मला आठवते , आमच्यावर लहानपणी असे संस्कार झाले होते कि कुणाकडे गेल्यावर कुठल्याही वस्तूला हात लावू नये , खायला मागू नये , खायला दिले तर थोडेसे खावे , आपल्यामुळे किंवा आपल्या कोणत्याही क्रुतीमुळे ज्यांच्याकडे आपण आलो आहोत त्याना कसल्याही प्रकारचा त्रास किंवा तसदी होवू नये याची नितांत काळजी घ्यावी. जेवायच्या वेळी शक्यतोवर कुणाकडे जाऊच नये. आभ्यासाला किंवा खेळायला कुण्या मित्रा कडे गेलात तर निघताना मांडलेला सगळा पसारा आवरून मगच बाहेर पडायचं !
मोठे झाल्यावर , कळायला लागल्यावर लक्षात आले कि आमची आई किती विचारी होती. किती विचारपूर्वक हे सारे तिने आम्हाला शिकवले ! दुसर्यांकडे गेल्यावर तुमचीच बडदास्त ठेवण्यात त्यांचा वेळ गेला तर शांतपणाने बसून गप्पा , विचारपूस , साहित्य-नाट्य-संगीत यावर चर्चा , माहितीची देवाण- घेवाण कशी होणार? टी व्ही वरचे कार्यक्रम - क्रिकेटच्या मॅचेस एकत्र बसून त्या घरच्या ग्रुहीणींना कशा बघायला मिळणार ? तुमचे केलेले पसारे आवरण्यात त्यांनी का वेळ घालवायचा ? त्यानाही त्यांचे उद्योग , नोकर्या आहेत , त्यांच्या हॉबीज आहेत , विरंगुळा आहे.... त्या सगळ्याचा आदर तितकाच महत्वाचा ... त्या कशात बाधा येऊ न देणे ही आपली जबाबदारी नाही का !
अशा शिस्तबद्ध वागणुकीमुळे शेजारी - पाजारी , मित्र ,नातेवाइक सगळ्यांच्या प्रेमाबरोबर नेहमी नकळत कौतुकाची शाबासकी मिळत गेली. आज पर्यंत सगळ्यांशी अतिशय घनिष्ट नाते-संबंध जोपासले गेले.
आजकाल मात्र वेगळेच चित्र दिसते. मुले वावसटपणे दुसर्यांच्या घरात धुडगूस मांडतात , वस्तू बिनधास्तपणे घेतात , हाताळतात , कुठेही कशाही टाकतात, आरडा ओरडा - किंचाळणे हेही बरोबरीने चालू असते.. आणि त्यांचे पालकही त्याना काही बोलत नाहीत , उलट थोडं जास्तच झालं तर , कौतुकाने " तो ऐकतच नाही" असे लाडाने म्हणतात ! आणि मोठ्याना या गदारोळात एक अक्षर शांतपणे बोलता येत नाही !
पुढे जाऊन आता अशी एक वेळ आली आहे कि अतिशय घनिष्ट प्रेम किंवा मैत्री म्हणजे दुसर्याला उगाचच खोड्या काढत त्रास द्यायचा , Embarrass करायचे... आणि त्यानेही ते 'प्रेमाने' सहन करायचे ... अशी व्याख्याच झालिये जणू ! आजकाल अशा जाहिरातीही पहायला मिळतात... आइसक्रीम दुसर्यासमोर धरायचे आणि तो खाऊ लागला कि त्याच्या तोंडासमोरून काढून घेऊन स्वतः च खायचे ... आणि फिदी फिदी टाळ्या देत हसायचे !
खूप जवळचा , खूप प्रेम म्हणजे हे 'असे वागण्याचा हक्क', हे कुठून आले ?
मला प्रश्ण पडतो कि फक्त मलाच हे बोचते का माझ्यासारखे इतरही आहेत कुणी ?
एटीकेटस, शिस्त देखील
एटीकेटस, शिस्त देखील भाषेप्रमाणे दहा मैलांवर बदलत जातात. जिथे कुठे असाल तिथल्या हवामानाप्रमाणे रहावे, कपडे घालावेत, सर्वांना रुचेल असा वावर असावा. त्याचे (भारतात तरी) जास्त अवडंबर माजवू नये तसेच अगदीच फाट्यावर मारल्यासारखेही करू नये.
मी इथे पोस्ट टाकून सरळ
मी इथे पोस्ट टाकून सरळ एम्प्रेस गार्डनला फ्लॉवर शो बघायला निघून गेले. आता मूड मस्त आहे त्यामुळे वर वाचलेल्या पोस्ट्सना प्रतिसाद देत नाही. तसही हर्पेन म्हणल्याप्रमाणे जे जे होईल ते ते पहावे, डोक्याला त्रास करून घेऊ नये. एकूणच पोस्ट्स मधले अँटीट्यूड्स पहाता सुधारणेची काही अपेक्षा ठेवण चूकच.
दक्षु, तुझा सल्ला बेस्ट. आपण पर्फेक्ट नसू, रादर नाहीच, पण काय चुकतं आहे हे सांगितलं तर सुधारायची तयारी आहे. जे चूक माहीत आहे, जे सामाजिक रित्या अयोग्य माहीत आहे, ते नक्कीच करणार नाही.
Bagz तुझ्या पोस्ट्स आवडल्या. सहमत आहे.
