नाम महाधन

Submitted by पुरंदरे शशांक on 24 October, 2018 - 23:04

नाम महाधन

नाम महाधन । देवोनिया भक्ता । केले जी कृतार्था । मायबापा ।।

नाम मुखी येता । लाभे महासुख । जीवासी क्षणिक । प्रभू भेटी ।।

ह्रदी ठसावता । नाम तुज कृपे । संसार नाशिजे । पूर्णपणे ।।

नामरुप जीव । होताचि समाधी । विराली उपाधी । जीवत्वाची ।।

तुजकृपे नाम । राहो मज चित्ती । उरेचिना खंती । ऐहिकाची ।।

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर नाम महिमा ....
एक तत्व नाम दृढ धरी मना |
हरिसी करुणा येईल तुझी ||१||

ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद |
वाचेसीं सदगद जपें आधीं ||२||

नामपरतें तत्व नाही रे अन्यथा ,
वायां आणिका पंथा जाशी झणे ||३||

ज्ञानदेवा मौन जप-माळ अंतरी,
धरोनी श्रीहरी जपे सदा ||४||