम दिली होती (रक्कम छोटी नाही) त्याचा पगार आणि घरची जबाबदारी पाहून मी हसतमुखाने पैसे काढून दिले होते ( एप्रिल २०१७) मध्ये बरं का. त्यातले १६ हजार अजून यायचे बाकी आहेत. जिच्या लग्नासाठी पैसे घेतले होते तिला आता मुलगी होऊन ती ३ महिन्याची झाली आहे. आता खुद्द या महाभागांचे लग्न आहे अगदी काही दिवसात, तत्पुर्वी मी अगदी हसतमुख बँक असल्याने माझ्याकडे चाचपणी झाली. पण मी खूप ठामपणे सांगितले की माझे पुर्वीचे पैसे पुर्ण परत आल्याशिवाय मी पुढचा व्यवहार करत नाही. मदत करायला काही वाटत नाही पण बोट दिले की हात धरणारे खूप असतात. त्याचा राग येतो.

एकदा मी ही २ लोकांकडून तात्पुरते ५० हजार घेतले होते काही दिवसांसाठी माझे पैसे ऐनवेळी अनलॉक झाले नाहित म्हणून. पण मी ते सांगितलेल्या दिवसाच्या अगोदरच परत केले कारण ठेवण्याचे काही कारणच नव्हते.
शेजारणीबरोबर मात्र (मैत्रिण असल्याने) पैशांचा सावळा गोंधळ असतो. चिरिमिरी वस्तू, रकमा यांचे हिशोब होत नाहीत. बर्‍याचदा माझे इस्त्री चे पैसे ती देते. तिचा मेन्टेनन्स मी भरते असे गोन्धळ होतात. पण ती हिशोबाला पक्की आहे, आवक जावक व्यवस्थित लिहून ठेवते त्यामुळे आयुष्य सोपे पडते.

बारकाईने लक्ष दिले तर एक गोष्ट लक्षात येते की शिस्तीत वागण्यापेक्षा बेशिस्तपणा करायला जास्त एनर्जी लागते. तरीही लोक असे का वागतात काही समजत नाही. >> हे वाक्य खूपच आवडलं.

संवादातली शिस्त -

१. फोन केल्यास प्रथम आपण कोण बोलतो आहे आणि आपल्याला कोण हवं आहे हे नम्रपणे सांगणे ही सर्वमान्य शिस्त आहे. पण खुद्द माझे बाबा फोन केला कुणाला तर पहिल्यांदा कोण बोलतंय असं विचारतात Uhoh मला ते इतकं ऑड वाटायचं ऐकताना की मी त्यांना म्हणायची आपण फोन केला आहे तर आपण सांगायला हवं कोण बोलतोय ते. तर ते म्हणे की "मला जो माणुस फोन वर हवाय तो नसेल तर भलत्याला मी माझं नाव का सांगू? Lol मी हसले फक्त.
२. रॉन्ग नंबर - मला कित्येक वर्ष राँग नंबर आला की डोकं फिरायचं. आणि मी चिडचिडून बोलायचे. नंतर नंतर मला जाणवू लागले की कधी कधी खूप खेड्यातून फोन कॉल्स येतात, ज्यांना फोन लावणे जमत नाही, कदाचित फोन साठी पुरेसे पैसे ही नसतील तर परत परत त्यांनी चुकिचा नंबर लावू नये म्हणून मी त्यांना पहिल्या फटक्यातच सांगते की तुम्हाला जो नंबर हवाय तो हा नाही तेव्हा प्लिज परत फोन करू नका. मात्र असे फोन ऑफिसला जायच्या वेळेत परत परत येत राहिले तर मात्र खूप चिडचिड होते.
राँग नंबर बरोबर गोड बोलल्याचा एकदा फटका बसला... नाव बरोबर घेतलं त्या मुलाने पण म्हणाला मी पुण्यात प्रॉपर्टी पाहतोय मला लोन विषयी बोलायचं होतं. मी म्हटलं मी बॅन्कर नाही मी आयटी मध्ये आहे. तरिही तो पुन्हा पुन्हा विचारत राहिला मजा करताय का? पण तरिही मी पेशंटली आणि गोड शब्दात ती मी नव्हेच हे सांगितले तर नंतर तो मला सतत व्हॉट्सपवर सॉरी चे मेसेज करायला लागला. दोन एक तासात ७ मेसेज आल्यावर मी त्याला ब्लॉक केले.

