बाहुबलीचा विक्रम तोडणारा चित्रपट -Accidental Prime Minister

Submitted by कटप्पा on 29 December, 2018 - 15:49

होय हा चित्रपट येतोय, आणि निवडणुकीच्या वेळेस येतोय.
अनुपम खेर ममो च्या भूमिकेत आहे.
योगायोग म्हणजे संजय बारु यांचे हे पुस्तक देखील बरोबर २०१४ च्या निवडणुकीच्या वेळी आले होते.

सर्वांना माहीत आहे अनुपम बीजेपी चा माणूस आहे.

चित्रपट कोणत्याही अजेंडा ने असू दे मात्र प्रचंड धंदा कमवेल हे निश्चित. काँग्रेस च्या 5 करोड लोकांनी हा चित्रपट जरी पहिला तरी ५०० cr आणि बीजेपी वाले नक्कीच बघणार, त्यांच्या ट्विटर हँडल वरून ट्रेलर प्रोमोट झाला आहे.
१००० करोड कुठे जाणार नाहीत. बाहुबली चा रेकॉर्ड तुटणार.

ट्रेलर -
https://youtu.be/q6a7YHDK-ik

Group content visibility: 
Use group defaults

कोणी कोणी पाहिला हा चित्रपट?
बाहुबलीचा विक्रम शाबूत आहे का?
आनुपम खेर यांच्या मते त्यांचा अभिनय ऑस्करच्या पात्रतेचा आहे, असं ऐकलं. दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत का?
विवेक ओबेरॉय साकारत असलेला आदर्णीय मोदीजींवरील चित्रपट आणि त्यावरचा धागा कधी येतील?

हा चित्रपट थिएटर मध्ये धंदा करायला बनवलाच नाहीये,
मतदानाच्या आदल्या दिवशी सर्व सॅटेलाईट/ केबल चॅनेल वर दाखवण्यासाठी बनवला आहे.

अजून महिन्याभरात याचा TV वल्ड प्रीमिअर होणार.
आणि एप्रिल पर्यंत हा सुर्यवंशम चा रेकॉर्ड मोडणार

विवेक ओबेरॉय साकारत असलेला आदर्णीय मोदीजींवरील चित्रपट आणि त्यावरचा धागा कधी येतील?>>>>>

धीर धरा हो जरा... सगळे एकदम कसे होणार.

हा चित्रपट थिएटर मध्ये धंदा करायला बनवलाच नाहीये,
मतदानाच्या आदल्या दिवशी सर्व सॅटेलाईट/ केबल चॅनेल वर दाखवण्यासाठी बनवला आहे.>>>>

बरोबर. काही वर्षांपूर्वी बॉबी चित्रपट अशाच काही कारणांमुळे दाखवलेला असे ऐकले होते. हिस्टरी रिपीट्स असेही ऐकले आहे.

Who cares,
तसाही पिक्चर झोपालाय, त्यामुळे हे अनुपम खेर चे पब्लिसिटी स्टंट समजून विसरून जायचे.

काही वर्षांपूर्वी बॉबी चित्रपट अशाच काही कारणांमुळे दाखवलेला असे ऐकले >>>>
ताई, तरुण जोडी मुळे सुपर हिट झालेला चित्रपट TV वर दाखवणे
आणि राजकीय अजेंडा राबवणारा , प्रचारकी चित्रपट मतदानाच्या आदल्या दिवशी, आचार संहिता लागू झालेली असताना दाखवणे
हे तुमच्या मते सारखेच आहे. फिर क्या, बोलणंच खुंट्या

बॉबी ?? काही कळलं नाही.
बॉबी कोणी दाखवला व त्यात कोणाचा काय फायदा?
सिम्बा किंवा साधना सांगा की प्लीज.

