Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नाही. यात तक्रार कुठे आहे?.
नाही. यात तक्रार कुठे आहे?.
थोडे अजून स्पष्ट करतो.... नायक काय तक्रार आहे ते सांगत आहे.
अजून एकhttps://www.youtube
अजून एक
https://www.youtube.com/watch?v=l_g5b_bXhNU
नायिका: साधना
नायिका: साधना
ऐ नर्गिस-ए-मस्ताना, बस इतनी
ऐ नर्गिस-ए-मस्ताना, बस इतनी शिकायत है
बस इतनी शिकायत है
समझा हमें बेगाना, बस इतनी शिकायत है
बस इतनी शिकायत है
बरोबर झिलमील.
बरोबर झिलमील.
सैफ़ अली खान पियानोवर ..सोबत
सैफ़ अली खान पियानोवर ..सोबत विद्या बालन
पियु बोले पिया बोले.. जाने ना
पियु बोले पिया बोले.. जाने ना
परदेशातून आलेली नवीन महाराणी
परदेशातून आलेली नवीन महाराणी प्रजा, सवत आणि महाराजांसमोर राजस्थानी नाच करत आहे.
झुबेदा मधले गाणे का?
झुबेदा मधले गाणे का?
आई किंवा बहिणीचेच रोल करायला
आई किंवा बहिणीचेच रोल करायला जन्माला आलेली सोज्वळ अभिनेत्री मारे पावसात भिजत सेक्सी दिसण्याची पराकाष्ठा करत आहे.
मनोज कुमार 'नेमकी आजच छत्री विसरायची होती च्यायला' असा भाव घेऊन वैतागल्यासारखा भिजत आहे.
--
नायक विमानात बसला आहे. चेहरा आयत्या वेळी लॅव्हेटरीसमोर मोठी रांग लागल्यासारखा चिंतित. खाली दोन बायका आपापल्या खिडकीत उभ्या राहून एकच गाणं म्हणत आहेत.
परदेशातून आलेली नवीन महाराणी
परदेशातून आलेली नवीन महाराणी प्रजा, सवत आणि महाराजांसमोर राजस्थानी नाच करत आहे. >>> घूमर. पद्मावत.
>>> घूमर. पद्मावत.
>>> घूमर. पद्मावत.
नवीन Submitted by फारएण्ड on 5 November, 2018 - 21:44
बिंगो
हे मनोज कुमार चे कोणते आठवत
हे मनोज कुमार चे कोणते आठवत नाही. आधी वाटले हाय हाय ये मजबुरी असेल पण त्यात झीनत आहे. "आई किंवा बहिणीचेच रोल करायला जन्माला आलेली सोज्वळ अभिनेत्री" च्या वर्णनाच्या जितकी दूर असू शकेल तितकी ती आहे![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
"नायक विमानात बसला आहे. चेहरा
"नायक विमानात बसला आहे. चेहरा आयत्या वेळी लॅव्हेटरीसमोर मोठी रांग लागल्यासारखा चिंतित. खाली दोन बायका आपापल्या खिडकीत उभ्या राहून एकच गाणं म्हणत आहेत." -ए चाँद जहाँ वह जाये (शारदा)
"आई किंवा बहिणीचेच रोल करायला
"आई किंवा बहिणीचेच रोल करायला जन्माला आलेली सोज्वळ अभिनेत्री मारे पावसात भिजत सेक्सी दिसण्याची पराकाष्ठा करत आहे.
मनोज कुमार 'नेमकी आजच छत्री विसरायची होती च्यायला' असा भाव घेऊन वैतागल्यासारखा भिजत आहे." - जान-ए-चमन, शोला बदन (गुमनाम)
फेफ - सही! हे अवघड होते. आता
फेफ - सही! हे अवघड होते. आता तुम्ही द्या गाणे पुढचे.
जाने चमन शोला बदन
जाने चमन शोला बदन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चला दुसरं गाणं तरी ओळखा कोणी!
फेफ सही! मी टाईप करेपर्यंत
फेफ सही! मी टाईप करेपर्यंत तुमचं पोस्ट आलं पण!
स्कॉच आणी मोगरा - हे
स्कॉच आणी मोगरा - हे काँबिनेशन ऑफिस मधे शोधायला 'जिगर' लागते.
स्कॉच- जॉनी वॉकर
स्कॉच- जॉनी वॉकर
मोगरा- विनिता भट्ट उर्फ यास्मिन
Mr. & Mrs. 55
जाने कहाँ मेरा जिगर गया जी
अभी अभी यही था किधर गया जी।
मानव पृथ्वीकर - मान गये
मानव पृथ्वीकर - मान गये उस्ताद!! लाजवाब!
मानव - रिस्पेक्ट!
मानव - रिस्पेक्ट!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हिरवीन हिरु च्या हाताला
हिरवीन हिरु च्या हाताला कडकडून चावते आणि पळून जाते तरी हिरो गाणं म्हणतो
स्कॉच आणी मोगरा - हे
स्कॉच आणी मोगरा - हे काँबिनेशन ऑफिस मधे शोधायला 'जिगर' लागते.> >>>> फेफ, भारी
मानव उत्तर पण भारी
ही लोकं काही नवी गाणी द्यायची
ही लोकं काही नवी गाणी द्यायची नाहीत. मीच देते..
हिरो हिरोईन स्कूटर वरून चाललेत. तिला तो आवडतो त्याला मात्र ती आवडत नाही (अगदीच सौमित्रीय झालं :फिदी:)
ओ ताई हे फारच त्रोटक आहे.
ओ ताई हे फारच त्रोटक आहे. अजुन द्या काही क्ल्यु
@रीया..दम लगा के हैशा
@रीया..दम लगा के हैशा
दोघांपैकी एक जण प्रेमाचं
दोघांपैकी एक जण प्रेमाचं महत्त्व पटवतयं तर एक जण प्रेम का करू नये हे सांगतयं..सोबत भन्नाट डान्स.!
जाने क्यु लोग प्यार करते है
जाने क्यु लोग प्यार करते है
बीएस यांच्या कोड्यावरून आठवलं
बीएस यांच्या कोड्यावरून आठवलं:
"तिघांपैकी दोघे जण प्रेमाचे महत्व सांगताहेत, एक जण सगळा फालतुपणा आहे म्हणतोय।"
--------------
रमेश रावल, हिंट द्या आणखी.
Pages