बाहुबलीचा विक्रम तोडणारा चित्रपट -Accidental Prime Minister

Submitted by कटप्पा on 29 December, 2018 - 15:49

होय हा चित्रपट येतोय, आणि निवडणुकीच्या वेळेस येतोय.
अनुपम खेर ममो च्या भूमिकेत आहे.
योगायोग म्हणजे संजय बारु यांचे हे पुस्तक देखील बरोबर २०१४ च्या निवडणुकीच्या वेळी आले होते.

सर्वांना माहीत आहे अनुपम बीजेपी चा माणूस आहे.

चित्रपट कोणत्याही अजेंडा ने असू दे मात्र प्रचंड धंदा कमवेल हे निश्चित. काँग्रेस च्या 5 करोड लोकांनी हा चित्रपट जरी पहिला तरी ५०० cr आणि बीजेपी वाले नक्कीच बघणार, त्यांच्या ट्विटर हँडल वरून ट्रेलर प्रोमोट झाला आहे.
१००० करोड कुठे जाणार नाहीत. बाहुबली चा रेकॉर्ड तुटणार.

ट्रेलर -
https://youtu.be/q6a7YHDK-ik

Group content visibility: 
Use group defaults

काल पाहिला हा पिक्चर. यात काय आहे ते आधीच गृहीत धरून बर्‍याच लोकांनी आधीच टीका केलेली दिसते.

प्रोपोगंडा म्हणून बघावे तर यात "सोनिया गांधींनी रागा तयार होईपर्यंत ममोंना पंप्र पदाची जबाबदारी दिली. पण त्याचबरोबर स्वतः व इतर काही लोक यांची एक वेगळी समिती नेमून सत्तेचे केंद्र स्वतःकडे ठेवले, व ममोंना अनेकदा त्यांच्या सल्ल्याप्रमाणे कारभार करावा लागला. काहीवेळा त्यांनी त्यांच्यावर कुरघोडी केली. पण एकूण सोनिया व रागा यांचा हस्तक्षेप होत होता" इतकाच मालमसाला यात आहे. आणि हे पुस्तकात तर होतेच पण एकूण जनरल पब्लिकलाही हे माहीत होते.

याव्यतिरिक्त यात कसलाही प्रोपोगंडा दिसला नाही. ममोंची प्रतिमा चांगलीच दाखवली आहे. ते राजकीय काड्या करायचा प्रयत्न करत नाहीत हे ही त्यांच्या स्वभावाला व एकूण अ-राजकीय व्यक्तिमत्त्वाला साजेसेच होते व ते यातही तसेच दाखवले आहे.

त्यामुळे या पिक्चरचा भाजप काय किंवा इतर कोणी यांना काहीच राजकीय फायदा होण्याची काहीच शक्यता नव्हती. उलट पिक्चर मधले सर्वात मोठे द्वंद्व हे "काँग्रेस वि. डावे पक्ष" असे दाखवले आहे. भाजपला फुटेज अगदीच थोडे आहे. इथला बराच "राजकीय" वाद पब्लिकने आधीच आपापल्या बाजूचे खुंटे पकडून धरल्याने झालेला दिसतोय.

हे झाले राजकारणाबद्दल. एक पिक्चर म्हणून पाहताना कंटाळा येत नाही इतकेच फार फार तर म्हणता येईल. वरती बा.का. यांनी लिहील्याप्रमाणे अनुपम खेर ने जरा मिमिक्रीच्या वळणावर नेला आहे अभिनय. वास्तविक अनुपम खेर असे रोल्स फार जबरदस्त करू शकतो. पण तरीही ममोंना "कॉमिक" पद्धतीने दाखवलेले नाही हे नक्की.

एक चांगला ३-३:३० तासांचा मोठा पट होऊ शकतो अशा कथेवर एक छोटा, बाळबोध लाइटवेट पिक्चर काढला आहे. आपल्याला ढोबळ माहिती असलेल्या गोष्टी पडद्यामागे कशा घडतात, नेहमीचे सराईत लोक विविध प्रसंगांमधे कसे बोलतात, कसे डावपेच टाकतात ई. माहिती, त्यातील विविध लोकांच्या वागण्याच्या तर्‍हा (सोनिया गांधी, रागा, अब्दुल कलाम, चिदंबरम, ममो, वाजपेयी, डावे नेते) वगैरे काहीच पुढे येत नाही. अनेक राजकीय व्यक्तिमत्वे एखाद्या सीनपुरते येउन जातात. काही लक्षात राहण्यासारखे सीन्स नाहीत.

अक्षय खन्नाने काम चांगले केले आहे. पण स्क्रिप्ट मधे संजय बारू बरीच सूत्रे हलवत असतो अशा पद्धतीने त्याला लीड रोल दिल्यासारखे बरेच सीन्स आहेत. पुस्तक त्यामानाने जास्त चांगले होते असे आठवते.

<१००० करोड कुठे जाणार नाहीत. बाहुबली चा रेकॉर्ड तुटणार. >
भारतात नेट २२ कोट रुपये कलेक्शन .

मध्ये डॉ सिंग यांच्यावर टीका करायला काही निमित्त मिळालं होतं. तेव्हा अनुपम खेरने या चित्रपटातील त्याच्या चालण्याची क्लिप टाकली होती. लोकांनी लगेच ती क्लिप आणो डॉ सिंग चालतानाची क्लिप तुलना करायला एकत्र उपलब्ध करून दिल्या. कॅरिकेचरच्या पुढचं / खालचं होतं खेरचं चालणं.

Pages