Submitted by संपदा on 22 December, 2016 - 03:39
प्रश्न जुनेच, धागा नवीन
आधीचे धागे :-
१. http://www.maayboli.com/node/2602
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हो फिरून आल्यावर एकदम जीवावर
हो फिरून आल्यावर एकदम जीवावर येतं करायला. गाद्या, उशा, ब्लॅंकेट, सोलापुरी चादरी सगळं आहे. वॉशिंग मशीन सगळे आपापलं लावतात.
टेला चालत असेल किंवा हर्शीज चॉकोलेट स्प्रेड तर त्याचा उपयोग होतो. ब्रेड वर घालून मुलांना आव ड्ते.
केळ्यांचे काप करोन त्यावर घालून छोटे डेझर्ट पण होते. ---- हे सोपे आहे, मुलांना एक दिवसाआड पण चालेल. मग मोठयचा खाणं वेगळे. चहा-कॉफी-दूध असे तिन्ही प्रकार लागतात त्याऐवजी मिल्कशेक करू शकते.
बाप्रे! भूक लागली !!
बाप्रे! भूक लागली !!
@योकु
>>>भरप्पूर कोथिंबीर मिळत असेल आणि घाट घालायचा असेल तर, कोथिंबीरीची पुडाची वडी
मला याची रेसिपी किंवा लिंक मिळेल का?
@मेधा
ब्रेफा फॉर डिनर मलाही फार आवडतं. त्यात मी ३ इंग्रिडियन्ट पॅनकेक्स करते बऱ्याचदा (ओट्स+बनाना+एग्स).
फटाफट करायचे असेल आणि हटके हवे असेल तर अव्हनमध्ये स्टफ्ड कॅप्सिकम मस्त होतात. त्यात बटाटे/राईस/खिमा अशी विविध सारण भरता येतात. लहान मुले असतील तर कॅप्सिकमच्या तळाला चीझ घालून वरती भाज्या आणि सेमीकुक्ड पास्ता आणि परत चीझ असे पण करता येते. मी शक्यतो स्पायसी चिकन खिमा घालून ही डिश करते. आणि त्या जोडीला भाज्या घातलेला मऊ पुलाव आणि टोमॅटो सार (श्रेयस स्टाईल) असे करते.
धन्यवाद लोकहो!
धन्यवाद लोकहो!
सई - पुडाची वडी/ कोथिंबीरवडी/ सांभारवडी
अरे हो, ते अंथरुण-पांघरुणाचं एक राह्यलं. सगळ्या ठेवणीतल्या चादरी, दोड, ब्लँकेट्स इ एकदा मशीनमधून काढून (स्वच्छ असतील तरीही) (चादरींना कंफर्ट मधून शेवटी रीन्स केलं तर सुरेख सुवास येतो; हे बाकी कपड्यांनाही लागू...) वेगळ्या खणात नीट रचून ठेवा. रात्रीला अंथरण्याचं आणि सकाळी परत घड्या करून पुन्हा जागच्या जागी ठेवायचं काम कुणाला तरी असाईन करा.
ही सगळी तयारी आधीच केलेली असेल तर फार उत्तम. बाकी किराणा वगैरे ही आधीच भरून घ्या. कांदे बटाटे ही किराण्यासोबतच आणि जरा जास्तीचे घेऊन ठेवा. भाज्या आठवड्याच्या किंवा २/४ दिवसांच्या आणून ठेवता येतील. भाज्यांमध्ये लिंब, कोथिंबीर, आलं, लसूण, कढीपत्ता आणि वापरत असाल तर पुदीना या गोष्टी नक्की आणा नाहीतर वेळेवर ५/- रुपयांच्या कोथिंबीरीकरता कुणाला तरी धावायला लागतं आणि ती नसेल तर आमच्या कडे पोह्यांवर कोथिंबीरीशिवाय जमत्तच नाही हे ऐकायची तयारी ठेवा!
