आजीच्या हातच्या फर्मास रेसिपी - गाजराची आमटी
डिसेंबर चालू झाल्यापासूनच मला गाजराच्या आमटीचे वेध लागायचे..एरवी गाजरं तशी वर्षभर मिळतात , पण त्या उंचीला बुटक्या असलेल्या गाजरांत तशी विशेष मजा नसते. गाजरं खायची ती मस्त थंडीतच..सुरुवातीला गाजराचा हलवा , कोशिंबीर वगैरे करून झाली की नंबर असायचा गाजराचा आमटीचा !! विशेष काहीही साहित्य न लागणारी ही आमटी माझी आजी अतिशय फर्मास बनवायची..सुरेख केशरी रंगाची ती गाजरं दिसायला फारच गोजिरी असतात , चवीलाही छान..
आजीच्या हातच्या त्या आमटीची तीच चव माझ्या आईच्या हातालाही आहे..आज त्याच गाजराच्या आमटीची रेसिपी शेअर करणार आहे.
साहित्य :
2गाजरे स्वच्छ धुवून साली काढून किसून घ्यायची.
फोडणीचे साहित्य
तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि मूठभर भाजलेले शेंगदाणे मिक्सर ला अर्धवट बारीक करून घ्यायचे, दीड ते दोन मोठे चमचे डाळीचं पीठ, चवीनुसार मीठ , वरून घालायला कोथिंबीर (यात लाल तिखट , गोडा मसाला वगैरे काहीही घालत नाहीत , त्यामुळे 3/4 हिरव्या मिरच्या चालू शकतात , तरीही तिखट कमी खाणाऱ्यांनी प्रमाण adjust केलं तरी चालेल)
कृती:
कुकरमधे आपण भात लावतो त्याच वेळेला छोट्या भांड्यात कीसलेली गाजरे थोडं पाणी घालून शिजवून घ्यायची , किंवा नुसती वाफवून घेतली तरी चालेल.
जास्तीचं पाणी काढून न टाकता त्यात डाळीचं पीठ घालून नीट मिक्स करून घ्यायचे.
तेल तापत ठेवून खमंग फोडणी करून भांड्यातील गाजरे आणि डाळीच्या पिठाचे मिश्रण घालून हलक्या हाताने परतून घ्यायचे , मिरच्या आणि शेंगदाणे यांचे वाटण घालून लागेल तेवढंच पाणी , मीठ घालून एक मस्त उकळी काढायची !!
वर कोथिंबीर पेरून लगेचच गरम असताना जेवायला घ्यायचं!!
हायब्रीड गाजरे नसल्याने याची आमटी फार झकास लागते ,परत पातळ असल्यामुळे भाताबरोबर पण खाता येते.
(No subject)
मस्त दिसतआहे फोटो...करुन बघेन
मस्त दिसतआहे फोटो...करुन बघेन आज .
अरे वा ! मस्त आयडिया.
अरे वा ! मस्त आयडिया.
ही पाकृ पहिल्यन्दाच ऐकली/वाचली
गाजराची आमटी कधी ऐकली
गाजराची आमटी कधी ऐकली/खाल्लेली नाही पण गाजराची भाजी एकदोनदा केली होती आणि आवडली होती.
छान रेसिपी, गाजरे भरपूर आहेत
छान रेसिपी, गाजरे भरपूर आहेत घरात करून बघेन.
गाजराची आमटी पहिल्यांदाच
गाजराची आमटी पहिल्यांदाच वाचते आहे. पाककृती सोपी आहे.
वेगळीच रेसीपी. करून पाहायला
वेगळीच रेसीपी. करून पाहायला हवी.
याची चव नेमकी कशी असते? पिठल्या सारखी (कारण डाळीचं पीठ आहे) की अजून कशी?
एकटीपुरती करून पहायला हवी.
एकटीपुरती करून पहायला हवी.
पिठल्याचा फील फारसा येत नाही
पिठल्याचा फील फारसा येत नाही कारण आपण मिरची आणि दाण्याच्या कूटाचं मिश्रण वापरणार आहोत. आमटी असली तरी डाळी वापरायच्या नाहीत म्हणून पातळपणासाठी डाळीचं पीठ वापरत आहोत. ☺
वेगळी रेसिपी. विदर्भ साइड ला
वेगळी रेसिपी. विदर्भ साइड ला काकडी, भोपळ्याचा कोर्डा करतात तशीच चव लागेल असे वाटते.
छानच लागेल. पहिल्यांदाच ऐकले
छानच लागेल. पहिल्यांदाच ऐकले या पाकृ विषयी.
मस्त, पहिल्यांदा ऐकली ही आमटी
मस्त, पहिल्यांदा ऐकली ही आमटी.
धन्यवाद सगळ्यांना..नक्की करून
धन्यवाद सगळ्यांना..नक्की करून बघा. फार काही वेगळं साहित्य लागत नाही शिवाय गाजरंही झकास मिळायला लागली आहेत आता. ☺
Nope.
Nope.
मस्त वाटत्येय. दाण्याच्या
मस्त वाटत्येय. दाण्याच्या कुटाची आमटी कधी खाल्ली नाहीये. बघतो करुन.
इंटरेस्टिंग रेसिपी आहे..अगदीच
इंटरेस्टिंग रेसिपी आहे..अगदीच वेगळी. नक्की करणार! धन्यवाद, शेअर केल्याबद्दल.
