बेत काय करावा- ३

Submitted by संपदा on 22 December, 2016 - 03:39

प्रश्न जुनेच, धागा नवीन Happy

आधीचे धागे :-
१. http://www.maayboli.com/node/2602

२. http://www.maayboli.com/node/50024

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पोहे, सांजा, साबुदाणा खिचडी, शेवया उपमा, शिरा (अजून पाच आयडिया हव्यात >>> डोसे/ ईडली/अप्पे/ घावन चटणी, टोमँटो ऑम्लेट, सँडविच, मिसळ(ब्रंच)
भाजी - कोबी, कांदा-बटाटा-मटार रस्सा, फ्लॉवर, छोटी वांगी रस भाजी, लाल-भोपळा, (अजून पाच-सहा आयडिया)>>>मूग/ मटकी उसळ, चवळी, मटार, पनीरची भाजी, पालकाची पातळ भाजी
रात्रीच जेवण>>> पिठले भात/भाकरी, मसाले भात- मठ्ठा, पराठे

राजसी, सर्वप्रथम शुभेच्छा! मदतनीस आहे ना !
रात्रीसाठी काही सूचवते सोनालीनी सुचवलेच आहेत. मिसळपाव, वरणफळ , भेळ पाणीपुरी, बिर्याणी, छोले भटुरे, थालीपीठ दहीहुत्ती, आणि एक दिवस बाहेर खास कर्नाटकी जेवण

सगळ्यात आधी कुणी पूर्ण स्वयंपाकाला मिळतेय का ते पाहा आणि बुकून टाका. नेहेमीच्या बाईला जास्तीचे पैसे देऊन वरकाम इ करता पटवा.
मेन्यू जरावेळानं टाकतो

सकाळी उकड, दडपे पोहे, शेवयांचा उपमा, ढोकळा, खटा ढोकळा, इडली-चटणी,
लंच - पालेभाज्या आणि उसळी अ‍ॅड करा की. भाज्यांना बरेच ऑप्शन्स आहेत आणखी. आणि कधी मराठी, कधी पंजाबी स्टाइलने करा (अमुक माखनी, तवा तमुक)
रात्री - पावभाजी, पिझ्झा, थाय करी +राइस, पिठलंभात, थालिपिठं, इ.इ.

चिल्लर नागरिकांच्या पसंतीला उतरायचं असेल तर ब्रेकफास्टला पॅनकेक्स / वॉफल्स, स्क्रँब्लड एग्ज , मफिन्स , ज्युस, हॉट चॉकलेट असे ठेवा एका दिवशी.
एखाद दिवस ब्रेकफास्ट फॉर डिनर अशी थीम ठेवून पण एग्ज, सेव्हरी ब्रेड पुडिंग, फ्रेंच टोस्ट असे करु शकता. आमच्या कडे ब्रेफा फॉर डिनर अगदी आवडती थीम आहे.

प्रत्येक दिवसाचा मेनू लिहून काढून त्यानुसार ग्रोसरी लिस्ट बनवा. बंगळुरु मधे( अजून तिथेच असाल तर) काही पदार्थ बाहेरून मागवायची सोय चांगली आहे - नंदिनी, आयटी पार्क मधले एक कोल्हापुरी रेस्टॉ, कामत यात्री निवास , मॅजेस्टिकच्या जवळचे फिशलँड हे आवडते होते/ आहेत.

येणार्‍या पाव्हण्यांमधे कोणी उत्साही ज्येना असतील तर त्यांना एकेक जेवण असाइन करा - त्यांची सिग्नेचर डिश बनवायला.

