दृश्यावरून गाणे ओळखा

Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Yoo sasmit

धबधब्याच्या पाण्यातून मालाक्का सीन्हा म्हशीची दोरी ओढून बाहेर काढतायेत.. नंतर अचानक ती दोरी सोडून पाण्यात नाचतात. मधेच चेहरा वेडावाकडा म्हणजे
हावभाव लाडीक+ त्रासिक+ चंबू वै. नंतर तिथेच खडकावर बसून कव्वाली!
गोल टोपी घातलेले शम्मीजी तिला उद्देशून सुंदरी हृदय घेऊन गेली अस म्हणतायत.

दिल ले गयी
एक चुलबुली नाझनीन

लाटसाहेब

नोप

धबधब्याच्या पाण्यातून मालाक्का सीन्हा म्हशीची दोरी ओढून बाहेर काढतायेत.. नंतर अचानक ती दोरी सोडून पाण्यात नाचतात. मधेच चेहरा वेडावाकडा म्हणजे
हावभाव लाडीक+ त्रासिक+ चंबू वै. नंतर तिथेच खडकावर बसून कव्वाली!

झुमता मौसम, मस्त महिना
याल्ला याल्ला दिल ले गयी

शिन्मा : उजाला

संपादन (4 hours left)
हेमा मालिनी - फरिदा जलाल - मा. अलंकार
नदीकाठी पाणी भरायला मटके घेउन जाताना म्हणतात

बेचारा दिल क्या करे

शिन्मा : खुश्बु

हेमा मालिनी - फरिदा जलाल - मा. अलंकार
नदीकाठी पाणी भरायला मटके घेउन जाताना म्हणता<<<<
बेचारा दिल क्या करे..
सावन जले भादो जले

जोराचा पाउस पडतोय. अमिताभ जखमेवर डॉ राखी कडून मलम्पट्टी करून घेउन चालला आहे .. परिक्षित धाब्यावर शेकोटीशेजारी बसून गातोय

<<बेचारा दिल क्या करे..
सावन जले भादो जले>>

याच चित्रपटातलं दुसरं गाण खूप सुंदर आहे.. " दो नैनों में आसू भरें हैं निंदिया कैसे समाए"

नायक टांग्यातून जात आहे. नायिका पायवाटेने धावत रस्त्यावर येऊन गाणे म्हणू लागते, तो टांगा थांबवतो...
सोलो ... कृष्णधवल

Sanjeev B राहू द्यायचे असते, दोनही सोडवले असते.
बरेचदा पोस्ट लिहायला घेतली की पूर्ण कारे पर्यंत बराच वेळ निघून जातो, तो पर्यंत इतर पोस्ट्स आल्या असतात.

thanks manav Happy
actually your wordings were correct
i typed it in haste

<<जगाया जगाया
काला पत्थर>>
या गाण्यात आणि "The Fountain Head " मधल्या एका प्रसंगात फार साम्य दिसतं मला. रोअर्क डोमिनिकच्या बाथरूम मधला मार्बल बसवायला जातो तो प्रसंग.

नायक टांग्यातून जात आहे. नायिका पायवाटेने धावत रस्त्यावर येऊन गाणे म्हणू लागते, तो टांगा थांबवतो...
सोलो ... कृष्णधवल
---------------- --------
स्वर्ण लता, करण दिवाण.
गाणे खूप जुने असले तरी सर्वांनी ऐकलेले आहे.

Pages

Back to top