आधीपासून नीट मॅनेज केलं तर घर लहान असेल तरीही काहीसुद्धा फरक पडत नाही.
हॅपी होस्टींग!
हे वाचून एकदम तयारीचा उगाचच
हे वाचून एकदम तयारीचा उगाचच उत्साह वाटतोय मलाच
योकु आणि सगळेच, मस्त प्रतिसाद! राजसी ऑल द बेस्ट!
जवळपास कुठे तट्टे इडलीचं आउटलेट असेल तर एक दिवस मागवा! पुलियोगरे आणि बिसिबेळे भात महान असतो त्यांचा.
हे वाचून एकदम तयारीचा उगाचच
हे वाचून एकदम तयारीचा उगाचच उत्साह वाटतोय मलाच Lo l+११११११११११११
योकुकडे मायबोली गटग ठेवू.
योकुकडे मायबोली गटग ठेवू. रहायलाच जाऊ.
आमच्याकडे airtight packing
आमच्याकडे airtight packing च्या मोठया पिशव्या आहेत. दरवेळेस वापरलं की धुवून, घड्या घालून airtight pack karun loft वर जातं ह्यापूर्वी यापेक्षा जास्त मंडळी पण 4 ते 5 दिवस host केलंय त्यामुळे माझी पाच दिवसांच्या च्या पुढे गाडी अडली. आणि तितक्याच दिवसांचा कोणाचं काय बरोबर झालं नाही तो पण अनुभव आहे सकाळी खाऊन wonder la ला जाऊन आल्यावर रात्रीच्या जेवणात dalfry, jeera rice आणि कोशिंबीर होती तर नंतर भाजी का नव्हती म्हणून प्रश्न विचारलाय. आम्हांला वाटलं दिवसभरची दमणूक आणि amusement पार्क मध्ये खाणं होतंच तर साधं पण पोटभरीच ठेऊ. आता भाजी पण असती तर एखादी पोळी पण चालली असती असं अभिप्राय आलाच असता आता जेवायला बसल्यावर काय एकच पोळी घ्या असं सांगायचं का !
एकेक वाचून सर्वांना दंडवत.
एकेक वाचून सर्वांना दंडवत.
कोकणात एक बरं कितीही जण जमुदेत, सकाळी एक मोठं पातेलं गुरगुरीत भात, मेतकुट, पापड, लोणचे, फोडणीची मिरची, लसणीचे तिखट . सगळे आवडीने खातात. मला रोज नाही आवडत पण खाते. दुपारी मात्र खास कोकणचे बेत असतात आमच्याकडे शाकाहारी जसं सांदणे आंबा, फणस दोघांचे, फणसाची भाजी, पोळ्याही असतात, आमरस पुरी हाही बेत असतो. आंब्याच्या दिवसांत भरपूर आंबे, फणस खा येता जाता. खोलीत आढि असते घातलेली. रात्री कधी पिठलं भात, कधी थालीपीठे, कधी आमटी भात, कधी पावभाजी वगैरे बेत. नाचणीच्या भाकऱ्या किंवा तांदुळाच्या त्या दुपारी बरेचदा.
कपडे भांडी करायला मात्र मदतनीस येते.
आता भाजी पण असती तर एखादी
आता भाजी पण असती तर एखादी पोळी पण चालली असती असं अभिप्राय आलाच असता>>>>>> ओ!जास्त लाड नाही करायचे पाहुण्यांचे आणि एकदम मनावर नाही घेऊ.भरपूर करताय.हॉटेलमधे राहिलं तर इतक्या दिवसांचे बिल किती होईल? सकाळपासून हा धागा वाचून आता पाहुण्यांची फर्माईश वाचून हिंस्त्र झाले.
देवकी, पान क्र ७ वरची माझ्या
देवकी, पान क्र ७ वरची माझ्या Submitted by योकु on 4 December, 2018 - 22:52 या पोस्टींतलं पहीलं वाक्य वाचा बरं
हिंस्त्रपणा का काय ते गुंडाळावं लागतंच.
