सध्या दिवसातले २५-२५ तास काम करत असल्याने, पुढील भाग उशिरा येण्याची शक्यता आहे. ऍडव्हान्स मध्ये माफी असावी....
पाटील v/s पाटील - भाग १०
https://www.maayboli.com/node/68633
वर्षभराने!
"वसंता, अंबा फिरकली नाही रे कधीची."
"आई ते कर्ज फेडताय की नाही?"
"देवाला माहीत. तू तिकडे युक्रेनला असतो, मला मेलीला घर सोडून जाता येत नाही."
"कृष्णा," वसंताने हाक मारली.
"काय दादा?"
"उद्याच आपल्याला पाटीलवाडीला निघायचय! जगन आणि आई घरी थांबेन, तू आणि मी जाऊयात."
"वसंता, तुम्हाला जाऊ नाही द्यायची मी. मीपण येईन!"
"आई एकदा फक्त बघून तर येऊ दे."
"दिनकरराव आणि तुझं किती जमतं, मला माहिती नाही होय? मीच येते तुझ्याबरोबर. कृष्णा, तू आणि जगन घरीच थांब."
सकाळी राधाबाई आणि वसंता निघाले. एसटी थांब्यापासून पाटीलवाडी साधारणतः दहा मिनिटं अंतरावर आत होतं.
"आई, ते बघ!" जाता जाता वसंताने एका दुकानाकडे बोट दाखवलं.
"अंबाचं ना रे हे दुकान?"
"आई पण नाव वेगळंच दिसतंय!"
वसंत दुकानात पोहोचला.
"काय हवंय," मालक म्हणाला.
"अहो, दिनकररावाना बोलवा, त्यांना म्हणा, वसंत आलाय."
"महिनाभरापूर्वीच दुकान विकलं त्यांनी."
वसंताच्या डोक्यावर वज्रघात झाला. तो झरझर पावलं टाकत राधाबाईजवळ पोहोचला.
"आई..."
"काय झालं वसंता?"
"दिनकररावांनी दुकान विकलं!"
"वसंता," राधाबाई सुन्न झाल्या. आणि सावरून म्हणाल्या, "चल पटकन!"
दोन्हीही अंबाच्या घराकडे निघाले.
अंबाच्या घरात आज प्रचंड रेलचेल चालू होती. धान्याने कोठारे भरली होती, आजूबाजूला नवीन बांधकामे चालू होती.
"वसंता, काही वाईट नाही झालंय," राधाबाई समाधानाने हसल्या!
"दिनकरराव, ओळखलं का नाही," वसंता दिनकररावांकडे जाऊन म्हणाला.
क्षणभर दिनकरराव गोंधळले, आणि अचानक भानावर येऊन म्हणाले.
"वसंता, आधी कळवायच की?"
"का टांगा पाठवणार होतात?" वसंता रोखून म्हणाला.
"वसंता, मोठ्यांशी तरी नीट बोलत जा!" घराच्या दारातून अंबा कडाडली.
अंबाचा आवाज ऐकून राधाबाईही थरारल्या...
"अंबे लहान आहे तो अजून," त्या कशाबशा म्हणाल्या.
क्षणभर कुणीच काही बोललं नाही. दिनकरराव मजुरांना सूचना देऊ लागले. अंबा घरात गेली, तशी पुन्हा दिसलीही नाही.
दोघेही, एकमेकांकडे आशाळभूत नजरेने बघत होते.
"दिनकरराव, घरात बोलवाल की नाही?" शांततेचा भंग करत राधाबाई म्हणाल्या.
"अरे हो, या, या..." दिनकरराव लगबगीने घरात पळाले.
आत गेल्यावर अंबाने गूळ पाणी दिलं!
"अंबा, चांगली प्रगती दिसतेय..."
"काय प्रगती राधी, दुकान गेलं,आता आहे त्यात भागवायच!"
राधाबाईंचा घसा कोरडा पडला.
"पण जाऊदे, आता शांतता मिळते. जे करायचं ते शेतीत! तुम्ही आता आराम करा, संध्याकाळी बोलू! जा, हातपाय धुवून जेवण करून घ्या."
संध्याकाळी दिवेलागण झाली. अंबा आणि दिनकरराव दिवाणखोलीत बसले.
"अंबे, एक विचारायचंय," राधाबाई म्हणाल्या
"विचार ना."
"माझ्या शेतीचं गहाणखत सोडवलंस?"
असह्य शांतता पसरली.
"दुकान गेलं, आणि तूझी शेतीही..." अंबा शांतपणे म्हणाली.
सगळीकडे एक सुतकी शांतता पसरली. राधाबाई जागीच थिजल्या. आणि किंचाळी घुमली!