दोन दिवसांचा मेनू ठरवून त्याप्रमाणे ग्रोसरी भरून ठेवा - नंतरचा दर आदल्या दिवशी मुलांनाच विचारून ठरवा. त्यांचा चॉइस विचारला की त्यांना 'लाड' केल्यासारखं वाटेल. Happy
पुरेशी मोठी असतील मुलं तर त्यांनाच एक दिवस (तुमच्या देखरेखीत) पास्ता + सॅलड वगैरे करायला लावा. Happy

सकाळचं खाणं>>>> टोस्ट सॅन्डविच,आप्पे,थालिपीठे,धिरडी,इडली सांबार,धोंडस(काकडीचा केक),घारगे.
भाजी >>>> अळूचे फतफते,तोंडली+बटाटा,भरली वांगी,सिमला मिरची पीठ पेरून्,मटकीची/मुगाची/वालाची उसळ
कोशिंबीर >>> गाजर काकडीच्या चकत्या,गाजर +आवळा किसून्,मुळा किसून्,वांग्याचे भरीत.
रात्रीच जेवण>>>> वरणभात्+बटाटा/फ्लॉवर्/सुरण काचर्‍या,पुलाव+ टॉ.चे सार,टॉमेटोभात+कुरडया इ.,मसालेभात+बुंदी रायता,बिसिबेळेअण्णा.
हुश्श!

आधी तयार करून ठेवायचे/ मागवून ठेवायचे प्रकार -
- चिवडा-लाडू आणि शेव आणि अजून काही खाऊ उदा. बेकरी आयटम्स इ. (हे कुणे काटेकोर वेळ पाळणारे असतील, डायबेटीक पेशंट्स, गोळ्यांच्या वेळा असणारे इ करता आणि लहान मुलं कुणी असतील तर त्यांनाही)

- अरे हो, दोन तीन प्रकारची लोणची चटण्या आणि साजुक तूप इ सुद्धा.
- १२ डिनर प्लेट्स, १२ (कमीतकमी) वाट्या, १२ ग्लासेस, १२ चमचे, २ किंवा ३ पाण्याचे मोठे जार्स.
- अन्न तयार करायला २ मध्यम मोठ्या कढया, एखादं मध्यम पण जाड बुडाचं भांड आणि हे अन्न सर्व करायला लागणारी भांडी त्याचे वेगळे चमचे.
- नाश्ता खायला पेपर प्लेट्स आणि आपले नेहेमीचे चमचे.
- चहा कॉफी इ करता १२ कप्स (कमीतकमी) आणि चहा गाळायला जरा मोठ्या आकाराची गाळणी.
- मध्यम मोठ्या गार्बेज बॅग्ज

सकाळचं खाणं -
पोहे, उपमा, इडली, उत्तपम, थालीपीठं, चिवडा- लाडू, कुठल्याही प्रकारचे पराठे, तांदळाची उकड, उकडपेंडी, साबुदाण्याची खिचडी, चालत असेल तर ब्रेड - बटर - जॅम, ऑम्लेट्स; टोमॅटो ऑमलेट्स इ. एखाद दिवस नाश्त्याला ढोकळा, समोसा कचोरी असं काही मागवता येईल