कोकणात काही आधुनिक बेत करायचे
कोकणात काही आधुनिक बेत करायचे असतील खायला तर मी आणि भाच्या ठरवतो आणि करतो. बाकी रसाच्या पोळ्या वगैरे असतील तर आम्ही हाताखाली मदतीला .
>>>>पाहुण्यांची फर्माईश वाचून
>>>>पाहुण्यांची फर्माईश वाचून हिंस्त्र झाले. Angry<<<<
अगदीअगदी.
हे वाचून मला माझा मुर्खपणा आठवून त्रासिक झाले. लग्नानंतर्चे पाच सहा वर्षे “एकता कपूरच्या सिरिय्स्लमधली खपणारी सून मोड “ होता माझा.
तर मी हेच शिकले, खूप त्रासून न घेता, पोटभरीचे आनंदाने खायला घालायचं. नेहमी कसल्या वरायट्या आणि किचनात दिवसभर काम.. वं.
-एक दोन दिवस सकाळी नाश्ता मागवायचा बाहेरून. अगदी पोटभरून. मेदुवडे, इडली, आलु पराठा, वेजी कटलेट, शीरा/मूग हलवा. मग उशीरा पुन्हा दुपारचे जेवण. रात्री खिचडी वगैरे हलकं. आणि दुपारी मिळून स्वयंपाक. मेनु मिळूनच ठरवा नाश्ता करताना. थंडीचे दिवस आहेत तसा मेनु करा. रात्री घरीच मूवी लावून , भाजी निवडणं , कपडाच्या घड्या वगैरे( आपापल्या आपण).
- एक दोन दिवस, सकाळपासून बाहेर जवळच डे ट्रिप काढा. तिथेच खा, प्या आणि घरी येवून झोपा.
-एक दोन दिवस , तुम्ही दुपारची झोप घ्या आणि सर्वांना दुपारचे मूवीला पाठवा. घरच्या काम करणार्या बाईला बरे असते.
घरी खाकरा, भुजिया, भेळ, बिस्किटे, पाणीपुरी आणि पिझ्झा सामान, पास्ता सामान, बोंबिनो शेवया( ह्याचे गोड/ तिखट प्रकार). बक्कळ आहेत पर्याय. कराल तेवढे थोडे.
आणि मंत्रा आहे, “कुछ तो लोग कहेंगे“.
राजसी, चिल रहा नाहितर इतकं करूनही चिडचिड होते.
अंजू,
अंजू,
ते कोकणात बरं आस्त. दिवसभर मूगाचे लाडु, तांदूळाच्गे पदार्थ, आंबे, फणस आणि त्याचे पदार्थ चरून आधीच पोट भरलं असतं, त्यात कोकम सरबतं पिवून गपगार..
करतात दुपारी, वेगवेगळे
करतात दुपारी, वेगवेगळे पदार्थ. कधी आमरसाच्या पोळ्या, कधी मोदक, कधी वर लिहिलं तसं सांदणे. पण सकाळी एकीकडे चहा आणि एकीकडे गुरगुरीत भात असं चुलीवर सुरु असते. आंघोळीचं पाणी बाहेरच्या चुलीवर. मेन म्हणजे फार कोणी कुरकुर केलेली बघितली नाही. आवडीने जेवतात सकाळी मऊभात, मेतकुट, तूप, भाजलेला पापड, लोणचे.
घरच्या बायकांना ते बरं पडते आणि लगोलग दुपारच्या स्वयंपाकाला लागता येतं. तसंही उन्हाळ्यात बाकी रातांबे फोडणे त्यापासून सरबत, अगोळ करणे. ती वाळवून कोकम म्हणजे आमसुल करणे. आंबे फणस साटे करणे , छुंदा करणे अशी कामे एकीकडे सुरु असतात. त्यामुळे निदान सकाळी लोड नाही येत स्वयंपाकाचा.
आन्जु, अहो मी चांगल्या
आन्जु, अहो मी चांगल्या अर्थानेच म्हणत होते की साधं असले तरी मजा यायची लहान मुलांना..
