Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04
युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा
या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अर्रे भारी आहे चित्र. अमित,
अर्रे भारी आहे चित्र.
अमित,
व्हाइट व्हिनेगर + पाणी यात एक
व्हाइट व्हिनेगर + पाणी यात एक नॅपकिन बुडवून त्याने सर्व शेल्फ्स पूसून घ्या. बेकिंग सोडा एका ताटलीत ठेवून ती फ्रीजमधे ठेवा.
अॅक्टिव्हेट्ड चारकोल असल्या तो सुद्धा ताटलीत घालून फ्रीजमधे ठेवा. १-२ दिवसात वास नाही गेला तर सोडा/ चारकोल टाकून द्या आणि परत फ्रेश बेकिंग सोडा / चारकोल ठेवा त्या ताटलीत.
सीमा, तुरीच्या हिरव्या
सीमा, तुरीच्या हिरव्या दाण्यांची अजून एक रेसीपी देऊन मला दुसऱ्यांदा ती भाजी घ्यायला प्रवृत्त केले आहेस. थँक्स.
योकू आज डिनरला तुमच्या पद्धतीने आमटी केली, गरम भात आणि ती आमटी उच्च कॉम्बिनेशन होतं. मी रोज डिनर स्कीप करते, पण आज मोह आवरला नाही.
अंजली फ्रीजचा वास घालवायला लिंबू अर्ध चिरून ते तुकडे पण फ्रीज मध्ये ठेवतात ना? आणि बेकिंग सोडा तर हमखास उपाय.
उप्स. बे सो. नॉट बे पा. बदल
उप्स. बे सो. नॉट बे पा. बदल केलाय पोस्टीत.
ओके ! धन्यवाद ! बेसो आणि
ओके ! धन्यवाद ! बेसो आणि लिंबू चा प्रयोग करते ..
फ्रिज खरं तर तसा रिकामाच आहे;दुधाचे पॅक दही फळभाज्या एवढंच आहे. सो फ्रिज बेसो च्या पाण्याने पुसणे लगेच शक्य आहे ..आज रात्री बघते करून आणि शिवाय बेसो ठेवते .. मग बघू
खरं तर वास यायला लागल्या नंतर एकदा वेट टिशू मिळतात इथे फर्निचर वगैरे पुसायचे त्याने पुसला होता .. पण..
.. अॅक्टिव्हेट्ड चारकोल आणि व्हाईट व्हिनेगर नाहीये .. सहज मिळालं तर ठेवते ..
धन्यवाद पुन्हा एकदा
कोळसा, अर्ध कापून ठेवलेलं
कोळसा तुकडा, अर्ध कापून ठेवलेलं लिंबू हे फ्रिजमध्ये ठेवायचं. असं माझ्या मावशीने सांगितलं होतं जेव्हा माहेरी आम्ही फ्रीज घेतला होता तेव्हा. त्यामुळे आई कोळशाचा एक लहान तुकडा, लिंबू कापून असं ठेवायची पूर्वी. आता माहिती नाही. मी कापलेलं लिंबू ठेवते.
व्हिनेगर वाटीत पण ठेवता येईल.
व्हिनेगर वाटीत पण ठेवता येईल.
लिंबू अर्धा कापुन उघडा
लिंबू अर्धा कापुन उघडा ठेवण्याची आयडीया वर्क करते.
बाकीच्या आयडीयाही चांगल्या आहेत. लक्षात ठेवेन.