जेवण -
- उकडलेल्या बटाट्यांची पिवळी भाजी, मटकीची उसळ, पुर्‍या, श्रिखंड्/आम्रखंड, मसालेभात, ताक, खमंग काकडी
- वांग्यांचं भरीत, भाकरी (कुठलीही - ज्वारी/बाजरी इ), मिरच्यांचा ठेचा/खरडा, लाल भोपळ्याचं भरीत, साधं वरण आणि भात, गुलाब जाम
- आलू प्राठे, दही आणि आमटी भात, दुधी-हलवा
- भरली वांगी, पोळी, कढी, साधं वरण, भात, कांदा - टोमॅटोची कोशिंबीर, काला जाम किंवा पीस वाईज कुठलंही गोड
- फ्लॉवर, बटाटा, मटार, टोमॅटो मिक्स सुकी भाजी, चपाती, आमटी भात, कुठलीही कोशिंबीर, चमचम
- मटार उसळ, फुलके, मुगाच्या डाळीची पातळसर खिचडी, गाजर हलवा, कुठलही ताजं लोणचं
- पत्ताकोबीची सुकी भाजी, पालकाची पातळ भाजी, कढी, साधं वरण भात, पुरण, गाजराची कोशिंबीर, डाळीचे वडे किंवा कांदा भजी आणि पुरण
- लाल भोपळ्याची बाकर भाजी किंवा कोफ्ता करी, आमटी भात, फुलके, गाजर किसून वाफवून दह्यातली कोशिंबीर, कणकेचा शिरा
- पाटवडी रस्सा, साधं वरण भात, पोळी, काकडीची दह्यातली कोशिंबीर, खव्याच्या पोळ्या
- मेथीचे पराठे, डाळीची दह्यातली चटणी, कुठलाही पांढरा पुलाव, टोमॅटो सार, जिलेबी
- तुरीच्या ओल्या दाण्यांची आमटी, भाकरी, कांद्याच्या पातीचा झुणका, वरण भात, भाजलेल्या मिरच्या, डिंगर्‍या (मुळ्याच्या शेंगा) तोंडी लावायला, दही
- चिकन ग्रेव्ही, पोळ्या, भात आणि दह्यांतली कोशिंबीर
- अंडा करी, थोड्या पोळ्या, चिकन बिर्यानी, कचुंबर
- माश्यांची करी, तळलेल्या तुकड्या, तांदळाची भाकरी, भात आणि सोलकढी
- भरप्पूर कोथिंबीर मिळत असेल आणि घाट घालायचा असेल तर, कोथिंबीरीची पुडाची वडी - श्रीखंड (इथे साधं श्रीखंडच हवं), साधा भात आमटी आणि हवंच असेल तर भाजी-पोळी
- पनीर ची ग्रेव्ही, पोळ्या, भात - आमटी किंवा साधं वरण, रबडी

संध्याकाळी
- पावभाजी, दहीबुत्ती (फार गारठा असेल तर पातळसर खिचडी)
- भरपूर भाज्या घालून केलेली खिचडी, पापड, कुरडया, सांडगे इ तळून एखादी कोशिंबीर
- दलीया खिचडा (चालत असेल तर)
- बिशिबेळे राईस जरा सढळ साजुक तूप, तळलेले काजू वगैरे घालून
- सांबार - राईस, बाजूला तोंडी लावायला कुठलीही परतून केलेली सुकी भाजी
- पिठलं - भात
- वरण फळं (ही भरपूर लागतात, करणार असाल तर); यावर घ्यायला ताजी शेंगदाण्याची लसूण घालून भरड चटणी
- मिसळ
- टोमॅटो सूप, कॉर्न चाट, कुठलाही पुलाव (पनीर चे क्यूब्स, भाज्या घालून केलेला)
- बिर्यानी, कचुंबर, मिर्च का सालन

यामध्ये सकाळी केलेल्यांपैकी काही बाकी असेल या हिशोबाने संध्याकाळचा मेन्यू करता येईल. काही बदलही करता येतील नक्कीच.
नॉनव्हेज चालत असेल तर मग अजून बरेच पर्याय मिळतील. शक्यतो सगळ्या जेवणांत वरण-भात किंवा भाताचा प्रकार आवर्जून येइल हे पाह्यंलंय कारण बहुतेकांना वरण भात नसेल तर जेवण अपूर्ण वाटतं.

रोजचे लागणारे प्रकार-
- दूध २ लिटर (चहा कॉफी,
- दही १ किलो (थोडंफार मागेपुढे)

रीसेंटली हा अनुभव घेतला आहे आणि वर दिल्यापैकी बहुतेक मेन्यू काँबो केले आहेत.

योकु, चरणकमल कुठे आहेत? माझ्याच्याने नोकरीउद्योग करून ही इतकी खातीरदारी कितिही आव्डत्या लाडाच्या पाहुण्यांची देखिल व्हायची नाही.

पण बेत अफाट अहेत एकेक.

