आजीच्या हातच्या फर्मास रेसिपी - गाजराची आमटी
डिसेंबर चालू झाल्यापासूनच मला गाजराच्या आमटीचे वेध लागायचे..एरवी गाजरं तशी वर्षभर मिळतात , पण त्या उंचीला बुटक्या असलेल्या गाजरांत तशी विशेष मजा नसते. गाजरं खायची ती मस्त थंडीतच..सुरुवातीला गाजराचा हलवा , कोशिंबीर वगैरे करून झाली की नंबर असायचा गाजराचा आमटीचा !! विशेष काहीही साहित्य न लागणारी ही आमटी माझी आजी अतिशय फर्मास बनवायची..सुरेख केशरी रंगाची ती गाजरं दिसायला फारच गोजिरी असतात , चवीलाही छान..
आजीच्या हातच्या त्या आमटीची तीच चव माझ्या आईच्या हातालाही आहे..आज त्याच गाजराच्या आमटीची रेसिपी शेअर करणार आहे.
साहित्य :
2गाजरे स्वच्छ धुवून साली काढून किसून घ्यायची.
फोडणीचे साहित्य
तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि मूठभर भाजलेले शेंगदाणे मिक्सर ला अर्धवट बारीक करून घ्यायचे, दीड ते दोन मोठे चमचे डाळीचं पीठ, चवीनुसार मीठ , वरून घालायला कोथिंबीर (यात लाल तिखट , गोडा मसाला वगैरे काहीही घालत नाहीत , त्यामुळे 3/4 हिरव्या मिरच्या चालू शकतात , तरीही तिखट कमी खाणाऱ्यांनी प्रमाण adjust केलं तरी चालेल)
कृती:
कुकरमधे आपण भात लावतो त्याच वेळेला छोट्या भांड्यात कीसलेली गाजरे थोडं पाणी घालून शिजवून घ्यायची , किंवा नुसती वाफवून घेतली तरी चालेल.
जास्तीचं पाणी काढून न टाकता त्यात डाळीचं पीठ घालून नीट मिक्स करून घ्यायचे.
तेल तापत ठेवून खमंग फोडणी करून भांड्यातील गाजरे आणि डाळीच्या पिठाचे मिश्रण घालून हलक्या हाताने परतून घ्यायचे , मिरच्या आणि शेंगदाणे यांचे वाटण घालून लागेल तेवढंच पाणी , मीठ घालून एक मस्त उकळी काढायची !!
वर कोथिंबीर पेरून लगेचच गरम असताना जेवायला घ्यायचं!!
हायब्रीड गाजरे नसल्याने याची आमटी फार झकास लागते ,परत पातळ असल्यामुळे भाताबरोबर पण खाता येते.
मस्त!! गाजराचे खेंदट आई नेहमी
मस्त!! गाजराचे खेंदट आई नेहमी करते आणि थंडीत मस्त चमचमीत. बाजरीच्या भाकरी सोबत छानच लागते...
इतकच नाही तर चिकनची आमटी,
इतकच नाही तर चिकनची आमटी, अंड्याची आमटी >>>>
ऐकायला फारच विचित्र वाटतं आहे. कदाचित करी म्हणजे आमटी अशा संदर्भानुसार चिकन करीचं शब्दशः भाषांतर केलं असावं.
गाजर फक्त हलवा बनवण्यासाठीच असते हा समज आहे. >>>>> अगदीच. गाजर म्हणजे गाजर हलवा, अतीच म्हणजे कोशिंबीर. पण यापलीकडे गाजर शिजवण म्हणजे पापच.
मस्त पाकृ.. करून बघणार आणि
मस्त पाकृ.. करून बघणार आणि झब्बु देणार
गाजराची कोशिंबीर (अर्थात
गाजराची कोशिंबीर (अर्थात गाजर न शिजवता) थोडसंच दाण्याचं कुट, लिंबू, बारीक चिरलेली मिरची कोथिंबीर आणि जिर्याची फोडणी घालून छान होते. आमच्याकडे या दिवसात बरेचदा केली जाते.
गाजराची कोशिंबीर , मुगाची डाळ
गाजराची कोशिंबीर , मुगाची डाळ भिजवून घातलेली (बारीक कांदा आणि वरून कडिपत्त्याची फोडणी) पण मस्त लागते.
अंजु, मेतकुट घालुन शेंगदाण्याची आमटी जबरी लागत असणार आहे. आजच करुन बघते.
Pages