३. बोलताना दुसर्‍याला कट करणे :- माझी एक अत्यंत जवळची नातेवाईक आहे जी फोन केला की फक्त आणि फक्त स्वतःबद्दल बोलत राहते. वयाने ज्येष्ठ आणि स्वभावाने अत्यंत गोड असूनही तिचे अती बोलणे हे डोक्यात जाते. तिला कंटिन्यु फक्त आणि फक्त स्वतःबद्दल बोलायचे असते. साठी उलटूनही ही गोष्ट तिच्या लक्षात येत नाही. जाणिव करून दिली तर ती "हा बोल" असं म्हणते आणि टोटल गप्प बसते. आपल्या बोलण्याला हुं का चुं सुद्धा करत नाही.
मला पण जाणवते की मी पण माझ्या एका मैत्रिणीला असेच बोलताना खूप कट करते. हे मी खुद्द तिला बोलून दाखवले आहे आणि ते मी कमी करण्याचा प्रयत्न करते आहे.

४. बोलण्याचा वेग - काही लोक रक्त तापल्या प्रमाणे फोन वर बोलतात किंवा समोर सुद्धा, इतकं की ते संभाषण आपल्याला जड होऊन आपलेच डो़के दुखु लागते. * बोलताना तिसरीकडेच पाहून बोलणे. * खूप अंगविक्षेप करणे. * बोलताना खूप मोठ्या आवाजात बोलणे, थुंकी उडणे. आवडत नाही.
माझ्या ऑफिसात एक मॅनेजर लेव्हलची मुलगी कुणाशीही बोलताना गरजेपेक्षा लांब उभी रहायची. मला वाटायचे की ही मला कमी लेखतेय म्हणजे एकतर माझ्या तोंडाला वास किंवा अंगाला घामाचा वास येत असणार. पण मैत्री झाल्यावर मी तिला एकदा टोमणा मारला की तु त्या तिकडे लाम्ब जाऊन उभी राहून बोल ना.. तर तेव्हा तिने खुलासा केला की तिच्या बर्‍याच दातांचे रूट कॅनॉल केल्याने तिला स्वतःला भीती वाटत राहते की तिच्या तोंडाला वास येईल म्हणून तीच लांब उभी राहून बोलते लोकांशी Uhoh

मला हा धागा खूप आवडलाय Happy खूप लिहिणार मी यावर.

मला रांगेत उभं रहायचं म्हणजे पोटात गोळा येतो - अगदी बायकांची रांग असली तरी. मागच्या बाईने आपल्याला सतत पुढे ढकलत राहणे, खेटून उभे राहणे, हे प्रकार डोक्यात जातात. माझा पाराच चढतो. बर्‍याचदा मी अशा मूर्ख बायकांना माझ्या पुढे जायला सांगते (व्यवस्थित त्रासिक चेहरा करून) -- आणि त्या त्यांचा तो हक्क असावा अशा अविर्भावात जातात पुढे! शिवाय ओळखीचं कोणी शोधून मधे घुसणं तर आहेच.

चांगले प्रतिसाद येतायत.

> १. फोन केल्यास प्रथम आपण कोण बोलतो आहे आणि आपल्याला कोण हवं आहे हे नम्रपणे सांगणे ही सर्वमान्य शिस्त आहे. पण खुद्द माझे बाबा फोन केला कुणाला तर पहिल्यांदा कोण बोलतंय असं विचारतात
Uhoh मला ते इतकं ऑड वाटायचं ऐकताना की मी त्यांना म्हणायची आपण फोन केला आहे तर आपण सांगायला हवं कोण बोलतोय ते. तर ते म्हणे की "मला जो माणुस फोन वर हवाय तो नसेल तर भलत्याला मी माझं नाव का सांगू? Lol मी हसले फक्त. > दुसरा पर्याय म्हणजे "हॅलो हा क्षयझ चा नम्बर आहे ना?" असे पहिले वाक्य असणे आणि मग समोरच्याने हो म्हणल्यावर "मी अबक बोलतोय" सांगणे.

नववर्ष किंवा तत्सम शुभेच्छा द्यायला फोन करावा आणि त्या व्यक्तीने आपलं हलो ऐकताच शुभेच्छा देऊन टाकाव्यात हा प्रकार अनेकदा अनुभवलाय.
चालत्या ट्रेन बसच्या खिडकीतून थुंकणे, ट्रेनमध्ये सतत फोनवर बोंबलणे, सार्वजनिक जागेत फोनवर जोरजोरात बोलणे.