योकु! तुझा साइड बिझनेस केटरिन्गअचा आहे का? अरे किति ते परफेक्ट नियोजन ( रोज रोज गोडाच प्रयोजन मात्र कळल नाही ) १० दिवसात ३-४ वेळा गोड चिक्कार झाल.
रात्रि/दुपारी
ईडलि साबार चटणी
वडा-साबार-चटणी
पाव-भा़जी पण चालुन जाइल

योकु __/\__
मला पोस्ट फार आवडली ( मी आयुष्यात कधीही इतकं करणार नाही कोणाच साठी ही वेगळी गोष्ट)
राजसी, १० दिवस १०-१५ लोकं ऐकुन च गरगरलं मला.. त्या लोकांची मदत मिळेल अशी आशा आहे. कारण नुसता स्वयंपाक हा फॅक्टर नाहीये, नंतर भांडी घासा, कपडे धुवा वगैरे पण गोष्टी आहेत्च
तुम्हाला एक खडुस सल्ला देते - फार चांगल्या होस्ट बनायला जाउन स्वतःचे हाल करुन घेउ नका.. आपल्याकडे पाहुणे येतायेत तर आपल्याला पण आनंद मिळायला हवा. जमेल तेवढंच करा.

बर्‍याचदा आपण म्हणतो बाहेर ऑर्डर द्या, बाहेरुन मागवा पण हा जगात सगळा सोप्पा उपाय आहे, सल्ला विचारणार्‍याला तो सुचला नसेल असं का वाटतं आपल्याला? काही कारणांनी ( आर्थिक, शारिरिक वगैरे) तो जमणार नसतो म्हणूनच इथे विचारलं जातं ना Happy

मला वरच्या पोस्ट्स वाचुन भारी वाटलं, मला महिन्याचा मेन्यु ठरवता येईल यात

प्राजक्ता, नाही बिन्नेस वगैरे नाही. प्रत्येक मेन्यूत गोड म्हणजे भरपूर असं नाही. पर हेड लहान सर्वींग अश्या हिशोबानं.
दोन लोकं कामं करायला होती + आमची थोडीफार मेहेनत इ. मुळेच हे झालं.

रीया, मॅनपॉवर लागतेच बाहेरून जेवण मागवलं असेल तरीही. आलेलं अन्न कमीतकमी सर्व तर करायला लागतंच की. पुन्हा पोर्शन्स चे प्रॉब्लेस होतात कधीकधी हे अनुभवलंय. सो पोळ्या, भाकरी प्रकार कुणाकडून तरी करवून घेणे किवा बाहेरून आणणे + गोडाचं बाहेरून आणि बाकी घरी करणे यावर गाडी फिक्स झाली आहे आता.

सिंडाक्का नक्की घाला धाड!

नाही बिन्नेस वगैरे नाही>> अरे गम्मत करत होते पण अगदी ऐस्पैस मेनु वाचुन कणभरही नवल वाटल नाही, सासर माहेर दोन्ही देशस्थ, भरपुर पादर्थ, भरपुर लोक आणी त्याच्या वरताण भरपुर घोळ ही वैषिश्ठ आहे

प्राजक्ता, एवढा तपशिलात मेनु दिला त्यानं, स्वतःच्या घरी प्लॅनिंग कसं केलं ते पण लिहिलं आणि हे सगळं वाचून तुला काय आठवलं तर देशस्थांचे घोळ? Uhoh

योकु, खूप छान सविस्तर पोस्ट.
इतकं सगळं करायला टीम असेल तरच अर्थ आहे. एका माणसानं हे सगळं करणं हा मात्र अन्याव आहे.

धन्यवाद सोनाली, मंजुताई, योकु, मेधा, स्वाती, देवकी, प्राजक्ता धन्यवाद. योकु detailed menu साठी खूप धन्यवाद.
रोज एक गोड हे खूप आवडलेलं आहे ( काही वर्षमपूर्वी तीन चिल्लर आले होते आणि मी पहिला दिवस वगळता अजिबात गोड प्लॅन केलं नव्हतं) आमचं चिल्लर रोज भाजी, आमटी बरोबर पोळी खायचं त्यांच्या वयाचं असलं तरी, ही मुलं ढिम्म कशाला हात लवायला तयार नाहीत. त्यांच्यापैकी एक आई म्हणे - त्यांना टिपिकल ब्राम्हणी लागतं (मग हे काय केलंय?!) नवरा उठला साखर-गुळाचे डबे, केळी-दूध-दही, जॅम घेऊन आला, दोन मिनिटात जेवण संपलं! (त्यांचे लाड केलेले बघून आमचं चिल्लर रडायला लागलं मला तुम्ही कधी असं देत नाही!)