आजी /सासुबाई, शेंगदाण्याचा
आजी /सासुबाई, शेंगदाण्याचा कुट कमी पडत असेल किंवा शेंगदाणे जास्त खायचे नसतील तर थोडसच डाळीचे पीठ पेरायची. त्यामुळ भाजी मिळून येते आणि थोडी थिक होते. हे वांगी, ढबु मिरची वगैरे सगळ्या भाज्याना करतात.
मी गाजर न शिजवता करून बघते. आमच्या इतर कुटाच्या भाज्यांसारख.
फोडणीत गाजराचे तुकडे अॅड करणार, मग शेंगदाण्याचा कुट विथ हिरवी मिरची चेचुन/किंवा तिखट , मीठ आणि थोडास डाळीचे पीठ /ज्वारीचे पीठ. परतून मग त्यात पाणि अॅड करून एक उकळी. कोथिंबीर.
इंटरेस्टिंग रेसिपी >>> मम.
इंटरेस्टिंग रेसिपी >>> मम.
सीमा तुमचीही छान आहे रेसिपी.
आमच्याकडं दाण्याच्या कुटाची
आमच्याकडं दाण्याच्या कुटाची आमटी करतात. पेलाभर चमचा - दोन चमचे दाण्याचं कूट, त्यात लहान चमचा मेतकूट, मीठ तिखट कालवून भरपूर लसणाच्या चरचरीत फोडणीवर घालायचं. उकळताना थोडा काळा / कांदा लसूण मसाला घालून छान उकळून घ्यायचं. गरम भात किंवा भाकरी, कांदा कैरी चटणी याबरोबर मस्त लागतं.
गाजराची किंवा दूधीची भाजी
गाजराची किंवा दूधीची भाजी/पिठलं करतो त्यात थोडं दही !
अंजली, पेलाभर पाण्यात म्हणायचंय का ?
सीमा आणि अंजली तुमच्याही
सीमा आणि अंजली तुमच्याही रेसिपी मस्त आहेत. करून बघेन.
गाजर हलवा सोडता शिजवलेले गाजर
गाजर हलवा सोडता शिजवलेले गाजर आवडत नाही, त्यामुळे पास. पण आजी स्पेशल रेसिपीज लिहीत राहा, काही तरी नवनवीन आणि वेगवेगळे हाती लागेल.
मीरा नक्कीच. धन्यवाद..
मीरा नक्कीच. धन्यवाद..
गाजर हलवा सोडता शिजवलेले गाजर
गाजर हलवा सोडता शिजवलेले गाजर आवडत नाही, त्यामुळे पास. पण आजी स्पेशल रेसिपीज लिहीत राहा, काही तरी नवनवीन आणि वेगवेगळे हाती लागेल. >>> + १२३
वेगळीच रेसिपी. गाजर घातलेल्या
वेगळीच रेसिपी. गाजर घातलेल्या पिठल्यासारखं होईल असं वाटतंय.
कसं असतं चवीला? आमटी पेक्षा पिठलं योग्य वाटतंय.
माझ्या एक मैत्रिण सगळ्याला आमटी म्हणते. तिखट डाळ केली तरी आमटी, साधं गोडं वरणाला आमटी, कडधान्याच्या उसळीला आमटी.
इतकच नाही तर चिकनची आमटी, अंड्याची आमटी
गाजर फक्त हलवा बनवण्यासाठीच
गाजर फक्त हलवा बनवण्यासाठीच असते हा समज आहे. तेव्हा भाजी , आमटी पचणे शक्य नाही. पण क्वचीत कुट घालून कोशिंबीर खालीय नाक मोडीत आमच्या एका नातेवाईकाकडे ते आठवले.
“अन्न पुर्णब्रम्ह” ह्यावर एका दोन पोस्टी मध्ये, दुसरे लोक कसे चुकीच्या पद्धतीने भाजी , डाळ वगैरे बनवतात.. वगैरे वाळ्ल्याचे आठव्तेय.
>>इतकच नाही तर चिकनची आमटी,
>>इतकच नाही तर चिकनची आमटी, अंड्याची आमटी Uhoh<<<
हे तरी बरय, माझा एक मित्र, मटणाची भाजी म्हणतो. अंड्याची भाजी... का? तर म्हणे, बटाटे घालतात त्यात...
एकायला सुद्धा विचित्र वाटते.
मटणाची भाजी म्हणतो. अंड्याची
मटणाची भाजी म्हणतो. अंड्याची भाजी.>> हो ऐकलंय मी पण. चिकनची भाजी वै.
पण बटाटे घालतात म्हणुन भाजी हे लॉजिक नवीनच आहे. मी नाही घालत बटाटे चिकन मटणात. अंडा करीत एखादा घालते क्वचित.
>>>बटाटे घालतात म्हणुन भाजी
>>>बटाटे घालतात म्हणुन भाजी हे लॉजिक नवीनच आहे.<<<
त्या मित्राचे हे लॉजिक एकुन आम्ही चकीत झालेलो.
मुसलमान लोक बनवतात आलु गोश. बैदा-आलु.
छान वाटतेय पाकृ. करून बघणार
छान वाटतेय पाकृ. करून बघणार नक्की!
Pages