Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04
युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा
या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आम्ही काकडी भेळ घरी बिरी करत
आम्ही काकडी भेळ घरी बिरी करत नसतोय.फक्त हॉटेलं आणि दुकानं माहीत असतात >>>
आमच्या कोपऱ्यावरच्या दुकानात चाट भेळ नावाने सुक्या भेळेचे पाकीट मिळते. त्याची सलाड घालून भेळ मस्त होते त्यात मी कांदा, टोमाटो, उ. बटाटा, काकडी घालते मस्त लागते अशी भेळ, बाकी थोडा ठेचा घालते. सांगायचा मुद्दा काय, छान लागते काकडी भेळेत . त्यात बीट, गाजर आणि कैरीच्या दिवसांत कैरीपण घालते.
बारीक चिरलेली कैरी, बारीकच
बारीक चिरलेली कैरी, बारीकच हिरव्या मिरच्या, कांदा, कोथिंबीर अशी भेळ काय भारी लागते.
कैरी, कच्चा कांदा, हिरवी
कैरी, कच्चा कांदा, हिरवी मिरची घातल्यावर काय बिशाद आहे काहीही वाईट लागण्याची!
अय गपा की जरा... पाणी सुटलंय
अय गपा की जरा... पाणी सुटलंय निस्त...
दाण्याचं कूट घातलेला थाय करंच
दाण्याचं कूट घातलेला थाय करंच पिझा भारी लागतो. तूप जिऱ्याची चुलीवरची फोडणी ही मात्र अस्सल पुणेरी (रीड: .... जाऊद्या) आवृत्ती असेल.
नॉन पुणेकर मोड ऑन:
नॉन पुणेकर मोड ऑन:
काहीही करतात बुवा.आज भेळेत काकड्या घालताय.उद्या पिझ्झा वर काकडी कोचवून घालून दाणेकूट घालून तुपहिंगजिरे फोडणी द्याल!!>>>
अॅकच्युली अनु, चांगली आयडिया आहे ही.
रंगासेठ रस्सम शक्यतो नको.
रंगासेठ रस्सम शक्यतो नको. त्या ऐवजी दुध,मऊ गरम भात आणि मेतकुट. किंवा गोड लिंबाच लोणच. शक्य असेल तर कोमट पाणि दिवसभर प्यायला.
किंवा पिझ्झा वर शेवग्याच्या
किंवा पिझ्झा वर शेवग्याच्या शेंगा आणि कढीपत्ता चटणी ☺️☺️☺️
किंवा दोडकी घोसावळी पडवळ टॉपिंग
किंवा शेपू अंबाडी
अहो मायबोलीवर किन्वा, ओटमिल
अहो मायबोलीवर किन्वा, ओटमिल घालून इन्स्टंट पॉट मध्ये पिटझा केला की तो हिट होणार.
गप. जरा चांगल म्हटलं तर
गप. जरा चांगल म्हटलं तर ,लग्गेच दहा पतंग घेवून आलीस उडवायला.
आता चांगलं म्हटलंय ना, मग
आता चांगलं म्हटलंय ना, मग गुमान खायचे बाकीचे हेल्दी पिझ्झा.व्हिटामिन मिळतात.अँटी एजिंग होतं.मराठी भाज्या पोटात जातात.बळीराजा चा फायदा होतो.असं शास्त्र असतं ते ☺️☺️☺️
देवा! पिझ्झ्यावर शेवग्याच्या
देवा! पिझ्झ्यावर शेवग्याच्या शेंगा अन कढीपत्ता!
पण अॅकच्युअली डुएबल आहे. थिक डोसा विथ क्रंची क्रस्ट आणि सांबार स्प्रेड बनवून त्याचा सॉस म्हणून वापर + टॉपिंग म्हणून या भाज्या. काही वैट नाही लागायचं... गन पावडर चे सॅशे सोबत (इतालिअन अर्ब्स ऐवजी)
देऊ का आयड्या त्या डॉमिनोज च्या गादी कारखान्याला?
डॉमिनोज च्या गादी कारखान्याला
डॉमिनोज च्या गादी कारखान्याला? >>>>> वाईट्ट हसले
(No subject)
माझा एक प्रश्न आहे पण किचन शी
माझा एक प्रश्न आहे पण किचन शी
संबंधित नाही...नियमात बसत नसेल तर उडवून टाका.