"फसवलं, अंबे तू, फसवलं. तुला दुकान नाही, शेती वाचवायची होती. तुझं धान्याचं कोठार, तुझं भलंथोरल घर, माझ्या शेतीचा घास घेऊन भरलं तू... अंबे, माझ्या तोंडातला घास काढला तू, माझ्या तिन्ही पोरांना रस्त्यावर आणलं तू."
अंबा संतापली
"राधी, भरल्या घरात रडू नको. तोंड सांभाळून बोल. मी बोलली नव्हती, शेती गहाण ठेव म्हणून. आणि माझ्याकडे येऊन राहा, तू एक काय जड नाही मला."
"भिकारीण नाहीये मी अंबे, हा वसंता चार घरं घेऊन देईल मला. मला दागिने दे फक्त, मी जाते परत." राधाबाई संतापाने थरथरत होत्या.
"राधी, दागिनेही गेले."
"अंबे, नीच, अग काय केलं हे? आपल्या सगळ्या पिढ्यांची पुण्याई अशीच वाहिलीस... अंबे मला दागिने परत हवेत."
"मी काय म्हणतो राधाबाई," दिनकरराव मध्येच छद्मी हसत म्हणाले, "तुम्हाला दागिन्यांची गरज काय? म्हणजे जर तुम्ही दागिने घालून मिरवायला लागलात, तर लोक वेगळा संशय घेतील हो..."
आणि पुढच्याच क्षणी दिनकररावांच्या डोळ्यासमोर अंधाऱ्या आल्या.
वसंता दिनकरच्या छातीवर चढून तोंडावर धडाधड ठोसे लगावू लागला.
दोन तीन गड्यांनी त्याला आवरले..
"महादू, दगडू, रामा, ह्या भिकाऱ्यांना बाहेर फेका..."अंबा कडाडली...
वसंता कुणालाही आवरत नव्हता, शेवटी एकाने वसंताच्या डोक्यावर जोरात काठी मारली...
वसंताच्या डोळ्यासमोर अंधारी येऊन तो जागीच बेशुद्ध झाला.
"अंबे, नको मारू त्याला, जाते मी. पण एक लक्षात ठेव, तुला नाही माझ्या पायाशी अश्रू ढाळायला लावले, तर राधा नाव लावणार नाही मी."
गड्यांनी उचलून वसंताला बाहेर टाकलं...
राधाबाई मूकपणे अश्रू ढाळत होत्या, थोड्यावेळाने वसंता शुद्धीवर आला. आणि म्हणाला
"आई, चलायचं?"
"वसंता!!!"
"आई मला काहीच आठवत नाहीये, आणि आठवायचंही नाहीये. चल जाऊयात!"
घरी गेल्यावर चार दिवसात राधाबाई आणि त्यांच्या तीन मुलांनी घर सोडलं,
नव्हे गाव सोडलं!
नव्हे राज्य सोडलं!
...नव्हे देशच सोडला!!!!
आणि ते कायमचे युक्रेनला स्थायिक झाले...
मस्त ! कथा प्रत्येक एपीसोडला
मस्त ! कथा प्रत्येक एपीसोडला अधिक रंजक आणि उत्कंठा वाढवणारी बनत चालली आहे.
धन्यवाद डूडायडू!!!
धन्यवाद डूडायडू!!!
(No subject)
तुमची लेखन शैली एकदम ओघवती
तुमची लेखन शैली एकदम ओघवती आहे. प्रत्येक भाग पुढल्या घागची उसुक्ता वाढवतो
@ श्रद्धा, ये ना चोलबे! फक्त
@ श्रद्धा, ये ना चोलबे! फक्त स्मायली? (सात्विक रागासाठी स्मायली सुचवा )
बादवे, या कथेत काही ईस्टर एग टाकलेत, बघा सापडतंय का?
@उनाडटप्पू -.धन्यवाद. पुढच्या भागासाठी वेळ लागेल थोडा, सांभाळून घ्या...
नेहमी सारखंच छान लिहीलयं
नेहमी सारखंच छान लिहीलयं
काल उशिरा वाचली...
म्हणून कंजुशी झाली कमेंट करताना
पण तुला माहितीये ना तु लिहिलेले मला आवडणार नाही हे शक्य आहे का..
आता परत वाचतेय.
अग जोक केला श्रद्धा!
अग विनोदात म्हटलं....
आणि तुला धन्यवाद बिलकुल म्हणणार नाही. गुड मॉर्निंग!!!
अग विनोदात म्हटलं.>> i know
अग विनोदात म्हटलं.>> i know
Very Good morning to you too..
हा भागही मस्तच झालाय. आणि
हा भागही मस्तच झालाय. आणि आमचं वाचकांचं टेन्शन घेऊ नका. तुमच्या लिखाणाच्या ट्रीटसाठी थोडी वाट बघायची आमची तयारी आहे.
खुप छान चालली आहे कथा. तुमची
खुप छान चालली आहे कथा. तुमची लिहन्याची पद्धत मस्त आहे.