बाकी मला तर या चित्रपटाची गरजच काय हा प्रश्न आहे. २००४ ते २०१४ या काळात २४ तास मीडिया कव्हरेज होतं, शेवटी शेवटी सोशल मीडिया पण जोरात होता. मग जेलोकांनी ऑलरेडी लाइव्ह पाहिलंय तेच पुन्हा काय बघायचं.
त्यापेक्षा १९९१ नावाचा चित्रपट यायला हवा ज्यात नरसिंह राव व मनमोहन यांनी देश बुडता बुडता कसा वाचवला ते दाखवता येईल. सोनं गहाण टाकण्याचा सीन तर हवाच. पण यात राव व सिंग हे दोघे हिरो बनतील जे अनेकांना अनेक कारणासाठी नको असेल.

निव्वळ अप-प्रचार आहे. चित्रपटाचे नाव Accidental Media Advisor हे जास्त समर्पक ठरले असते.

काँग्रेसने आदळआपट/ विरोध करुन सपशेल आपटणार्‍या चित्रपटाला थोडी संजिवनी दिली.

<< विरोधी पक्षाची मुंबईत मोठी सभा होणार होती, त्याच दिवशी टीव्हीवर बॉबी दाखवला असं सांगतात लोक. >>
------- सभेला विराट गर्दी जमल्याच्या तंत्रज्ञानाचा त्या काळात विकास झाला नव्हता ?

बॉबी
कुठल्यातरी लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा दिवस होता. तोपर्यंत टीवी वर फार अपडेट्स येत नसत. स्पेशिअल न्यूज बुलेटिन्स असत. ती मात्र लोक टीवीला चिकटून राहून बघत. मला वाटते आणीबाणी उठल्यावरच्या निवडणुकीच्या निकालाचा दिवस असावा. सकाळी मतमोजणीपासूनच कॉंग्रेस जबरदस्त मार खात असल्याच्या बातम्या पसरू लागल्या होत्या. संध्याकाळच्या स्लॉट्मध्ये नेहमीच्या कार्यक्रमाऐवजी एक लोकप्रिय चित्रपट दाखवला. तो मध्ये मध्ये थांबवून बातम्या दाखवल्या जात होत्या. पण लोकांमध्ये इतके चैतन्य उत्सुकता आणि हर्षोन्माद पसरला होता की तो चित्रपट पाहाण्याऐवजी लोक बाहेर पडून एकमेकांना भेटत आनंद व्यक्त करीत होते. मला वाटते हा सिनेमा बॉबीच असावा. बॉबी १९७८ च्या आधी प्रदर्शित झाला होता का?

हिरा, निवडणूक निकाल दाखवताना बॉबी दाखवण्यात लॉजिक नाहीये काही,
भरत म्हणतात तसे विरोधी पक्षाच्या सभेला गर्दी जमू नये म्हणून बॉबी दाखवला अशी आठवण मी पण ऐकली आहे, पण साल माहीत नाही.

Off the topic- लहानपणी पिक्चर पहायला कधीतरीच मिळत असल्याने निवडणूक निकाल- चित्रपट यात गंमत वाटायची, वडीलधाऱ्यांची एकसाईटमेंट जाणवायची (तेव्हा बहुतेक वेळेला आमच्या भागात bjp मार खायची ही गोष्ट वेगळी)

९० च्या दशकात मंगळवारी दुपारी चार वाजता चित्रपट दाखवण्याचा प्रकार सुरु होता दूरदर्शनवर. तेव्हा मिथुनचा 'डिस्को डान्सर' एकदा लागणार होता. तो बघण्यासाठी आमच्या शहरातल्या बहुतांश शाळेतली बरीच मुले दुपारच्या सुट्टीनंतर पळून गेली होती. मी पण जाम हळहळलो होतो, ती एक्साइटमेंट काही वेगळीच होती. पण मी गेलो नाही कारण एकतर घरी टीव्ही नव्हता. शाळेतून पळून कुणा मित्राकडे सिनेमा पाहायला गेलो असे समजले असते तर घरच्यांनी जीव घेतला असता..