किरणउद्दीन, योग्य सल्ला.
उदाहरण द्यायचे झाले तर लिफ्ट
उदाहरण द्यायचे झाले तर लिफ्ट चा किस्सा. घाईच्या वेळेत बाकीचे मॅनरलेस लोक जेव्हा घोळका करुन उभे असतात अन आपल्याला ज्या मजल्यावर जायचेय तिथे चालत जाणे खुप त्रासदायक आहे किंवा झेपणार नाही म्हणजेच थोडक्यात काय तर लिफ्ट ला पर्याय नाही . त्यावेळी काय करत असावे बरे?? >>>>
हे इतके अवघड नाही. नेहमी करतो. त्या घोळक्याच्या मागे उभा राहतो. एक जनरल अंदाज घेउन आपल्या आधी जे तेथे आहेत त्यांच्या पुढे घुसत नाही. ते आत गेल्यावर माझ्या नंतर जे आले आहेत ते जर घुसू लागले तर त्यांच्या पुढे घुसतो. लिफ्ट येताना मी जर तेथे उभा असेन तर थोडा मागे उभा राहतो. बाकीचे काही का करेनात. थोडक्यात १. आतल्या लोकांना व माझ्या आधी आलेल्यांना आधी जाउ देणे, आणि २. नंतरच्यांना आपल्यापुढे न घुसू देणे - यात तडजोड करायची वेळ आली तर "१" ला महत्त्व व "२" च्या बाबतीत तडजोड.
आपण बॅकपॅक पाठीवर घेऊन फिरत
आपण बॅकपॅक पाठीवर घेऊन फिरत असताना लिफ्टमधे किंवा जिथे दोन लोकांमधे फार अंतर ठेवू शकत नाही अशा ठिकाणी बॅग पाठीवरून काढून हातात खाली धरणे. >> बंगलोर मेट्रो मधे हे आवर्जून लिहीलेले आहे, चित्र वगैरे काढून
आणि लोक करतानाही दिसतात.
लिफ्टचे किस्से राहुद्या, आता
लिफ्टचे किस्से राहुद्या, आता खालुन आवाज येतायेत ठणाना ‘हम जीएंगे या मरेंगे ऐ वतन तेरे लिए’
२६ जानेवारी उद्या आहे ना? विरोध तर बाजुलाच, सुचवायची सुध्दा सोय नाही.
फा +१.
फा +१.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मी मला आवडणारी गाणी गाडीत मोठ्ठ्याने लावुन ऐकू शकतो पण बायकोने तिच्या आवडीची लावली की प्रतिक्षिप्तपणे हात आवाजाचा नॉब कमी करण्याकडे जातो. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मग उद्या चालणारे का तुम्हाला हा आवाज?
बाकी पुण्याचे लोक विसर्जनाच्या मिरवणुकीचा विषय आला की स्पिकर, दिवस रात्र आवाजाचा गदारोळ यावर चक्क काणाडोळा करतात. मुंबईचे क्रिकेटच्या मॅचच्या गोधळाला... नाही नाही... सगळ्याच समस्यांना करतात.
आणि हेच लोक भारतातून परदेशात आले की अरे इथे किती शांतता आहे, रात्रीच नाही तर दिवसापण शांत शांत, अजिबातच करमत नाही, अशा शांततेची सवयच नाही... अरे पंख्याचा आवज तरी लावा की झोप येईल म्हणतात.
आपल्याला जे आवडत नाही त्याचा माणसाला फार्फार त्रास होतो.
ज्यांना लिफ्टमधे चढणे उतरणे
ज्यांना लिफ्टमधे चढणे उतरणे जमत नाही त्यांना मुंबईच्या दादर स्टेशनला एक महीना लोकलमधे चढण्या उतरण्याचा कोर्स करायला लावावा. कंपल्सरी..
प्राजक्ता, सदर्न
प्राजक्ता, सदर्न कॅलिफॉर्नियाचे वाचून मजा वाटली. कारण मी देशातून डायरेक्ट इकडे आल्याने मी ह्याच ट्रॅफिकला जबरा शिस्त वगैरे म्हणते. एखादी कार जाते कैच्याकै वेगात वगैरे ते सोडून देते. इतर ठिकाणी कसं आहे अमेरिकेत बघायला हवं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ऑटीझमच्या लेखांची सुरवातच मी ह्या उदाहरणाने केली होती. हे स्पेसिफिक कारण आहे आमचे बाहेर जेवायला जाणे कमी झाल्याचे. आपल्यामुळे इतरांना त्रास नको. अर्थात बरंय म्हणा. हेल्थच्यादृष्टीने बरंच झाले.
मुलं पळापळ, आवाजी दंगा>>
बायदवे, चांगला धागा आहे.
बे एरिया, सदर्न कॅलिफोर्निया,
बे एरिया, सदर्न कॅलिफोर्निया, न्यू जर्सी आणि सर्व मेट्रोज ची डाउन्टाउन्स - हे सोडले तर बाकी अमेरिकेत अत्यंत रिलॅक्स्ड ड्रायव्हिंग कल्चर आहे असे मला तरी दिसले आहे. एनसी, मेरीलॅण्ड, अटलाण्टा, ह्यूस्टन या ठिकाणच्या सबर्ब्ज आणि जवळपासच्या भागातील अनुभवांवरून.
Pages