Ek no jhalay ha bhag pn
Ek no jhalay ha bhag pn
वाचतेय.
वाचतेय.
मस्त
मस्त
मस्त चालुये स्टोरी .. पुभाप्र
मस्त चालुये स्टोरी .. पुभाप्र
हा भागही मस्तच झालाय. आणि
हा भागही मस्तच झालाय. आणि आमचं वाचकांचं टेन्शन घेऊ नका. तुमच्या लिखाणाच्या ट्रीटसाठी थोडी वाट बघायची आमची तयारी आहे.
Submitted by Meghana sahasrabudhe on 16 January, 2019 - 01:36>>>>
धन्यवाद मेघना, आणि अशी मुभा मला देऊ नका, नाहीतर मी महिनोंमहिने गायब होईन
खुप छान चालली आहे कथा. तुमची लिहन्याची पद्धत मस्त आहे.
Submitted by राजकूमारी on 16 January, 2019 - 02:34>>>>>>
धन्यवाद राजकुमारी!
Ek no jhalay ha bhag pn
Submitted by Haddi on 16 January, 2019 - 03:08>>>>>
धन्यवाद!
वाचतेय.
Submitted by अॅमी on 16 January, 2019 - 20:53>>>>>>>
धन्यवाद अॅमी. बादवे सदस्य नावात काही घोळ झालाय का?
मस्त
Submitted by कोमल १२३४५६ on 17 January, 2019 - 00:59>>>>
धन्यवाद कोमल
मस्त चालुये स्टोरी .. पुभाप्र Happy
Submitted by मेघा. on 17 January, 2019 - 01:11
>>>> तू मस्त म्हणशीलच, तुझ्यामुळे दिवसातल्या सवविसाव्या तासाला पुढचा भाग लिहावा लागला!
Kiti Chan bhag.. tumhi liha
Kiti Chan bhag.. tumhi liha aramat aamhi wait kru...
> धन्यवाद अॅमी. बादवे सदस्य
> धन्यवाद अॅमी. बादवे सदस्य नावात काही घोळ झालाय का? > एमी असायला हवं आणि अॅमी झालंय असं म्हंतोय्स का?
नाही पण मला अ नंतर स्वतंत्र
नाही पण मला अ नंतर स्वतंत्र रफार आणि नंतर मी दिसतोय!☺️
(No subject)
गुड मॉर्निंग श्रद्धा!
गुड मॉर्निंग श्रद्धा!
गुड मॉर्निंग.. खुप लवकर उठतोस
गुड मॉर्निंग..
अनंतर स्वतंत्र अर्धचंद्र बरेच
अनंतर स्वतंत्र अर्धचंद्र बरेच दिवस दिसतोय मला. सदस्यनाम घेताना माझ्याकडे नोकिया २७०० त्याच्या मराठी किपॅडवरून 'अ'वर अर्धचंद्र टंकता आला होता आता गुगल इंडिक किबोर्डवरून तसा लिहता येत नाही, ऍ टंकता येतोय....
नोकिया 2700 क्लासिक,
नोकिया 2700 क्लासिक,
टू बी सेसिफिक
हो हो क्लासिक फोन
हो हो क्लासिक फोन
अरे क्लासिक त्याच्या नावातच
अरे क्लासिक त्याच्या नावातच होतं.
आणि इतकं सगळं आठवण्याचं कारण म्हणजे, माझा पहिला मल्टिमीडिया फोन होता तो, आणि हरवला
त्यांनतर मी चॉकोलेट घेतला, LG चा (अज्ञातवासी साहेब, फोन पुराण बस करा)
> अरे क्लासिक त्याच्या नावातच
> अरे क्लासिक त्याच्या नावातच होतं. > हो माहित आहे. माझा दुसरा फोन होता तो. किपॅडवरची सगळी अक्षरं मिटून जाईपर्यंत वापरला. सध्या वापरत नसले तरी अजूनही ठेवला आहे घरात.
> (अज्ञातवासी साहेब, फोन पुराण बस करा) > हो बस झाले फोनपुराण
अज्ञातवासी साहेब, फोन पुराण
अज्ञातवासी साहेब, फोन पुराण बस करा>> आवडता विषय आहे ना ..
आवडता विषय आहे ना .. खूपच!
आवडता विषय आहे ना .. खूपच!
बादवे कुणालाही इस्टर एग सापडलं नाही का, तिकडे तर एक कथाही पूर्ण झाली!!!
शोधा शोधा
Ata taka ki Navin bhag...
Ata taka ki Navin bhag...
@उर्मिला-
@उर्मिला-
उर्मिला आज किंवा उद्या नवीन भाग येईल. बिलकुल चुकवू नका, एका नवीन कॅरेक्टरच कमिओ अपिअरेन्स होणार आहे, याल तर पोटभर हसाल, नाहीतर फसाल!!!
Pages