रात्रीच्या जेवणात dalfry,
रात्रीच्या जेवणात dalfry, jeera rice आणि कोशिंबीर होती तर नंतर भाजी का नव्हती म्हणून प्रश्न विचारलाय. >>>>> हे जरा जास्तच होतंय हं
राजसी यांना कोकणात शिफ्ट करून
राजसी यांना कोकणात शिफ्ट करून टाका. हाकानाका. एका फटक्यात काटुक मोडेल.
लहानपणी सौम्य तंबी असायची की
लहानपणी सौम्य तंबी असायची की जे दुसर्या घरी(होस्टाकडे) शिजलं असेल ते खायचं.आणखी मागायचं नाही.त्यामुळे जेवण- खाण असा कधी जीवनमरणाचा प्रश्न असल्याचं आठवत नाही.नाही म्हणजे कोकणात एकाकडे ३-४ दिवस असायचो,त्यात हापूस्/पायरीचा १ बाठा+२ शिरा(फाकी) जेवणात मिळाल्यावर वैताग आला होता.मातोश्रींना हळूच विचारलं असता उत्तर मिळालं होतं'नंतर मुंबईला गेल्यावर अख्खा खा'.मजा म्हणजे त्या नातलगांची आंब्याची वाडी होती.घरी आल्यावर स्पष्टीकरण मिळालं 'एवढी माणसं होती, पिकलेले आंबे सर्वांना पुरवायचे असतील.त्यांच्या नातलगांना द्यायचे असतील इ.इ.'
थोडक्यात काय तर जे असेल ते मुकाट गिळायचं!जेवणाखाण्याचे लाड/नखरे आपल्या घरी.
आन्जु, अहो मी चांगल्या
आन्जु, अहो मी चांगल्या अर्थानेच म्हणत होते की साधं असले तरी मजा यायची लहान मुलांना.. >>> मी रागाऊन नाही हो लिहीलं, मला वाटलं ते दुपारी खास खास बरेच पदार्थ करतात ते अजून सविस्तर लिहावं
लहानपणी सौम्य तंबी असायची की
लहानपणी सौम्य तंबी असायची की जे दुसर्या घरी(होस्टाकडे) शिजलं असेल ते खायचं. >>> हो हे असायचं मात्र. कोकण, बडोदे कुठेही गेलो तरी आई सांगायची. सगळीकडे आपापल्या परीने करतात सर्वजण, जसं जमेल तसं.
लहानपणी सौम्य तंबी असायची की
लहानपणी सौम्य तंबी असायची की जे दुसर्या घरी(होस्टाकडे) शिजलं असेल ते खायचं>>>> अगदी अगदी देवकीताई, माझी मम्मा पण आम्हाला सांगून न्यायची की जे मिळेल ते शांतपणे खायचे, जास्तीचे बोलायचे/विचारायचे नाही की आपले काही सांगायचे नाही. मला चिकन आवडायचे नाही तर चिकनसुद्दा पालव्याचे मटण म्हणून दिलेय, जे अगदी पहिल्या घासात कळून सुद्धा फक्त मम्मीला वाईट वाटेल म्हणून कसेतरी खाल्लेय. तरी त्यांनी पप्पांना ऐकवले होते बघ कसे खाल्लं चिकन तूच उगा लाडावून ठेवले.
बाकी वरचे सगळे वाचूनच दमली मी, इतके लोक, इतक्यांचे नखरे, कितीही केले तरी कमी.
राजसी खूप शुभेच्छा, जमल्यास नंतर अनुभव लिहा
लहानपणी सौम्य तंबी असायची की
लहानपणी सौम्य तंबी असायची की जे दुसर्या घरी(होस्टाकडे) शिजलं असेल ते खायचं>>>> +१ अगदी अगदी
आताही आम्ही आमच्या मुलांना तसंच शिकवलंय.