मुलांना विचारा हे पण आवडलेलं सजेशन. दोनच दिवसांच प्लॅन करून मग बाकीचं विचारून हे पण आवडलं आहे.

नॉन-व्हेज (ऑम्लेट सोडून) खात नाही. शक्यतो डोसे, थालीपीठ इ.गरमगरम बेत करणार नाही. खूप वेळ मोडतो आणि unending प्रोसेस होते.
पथ्यमुळे रोज प्रत्येक जेवणात भाजी (पालेभाजी ऍड करता येईल, जरा निवडायचा प्रॉब्लेम होऊ शकतो) हवीच त्यामुळे पनीर, छोले केले तरी भाजी करावी लागणार( बटाटा वर्ज्य) तर पनीर-छोले-उसळ रात्री करता येईल (सकाळची वाटीभर भाजी बाजूला काढून).

चिवडा/शेव अशी ऑर्डर दिली आहे इतर वेळेला तोंड चालवायला.

हॉटेल किंवा ऑर्डर हे मी तरी ह्यावेळेस ब्र काढणार नाही किंवा प्लान पण करणार नाही. सगळं एन्जॉय करायचं आणि वर हॉटेलिंग करतात म्हणायचं, राजसी म्हणजे हॉटेल आणि ऑर्डर एक्स्पर्ट म्हणायचं!

मुख्य अडचण मदतीची असणार आहे कारण दीड आणि अडीच अश्या चिल्लर च्या आया busy असणार. एक मोलकरणी आंध्राला चालली आहे, वेळेत परत येईन म्हणाली आहे, बघू! दुसरीने अजून तरी सुट्टीचे सूतोवाच केलेले नाही. ऐनवेळेस एखादीला पूर्ण वेळ थांबणार का वरकामाला ते विचारणार आहे. जेवायची तयारी घेणं-आवरणे, ओटा, चहा-खायला नेऊन देणं अश्या मदतीला थांबली तर बरं!

इतकं सगळं करायला टीम असेल तरच अर्थ आहे. एका माणसानं हे सगळं करणं हा मात्र अन्याव आहे.>>>>
अनुमोदन.
येणार्या पाहुण्यांनीसुद्धा थोडी मदत केली पाहिजे.

राजसी म्हणजे हॉटेल आणि ऑर्डर एक्स्पर्ट म्हणायचं! >>>>
म्हणेनात का. खरं सांगू का, मदत नसेल तर एवढं करायचा अट्टाहास करु नका. झेपेल असे साधे मेन्यू करा. अन्यथा तुम्ही पाहुण्यांबरोबर काहीच एंजॉय करु शकणार नाही आणि चिडचिड होत राहिल. (अनुभवाचे बोल)

मामाच्या गावाला जाऊया >>>>
मामाची बायको सुगरण
रोजरोज पोळी शिकरण Wink

योकुटल्या , विकतची मशीन मेड चपाती, भात आणि न जमलेली बीन्सची भाजी खात होते कि रे. गिळेना आता तुझा मेनु वाचून. खरच खुप छान लिहलं आहेस.
अन्नपुर्णा मध्ये असे मेनु लिहिले आहेत. माझे 'फील गुड रिडींग' आहेत ते. LOL वाचून इतक बरं वाटत. करत काही नाही त्यातल ते जाऊदे. Happy

योकू मस्त पोस्ट व नियोजन. रात्रीतूनच वाचून काढले होते.
महत्वाचे म्हणजे होस्टेसची खूप धावपळ होते. पा हुण्यांबरोबर फिरायचे पण व दमून आल्यावर सर्वांना लगेच खायला हवे असते.