माझ्याकडे जुना संगमरवरी देव्हारा आहे...जो वापरत नाही
भेगा पडल्या आहेत त्याला...खूप जड आहे...तो विसर्जन ही करता येत नाहीये....म्हणजे लेक पाशी घेऊन गेलो होतो..वॉचमन ने विसर्जन नाही करू दिला ..
काही उपाय आहे का..देव्हारा असल्यामुळे कुठे टाकूनही देता येत नाही आणि घरात असा भंगलेला देव्हारा ठेवायला नको वाटतंय.
प्लीज काही उपाय असेल तर सांगा...
आधी वॉचमनचे विसर्जन करा मग
आधी वॉचमनचे विसर्जन करा मग देव्हार्याचे
ओटा/कडप्पाचे काम करणारे कोणी कंत्राटदार बोलावून त्यांना घेऊन जायला सांगा/ तुकडे पाडून द्यायला सांगा.
अंगण / बाल्कनी असेल आणि
अंगण / बाल्कनी असेल आणि थोडीफार झाडं असतील तर डेकोरेशन म्हणून वापरता येईल. तुळस, दिवा असं ठेवायला किंवा त्याच्यात छोटे शोभेचे झाड/ वेल लावायची काही महिने झाले की पानांनी पूर्ण झाकला जाईल.
सीमंतिनी आणि राजसी .
सीमंतिनी आणि राजसी .
लगेच प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
दोन्ही कल्पना चांगल्या आहेत...नक्की बघते काय करता येईल.
त्याचे पार्ट्स काढून पूर्ण
त्याचे पार्ट्स काढून पूर्ण डिसमँटल करणं जमत असेल तर ते करून पाहा; नाहीतर डागडुजी करून पुन्हा वापरता येत असेल तर तो ही एक पर्याय आहे. शुभ्र संगमरवराचं देवघर फार सुरेख दिसतं. पुण्यात असाल तर भोसरी नंतर नाशिक रोड वर बरेच संगमरवराचे काम करणारे कारखाने आहेत. तिथे चौकशी करून काही करता येत असेल तर पाहा. ते लोक्स ट्रान्सपोर्ट करत नाहीत पण; तुम्हालाच कारनी वगैरे ने-आण करावी लागेल...
धन्यवाद योकु
धन्यवाद योकु
तेच करणार आहे....कात्रज हायवे ला बरेच देव्हारे बनवायचे कारखाने आहेत ...तिथे घेऊन जाणार आहे
.देव्हारा असल्यामुळे कुठे
.देव्हारा असल्यामुळे कुठे टाकूनही देता येत नाही आणि घरात असा भंगलेला देव्हारा ठेवायला नको वाटतंय. प्लीज काही उपाय असेल तर सांगा >>> घरी बागकाम करत असाल तर त्या देव्हार्याच्या बारीक कपच्या करा (संगमरवर ठिसूळ असतो. पटकन होतील तुकडे) आणि कुंडीत मातीवर पसरवून ठेवा. सुंदर दिसतात. एरीका पाम, सक्युलंट्स असतील तर मस्तच दिसतात.
चांगला उपाय माधव....धन्यवाद
चांगला उपाय माधव....धन्यवाद
म्हणजे तुम्ही तो देव्हारा
म्हणजे तुम्ही तो देव्हारा कुठेही टाकू नये म्हणून लेकमध्ये (बहुदा उपवन) टाकणार होतात? कमाल आहे! Watchman चे आभार मानले पाहिजेत तुम्हाला तसे न करू दिल्याबद्दल!
वर काकडीच्या कोशिंबीरीची चर्चा वाचली. यजमानांनी तुम्हाला का ची को करून आणण्याऐवजी दुसरा सुटसुटीत पदार्थ आणायला सांगायला हवे होते. कोशिंबीर वेळेवर करण्याचाच पदार्थ आहे.15 काकड्या किसायला कितीसा वेळ लागतो?
वत्सला...विसर्जन करायला...
वत्सला...विसर्जन करायला....टाकायला नाही...
देव्हार्याचे विसर्जन का
देव्हार्याचे विसर्जन का करावे लागते? अगदी शोभेच्या मूर्ती, कॅलेंडर्स असतील तरी त्यांना नेऊन पाण्यात बुडवायची भलती सवय आपल्याकडे आहे. अहो, त्या देव्हार्याची प्राणप्रतिष्ठा करून त्याला देवत्व मिळालंय का?
