युक्ती सुचवा युक्ती सांगा- ५

Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04

युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ शिवाली
कपकेक्स वर चॉकलेट स्प्रेड लावून त्यावर मार्शमेलोस किंवा जेम्स च्या गोळया ,ड्रायफ्रुटस , चॉकलेट रोल्स आणि फळांच्या फोडी असे कॉम्बिनेशन करून पसरवता येईल फळांच्या फोडी टूथपिक वापरून अडकवता येतील

मला काकड्या किसत बसण्यापेक्षा पब्लिक ला बारीक काकडी चकत्या खाऊ घालायला आवडेल ☺️☺️☺️
तसेच मक्याच्या कणसाची उसळ मला आवडते, पण किसण्या योग्य गावरान कणसे हल्ली मिळत नाहीत. स्वीट कॉर्न किसून पाणी पाणी होते.रक्त आटवून 3 चमचे खाऊ बनतो आणि संपतो.शिवाय गोड लागतो हे दुःख वेगळे.

मला काकड्या किसत बसण्यापेक्षा पब्लिक ला बारीक काकडी चकत्या खाऊ घालायला आवडेल>> आपल्याला लाख आवडेल हो .. मी तर पात्तळ चकत्या कापून गुंडाळून फुलं बनवेन , काट्याने रेघोट्या मारून डिझाईन काढेन, काकडी कोरून मगर बनवेन वगैरे अमिष दाखवले .. पण ते रायतं च धरून बसले आता मी काय करू .. जौद्या झालं .. Happy

जाऊदेच.
बसा म्हणावं किसलेल्या काकड्या खात आणि ढेकर देत ☺️☺️☺️
आपण टोमॅटो घातलेले पिझझे खाऊ.

आपण टोमॅटो घातलेले पिझझे खाऊ.>> खरा खरा पिझ्झा का ? नक्की ना ? कि मागच्यासारखा खमंग काकडीचा पिझ्झा ? आणि काकडीची भेळ ?

कोशिंबिरीसाठी काकडी किसणीवर किसणार्‍या काकवांचा (घ्या. भर्पूर क झाले) मला भयंकर Angry येतो.

काकडी विळीवर चोचून्/कोचून कोशिंबीर केली पाहिजे.

किसलेल्या काकडीचं टेक्श्चर इतक फडतूस लागतं तोंडात. सगळा क्रंच निघून जातो.

किसलेल्या काकडीबद्दल आरारांशी सहमत. पाणचट लागते अगदी. माझ्याकडच्या चॉपर वर अगदी सेम नाही पण बर्‍यापैकी जमते काकडीचे ते टेक्स्चर.

किसलेल्या काकडीचा दही / सावर क्रीम घालून रायता खूप छान होतो. या प्रकारच्या रायत्यासाठी किसलेलीच काकडी हवी. खूप छान मिळून येतो रायता. अंजली, हा रायता आदल्या दिवशीही करुन ठेवता येतो.

का ची को करायची असेल फोडणी - दाकु घालून तर मात्र कोचवलेली काकडीच हवी. ही देखील आदल्या दिवशी कोचवून रेफ्रीजरेटर मधे ठेवावी आणि बाकी सर्व पदार्थ - फोडणी, दाकु, मीठ , साखर इ. - ऐनवेळी घालावे.

तयारी - मोठ्या गाळण्यात ४/५ टेबलस्पून्स दही घालून पाणी निथळण्याकरता ठेवून द्यावं. फ्रिजातच ठेवलं तर उत्तम.
काकड्या ३ मध्यम आकाराच्या शेंडा-बुडखा काढून किसून घ्याव्यात. जबरी घट्ट पिळून पाणी काढून घ्यावं. ह्या पाण्यात हिंगाची चिमूट आणि मीठ घालून प्यायला मस्त लागतं.
पिळलेल्या काकडीत आता पूर्ण पाणी निघालेलं दही घालावं आणि मग चवीनुसार मीठ साखर घालून नीट हलवून घ्यावं. अजिबात पाणी न सुटलेली का ची को तयार. लगेचच वाढून संपवूनच टाकावी. साखर-मिठामुळे नंतर पाणी सुटणे वगैरे प्रकार होतात सो सगळी तयारी करून वेळेवरच करावं आणि संपवून टाकावं.

देव्हारा विसर्जित कसा होणार? तो लेकमध्ये विरघळून जाईल का? असो.
काकडी को/चोचवण्याबद्दल डॉ ना +100
फाईन नाईफ वापरून काकडी को/चोचवता येते. वेळ जास्त लागतो (मला).
योकु, का च्या को ला सणसणीत तापलेल्या लोखंडी पळीत फोडणी नाही का द्यायची वरून? Lol

देव्हार्‍याबद्दल वत्सलाशी सहमत. फेकून द्या, नसेल द्यायचा तर तोडून मटेरिअलचा रियुज करा. आधी बोलत न्हवतो कारण हल्ली स्वस्त झालेल्या भावना दुखावतात लोकांच्या.
येस. काकडीच्या दह्यातल्या कोशिंबिरीला फेसलेली मोहोरी लावली की अप्रतिम चव येते. मी कधी केलं नाहीये, पण आजी करायची. इथे गुज्जू किंवा पंजाबी उपहारगृहात मिळतं असं रायतं.

कोचवलेल्या काकडीला पिळून घेतल्यावर थोडस्सं तूप हलक्या हाताने चोळायचं - पाणी सुटत नाही.

फेसलेली मोहरी आणि चिंचगूळ घालून केलेली काचीको अफाट मस्त लागते! (यात नो दही!) लाडात आलात तर थोडे डाळिंबाचे दाणेही घालायचे त्यात.

अंजलीचा ( कूल नाही, कंपनीचं नाव) कटिंग बोर्ड असतो त्याचं ब्लेड उलटं करून त्यावर काकडी कोचवता येते. ( मी कोचवत नाही शक्यतो Wink किसूनच करते ते सोडा, पण कोचवता येते हे महत्त्वाचे ) . पण फूटभर लांबीच्या १५ काकड्या कोचवायला १५ जण असतील तर ठीके Happy

देव्हारा तळ्यात विरघळला का पाहिजे? नाही विरघळला तरी प्रदूषण घडेल का? संगमरवर हा मूळात मेटामॉर्फड 'सेडिमेंटरी रॉक' आहे (मराठी शब्द माहिती नाही). जसा निर्माण झाला तसा पाण्याच्या तळाशी पडून राहिल. लागलाच जेम्स कॅमरूनच्या हाती तर निघेल ही सिनेमा...

VB, madhura's kitchen chaa थंडगार खमंग काकडी हा व्हिडिओ बघा.
Kakadee koshimbeer असं गुगल केलंत तर वरचा व्हिडिओ दिसेल.
लिंक इथे देता येत नाहीये.

का चि को... >> चीनकि/ कोरियन नाव अशीच असतात Happy त्यंनी माबोवरुन ढापली असतील असं वाटायला लागलं आहे आता

Pages