बाकी आत्या, मामा- मामी, काका-काकी स्वतःहुन जे लाड करतील ते करतीलच.
पण अगदी भाजीच का नाही. चारीठाव स्वयंपाक हवाच असं कुणीही करणार नाही.
योकु , दंडवत घ्या.
योकु , दंडवत घ्या.
पूर्ण सुट्टी छान पार पडली.
पूर्ण सुट्टी छान पार पडली. मला पण काम पडून ही खूप मजा आली. चिवडा, भडंग, शेव, लाडू इ. करवून घेतले होते. अहो आदल्याच आठवड्यात US ला जाऊन आले होते, त्यांनी पण भरपूर खाऊ तिकडून आणला होता - in-between the meals . दोन वेळेस ब्रेकफास्ट आणि एक जेवण ऑर्डर out केलं . एक दुपार-संध्याकाळ झू आणि टायगर सफारीला गेलो, जेवायला रात्री घरी. Weekend getaway दोन दिवस प्लान केला. बाकीचं सर्व दिवस घरीच जेवणखाण होतं, मदत मिळाली -दोन वेगवेगळ्या बायका एक भरवशाची बाई लक्ष्मी नाव असून ख्रिश्चन निघाली; ऐनवेळेस आणि ती 3-4 दिवस सुट्टी घेणारच होती मग दुसरी temp बाई स्वयंपाकाला hire केली.
पोहे,इडली, ब्रेकफास्ट सिरिअल आणि मोसंबी juice, सँडविच, आप्पे,आलू-पराठा हे पदार्थ ब्रेकफास्ट ला होते. रोज डाळ-पालक/मेथी/पाती कांदा पैकी एक, छोले/ कोबी/फ्लॉवर/ लाल-भोपळा/भेंडी/वांगी-बटाटा रस्सा ह्या भाज्या, बाकी पोळ्या, भात, दही standard होतं. खाऊ आणि ice-cream लहान मुलांचा हात पोचेल असं ठेवलं, त्यामुळे आईला न विचारता खायला घेता येत होतं. श्रीखंड आणलं होतं, ते तीन-चार दिवस पुरले मग बाकीचे दिवस लाडू आणि ice-cream हवं तसं!
दोन दिवस सगळे दुसऱ्या sub-unit मध्ये राहायला गेले होते. आम्हाला पण बोलावलं होतं मी एक दिवस गेले, दुसऱ्या दिवशी घरी उर्वरित दिवसांची पूर्व तयारी
एक dialouge आला - स्वयंपाक आता पर:पाक झालाय! मी उत्तर दिलं पुरुष शतकानुशतके पर:पाक खातातच की बायकांना ती सोय मिळाली तर का बरं पोटात दुखतं! मग त्यावर मग पुरुषना खूप कामं असतात असं उत्तर आलं (इथे मी प्रतिउत्तर असून सोडून दिलं मला धाकट्या मंडळींनी सुचवलं होतं की मी उगीच उत्तर-प्रतिउत्तर करत बसू नये, जाऊदे म्हणून सोडून दे,नाहितर करतेस पण बोलतेस म्हणून फक्त तुझं बोलणं दिसतं आणि केलेलं सगळं केलेलं दृष्टीआड होतं. मला जमलं तेवढं गप्प बसले )
एक dialouge आला - >>>>> राजसी
एक dialouge आला - >>>>> राजसी, ____/\____.तुमचा संयम दांडगा आहे.
एक संवाद आला - स्वयंपाक आता
एक संवाद आला - स्वयंपाक आता पर:पाक झालाय! > पाहुणे पुण्याचे आहेत का? एक तर घरी राहायला यायचे व
असे संवाद म्हणजे जरा रूड वाटते न. तुम्ही संयम दाखवलात ते चांगले. केलेल्या मेहनतीवर पाणी ओतले गेले असते.
'संवाद कर्त्याला रि व्यु मध्ये नक्की बिलो एक्स्पेक्टेशन मिळेल... फार काम अस्ते इंडीड...
