मासिकपाळी पुरुषदेहप्रधान मानसिकतेला पटत नाही की काय? ज्यातून आपला देह निर्माण झाला ती प्रोसेस इतकी अपवित्र का वाटावी? स्वत:च्या जन्माच दु:ख इतक जिव्हारी लागाव की ती प्रक्रिया (मासिकधर्म/मासिकपाळी) च घाणेरडी,अस्वच्छ, असुरक्षित (अगदी इतकी की तो धारण करणारा देहच कमजोर वाटून त्या देहाला सुरक्षा देण्याच्या नावाखाली बंधनाच्या जोखडात अडकवून ठेवला/ टाकला.) समजून वेगवेगळ्या प्रकारच्या शुद्धीकरणाची जणू रेलचेलच सुरू झाली आहे.तेही वेगवेगळे नवे-जूने दाखले/उदाहरणे देत,सांगत!!!!! श्रद्धेच भांडवल करत!!! विज्ञान, तत्वांचे खेळ, गणित मांडत!!!!!
हे कितपत योग्य आहे? व का ????
कारण तसेही आपले संत,महात्मे, सद्गुरू तत्त्वज्ञानी, तत्त्वचिंतक, शास्त्रज्ञ,गणिततज्ञ,विचारवंत ही सुद्धा शेवटी पुरुषदेहप्रधान मानसिकतेने पछाडलेले होते,पण त्यातून बाहेर पडण्याचा ते कसोशिने प्रयत्नाची पराकाष्ठा करीत असल्याचे त्यांच्याच विविध (अभंग,काव्य, श्र्लोक,ग्रंथ----वगैरे) रचना अभ्यासताना जाणवते----ती त्यांची पडतझडत चाललेली धडपड आहे, त्यामुळे त्यांच्या चुका दाखवून तशाच चुका करण्याचे लायसन्स मिळाल्यासारखे जर कुणी वागत असेल तर शहाण्यांचाही शहाणपण बरेचदा कमी पडतो---असेच म्हणावे लागेल किंवा असेच होत असावे!!!!!!!
तुम्हाला काय वाटते???????
मासिकपाळी ही पुरुषदेहप्रधान मानसिकतेला का अपवित्र वाटते?
आपण चुका शिकतोय, की शाहणपण ? इतिहासातून,पूर्वजांकडून!!!!!
Submitted by Mi Patil aahe. on 6 January, 2019 - 08:23
प्रांत/गाव:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
>> पुरुषदेहप्रधान मानसिकतेला
>> पुरुषदेहप्रधान मानसिकतेला का अपवित्र वाटते?
सर्वांनाच असे वाटते असे नाही. त्याबाबत पावित्र्य अपवित्र्याच्या कल्पना जे बाळगतात त्यांना वाटते.
>> हे कितपत योग्य आहे? व का ????
हो विज्ञानाच्या दृष्टीने ती एक वैज्ञानिक प्रोसेस आहे. त्यामुळे विज्ञानाच्या दृष्टीने अशा धारणा अर्थहीन व म्हणून अयोग्यच आहेत.
ठिक आहे तुम्ही म्हणता तर तसे!
ठिक आहे तुम्ही म्हणता तर तसे!
मत्सर !
मत्सर !
पूर्वीच्या काळी समाज अशिक्षित
पूर्वीच्या काळी समाज अशिक्षित होता तेंव्हा धार्मिक आधार घेऊन काही सवयी समाजात रुजवण्याचा प्रयत्न केला गेला असावा. त्यातून जे आरोग्यास चांगले ते पवित्र (उदाहरणार्थ औषधी वनस्पती, नदीचे निर्मळ पाणी इत्यादी) व आरोग्यास अपायकारक ते अपवित्र (उदाहरणार्थ शरीराने बाहेर टाकलेले स्राव) मानले गेले. मात्र कालांतराने त्याचे अवडंबर माजत गेले.
दासबोध :
दासबोध :
दशक ३, समास १
"पाहता शरीराचे मूळ
याऐसे नाही अमंगळ
रजस्वलेचा जो विटाळ
त्यामधे जन्म यासी ॥११॥
अत्यंत दोष ज्या विटाळा
त्या विटाळाचाचि पुतळा
तेथे निर्मळपणाचा सोहळा
केवी घडे ॥१२॥
रजस्वलेचा जो विटाळ
त्याचा आळोन जाला गाळ
त्या गाळाचेच केवळ
शरीर हे ॥१३॥
एकंदरित तुमचं शरीरच कसं भुक्कड, जन्माला येणे हेच मुळात कसे चूक (एर्गो, देव देव करा, मोक्ष वगैरे मिळवा) इत्यादि इत्यादी सांगताना आपल्या महान संतांनीच असले शब्द लिहून ठेवले आहेत.
आता सद्गुरूंनी स्वतः सांगितले (ते फॅक्चुअली कितीही चुकीचे असले, तरी) म्हणजे विटाळ वाईटच ना? मग समर्थक त्याचे वाईट म्हणून समर्थन करणारच.
आता काही लोकसमुहांत मुलगी न्हाती होण्याचे सेलेब्रेशन करतात, कौतुकाने त्याचे फ्लेक्स लावून जाहिरात करतात, वगैरे बाष्कळ बाबी जाऊ द्या.
आपले संत,महात्मे, सद्गुरू ही
आपले संत,महात्मे, सद्गुरू ही सुद्धा शेवटी पुरुषदेहप्रधान मानसिकतेने पछाडलेले होते,पण त्यातून बाहेर पडण्याचा ते कसोशिने प्रयत्नाची पराकाष्ठा करीत असल्याचे त्यांच्याच विविध (अभंग,काव्य, श्र्लोक,ग्रंथ----वगैरे) रचना अभ्यासताना जाणवते----ती त्यांची पडतझडत चाललेली धडपड आहे, त्यामुळे त्यांच्या चुका दाखवून तशाच चुका करण्याचे लायसन्स मिळाल्यासारखे जर कुणी वागत असेल तर शहाण्यांचाही शहाणपण बरेचदा कमी पडतो---असेच म्हणावे लागेल किंवा असेच होत असावे!!!!!!!
Submitted by आ.रा.रा. on 6
Submitted by आ.रा.रा. on 6 January, 2019 - 20:34
@आ.रा.रा.... ज्यांनी हयातीत लग्न केले नाही, मुले जन्माला घातली नाहीत, साध्या संसाराच्या जबाबदारीला (जी सामन्यातला सामान्य सुद्धा पार पाडतो) घाबरून मांडवातून पळून गेले. अशा रीतीने पदोपदी निसर्गनियमांचा अवमान करणाऱ्या व्यक्तीकडून अशा पंक्ती याव्यात याच आश्चर्य ते काय.
हे आजच्या युगात कोणी पाळत
हे आजच्या युगात कोणी पाळत नाही तुम्ही तर नक्कीच नाही, म तुम्ही ते विषय का काढता ? जे उत्तर दिलं जाईल ते तुम्हाला पटणार नाही तुम्हाला जे हवं ते इथे दिल जाणार नाही देवस्थाना त काही त्यांचे नियम असतील म्हणून सोडत नसतील कोर्टात सुद्धा नियम आहे वकिलाने काळा कोट घालुन केस लढवली पाहिजे तस
वकिल,जज,आरोपी,प्रत्यारोपी
वकिल,जज,आरोपी,प्रत्यारोपी ,न्यायालय, साक्षीदार सारी भूमिका तुम्हीच एकटेच कसे काय वठवता,भूषण कात्रे!!!!