बाकी, काकडीचा रस असा स्टोर करुन दुसर्या दिवशी पिणं चांगलं असतं का आणि दीडेक लिटर रस काढुन झाल्यावर काकडीच्या चोथ्याचा रायता झाला का असे फाटे न फुटता योग्य सल्ले / युक्त्या मिळाल्याबद्दल अंजली कूलचं अभिनंदन
फाटे न फुटता योग्य सल्ले /
फाटे न फुटता योग्य सल्ले / युक्त्या मिळाल्याबद्दल अंजली कूलचं अभिनंदन Light 1 Happy. >>>> माबोकरांच्या विक पॉइंटवरच बोट ठेवलस की
(No subject)
काकडीच्या चोथ्याचा रायता झाला
काकडीच्या चोथ्याचा रायता झाला का असे फाटे न फुटता योग्य सल्ले / युक्त्या मिळाल्याबद्दल>> हो मी आधी शंकीतच होते पण ४-५ दिवस वास जाईना म्हंटल्यावर माझा धीर सुटत चालला होता .. आणि उरलेला धीर जमा करून इथे प्रश्न टाकला
बाकी, काकडीचा रस असा स्टोर करुन दुसर्या दिवशी पिणं चांगलं असतं का आणि दीडेक लिटर रस काढुन झाल्यावर >> कुणास ठाऊक माझा पण प्रयोग च होता पण एवढा रस निघाला कि एकावेळी पिणं हि शक्य नव्हतं थोडासा प्यायलो.. आणि आम्हाला लगेच निघायचं होतं .. जनरली मी कधीच काकडी पिळून रस काढत नाही .. पण १५ लांबड्या इंग्लिश काकड्यांचा किसल्यावर भसाभस रस जमा झाला .. आणि दुपारी केलेलं रायतं रात्री ८ ला जेवायला घेणार म्हणून रस काढला
हो चोथ्याच मस्स्त रायतं झालं त्यात १ सफरचंद आणि डाळिंबाचे दाणे घातले होते बाकी नेहेमीचंच मीठ मध दही ...
पण धन्यवाद पुन्हा एकदा ! २ दिवसांनी सांगते काय होतंय ते
मायबोलीकर मोड ऑन:
मायबोलीकर मोड ऑन:
पॉण काकड्या किसाव्यात कशाला म्हणते मी.
पाहुण्यांना का दात नाहीत?चकत्या करून समोर आदळून गिळा म्हणावे ☺️☺️
चकत्या करून समोर आदळून गिळा
चकत्या करून समोर आदळून गिळा म्हणावे >> नाही ना ! मेनू फिक्स होता त्यात चकत्या नव्हत्या .. तरी मी आगाऊपणाने विचारले होते कि मी काट्याने डिझाईन काढून चकत्या करीन लांबडे काप करीन .. पण मेल्यानी धुडकावून लावलनी
अरे काय एकेक जबरदस्त कमेंट्स,
अरे काय एकेक जबरदस्त कमेंट्स, सस्मितने लिहिल्याबरोबर
फ्रिज मधला काकडीचा वास बराच
फ्रिज मधला काकडीचा वास बराच कमी झालाय ... आता आज/उद्या परत नवीन सोडा आणि नवीन लिंबू बदलून ठेवेन ..
परत एकदा सगळ्यांना धन्यवाद ! _/\_
काकडीचा रस फ्रीजमध्ये
काकडीचा रस फ्रीजमध्ये ठेवण्याच्या पापाचे परिमार्जन म्हणून जंगली महाराज रोड ला जाऊन काकडी भेळ खाऊन यावी. ☺️☺️
@ anjali_kool
@ anjali_kool
काकडीचा रस कडू झाला असेल तर कृपया निमुट ( या शब्दा साठी सॉरी) पणे फेकुन द्या.
काकडी वर्गिय फ़ळे भाज़्यां मधे कुकुरबीटॅसीन असते ज्यातील काही प्रकार विषारी आहेत.
https://www.boldsky.com/health/disorders-cure/2018/cucurbit-poisoning-ca...
https://www.timesnownews.com/health/article/pune-woman-dies-after-consum...
@ Nira अहो तो केव्हाच फेकला
@ Nira अहो तो केव्हाच फेकला लगेच दुसऱ्या दिवशी पण फेकल्यानंतर सुद्धा फ्रिज ला वास येत होता काकडीचा
.. लिकांबद्दल थँक्स
@ mi_anu जंगली महाराज रोड ला जाऊन काकडी भेळ खाऊन यावी>> आता हे कसे जमावावे ? पश्चातापाने चित्तशुध्दी झालेली आहे ... आता तुम्हीच अनुग्रह द्यावा आणि काकडी भेळ कशी करावी हे इथे नवीन पाकृ लिहून मज पामरास शिकवावे .. म्हणजे निदान पापाचे थोडे तरी परिमार्जन होण्यास मदत होईल
आम्ही काकडी भेळ घरी बिरी करत
आम्ही काकडी भेळ घरी बिरी करत नसतोय.फक्त हॉटेलं आणि दुकानं माहीत असतात ☺️☺️☺️
घरी बिरी करत नसतोय>> करा कि
घरी बिरी करत नसतोय>> करा कि वो यक डाव मांज्यासाटी ..