मला फोनवरचं कामाचं बोलणं संपलं की सरळ फोन कट करायची सवय होती. हे curt आहे, असं सांगितलं गेल्यापासून "बरं! ठेवू?" "चलो, बाय" अशी शेपटं जोडायला शिकलो.

ट्र्रेनमध्ये समोरच्या सीटवर, अगदी चपलांसकट किंवा डायरेक्ट चपलाच लागतील असे पाय ठेवणे.

कुठल्याही रांगेत पुढच्या व्यक्तीच्या अंगचटीला लागणे हेही अनेकदा पाहिलंय. मग ती ट्रेनची तिकीट खिडकी असेल, नाहीतर विवाहसमारंभात वधुवरांना भेटायची रांग.

बस मधे बसल्यावर शेजारी उभे राहणारे टेकून उभे राहतात तेव्हा खूप राग यायचा. तसेच त्यांची पिशवी/पर्स/बॅग आपल्याला लागत असते. नंतर तर मी माझ्या हातात काही नसेल तर सांगायला लागले कि जे आहे ते माझ्याकडे द्या आणि नीट उभे रहा.

मी रोज मेट्रो ने प्रवास करते तिकडे डोक्यात जाणारे महाभाग फार मिळतात .
मेट्रोच्या स्काय्वॉकवर २-३ जण्/जणी एका रांगेत गप्पा मारत चलत असतात . हा प्रकार भयानक चीड आणणारा आहे .
तुम्हाला घाई नाही , मागून येणार्याला आहे , तुमच्यासमोर ६-७ फीट जागा मोकळी पडली आहे . रमत्गमत चालायच आहे तर गार्डन मध्ये फिरा .

स्कॅनिन्ग मशीन मधून बॅग कलेक्ट करताना , एका कानाला फोन असतो , समोर २-३ बॅगा उचलायच्या असतात . तिकडचं उभे राहून हळूहळू एकेक बॅग उचलून खांद्याला लावणार . सगळ्या बॅगा पटकन पूढे सरकाव याच्या आणि मग हव तर हळू उचलायच्या ,पण तोपर्यन्त मागचीला तिची बॅग उचलू द्यावी हा विचारच नाही
एस्कलेटरवरती एका पायरीवर उभं राहून गप्पा मारणार्या दोन लोकांबद्दल तर बोलूच नका.
लिफ्टचा फारेण्ड्वाला खेळ काही अंशी ईथेही पहायला मिळतो .

या धाग्यात भर घालण्या सारखे खूप काही आहे.. हाताखालच्या किंवा बेसिक काम करणाऱ्या लोकांशी जसे कामवाली बाई, सोसायटी मध्ये स्वच्छता करणाऱ्या बायका आणि watchman. फक्त आपण पैसे देतो म्हणून अरेरावी ने बोलणारे आणि पावलो पावली त्यांचा अपमान करणारे लोकही भरपूर असतात.
बायकांना बोनस देण्यात कंजूषी करायची आणि त्यांनी सुट्ट्या मारल्या की त्यांचे पैसे कापायचे यात त्या बायकाही माणसं आहे, आपल्यासारखेच त्यांना सणवार, पाहुणे रावळे, सण समारंभ आहेत याचे भान विसरले जाते.

आमच्याकडे तर कचऱ्यात काहीही सापडते आणि असा कचरा त्या बायकांना ओला सुका च्या नावाखाली हाताने वेगळा करावा लागतो. त्या बायकांनी रोज बेल वाजवून कचरा मागायचा आणि एखादे वेळ नाही मागितला किंवा वैतागून बोलल्या की सोसायटी मध्ये थयथयाट करायचा.
Guest parking बहुतांश सोसायटी मध्ये बाहेर करवतात. आमच्याकडे ज्याच्याकडे गेस्ट आहेत तो आणि ज्याचे पार्किंग अडले आहे तो असे दोघेही watchman ला ओरडतात. तो बिचारा काहीच करू शकत नाही कारण guest आणि host दोघांनीही त्याचे ऐकलेले नसते.

या लोकांच्या आगाऊपणाची दुसरी बाजू सुद्धा आहे. पण ज्या वेळी हे लोक बरोबर असतात तेव्हाचा माझा अनुभव.

Pages