एक dialouge आला -स्वयंपाक आता
एक dialouge आला -स्वयंपाक आता पर:पाक झालाय!>>> खरंच रुड! असं कोण बोलतं? आमच्याकडे नाही असं काही बोलत पाहुणे. उलट जास्त दगदग नको ह्याची काळजी घेतात. मदत करतात.
पाहुणे म्हणजे पाहुणे नाहीत
पाहुणे म्हणजे पाहुणे नाहीत सगळी घरचीच माझ्या सासरची आणि नवऱ्याच्या माहेरची मंडळी आहेत
पाहुणे नाहीत सगळी घरचीच
पाहुणे नाहीत सगळी घरचीच माझ्या सासरची आणि नवऱ्याच्या माहेरची मंडळी आहेत >>>>>>> अवांतर्च.तुम्ही कधी इतके दिवस न.मा.मंकडे पाहुणचार घेतला आहात का?
नाही असं काही बोलत पाहुणे. उलट जास्त दगदग नको ह्याची काळजी घेतात. >>>>>> एका पाहुण्यांकडे लग्नासाठी गेलो असता लग्नानंतर घरी आल्यावर यजमानीणबाईंने डिक्लेयर केले की आज आमचा उपवास आहे.तुम्ही तुमचे काय करायचे ते पहा.(म्हणजे घरात काय ते करा.).बरं लग्न हिच्याच मुलाचे होते.मुलगी,जावई घरात होते.ते आपल्यापुरते हॉटेलची भाषा बोलायला लागले.नवीन सून घरात आली आणि सासूने असं फर्मान काढले.घरात अक्षरशः मिरची,कोथिंबीर, कांदे, बटाट्यापासून आम्ही विकत आणले.आमच्यात एक ज्ये.ना.असल्यामुळे घरीच डाळीची आमटी,ब.चा रस्सा,काचर्या सर्व केले.अर्थात पोळ्या नाही,त्या ऐवजी ब्रेड आणले.आम्हीच आमचा पाहुणचार केला.
अतिअवांतर -
अतिअवांतर -
घरात अक्षरशः मिरची,कोथिंबीर, कांदे, बटाट्यापासून आम्ही विकत आणले.......... आम्हीच आमचा पाहुणचार केला.>>>>>. मी माझ्या कुटुंबासह तिथुन निघाले असते शक्य झाल्यास. नीट पाहुणचार न होणे ही मला तरी अपमानास्पद बाब वाटते. मी मग अशा लोकांकडे जायचं शक्यतो टाळतेच. आणी मग हीच लोकं आपल्याकडे आल्यावर अगदी स्वतःच्या हाताने वाढुन घेतात आणी वर चव कशी आहे बद्दल चर्चा करतात.
पण कुणी आपुलकीने पाहुणचार करत असेल, आपल्यासाठी खपत असेल तरी नावं ठेवणं - त्यात काय मोठं असा अॅटीट्युड दाखवणं तर चुकच.
माझ्या एक मामेसासुबाई आहेत. पाहुणे आले की त्यांना चहाही करायला जीवावर येतं. अर्धा कप चहा आण्तात जीवावर केल्यासारखा.
आजी होती तेव्हा आणि जवळ रहात असल्याकारणाने बरेचदा जाणं व्हायचं.
बरेचदा जेवणाच्या वेळेला असलो की फ्रीजमधाला भात काढायचा, शिळी डाळ/ कालवण असेल त्यात पाणी घालुन वाढवायचं आणी वाढायचं.
आजी-मामा, मुलांना पण तेच देतेय हे बघुन आम्ही पण मुकाट खायचो.
काही केलंच असेल मासे, चिकन मटण तर वाढायला हात पण उंच नाही. जीवावर आल्यासारखं वाढायचं
मग नंतर जाणं कमी केलं. गेलो तरी संध्याकळी एखाद तास बसुन यायचो.
आजी गेल्यावर तर जाणं झालंच नाहीये अजुन.
Pages