मला कपकेक डेकोरेशनच्या सोप्या
मला कपकेक डेकोरेशनच्या सोप्या आणि झटपट आयडियाज सुचवाल का प्लिज? भारतात करता येण्यासारख्या. कपकेक विकतच आणणार आहे. थोडक्यात म्हणजे क्रिम फ्राॅस्टिंग असं काही घरी न करता. सहज उपलब्ध होणार्या साहित्यातून.
क्रीम किंवा फ्रॉस्टिंग शिवाय
क्रीम किंवा फ्रॉस्टिंग शिवाय सोप्पे म्हणजे नटेला किंवा तत्सम स्प्रेड, जॅम,चॉकलेट किंवा कॅरॅमल सिरप, स्ट्रॉबेरी सिरप, मध, गुलकंद इ इ.. यावर टॉपिंग्ज साठी फळं, ड्रायफ्रूट, चॉकोचिप्स, रेनबो स्प्रिंकल असे काही वापरता येईल. चॉकलेट कपकेकवर नुसती पिठीसाखर भुरभुरून पण चांगलं दिसतं. (पण हे ऐनवेळी केलेले बरं)
देव्हार्याचे विसर्जन का
देव्हार्याचे विसर्जन का करावे लागते? अगदी शोभेच्या मूर्ती, कॅलेंडर्स असतील तरी त्यांना नेऊन पाण्यात बुडवायची भलती सवय आपल्याकडे आहे. अहो, त्या देव्हार्याची प्राणप्रतिष्ठा करून त्याला देवत्व मिळालंय का?>>>>>> वर्षानुवर्षे आणी पिढ्या दर पिढ्या लोकांच्या मनात देवाची भीती बसल्याने तसे होते. खरे तर फोटो पेक्षा मुर्तीवरच अभिषेक होत असल्याने त्यांचे विसर्जन योग्य ( जर मुर्ती भंगली असेल तरच ) पण देव्हारा तुटल्यास इतके मनाला लावुन घेऊ नये.
मला राजसीचा पर्याय फार आवडला. बाकीच्यांनी पण छान उपाय सुचवलेत. अंगणात तुळस त्यात ठेऊन संध्याकाळी दिवा/ पणती लावली तर काय मोहक दृष्य असेल !! खूप छान पर्याय !!
Cupcake: Hershey chocolaye
Cupcake: Hershey chocolaye spread is amazing. also try royal icing. very easy to make. and then put marzipan flowers on it
वर काकडीच्या कोशिंबीरीची
वर काकडीच्या कोशिंबीरीची चर्चा वाचली. यजमानांनी तुम्हाला का ची को करून आणण्याऐवजी दुसरा सुटसुटीत पदार्थ आणायला सांगायला हवे होते. कोशिंबीर वेळेवर करण्याचाच पदार्थ आहे.15 काकड्या किसायला कितीसा वेळ लागतो?>>> वेगवेगळे पदार्थ न्यायचे होते छोले , बटाटा टोमॅटो मटार मिक्स भाजी ,पुऱ्या , भजी , काहीतरी गोड़ , साधा भात , आणि रायता (हा हिंदी शब्द आहे बहुतेक ).. तर रायता कोणीच आणायला तयार होईना .. सगळे छोले आणि मिक्स भाजीच आणि भात करू म्हणायला लागले .. उरता उरले गोड आणि रायता ..
15 काकड्या किसायला कितीसा वेळ लागतो?>>> हे मला साबा नि सुचवले होते .. पण जिथे न्यायचे होते तो एक हॉल होता जिथे लांबलचक टेबले मांडून सगळ्यांचे एकत्र करून सांस्कृतिक कार्यक्रम झाल्यावर जेवायचे होते .. तिथे आता मी काकड्या कुठे किसत बसू !?.. कसं दिसेल ते ! १५ मोठ्या काकड्या हो फूटभर लांबीच्या असतात त्या .. २-अडीच किलो रायतं झालं असेल
कोणाच्या घरी किंवा बागेत असा नव्हता प्रोग्राम .. बरीचशी अनोळखी माणसे असणार होती दिवाळी निमित्त कार्यक्रम होता
शेवटी पुऱ्या कोणीच आणल्या नाहीत त्या ऐवजी रोट्या कि काय होतं आणि गोड पदार्थ विकत आणले असावेत .. आणि भजी च्या जागी इथे फ्रोझन बटाटा टिक्या सारखं मिळतं ते होतं ..
का ची को>>> हसून मेले मी .. खूप दिवसांनी वाचला हा शॉर्टफॉर्म
Pages