मुख्य म्हणजे जास्तीच्या चादरी, गाद्या व पांघरुणे ह्यांची सोय करून ठेवा व वॉशिन्ग मशीन चालते आहे ना ते चेक करून घ्या नाहीतर कपड्यांचा फार राडा पडतो. एकदा आमच्याक डे एक चौकोनी कुटुंब प्रत्येकी पाच चपला घेउन आलेले. घर भर त्या चपला ?! व मशीन चालत नव्हते. दोन तीन बादल्या धुणे रोज धुवावे लागत होते.

डायनिग टेबल वर टिशू नाहीत म्हणून एका बाईंनी नाक मुरडले होते.

तिखट मिठाची पुरी विसरलात का मुलांनो. लवकर होते. अडीला नडी नडी. मिसळ पाव क ट वडा हे मुंबईक रांना चालेल पुणे करांचे माहीत नाही

एक दिवस शादीवाले आलू व पुरी रेसीपी करा. आलू रेसीपी युट्यूब वर आहे.

ग्रीन टी घेणारे काही असतात. ती सोय ठेवा व शुगर फ्री पण घरी ठेवा. काहींना लागते.

नटेला चालत असेल किंवा हर्शीज चॉकोलेट स्प्रेड तर त्याचा उपयोग होतो. ब्रेड वर घालून मुलांना आव ड्ते.
केळ्यांचे काप करोन त्यावर घालून छोटे डेझर्ट पण होते.

हिरव्या मुगाचे डोसे, पनीर चिला, मेथी व पालक पराठे जमल्यास करा.

इडली / कांची पुरम इडली, / रवा इडली होण्यासारखे आहे.

इडिअप्पाम जमल्यास.

योकु, भारी आहे मेन्यु. वाचुनच छान वाटलं.
राजसी, तुमची भाचरं /पुतणे/ण्या म्हणजे फरतर टीन्स असतील. (माझीही दोन्ही घरची टीनेजर्स आहेत.)
ह्या वयातली मुलं असं जेवण आवडीने खातात? म्हणजे रोज आमटी भात पोळी भाजी च हवंय म्हणून म्हणते.
आमच्यांना पाहुणे म्हणुन आल्यावर पास्ता, बिरयाणी, कधी पिझ्झे, सॅन्ड्विच, कधी बाहेरचं मागवा वैगेरे लाड येतात.
भोपळा भाजी वरण भात फ्लॉवर भाजी वैगेरे ब्घुन नाकं मुरडणंच जास्त होईल.
चिकन करी, अंडा करी, पनीर ग्रेव्ही, छोले ग्रेव्ही सोबत पोळ्या/ फुलके/ नान/ पुर्‍या/ रोट्या, जीरा राइस
इतर बिर्याण्यांमधे चिकन बि, अंडा बि, पनीर बि, वेज बि, सोबत रायता, गुजा
पुरी भाजी, आलु, मेथी, गोभी, पनीर, चीज पराठेसोबत दही/छुंदा, दाल फ्राय जीरा राईस, फ्रायम आयटम्स.
पावभाजी, पाणी पुरी-शेवबटाटा पुरी, मिसळ पाव, चीज मका दाणे सॅन्ड्विच, वेज सॅन्ड्विच, पनीर सॅन्ड्विच ग्रील करुन / टोस्ट करुन
ह्या काही सजेशन्स. बाकी पोळी भाजी वैगेरे योकुंनी आयडीया दिल्यातच Happy
गोडात गुजा, रबडी, आइसक्रीम्स, कस्टर्ड.

योकु...काय सजेशन्स..! एकदम भारी! Happy
हा प्लॅन जनरलीच सगळ्यांना लागू होईल....!
किती ते काटकोर नियोजन..!!
खरंच तुमच्या कडे पाहुणे बनून यायला आवडेल.

Pages