पण खरंच काय आहे हे काकडी भेळ प्रकरण ? आपल्या नेहेमीच्या भेळेत काकडी चोचवून घालायची का ?
माहीत नाही.जंगली महाराज ला
माहीत नाही.जंगली महाराज ला झेड ब्रिज च्या सुरुवातीला कोणाची तरी काकडी भेळ ची सुप्रसिद्ध गाडी पाहिलिय
खाल्ली नाही अजून.
खाल्ली नाही अजून.>>
खाल्ली नाही अजून.>> हात्तिच्या मारी !!.. फुकटच्या शेळ्या हाकतेयस होय !
☺️☺️
☺️☺️
नॉन पुणेकर मोड ऑन:
काहीही करतात बुवा.आज भेळेत काकड्या घालताय.उद्या पिझ्झा वर काकडी कोचवून घालून दाणेकूट घालून तुपहिंगजिरे फोडणी द्याल!!
पाककृती संबंधित नाही पण एक
पाककृती संबंधित नाही पण एक शंका आहे, भयंकर अॅसिडिटी/गॅसेस झाले असताना कम्फर्ट फूड म्हणून "रस्सम भात" खाल्ला तर चालेल काय? वरण भाताचा कंटाळा आलाय. कारण रस्स्म मधे मुख्य घटक चिंच असल्याने शंका आहे.
किंवा दुसर्या कुठल्या धाग्यावर प्रश्न विचारू?
खमंग काकडी पिझ्झा!
खमंग काकडी पिझ्झा!
रंगासेठ, शक्यतो डाळ/ त्याचं
रंगासेठ, शक्यतो डाळ/ त्याचं शिजवलेलं पाणी इ. टाळा. वातुळ असतातच बहुतेक सगळ्याच डाळी. त्यातल्यात्यात पचायला हलकी म्हणजे मूगडाळ. तीही सालीसकट वापरली तर अजूनच उत्तम.
वरचेवर जर पित्ताचा त्रास असेल तर डॉ. ला दाखवा.
शक्यतो, सूदिंग प्रकार खाण्यात नेहेमी ठेवा.
दही, ताक, दूध यांसोबत भात, पोळी इ.
भाज्यांमध्येही तेल मसाले तिखट मर्यादेतच हवं
प्रत्येक जेवणासोबत (दही, ताक) घेता आलं तर उत्तमच. साखर मीठ जेमतेम चवीपुरेसे वापरायचे नेहेमीच.
अजून एक म्हणजे काही टेन्शन्स असतील तर त्यांवर काही उपाय जमू शकेल का ते ही पाहा.
मी कुणी आहार तज्ञ वा डॉ नाही. सर्वसामान्यपणे जे उपाय करता येऊ शकतील ते सुचवलेले आहेत.
खमंग काकडी पिझ्झा Uhoh>>
खमंग काकडी पिझ्झा Uhoh>> थोडक्यात साबुदाण्याच्या थालीपिठावर दही आणि खमंग काकडी घालून खायची हो
धन्यवाद योकुजी, कधीतरीच होतो
धन्यवाद योकुजी, कधीतरीच होतो एवढा त्रास. पण या सूचना ध्यानात ठेवेन.
अॅसिडिटी असेल तर लाह्या
अॅसिडिटी असेल तर लाह्या खाऊन बघा. त्यानं त्रास कमी होइल थोडा. रस्सम खाल्ल्यास घशाची जळजळ वाढेल बहुतेक. वरणानं पण अॅसिडिटी वाढत असेल ना? अजिबात तिखट नसलेली, साधी जिरं-हिंग-कढीपत्ता फोडणी दिलेली मुगाची आमटी किंवा मुगडाळ खिचडी जास्त बरी पडेल.
अर्र नंतरच्या पोस्टी न बघताच
अर्र नंतरच्या पोस्टी न बघताच सल्ला द्यायची घाई केली
Pages