माझ्या वर्गातल्या दहा बारा मुलांना दुसर्‍या दिवशी मात्र शिक्षा झालेली.

रॉबीनहुड सांगू शकतील.

एक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. इथल्या Accidental देशभक्तांनीसुद्धा हा चित्रपट पाहिला नाही का?

पाहिला हा चित्रपट. आवडला असे नाही म्हणता येणार कारण,
सलग दहा वर्षे एका विदेशी बाईने व तिच्या पन्नास वर्षाच्या मंद मुलाने, भारतासारख्या प्रजासत्ताक देशाच्या पंतप्रधानाची अवस्था, स्वत:च्या घरातील एकाद्या "घरगड्या"सारखी केलेली पाहाताना अतिशय वाईट वाटले.
--
पंजाबी लोक फारच स्वाभिमानी असतात असा माझा समज होता, मात्र इंदिरा गांधींच्या तालावर नाचणारे व ऐकेकाळी भारताचे गृहमंत्री व नंतर राष्ट्रपती झालेले ज्ञानी ज़ैल सिंह व आता विदेशी सोगाच्या तालावर नाचणारे मनमोहन सिंग पाहून तो समज खोटा आहे असे वाटते. अर्थात ह्याला काही सन्माननिय अपवाद आहेत.

सविस्तर परीक्षण लिहा बरं.
वर लिहिलंत , हे तर तुम्ही चित्रपट यायच्या आधीपासूनच सांगताय. चित्रपटाबद्दल काहीच नाही लिहिलंत.

सविस्तर परीक्षण लिहा बरं.>>>>
तुम्हाला वाटते का , कोणताही भक्त २०० रुपये तिकिटाचे खर्चून हा चित्रपट पाहिल?
bjp ची सदस्य संख्या १० करोड त्यातल्या ३ करोड लोकांनी जरी चित्रपट पहिला असता तरी ६०० करोड गल्ला जमावाला असता याने,

फुकटे भक्त आता TV वर येईलच म्हणून वाट पाहात असतील

सविस्तर परीक्षण लिहा बरं.
वर लिहिलंत , हे तर तुम्ही चित्रपट यायच्या आधीपासूनच सांगताय. चित्रपटाबद्दल काहीच नाही लिहिलंत.
नवीन Submitted by भरत. on 17 January, 2019 - 15:00
<<
परीक्षण कश्याला लिहित बसायचे, त्याऐवजी बारुचे पुस्तक वाचा.
---
बारुंनी पुस्तकात मनमोहन सिंग यांची अवस्था, १० वर्षात सोनिया गांधीपुढे जितकी लीनदिन झालेली रंगवली आहे, तितकी ह्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला रंगवता आली नाही. बहुतेक सेंसॉरबोर्डाचा धसका घेतला असेल निर्मात्याने. ह्या पुस्तकावर एकादी वेबसिरिज निघायला हवी.
--
सोगा पुढे ममो यांची रियल लाईफ मधील लीन-दिन अवस्था पाहायची असेल तर येथे दिलेला व्हिडीओ पाहा.

पण बारू तर २००८ पर्यंत होता? दहा वर्षाचा अनुभव त्याने स्वत:च्या मनाने रंगवला आणि भाजपने त्यात आणखी पाणी टाकून सिनेमा बनवला. असले वाह्यात सिनेमे 'खरा इतिहास समजणे म्हणजे महान आहे. अर्थात भाजप समर्थकांना सर्व मुभा असते.

श्या! एक आठवडा आधी सिनेमा तिकिटांवर जीएसटी कमी केला, आयटी सेल प्रमुखापासून सगळ्यांनी प्रचार केला, तरीही चित्रपट पाहिलेला एक माणूस सापडेना.

आकशवाणीवरच्या सकाळी सहाच्या पाच मिनिटांच्या बातमीपत्रात या चित्रपटाला पाच वाक्ये दिली होती. चित्रपट पाकिस्तानमध्ये प्रदर्शित होणार, म्हणून.

Pages

Back to top