Submitted by पाटलीण बोवा on 19 January, 2019 - 22:40
प्रेमभंग झाल्यावर काय करावे ?
१. जिम लावावी, बॉडी बिल्डींग करावे
२. कवी/ कवयित्री व्हावे
३. व्यसनी व्हावे
४. दुनियेला आग लावावी
कृपया नीट सल्ला द्या. विषय अत्यंत नाजूक व गंभीर आहे. पालतूगिरी करू नये.
( फालतू लोकांनी इकडे फिरकूच नये )
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
> Submitted by ऋन्मेऽऽष on 21
> Submitted by ऋन्मेऽऽष on 21 January, 2019 - 09:50
मन आणि भावना प्रेम करायला दिलेत. विरहात सडायला नाही. आणि सहानुभूती वगैरे नाहीच. व्यवहारिक सल्ला दिला आहे. अखेर जगण्यासाठी अन्न, वस्त्र निवारा लागतो. ब्रूटल असली तरी हीच वस्तुस्थिती आहे. आठवणी खावून जगता येत नाही. आणि हे मीच नाही अनेक थोर लोकांनी सुद्धा हेच म्हटले आहे. खांडेकरांचे साहित्य वाचले नाही का? "स्वप्नभंग... काचेचे तुकडे... रक्ताळलेल्या टाचा.. नवीन स्वप्नामागे धावणे..." वगैरे वगैरे. प्रसिद्ध आहे कि हो.
प्रेम ही एक उथळ भावना नाहीये
प्रेम ही एक उथळ भावना नाहीये मित्रांनो. जर कधी झालेच नसेल तर तुम्ही ते समजू शकत नाही. मी समजवू शकत नाही.>>>>>>>>. छान प्रतिसाद दिला हां. आवडला.
कुठलाही शाहरूख होणे सोपे नाहीये.
मायबोलीचा शाहरूख होणे त्याहून अवघड.
एका म्यानात दोन तलवार नाही राहू शकत..>>>>>सोपे नसोन पण अवघड नाही...
मन आणि भावना प्रेम करायला
मन आणि भावना प्रेम करायला दिलेत. विरहात सडायला नाही.
>>>>>
विरहात लोकं "सडतात" हेच गृहीतक मुळात चुकलेले आहे
अखेर जगण्यासाठी अन्न, वस्त्र निवारा लागतो.
>>>>
हे असेही म्हणता येईल की नुसते अन्न वस्त्र निवारा जगण्यासाठी पुरेसा नसतो.
वाटल्यास इमॅजिन करून पाहा की कुठल्यातरी परग्रहावर आहात आणि मुबलक अन्न वस्त्र निवारा उपलब्ध आहे. पण याऊपर काहीच नाही. कोणाचीच सोबत नाही. आयुष्य जगणे आणि एक दिवस मरण्यासाठी जगणे यात फरक आहे
प्रेमभंग झाल्यावर काय करावे?
प्रेमभंग झाल्यावर काय करावे?
<<
प्रश्नः हार्ट अॅटॅक आल्यवर काय करावे?
उत्तर:
१. हार्ट अॅटॅक आल्याचे डायग्नोसिस.
आधी हार्ट अॅटॅक म्हणजे काय ते समजून घेणे. मग,
२. पेशंटला अॅटॅक आलाय हे डायग्नोज करणे.
३. तो नक्की का आलाय?
अ. असिस्टोल उर्फ हार्ट बीटच करीत नाहिये.
आ. वी टॅक उर्फ चुकीच्या पद्धतीने बीट करतेय
ई. फ्लटर आहे.
वगैरे.
४. मग त्यावर उपचार करावेत.
तर,
हे असले भाकड वर का लिहिलेय? तर तुमचा प्रेमभंग झालाय म्हणजे नक्की काय झालंय ते जरा डायग्नोज करा आधी.
तुम्ही लाईन मारत होतात तिला अॅनॉनिमस पत्र लिहून पोस्टात टाकले, अन त्याचे उत्तर आले नाही म्हणून तुम्ही प्रेम भंगी झालात का?
प्रेम भंगाची लेवल व रिअॅलिटी आधी डिफाइन करा व डायग्नोसिस एस्टॅब्लिश करा. मग पुढे काय करायचे ते ठरते.
आपल्या देशातल्या ९९.८८% प्रकरणांत,
प्रेमभंग झाल्यावर काय करावे? या प्रश्नाचे उत्तर, "लग्न" असे आहे. (आईबापांनी करवून दिलेले 'अॅरेंज्ड' उर्फ नियोजित विवाह)
त्यानंतर सुमारे ५० (अक्षरी पन्नास) वर्षे वय होई पर्यंत वाट पहावी.
तद्नंतर व्हॉट्सॅप ग्रूप फॉर्म होतील. प्रायमरी स्कूलचा ग्रूप फॉर्म होऊ द्यावा. मग तेथे तुमची प्रेयसी आपल्या पांढर्या झिपर्या सावरत, थरथरत्या आवाजात तुम्हाला सांगेल, की अरे तू ही मला आवडायचास. मग तिच्या डीपीमधे सोबत असलेल्या तिच्या नवर्याच्या टकलाकडे तुक टाकून प्रेम भंगी हळहळ करीत पुन्हा एकदा जिम जॉइन करावी
काही नाही दुसरीकडे दुकान
काही नाही दुसरीकडे दुकान थाटावे
Pages